Skip to main content

शशक'२०२२ - स्क्रीनटाईम

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 07/05/2022 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या वाढत्या स्क्रीनटाईमच्या व्यसनाबाबचा मानसोपचारतज्ञाने दिलेला रिपोर्ट वाचून होताच बायोटेलीपोर्टेशनतज्ञ डाॅ गफलावाला मला म्हणाले," तुला या व्यसनातून कायमचं सोडवीन मी . फक्त माझ्या एका प्रयोगात स्वेच्छेने सहभागी होतोयस असं लिहून सही कर इथे" "काहीही करीन सर पण..." सही करताना मी म्हणालो. "गुड. हे हेल्मेट घालून या होलोग्राम प्रतिमेत उभा रहा" कानातला कल्लोळ दुर्लक्षून मी होलोग्राममधे उभा राहिलो. डोळे उघडले तेव्हा समोर असलेले डाॅ गफलावाला म्हणत होते," कसं वाटतंय? आता वाढता स्क्रीन टाईम वगैरे विसरून जायचं" "खरंच?" " हो, काळ कायमचा गोठवलाय तुझ्यासाठी, पण.." ............ "सर ! माझे हात ? पाय? सगळंच द्विमितीत कसं?...कोण हे विकट हसतंय? ..अर्र.. मी कुठाय ? मला स्विच आॅफ केलंत सर?

वाचने 5478
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

छान. -दिलीप बिरुटे

+१ आवडली.

आवडलं. सुपरमॅन च्या पहिला चित्रपटात असे एक दृष्य होते

+१

+१

मोठा आशय असलेली कथा १०० शब्दात बसवताना लेखकाची दमछाक झालेली दिसतेय पण प्रयत्न चांगला.

+१