शशक'२०२२ - उल्का

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
9 May 2022 - 1:08 pm

मंगळावरील वसाहतीत प्रचंड धावपळ सुरु होती. तातडीने ग्रह सोडण्याचे आदेश आले होते.

एक मोठी उल्का काही तासात मंगळावर आदळणार होती.

काउंटडाऊन शून्य झाल्या क्षणी तिने बटन दाबले, तेव्हाच तिच्या आईचा फोन आला.

तिच्या बाळला घेऊन आई स्पेसस्टेशनवरच भेटणार होती.

“लवकर नीघ बाई...शेवटचे स्पेसशटल सुटण्याची वेळ झाली, बाहेर बघ उल्का चंद्रापेक्षा मोठी दिसते आहे.” आईचा आठवा फोन आला.

“आम्ही एकटे जाणार नाही” आई निग्रहाने म्हणाली .

“स्पेस शटल गेले... आता आकाशभर उल्काच आहे” आई रडतच म्हणाली.

“आई.... जरा नीट बघ बरं उल्केकडे” ती म्हणाली.

त्याक्षणी प्रचंड विस्फोट होऊन उल्का आकाशातच फुटून विखुरली.

तिने सोडलेल्या अग्नीबाणाच्या अचूक कामगिरीने मंगळावरचे संकट टळले होते.

प्रतिक्रिया

स्पेस शटल वाल्यांनी वाईच घाईच केली म्हणायची. जरा थांबले असते तैच्या अग्नीबाणावर विश्वास ठेऊन तर मोकार पळापळ नसती झाली.

सं - दी - प

शेवटचे स्पेसशटल सुटण्याची वेळ झाली

स्पेस शटल गेले.

१०० शब्दांत कथा बसवण्याच्या नादात अशा ढोबळ चुकांकडे लेखकाने दुर्लक्ष करणे नको वाटते.