Skip to main content

शशक'२०२२ - नथिंग न्यू अंडर द सन

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 07/05/2022 या दिवशी प्रकाशित केले.
“मुळ्याची भाजी, वेळ पाहुन खावी” अशी म्हण का बरं नाहीये ? चौथी ब मधल्या त्याने तळमळत विचार केला. डोळे मिटलेले होते. पाच मिनीटं “मौन”मध्ये काढणे अशक्यप्राय. काहीतरी करायलाच पाहीजे. त्याने डोळे किलकीले केले, आणि टिचर मोबाईल मध्ये डोकं खुपसून आहेत पाहुन त्याला हायसे वाटले. डेस्कवर सेलोची स्टीलची बाटली होती. ती स्टीलच्या बाकावर पाडायची आणि होणार्‍या आवाजासोबत आपला कार्यभाग उरकून घ्यायचा. दुसरा पर्यायच नाही, बाटली डेस्कच्या उजव्या कोपर्‍यात होती. हात थेट पोहोचत नव्हता. तो थोडासा वाकला आणि... विस्फोट. विस्फोट आणि हास्यकल्लोळामधल्या पाच सेकंदाच्या स्तब्धतेमध्ये त्याला “वर्गात उमगले मजला, संपले बालपण माझे...” अश्या ओळी सुचल्या. “हम्म, कवितेत छान वाटतील ना या ओळी...?”

वाचने 4995
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

+१

पहीलीच अर्थहीन कथा पाहून वाईट वाटले. -१

In reply to by अमरेंद्र बाहुबली

प्रयत्न केला म्हणून प्लस वन. प्रोत्साहनाचं धोरण. आता एवढं तेवढं चालायचंच. -दिलीप बिरुटे

निरागस बालविनोद ! पण, निसर्गकॉल विस्फोट आणि बालपण संपण्याचा काय संबंध आहे हे कळले नाही, पंच जाणवला नाही.