मंडळी इथे पडणार्या व्हेज नॉनव्हेज पाककृत्या आणि त्यावरील उदंड प्रतिसाद पाहीले की (स्वगत :- माझ्या लेखांना का बरं प्रतिसाद मिळत नाहीत ? म्हणून रोज विसेक चपात्या रागाच्या भरात जास्त खातोय, एक तर रेसेशन चालू आहे आणि हे असं भस्म्या झाल्या सारखं खाऊन रेशन पण पटकन संपतंय) कधी कधी उद्भवलेले व्हेज-नॉनव्हेजिटेरियन्स चे वाद लक्षात घेऊन एक सुचना करावीशी वाटते.
चिकन, मटण , मासे , बोंबिल , सुक्कट, प्राँप्लेट इत्यादी भावना भडकवू (काय चाल्लय हे ? सजिवांच्या रक्तपातातून मिळणार्या मांसावर आपण माणसे असा "क्रुर इमोसनल अत्याच्यार" करून पाककृती मिपा वर येऊ नये असे काही शुद्ध शाकाहार्यांचे म्हणने पडते.) पण मनातल्या नॉन-व्हेज जेवणाच्या इच्छेचा कचरा होऊ नये, आहार-स्वातंत्र्य अबाधित रहावे म्हणून अशा पाककृतींना बंदी असु नये असे मला वाटते.
त्यासाठी 'शेवागा' नावाचा (हेच नाव असावे असे नाही. काही वेगळे नाव सुचवायला हरकत नाही, शेवगा मला बिक्लूल आवडत नाही, तसेच शाकाहार्यांना मांस-मच्छी आवडत नसावी म्हणून हे नाव , बाकी काही नाही ... च्यायला नाय तर पब्लिक म्हणायचं शेवगा कुठं नॉनव्हेज असतोय व्हय ? असो .. ) एक वेगळा उपविभाग पाककृती विभागात उघडल्यास त्यात हवे त्या मासकांडांच्या पाककृतींचं लेखन करता येईल (स्वगत : मला सुचना करायला काय जातं ? ते तात्या आणि तो बिचारा निलकांत जाणो, आपल्या लेखाला वाद होऊन का होईना ५० प्रतिसाद आले की ब्लड प्रेशर कमी होईल आणि नॉर्मल जेवण जाईल तरी . आणि पचेलही ) आणि ज्यांना ते वाचायचे आहे तेच वाचतील उगीच कुणालाही ते वाचावे लागणार नाही.
सद्याही मिपावर वेगवेगळे विभाग आहेत पण मिपाच्या मुखपृष्ठावर सर्वसमावेशक पाककृत्या पाहायला मिळतात.
म्हणून मिपाच्या सद्याच्या रचनेत त्यासाठी काही बदल करावे लागतील. ( स्वगत : करा ... अजुन बदल करा , त्याने काही फरक पडो न पडो .. आपण सुचना करणे सोडणार नाय बॉ ) जसे की...सद्या प्रथम उघडणार्या सर्वसमावेशक पानांऐवजी प्रथम फक्त विभाग दर्शवणारे पान उघडेल म्हणजे ज्याला जो विभाग उघडायचा असेल तो उघडून त्यातील पाककृती-प्रकार वाचता येईल. ह्यामुळे लिहीणार्याला कोणतेही बंधन घालायची जरूर लागणार नाही आणि वाचकही आपापल्या आवडीप्रमाणे आपल्याला हव्या त्याच पाककृती वाचू शकतील.
ता.क. : वरिल सर्व हलकेच घेण्यासाठी आहे !
कळावे,
मांसाहारी टारूदेव प्रसन्न!!
वाचने
6838
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
शेवगा
=))
खि खि
खि खि खि
In reply to खि खि by काळा डॉन
हाहाहा!
In reply to खि खि खि by टारझन
टार्या....बा
In reply to खि खि खि by टारझन
ठ्ठोऽऽऽ!!!!
In reply to खि खि खि by टारझन
लै भारी रे
टार्या....म
सरळ
.
In reply to सरळ by दशानन
हेहेहे
चुचु
In reply to हेहेहे by परिकथेतील राजकुमार
चुचु
In reply to चुचु by पर्नल नेने मराठे
चुचु किती
In reply to चुचु by पर्नल नेने मराठे
चुचु
In reply to चुचु किती by परिकथेतील राजकुमार
आज
In reply to चुचु किती by परिकथेतील राजकुमार
छान लेख.
अर्रे वा !!
In reply to छान लेख. by विसोबा खेचर
खरय