Skip to main content

ताज्या घडामोडी मार्च - भाग २

लेखक निनाद यांनी गुरुवार, 17/03/2022 05:24 या दिवशी प्रकाशित केले.
ताज्या घडामोडी मार्च - भाग २ येथून पुढे... ऑड्रे ट्रुशके, अमन वडूद, डॉ वारिस हुसेन हे हिंदुत्वाविरुद्ध होळी साजरी करणार आहेत. यासाठी'स्टुडंट्स अगेन्स्ट हिंदुत्व आयडॉलॉजी' किंवा SAHI अशी संस्था स्थापन केली गेली आहे. येल, कोलंबिया, कॉर्नेल, प्रिन्स्टन, वेलस्ली, मिशिगन स्टेट, ड्यूक आणि रटगर्ससह अमेरिकन युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये SAHI, HfHR आणि साधना या संस्थांनी एकत्रितपणे CAA आणि NRC विरुद्ध निदर्शने केली होती. संघटनेने भारतीय सरकारी अधिकार्‍यांवर निर्बंध लादण्यासाठी अमेरिकन काँग्रेसला खुले पत्र लिहिले होते. या वर्षी आता वेबिनार घेतला जाणार आहे. लिबरल कट्टरवाद असा वाढवला जातो असे दिसते आहे.

वाचने 31867
प्रतिक्रिया 185

प्रतिक्रिया

राज्यात नवी समीकरणं जुळणार? एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेसला दिली ‘ही’ ऑफर! https://www.loksatta.com/maharashtra/mim-imtiyaz-jaleel-offers-alliance… ज्या MIMच्या नेत्याने, 100 कोटी गैर मुस्लिम लोकांना मारण्याची धमकी दिली होती, त्या पक्षा बरोबर, कुठलाच पक्ष युती करण्याची शक्यता नाही...

एमआयएम भगव्याला विरोध करणारी संघटना, तडजोड शक्य नाही,’ शिवसेनेने जलील यांची ऑफर धुडकावली https://www.loksatta.com/maharashtra/shivsena-wont-go-with-mim-said-shi… --------- समुद्रात बुडालेली Enron, बाहेर येतांना बघीतली आहे, त्यामुळे, हा देखील , बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, असा प्रकार होण्याची शक्यता जास्त आहे...

कर्नाटक हायकोर्टाने हिजाब ही इस्लाममध्ये अनिवार्य प्रथा नाही हे मान्य केल्यानंतर दोन दिवसांनी, तामिळनाडू तौहीद जमात (TMTJ) नावाच्या इस्लामी संघटनेने मदुराई येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान न्यायाधीशांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. TMTJ नेते कोवई आर. रहमतुल्ला यांनी जाहीर केले की जर हिजाब प्रकरणाच्या निकालावर न्यायाधीश मारले गेले तर, त्यांच्या मृत्यूसाठी ते स्वतः जबाबदार असतील. यावर मात्र कोणतीही चर्चा झालेली दिसली नाही. या पुर्वीच हर्षा नावाच्या हिंदूची मुस्लिम जमावाने याच कारणावरून हत्या केली आहे. यावरून दिसून येते की ही धमकी पोकळ नाही!

अहमदाबादमधील एका विवाहित महिलेने नसरुखान पठाण नावाच्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे की, त्याने प्रेमात पडण्याचे नाटक करून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर नसरुखान पठाण याने महिलेची बदनामी करण्याची धमकी देत ​​सुमारे अडीच लाख रुपये घेतले आणि अहमदाबाद येथील तीन दरवाजाजवळील पटवा रस्त्यावरील एका घरात नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. गुन्हेगार नसरुखान पठाण याने तिला प्रियकर असल्याचे भासवून तिला अजमेर दर्गा आणि इतर अनेक ठिकाणी नेऊन तिच्यावर अनेक महिने बलात्कार केल्याचे आता उघड झाले आहे. फत्तेवाडी येथे राहणारी महिला आपल्या कुटुंबासह राहते आणि घरकाम करते. त्यांचे पती रिक्षा व्यवसाय करतात. या जोडप्याला ११ वर्षांची मुलगी आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी या महिलेने फेसबुकवरील एन के पठाण नावाच्या अकाउंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली आणि तीच्या आयुष्याची वाताहत झाली!

In reply to by निनाद

माहिती बद्दल धन्यवाद ....

देश गुजरात या वृत्तपत्रानुसार गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर धर्मांतराचे नवे प्रकरण समोर आले आहे. भरूचच्या आमोद तालुक्यातील पुरसा गावातील चार मुस्लिम आणि भरूचमधील एका मौलवीला हिंदूंना जबरदस्तीने इस्लाम धर्मात आणल्याच्या आरोपावरून ताब्यात घेण्यात आले आहे. पुरसा गाव हे आमोद तालुक्यातील कांकरिया गावाच्या अगदी जवळ आहे जेथे २०२१ मध्ये आदिवासी वसावा समाजातील शेकडो हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याबद्दल एफआयआर नोंदवण्यात आला आहे. अन्वरखा इब्राहिम पठाण, गेमलसंग भरतसंग सिंघा, इम्रान नूरभा मलेक आणि जहांगीर गुलाम सरदार मालेक अशी पर्सा प्रकरणातील पाच आरोपींची नावे आहेत. अलीकडेच गुजरातमधील भरुचमध्ये मोठ्या प्रमाणावर धार्मिक धर्मांतरण झाल्याची नोंद झाली आहे जिथे मुस्लिमांनी आदिवासी समुदायातील अनेक लोकांना जबरदस्तीने इस्लाममध्ये धर्मांतरित केले आहे. येथे कोणत्याही हिंदू लोकांचे /हिंदू संघटनेचे लक्ष नाही.

In reply to by निनाद

उदारमतवादी जनता, काय मत व्यक्त करणार? हे वाचणे रोचक ठरेल ...

राज्य सरकारचा अजब कारभार; कुटुंब नियोजन कीटमध्ये दिलं रबरी लिंग, प्रात्यक्षिकाबद्दल कर्मचाऱ्यांसमोर पेच https://www.loksatta.com/maharashtra/rubber-sex-toy-in-family-planning-… -------- No Comments...

“आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेते? पवार सरकार”, सेना खासदार गजानन किर्तीकरांच्या वक्तव्यानं खळबळ https://www.tv9marathi.com/politics/shivsena-mp-gajanan-kirtikar-said-n… घरचा आहेर ...

शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करणारी तरुणी आली समोर; म्हणाली “संजय राऊतांनी…” https://www.loksatta.com/pune/a-girl-accused-shivsena-leader-raghunath-… ज्या राजवटीत, महिलांना न्याय मिळत नाही, ती राजवट लयाला जाते ...

Hijab News : आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनींना धक्का; कर्नाटक सरकारने घेतली कडक भूमिका https://maharashtratimes.com/india-news/hijab-ban-updates-set-back-for-… कायद्याचा मान, राखला गेलाच पाहिजे....

राजकीय नेत्यांच्या डावपेचात फसू नका. सर्व सामान्य लोक फक्त खेळणी आहेत देशाची संपत्ती काहीच मोजकेच लोक बळकावत आहेत. तुम्ही फक्त हिंदू मुस्लिम करत बसा. सावध राहा भावनिक होवू नका .नाही तर पुढे खूप कठीण काळ येईल धर्म जात,हे विष आहे आणि ते फक्त सामान्य लोकांसाठी च असते.. उद्योगपती,राजकीय नेते . त्याचा फायदा घेवून संपत्ती वर कब्जा करतात . डोके उघडा.

शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी: शिवजयंती तारखेनुसार की तिथीनुसार?; महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्येच मतभेद https://www.loksatta.com/maharashtra/shivjayanti-issue-ncp-mla-amol-mit… आता, कॉंग्रेस कुठली कालगणना सुचवतो? हे वाचणे रोचक ठरेल...

जानेवारी २०२१ मधे, शेतकरी आंदोलनाची दखल घेऊन, सुप्रीम कोर्टाने, 'त्या तीन कायद्यांची' अंमलबजावणी स्थगित केली व देशभरांतील शेतकर्‍यांचे सदर कायद्यांसंबंधी मानस जाणण्यासाठी, कोर्टाने एक चौकशी समिती नेमली. ह्या समितीने, तिचा अहवाल सुप्रीम कोर्टास, मार्च २०२१ मधे पाठवला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने स्वतःहून तो आजतागायत प्रसिद्ध केलेला नाही. त्या समितीतील एक सदस्य, श्री. अनिल घनवट -- जे शेतकरी संघटनेचे सध्याचे अध्यक्ष आहेत, व ज्यांनी कै. शरद जोशी ह्यांच्या खांद्याला खांदा लावून, सुरूवातीपासून त्या संघटनेची उभारणी केली आहे-- ह्यांनी स्वतःहून तो अहवाल मीडियांतून आज प्रसिद्ध केला. त्यानुसार, समितीला एकूण ७३ शेतकरी संघटनांपैकी, ६१ संघटनांनी (म्हणजे ८५%) कायद्यांना पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, कायदे उत्तरेतील काही मूठभर संघटनांच्या तथाकथित आंदोलनामुळे प्रथम कोर्टाकडून स्थगित व नंतर, सरकारकडून रद्द करण्यांत आले आहेत.

In reply to by प्रदीप

थोडक्यात काय तर केंद्र सरकारने शेपूट घालायला नको होती. असेही पंजाब मधील मते त्यांना मिळणार नव्हती. युपी मधे मतांवर काही फारसा परिणाम झालेला नाही. असो. आता कोणताही राजकीय पक्ष शेतकर्‍यांच्या खर्‍या प्रश्नांना हात घालायला धजावणार नाही. त्यांची थातूरमातूर मोफत वीज, कर्जमाफी असल्या तुकड्यांवरच बोळवण केली जाईल.

In reply to by धर्मराजमुटके

सरकार दोन पावले मागे आले आहे ... शिवाय, शेतकरी वर्गाला, स्वतःचे मार्केट स्वतःच शोधायला लागेल, ही जाणीव झाली ...आंतरजाला मुळे आता ते शक्य पण होईल... थोडा वेळ लागेल पण, गावोगावी, तात्पुरत्या सहकारी संस्था पण सुरू होतील ... जसे आमचा गृप करतो.... ज्या कुणाला, डायरेक्ट शेतकरी वर्गा कडून, गूळ, हळद, तांदूळ, ओले काजू हवा असेल, त्यांनी जरूर संपर्क करा... मागच्याच आठवड्यात, डायरेक्ट शेतकरी वर्गा कडून, ओले काजू खरेदी केलेे, घरपोच डिलीव्हरी आणि उत्तम माल...

In reply to by मुक्त विहारि

सरकार दोन पावले मागे आले आहे या वाक्याशी असहमत. सरकार हा विषय आता कायमचा ऑप्शन ला टाकील. उरलेल्या मुद्यांशी सहमत. मागील आठवड्यातच एका मुस्लिम व्यापारी मित्राशी बोलणे झाले. त्यांचा पिढ्यान पिढ्या आंबे विक्रीचा व्यवसाय होता. लॉकडाऊन नंतर धंद्याचा चेहरा मोहरा बदललाय. आता बरेचशे शेतकरी व्यापार्‍यांना माल देण्याऐवजी फेसबुक / व्हॉटसप द्वारे जाहिरात करतात. गुगल पे / पेटीएम ने पैसे घेतात आणी आंब्याचा मोबदला अधिक १०० / २०० रु. ज्यादाचे पैसे घेऊन घरपोच डिलेव्हरी देत आहेत. त्यामुळे त्यांच्या धंद्यावर चांगलाच परिणाम झाला आहे. आता आंब्यात जास्त कमाई नाही मात्र रमजानचा महिना येतोय. त्यामुळे कलींगड, केळी, कांदा, बटाटा आणि पपई हा माल स्वस्तात कुठे मिळेल ते शोधतो आहे. रमजानच्या महिन्यात फळविक्रीमधे भरपूर कमाई होते असा त्याचा अनुभव आहे.

In reply to by धर्मराजमुटके

पुढच्या निवडणूकी पर्यंत, तह करतो ...

In reply to by धर्मराजमुटके

सुप्रीम कोर्टाने स्वतःच्या अखत्यारीत कायदे स्थगित केले. त्यानंतर, चौकशीचा घोळ घातला. घोळ अशासाठी, की उत्तरेतल्या ज्या संघटनांनी तथाकथित 'आंदोलन' पुकारले होते, त्यांनी वारंवार सांगूनही, समितीपुढे यायचे नाकारले. तेव्हा, ह्या समितीच्या निष्कर्षावर कोर्ट काही ठोस पाऊले उचलेल (वा सरकारला उचलू देईल) ही आशा मावळली होती. त्यावेळीच, आता कायदे काही अंमलात लवकर आणता येणार नाहीत, हे उघड झाले. तेव्हा ते तसेच सुरू ठेऊन फायदा काहीच नव्हता. त्याही पुढे जाऊन बहुधा देशाच्या सुरक्षिततेची स्थिती, पंजाबांत, खालिस्तानी चळवळीच्या आंदोलनांतील सहभागाने/ पुढाकाराने-- बिघडत चालली होती. मी असे वाचले होते की, पंजाबांत, ह्या कायद्यांमुळे अढतियांच्या पोटावर केंद्र सरकार पाय आणते आहे, व पर्यायाने, तेथील गुरुद्वारांचे फंडिंगही जाणूनबुजून छाटून टाकते आहे, असा प्रचार खूप होऊ लागला होता. थोडक्यात, हे कायदे सिखांच्या विरूद्ध आहेत, असा प्रचार तेथे चालवला गेला होता, म्हणे. तेव्हा शेपूट घालणे, देशहितासाठी जरूरीचे होते.

In reply to by प्रदीप

केंद्राने हा कायदा लागू करण्याचे राज्य सरकारांना आवाहन करायला हवे होते. कमीत कमी भाजपाशासीत राज्यांनी हा कायदा लागू केला असता तर येत्या दोन चार वर्षात त्याचे फायदे तोटे समोर आले असते. नंतर त्यात योग्य ते बदल करता आले असते असे वाटते. सध्या विरोधक आणि समर्थक दोघेही आपापल्या कल्पनाशक्तीला वाव देऊन विरोध वा समर्थन करत आहेत.

In reply to by प्रदीप

1. ह्या आंदोलनाला, कॉंग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांचा पाठिंबा होता. कॉंग्रेस कधीच जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाहीत, हा आणीबाणी पासून माझा अनुभव आहे ... 2. ह्या आंदोलनाला, माझ्या ओळखीतल्या कुठल्याही वंशपरापरागत शेती करणार्यांचा पाठिंबा न्हवता... पण एक झाले की, शेतकरी आता, आंतरजालाच्या माध्यमातून स्वतः मार्केट शोधायला लागले. हे आंदोलन, शेतकरी वर्गा साठी, इष्टापत्तीच ठरले ...

नवीन कायद्यात अशी काय कलम होती की त्याचा आधार घेवून शेतकऱ्यानं ठरवून कंगाल करायचा मार्ग ओपन झाला असता.शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगपती,सरकार ह्या जोड गोळी नी हडपल्या असत्या. कायदे रद्द झाले ते योग्य च झाले आणि कायद्याला जो विरोध होता तो पण योग्य च होतं

In reply to by sunil kachure

पुरावा द्या, किंवा तुमच्याकडे पुरावा नाही हे मान्य करा.. तुम्ही बहुतेकशी विधाने हवेत गोळीबार केल्यासारखी करत असत, यापुढे तुमच्या प्रत्येक वादग्रस्त वक्तव्याबद्दल पुरावा मागितला जाईल याची नोंद घ्यावी.

In reply to by आनन्दा

त्यावरून, काय ते ओळखा ... पुस्तकांत लिहिलेले, प्रत्यक्षांत आलेले, बघवले नसेल...

आणि राजकीय उलाढाली वाढल्या. आज आता ताबडतोब चक्रे फिरत आहेत. चानेलना मोठी बातमी मिळाली. मा. मुख्यमंत्री स्वत:च कार चालवत परतले. इंडिअन एक्सप्रेसच्या बातमीनुसार एका जवाहिऱ्यावर २०१७ सालीच चौकशी/खटला चालू आहे. त्यात खोलात जाताना नवीन धागे हाती लागत आहेत. एकूण खोल खोल आहे प्रकरण.

श्रीलंकेत तांदुळ ५०० रुपये किलो, साखर ३०० रुपये किलो इतकी प्रचंड महागाई वाढली आहे. देश कोसळण्याच्या बेतात आहे. तिकडून तमिळ शरणार्थी भारतात यायला सुरुवात झाली आहे. एका बातमीनुसार नाविक लोक भारतीय हद्दीत आणून सोडण्यासाठी ५० हजार पासून पुढे कितीही अशी रक्कम आकारत आहे. एकंदरीत शेजारी अस्थिर झाला की त्याचे दुष्परीणाम आपल्यालाही भोगायला लागणार आहेत. एवढे करुन श्रीलंकंन लोकांना भारताबाबत कितपत आत्मियता आहे माहित नाही.

In reply to by धर्मराजमुटके

१चहा,२.कॉफी,३.मसाले जिन्नस आणि ४.पर्यटन यावर अवलंबून असेल तर क्र ४ नुकसानीत गेलं असेल. समुद्री उत्पादन किती खाली वर गेलं हेसुद्धा पाहायला हवं.

हे सर्व शरणागत नियमानुसार मुंबई आणि महाराष्ट्र च्या बोकांडीवर च येवून बसणार आहेत .सिंधी,आले. बांगलादेश मधून बंगाली आले ते बंगाल मध्ये न जाता मुंबई ,महारष्ट्र च आले.. आता हे तामिळी पण हक्क नी पोट भरता येणारे राज्य म्हणून महाराष्ट्र कडेच कूच करतील.

In reply to by sunil kachure

मग तुम्हाला काय वाटते ? तुमचे आवडते महाराष्ट्रवादी पक्ष उठाव लुंगी, बजाव पुंगी चा पुढचा पुढचा भाग लावणार ? की वणक्कम ! म्हणत सामी सामी गाण्यावर नृत्य करुन त्यांचे स्वागत करणार ?

मुंबई,पुणे,thane, नागपूर,नाशिक,नवी मुंबई, औरगाबद ही प्रगत शहर महाराष्ट्र साठी शाप आहेत की वरदान बाकी राज्य पेक्षा मराठी लोकांचा कमी भाषिक अभिमान,हिंदी राष्ट्र भाषा असा स्वतःच समज करून घेणे,बाकी राज्यांपेक्षा उत्तम सम हवामान. बाकी राज्यांपेक्षा तुलनेने चांगली कायदा आणि सुव्यवस्था,शांतता . हे महारष्ट्र साठी शाप आहे की वरदान

सावरकरांच्या साहित्याचा, विचारांचा अभ्यास असणाऱ्या लोकांचे या लेखावर काय मत आहे ? https://indianexpress.com/article/opinion/columns/truth-about-savarkar-…

In reply to by कॉमी

ठीक आहे, विशेषतः सेलेक्टिव्ह reading म्हणून.. पूर्ण लेख वाचला, विशेषतः फक्त आंबेडकरांचे पत्र वाचले तरी जाणवते ते. अवांतर - ज्या माणसाने अंदमानामध्ये मिळेल ते खाऊन दिवस काढले, आणि विविध जातींना एकत्र घेऊन क्रांतिकार्य उभारले, तो अस्पृश्यता मनात असेल ही गोष्ट कठीण. पण असो.

https://youtu.be/N32a6ecs8zY या व्हिडिओवर माझ्या एका तमिळ मित्राचा प्रतिसाद 10 SL Tamils escaped from Lanka and reached TN Dhanushkodi due to economic crisis in their country. As an Indian - I would say they should migrate to some other country compared to India. They would atleast get a citizenship in some other country whereas my govt likes to give citizenship only to Pakistan Hindus. I would say it’s better to die in hunger than come to Tamil Nadu. You will be put in Akathikal Mukaam and you won’t get a proper job, education and not even a citizenship in 30 years. We were far better during Chola and Pandya time. State and Central govt are good at playing politics. I respect Malayalis in that regard - They do have a greater affinity towards their community. Suppose if there were Lankan Malayalis in place of Lankan Tamils affected in a crisis then they would have welcomed them with open arms in Kerala. Tamils - Your ancestors might be one of the greats in Naval building, literature and espionage etc but Modern Tamils don’t have a say in our own land itself. If you take Portugal - if u stay in Portugal and worked there u r eligible to get citizenship. Some SL refugees came here bfr 1980s didn’t get citizenship. I dont think killing of Rajiv Gandhi was the reason to it.

In reply to by उपयोजक

भारत काही धर्मशाळा नाही कि कुणीही यावे आणी त्याला नागरीकत्व द्यावे. श्रीलंकेत आलेले आर्थिक संकट हे त्या देशाच्या सरकारच्या नाकर्ते पणा मुळे आले आहे. तिथल्या लोकांनी त्याचा जाब तिथे विचारावा. भारतात येउन मग्रुरी करु नये. तुमच्या मित्राला तमीळ लोकांविषयी कणव असेल तर त्याने आपला पगार त्यांना पाठवावा. उगाच भारत सरकारच्या नावाने गळे काढु नये. बाकी निर्वासितांनी कायमस्वरुपी दुसर्‍या देशात जायचे नसते. आपल्या देशातले वातावरण ठीक झाले की परत जायचे असते. तेव्हा भारतीय नागरिकत्वाची मागणी चुकीची आहे.

In reply to by सुक्या

श्रीलंका कर्जबाजारी होण्याच्या आधीपासून लंकन निर्वासित हिंदू भारतात कँपमधे राहतायत. बरीच वर्षे त्यांची भारतीय नागरीकत्वासाठी मागणी आहे. आणि ते कुणीही नाहीत. श्रीलंकन हिंदूच आहेत. आपल्या हिंदू बांधवांबद्दल इतका आकस का तुम्हाला? अर्धवट माहिती लंकन हिंदूंबद्दल की तुम्ही राजीव गांधी नि काँग्रेस समर्थक आहात? नक्की काय?

मुस्लिमांनी आम्हाला आश्वस्त केलं पाहिजे की…”; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत वक्तव्य https://www.loksatta.com/desh-videsh/muslims-not-minority-in-assam-says… आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी राज्यामधील मुस्लिमांसंदर्भात एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. आसामच्या एकूण लोकसंख्येपैकी ३५ टक्के लोकसंख्या ही मुस्लीम असल्याने त्यांना यापुढे राज्यामध्ये अल्पसंख्यांक म्हणून गृहित धरता येणार नाही, असं आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी म्हटलंय. तसेच १९९० मध्ये काश्मीरमधील हिंदूंच्या ज्या हत्या झाल्या त्यासाठी मुस्लीम जबाबदार असल्याचं सांगत हेमंत बिस्वा शर्मा यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटामध्ये दाखवल्याप्रमाणे आसामची अवस्था होईल अशी जी इतर समुदायांना भीती वाटतेय ती दूर करण्याचं ‘मुस्लिमांचं कर्तव्य आहे’ असं मत व्यक्त केलंय. ------- No Comments...

हिजाब वाद पुन्हा उफाळला; मुस्लिमांना जत्रेत दुकान लावण्यावर बंदी https://www.esakal.com/desh/ban-on-setting-up-shop-for-muslims-at-mahal… योग्य निर्णय....अगदी असेच, दर्गा जत्रा असेल तर, इतर धर्मियांना दुकाने लावायला परवानगी देऊ नये...

ईडीचा फटका, पाटणकरांचा खटका, फक्त १० पॉईंटमधून समजून घ्या, प्रकरण नेमकं काय? https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/enforcement-direct… ------- नितेश राणे यांनी, उत्तम प्रतिसाद दिला आहे ... https://www.loksatta.com/maharashtra/bjp-mla-nitesh-ranes-question-to-c… ------

In reply to by मुक्त विहारि

हसत खेळत रहा. मजा करा. आयुष्य फार सुंदर आहे ...फक्त मेव्हण्याने घोळ करायला नको . emoji

In reply to by अनन्त अवधुत

आत्ता पर्यंत.... वाईन, वेल्थ आणि वुमनच चालू आहे.... क्रिकेट मध्ये एके काळी Three W, प्रसिद्ध होते, आता ह्या राजवटीत, हे Three W...

घटना भारताबाहेरची नसून देवभूमी म्हणवल्या जाणार्‍या केरळ राज्यातली आहे. पलक्कड जिल्हा न्यायाधीश कलाम पाशा यांनी प्रसिद्ध मोहिनीअट्टम नृत्यांगना डॉ. नीना प्रसाद यांचा कार्यक्रम अर्ध्यात थांबवला. त्यांना आवाजाचा त्रास होत होता म्हणे! नृत्यांगना डॉ. नीना प्रसाद यांनी या कार्यक्रमावर त्या तयारीवर त्यांनी अनेक तास खर्च केले होते. व्हायोलिन, मृदंगम सह अगदी कमी आवाजात शांत वाद्यांसह ते सादर करण्यात आले होते. तालिबानांनी अफगाणिस्तानात सर्व प्रकारच्या नृत्य आणि संगित यावर बंदी आणली आहे. इस्लाम मध्ये याला परवानगी नाही असे कारण दिले जाते. हा प्रकार त्या सदृश दिसत आहे. पण हे महाशय न्यायव्यवस्थेत आहेत. तेव्हा ते तेथे काय करत असतील असा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

In reply to by निनाद

कलाम पाशा यांचे भाऊ बी केमल पाशा हे केरळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते!

In reply to by निनाद

आता, मानवता वादी आणि उदारमतवादी हिंदू काय प्रतिसाद देतात? हे बघणे रोचक ठरेल ...

In reply to by निनाद

हे असे घडले ! अहो आश्चर्य " आमचा केरळ कसा शांत आणि सर्वधर्मसमभावी आहे ( गोव्या सारखाच ) " अशी वक्तवये करणाऱ्या शशी थरूर यांच्या राज्यात

बंगाल हिंसाचारप्रकरणी २२ अटकेत ; १० घरांवर पेट्रोल बॉम्बच्या सहा्य्याने हल्ला; आठ जणांचा मृत्यू https://www.loksatta.com/desh-videsh/22-people-arrested-in-birbhum-viol… विकृत मनोवृत्ती

सर्व तपास CBI कडे वर्ग करा” परमबीर सिंह प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा दणका! https://www.loksatta.com/maharashtra/supreme-court-orders-parambir-sing… ED, IT आणि आता CBI..... ह्या राजवटीत, सगळ्या महत्वाच्या केंद्रीय संस्था यायला लागल्या...

“तुमच्या अशा वक्तव्यांची जागा केराच्या टोपलीत आहे”; सुप्रीम कोर्टाने संजय राऊतांना नाव न घेता फटकारले... https://www.loksatta.com/desh-videsh/your-statement-place-in-the-basket… आता, सर्वोच्च न्यायालय देखील, महाराष्ट्र विरोधी का?

In reply to by मुक्त विहारि

परवा महाराष्ट्र सरकारमधील एका व्यक्तीने असं वक्तव्य केलं की आता त्यांना न्यायालयाकडून योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही. यावर ती टिप्पणी आहे

In reply to by सुबोध खरे

CBI ला पण परवानगी दिली नाही ... आता, न्यायसंस्थेवर पण विश्र्वास नाही ... असो,

In reply to by सुबोध खरे

परवा महाराष्ट्र सरकारमधील एका व्यक्तीने असं वक्तव्य केलं की आता त्यांना न्यायालयाकडून योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही. डॉक्टर ऐवजी कंपांऊडर कडुन औषध घेतल्याचा परिणाम आहे तो... :))) आता इडीची इतकी भिती वाटतेय जितकी मुघला सैन्याच्या घोड्यांना संताजी-धनाजी यांची सावली देखील पाण्यात दिसल्यास व्हायची ! :))) कधी काळी इडी बद्धल भरभरुन बोलणारे आज होलसेल मध्ये फाटल्यावर काय बोलतात ते देखील पहावे. )))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Lalana... :- Me Vasantrao

उमर खालिदला न्यायालयाकडून धक्का ; दिल्ली दंगल प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला... https://www.loksatta.com/desh-videsh/umar-khalids-bail-plea-rejected-in… उत्तम निर्णय ...

घटनेचं समर्थन नाही, पण गुजरात….”; ममता बॅनर्जींची बंगाल हिंसाचारावर प्रतिक्रिया https://www.loksatta.com/desh-videsh/mamata-banerjee-reaction-on-bengal… No Comments

पंजाब चे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज पंतप्रधानांची भेट घेतली आणि पंजाब ची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी ५० हजार करोड ची मागणी केली. ही बातमी

In reply to by धर्मराजमुटके

का? भ्रष्टाचाराला आळा घालून सरकारी खजिन्याची चालवली जाणारी लूट थांबवू हा आपच्या प्रचारातील एक महत्वाचा मुद्दा होता ना? मग आता केंद्र सरकारपुढे हात का पसरत आहेत? घाला भ्रष्टाचाराला आळा आणि वाढवा सरकारचे उत्पन्न. एका अर्थी हे विदूषक लोक पंजाबमध्ये सत्तेत आले हे चांगलेच झाले. दिल्ली अर्धे राज्य असल्याने नायब राज्यपाल खोडा घालत आहेत, केंद्र सरकार सहकार्य करत नाही, मोदींना माझा खून करायचा आहे वगैरे वगैरे बोललेले खपत होते. आता पंजाब या पूर्ण राज्यात सत्ता मिळाली आहे. असल्या काहीही सबबी तिथे चालणार्‍यातल्या नाहीत. तेव्हा घोडामैदान फार लांब नाही.

In reply to by धर्मराजमुटके

पंजाब आणि गरीब कसा? "अख्या भारताची शेती " तिथेच होते ना ( शेतकरी आंदोलनावरून तरी वाटले बुवा !)

In reply to by चौकस२१२

असं कसं ? असं कसं ? शेतकरी मग तो कुठलाही असो .. गरीबच असतो ना? आता तुम्हाला त्या लोकांच्या भारी गाड्या , ट्रॅक्टर , मोटार सायकल दिसले त्याला आम्ही काय करु? बिचारे गरीब शेतकरी ... ५ - ५ लाख खर्च करुन बिचारे आंदोलन करत होते ... तुम्हाला ना खरा शेतकरी दिसतच नाही ... हुच्च्भ्रु कुठले .. (ह. घ्या)

In reply to by कॉमी

जसे शिवसेनावाले महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका- विशेषतः शिवसेनेचा जीव ज्यात आहे त्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका घ्यायला घाबरत आहे त्याप्रमाणे दिल्लीत भाजपवाले घाबरले आहेत असे दिसते. असले प्रकार फार काळ चालत नाहीत. कधीनाकधी निवडणुक घ्यावीच लागेल.

In reply to by कॉमी

काल काश्मीरी फाइल्स सिनेमा टॅक्स फ्री करण्याबद्दलही ते म्हणाले की विवेक अग्निहोत्रीने यूट्यूबवर सिनेमा टाकून द्यावा. सर्व देश सिनेमा फुकट पाहील. =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यूट्यूबवर सिनेमा टाकणे आणि कर माफी यात फरक आहे असो विवेक अग्निहो त्रिने धोका पत्करून हा चित्रपट काढला तेवढी हिंमत ना माझ्यात ना तुमच्यात हि कि यातही शेठ नि संत्र्याचं प्रदेशातून हिंदूंनो चित्रपट बघा म्हणून "भगवा फतवा काढला" असे आपले म्हणणे आहे ?

In reply to by चौकस२१२

कुणाला समजावताय, नोटबंदी पासून बरीच लोक बिघडल्यासारखं बोलतात लिहतात. नका लक्ष देत जाऊ.

In reply to by धनावडे

कुणाला समजावताय,.... हो ना पण राहवत नाही ... एकदातरी वाटते कि प्राध्यपक लेव्हल ची व्यक्ती एकदातरी पोटातील/ हृदयातील जळफळ बाजूला ठेऊन निपक्षपणे परिस्थितीचा आढावा घेईल ! आपणच येडे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काल काश्मीरी फाइल्स सिनेमा टॅक्स फ्री करण्याबद्दलही ते म्हणाले की विवेक अग्निहोत्रीने यूट्यूबवर सिनेमा टाकून द्यावा. सर्व देश सिनेमा फुकट पाहील. =))
प्रत्येक पांचट सिनेमाचा review देणारा व तुकडे तुकडे गँग चे सिनेमे दिल्लीत टॅक्स फ्री करणारा युगपुरुष आज म्हणतोय की द काश्मिरी फाईल्स हा सिनेमा यु ट्युब वर टाका म्हणून.. ज्या पद्धतीने तो केविलवाणे हसत हसत हे वक्त्यव करत होता व त्याचे भाट ज्या प्रमाणे त्याचे हसून समर्थन करत होते ते बघून कळून येते की चोट बहुत गेहरी लगी है..

काल... मेव्हणे... मेव्हणे... मेव्हण्यांचे पाहुणे ! हा दुनियादी चित्रपटातील डायलॉग संदीप देशपांडे यांच्या एका ट्वीट ने मला अगदी "मन से" आवडला !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Lalana... :- Me Vasantrao

https://www.tv9marathi.com/maharashtra/chandrapur-swearing-and-beating-… मागणी बरोबर पण आंदोलन करण्याचा मार्ग चुकीचा..

महाराष्ट्रातील पुढील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यावर फार पूर्वीच फुली मारली आहे. जोपर्यंत फडणवीस व चंद्रकांत पाटील भाजपचे प्रमुख नेता आहेत, तोपर्यंत भाजपवर सुद्धा फुली मारली आहे. आआप किंवा मनसे या दोन पर्यायांवर विचार सुरू आहे. https://maharashtratimes.com/india-news/only-one-pension-for-punjab-mla…