✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पुण्याहून शिवथरघळीला जाण्याचा सगळ्यात सोपा आणि जवळचा मार्ग कोणता?

स
सालोमालो यांनी
Wed, 04/22/2009 - 16:17  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4453 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

शिवथरघळील

आंबोळी
Wed, 04/22/2009 - 17:10 नवीन
शिवथरघळीला जाण्याचा सगळ्यात सोपा आणि जवळचा मार्ग कोणता? हा मार्ग स्वारगेटवरून निघतो. मधे १-२ घाट लागतील पण बाकी मार्ग एकदम सोप्पा आहे. प्रो. आंबोळी
  • Log in or register to post comments

जवळचा मार्ग

विटेकर
Wed, 04/22/2009 - 17:24 नवीन
पण कोथून ? मी पुण्याहून असे समजतो. पुण्याहून भोर मार्गे कोकणात उतरावे.घाट संपल्यावर डाव्या हाताला शिवथर घळ आहे. विचारत -विचारतच जावे हे बरे. मुंबईहून यायचे असल्यास महाड्ला यावे, तेथून सरळ रस्ता आहे. घळित उतरणारा रस्ता फारसा चांगला नाहि. संभाळून जावे. चाफळ हे पुणे- सातारा रस्त्यावरिल उंब्रज पासून अंदाजे १८ किमि , उंब्रज - कोयनानगर रस्त्यावर आहे. रस्ता सुंदर आहे. या कोयना नगर रस्त्यावरुन थोडेसे डावीकडे जावे लागते.विचारत -विचारतच जावे हे बरे. दोन्हि एका दिवसांत जरा कठिण वाटतय पण अशक्य नाहि. . त्यापेक्शा मी सज्जन गड - चाफळ असे सुचवीन, सज्जन गड सातार्‍यापासून अगदि जवळ आहे. तसे ही आत्ता घळित पाणी नाही त्यामुळे ' गिरिच्या मस्तकि गंगा धबाबा तोय आद्ळे " पाहता येणार नाहिच. असो, गेलात तर समर्थाना आमचा दंडवत सांगा. -विटेकर आपणांस आहे मरण! म्ह् णोन राखावें बरवेपण!!
  • Log in or register to post comments

या कोयना

प्राची
Wed, 04/22/2009 - 17:50 नवीन
या कोयना नगर रस्त्यावरुन थोडेसे डावीकडे जावे लागते.विचारत -विचारतच जावे हे बरे. विटेकरजी,कोयनानगर रस्त्यावरून जाताना चाफळला जायला उजवीकडे फाटा आहे. सालोमालो,विटेकरांनी अगदी योग्य सल्ला दिलाय.सज्जनगडला गेलात,तर तिथे प्रसादी करूनच या.तिथली गव्हाची (वरून तूप घातलेली) खीर म्हणजे 8> ...खरच तृप्त होतो आपण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

धन्यवाद!

सालोमालो
Wed, 04/22/2009 - 18:02 नवीन
विटेकरजी/प्राची, मनापासून धन्यवाद! समर्थांना जरूर दंडवत सांगीन. सालो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

अरेच्चा ,

विटेकर
Wed, 04/22/2009 - 17:27 नवीन
मी शीर्षक नीट वाचले नाही, अस्तु. -विटेकर आपणांस आहे मरण! म्ह् णोन राखावें बरवेपण!!
  • Log in or register to post comments

एक

शैलेन्द्र
Wed, 04/22/2009 - 17:48 नवीन
एक दुरुस्ती... वरंधा घाट संपल्यावर "ऊजव्या" हाताला शिवथर घळ आहे. शिवाय जर तुम्ही सुमो किंवा तत्सम गाडी नेणार असाल तर घाट संपायच्या आधीच एक ऊजवे वळण आहे, तिथुन अगदी जवळ... तिथे बोर्ड आहे... नाहीतर जर नाजुक गाडी असेल तर घाट ऊतरुन ३-४ कीमी पुढे या, आणि मग फाट्यावरुन ऊजवीकडे....या मार्गने १५-१७ किमी वाढतात...
  • Log in or register to post comments

वरंधा घाट

ज्ञ
Wed, 04/22/2009 - 18:37 नवीन
वरंधा घाटातून जो पहिला उजवीकडचा फाटा आहे त्या मार्गाने छोटी गाडी असेल तर मुळीच जाऊ नका.. रस्त्याची अवस्था गंभी र आहे.. तसेच शक्य तितक्या लवकर जा.. ऊन मी म्हणते आहे.. सध्या उन्हाळ्यामुळे तिथे सगळे फारच रुक्ष झालेले आहे..
  • Log in or register to post comments

त्यापेक्षा

मिसळभोक्ता
Wed, 04/22/2009 - 22:26 नवीन
त्यापेक्षा घरीच बसून, भगवी लंगोटी नेसून, मनाचे श्लोक म्हणा. आणि घळींचे चिंतन करा. (घळींच्य चिंतनाविषयी विनायक प्रभूंना भेटा अथवा लिहा. ते त्यात एक्सपर्ट आहेत.) तो सर्वात सोपा मार्ग. -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments

आयला!! जबरा प्रतिसाद!!!

पिवळा डांबिस
गुरुवार, 04/23/2009 - 10:11 नवीन
आम्हाला इथेच मिपावर भेटलेल्या एका जुन्या स्नेह्यांची आठवण झाली... ;) अगदी तीच शैली.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

आत्ता पचला!

सालोमालो
Mon, 04/27/2009 - 11:09 नवीन
प्रतिसाद जबरा होता. पण अशी आशा करतो की मी मुलगा का मुलगी हे तुम्ही माझ्या profile मध्ये पाहून प्रतिसाद दिलायतं. मी मुलगाच आहे म्हणून तो पचला. जर मुलगी असती तर ठो ठो हसण्यापलीकडे हातात काहीच राहीलं नसत. =)) सालो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

रामदास

अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 04/23/2009 - 06:27 नवीन
रामदास स्वामीच आपणास मार्ग दाखवतिल.....त्याच मार्गाने जा... =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

शिवथर घळ व

अमोल केळकर
गुरुवार, 04/23/2009 - 09:52 नवीन
शिवथर घळ व चाफळ एका दिवसात होणे अवघड -------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा