झटपट रवा डोसा...(फोटोसहित )
नमस्कार,
आज खुप दिवसांनी एक पाकॄ घेउन आले आहे :-)
साहित्यः
१.१वाटी मैदा
२.१वाटी रवा
३.२ चमचे दही(नसले तरी चालते)
४.३-४ हिरव्या मिरच्या(किती तिखट पचवु शकता त्यानुसार :-) )बारीक चिरुन
५.१-२ चमचे आलं-लसुण बारीक चिरलेला
६.भरपुर ताजा कढिपत्ता,बारीक चिरलेली कोथिंबीर
७.फोडणीचे साहित्य (जिरे,मोहरी,हिंग,हळद)
८.एक बारिक चिरलेला कांदा
९.मीठ
१०.१ चमचा साखर्(आवडत असल्यास)
कॄती:
रवा,मैदा,दही,मीठ,साखर आणि पाणी घालुन सारखे करावे आणि एक तास भिजवत ठेवावे...यात भरपुर पाणी लागते कारण रवा पाणी शोषुन घेतो...
आता तेलाची फोडणी करुन त्यात जिरे,मोहरी,हिंग,बारीक चुरलेला कढीपत्ता,बारीक चिरलेल्या मिरच्या,आले,लसुण,कोथिंबीर घालावे..
ही फोडणी आता डोश्याच्या पिठात ओतावी,कांदा घालावा आणि व्यवस्थीत हलवुन घ्यावे...गरजेनुसार पाणी आणि मीठ घालावे...
शेवटी जे पीठ तयार होइल ते खुप पातळ (आमटीसारखे पळीसांड झाले पाहिजे)
आता नॉनस्टीक तव्यावर थोडेसे तेल लावुन घ्यावे..आणि वाटीने पीठ पसरुन डोसा घालावा..
पीठ पसरताना आधी कडेने घालत घालत मग मध्यापर्यंत यावे...मधे मधे भोके ठेवावीत्...तसेच तवा तापलेला असताना पीठ घालावे...
एका बाजुन छान खरपूस भाजुन झाले की मग उलटुन टाकावे...मस्त कुरकुरीत डोसा तयार होईल....
आता नारळाच्या अथवा दाण्याच्या चटणी सोबत फस्त करावा :-)
चटणी ची कॄती ( खास रेवतीसाठी) :-)
साहित्यः
शेंगदाणे मुठभर,२ पाकळी लसुण,२-४ लाल सुक्या मिरच्या,१ चिंचेचे बुटुक,मीठ्,साखर,
कॄती:
सर्व पदार्थ मिक्सरवरुन जरुरीप्रमाणे पाणी घालुन बारीक वाटणे...लाल मिरच्या नसल्यास लाल तिखट घालणे.
आवश्यक तेवढे पाणी घालुन सारखे करावे...
माहितीचा स्त्रोतः
आंतरजाल

वाचने
35620
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
मार डाला
लै भारी
भुक लागली
In reply to भुक लागली by मदनबाण
हो ख्ररच
In reply to हो ख्ररच by रश्मी
+२
तोंडाला
मस्त..
मस्त
छान दिसतोय डोसा
डोसा छान
खूप खमंग!
सर्वांचे आभार :-)
आजच केला..
In reply to आजच केला.. by प्राजु
मी पण
In reply to आजच केला.. by प्राजु
प्राजु,समिधा..
क्लासिक...! स
In reply to क्लासिक...! स by विसोबा खेचर
धन्यवाद
मीपण करून
In reply to मीपण करून by मेघना भुस्कुटे
मेघना
झक्कास दिसत आहे ............!!
मस्त ग !