Skip to main content

ताज्या घडामोडी मार्च - भाग १

लेखक निनाद यांनी मंगळवार, 01/03/2022 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्ली हिंदूविरोधी दंगल - दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस बजावली. फेब्रुवारी २०२० च्या हिंदू विरोधी दंगलीला भडकावणाऱ्या CAA विरुद्धच्या निदर्शनांदरम्यान त्यांनी द्वेषपूर्ण भाषणे केल्याचा आरोप आहे. नोटीस बजावण्यात आलेल्या इतरांमध्ये आप नेते मनीष सिसोदिया आणि अमानतुल्ला खान, एआयएमआयएम नेते वारिस पठाण आणि अकबरुद्दीन ओवेसी, मेहमूद प्राचा, वादग्रस्त डाव्या विचारसरणीचा 'कार्यकर्ता' हर्ष मंडर आणि अभिनेत्री स्वरा भास्कर यांचा समावेश आहे. माजी JNU विद्यार्थी उमर खालिद हा देखील या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक होता, ज्यावर प्रदेशात हिंसाचार भडकवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. राजकीय-धार्मिक वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी मुस्लिम अल्पसंख्याक गटाने हिंदू समुदायाची हत्या करण्यासाठी आयोजित केलेली हिंसा होती असा आरोप केला गेला आहे. सीएए विरोधी निदर्शनांचा एक भाग म्हणून ईशान्य दिल्लीत दंगल उसळली होती. या हिंसाचारात ५३ हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला, २०० हून अधिक लोक जखमी झाले आणि ४०० लोक विस्थापित झाले. मुस्लिम जमावाने घरे, दुकाने आणि मंदिरे जाळली आणि हल्ले केले. शाहरुख नावाच्या व्यक्तीने सर्वसामान्य लोकांना आणि पोलिस कर्मचाऱ्यांना खुलेआम धमकावले. नंतर त्याला यूपीच्या शामली जिल्ह्यातून अटक करण्यात आली. आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात दिल्ली पोलिसांचे हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांना जीव गमवावा लागला.

वाचने 46259
प्रतिक्रिया 168

प्रतिक्रिया

देशात प्रचंड महागाई वाढली आहे. पेट्रोल ,डिझेल च्या किंमती केंद्र सरकार मुळे इतक्या वाढल्या आहेत की जनता हैराण झाली आहे . खाद्यतेल च्या किंमती दुप्पट झाल्या आहेत . सर्व डाळी,उपयोगी वस्तू प्रचंड महाग आहेत. Pf वर मिळणारे व्याज आता पर्यंत च्या इतिहासात सर्वात कमी आहे प्रचंड बेरोजगारी आणि त्याच्या जोडीला प्रचंड महागाई. जनता संकटात आहे..म्हणून धार्मिक उन्माद निर्माण करणारे विषय गोदी मीडिया ,गोदी कार्यकर्ते हायलाईट मध्ये ठेवतात. काश्मीर फाईल हा फक्त सिनेमा आहे..त्या वरून गोदी मीडिया लोकांना भडकवत आहे . उदय युक्रेन आणि रशियात. पण गोदी मीडिया ,कार्यकर्ते त्या वर च २४ तास चर्चा कशी होईल हे बघत असतात.. देशात आर्थिक संकटात जनता असताना त्याच्या वर चर्चा होवू नये .सरकार काही कामाचे नाही हे लोकांना समजू नये म्हणून . फालतू विषय पुढे केले जात आहेत.

In reply to by sunil kachure

मी काचुरे/कचुरे साहेबान्शी सहमत आहे. म्हागाई लै म्हन्जे लैच वाधली असं खालच्या तक्त्यावरुन दिसायले.(ह्यो तक्ता नेटवरुन आभारासहित) Some price index, worth comparing: Year LPG Price 2011 ₹ 877 2012 ₹ 922 2013 ₹ 1021 2014 ₹ 1241 2015 ₹ 606 2016 ₹ 584 2017 ₹ 747 2018 ₹ 609 2019 ₹ 695 2020 ₹ 594 (Lockdown) 2021 ₹ 719 (today) *Non Subsidised LPG Gas Cylinder prices in Delhi* I was going through the grocery price list & compared it with 2014 figures *Tur Dhal* 2014 - Rs 210 2021 - Rs 94 *Urud Dhal* 2014 - Rs 178 2021 - Rs 115 *Moong Dhal* 2014 - Rs 180 2021 - Rs 110 *Sugar* 2014 - Rs 45 2021 - Rs 38 *Chana Dhal* 2014 - Rs 125 2021 - Rs 64 *Tamarind* 2014 - Rs 240 2021 - Rs 160 *Wheat Flour (Un branded)* 2014 - Rs 36 2021 - Rs 30 The list is long... Another important factor is the mobile phone charges... Average monthly spend for Voice + SMD + Data 2014 - Rs 1500 per phone for 2G Data , limited 2021 - Rs 400 per phone for 4G Data Unlimited Savings per phone per month Rs 1100 Each family has an average of 3 phones *Savings per family on mobile recharges...* Rs 1100 X 3 - Rs 3300 per month Or Rs 39600 / year *Rs 237600 / family / over 6 year period* Handset charges 2014 - Rs 30000 2021- Rs 12000 (With more features )

युवक काँग्रेस निवडणूक, तौसिफ खान नागपूरचे शहराध्यक्ष, निवडणुकीत गैरप्रकार झालाय? वसीम खान, अक्षय घाटोळे यांच्या म्हणण्यानुसार, तौसिफ खानवर गुन्हे दाखल आहेत. शिवाय वय पस्तीस वर्षांपेक्षा जास्त आहे. त्यामुळं तौसिफ खान युवक काँग्रेसची निवडणूक लढू शकत नाहीत. शीलजरत्न पांडे समर्थकांनी आक्षेप घेतला की, सर्वाधिक मते घेणारे तीन उमेदवार निवडणुकीसाठी पात्र नाहीत.

दिल्लीतील हिंदूविरोधी दंगलीतील आरोपी इशरत जहाँला CrPc आणि UAPA मधील तरतुदींना परवानगी नसतानाही इशरत जहाँला जामीन मिळाला आहे. दिल्लीतील हिंदुविरोधी दंगलीत सहभागी झाल्याबद्दल अटक करण्यात आलेल्या काँग्रेसच्या माजी नगरसेवक इशरत जहाँला दिल्लीच्या कर्करडूमा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. इशरत जहाँचे वकील प्रदीप टेवटिया आहेत.

In reply to by निनाद

CrPc आणि UAPA मधील तरतुदींना परवानगी नसतानाही इशरत जहाँला जामीन मिळाला आहे.
म्हणजे हा जामीन चुकीच्या तर्‍हेने दिल गेला आहे, असे म्हणायचे आहे का? तसे असल्यास, नक्की कुठल्या बाबींचे उल्लंघन येथे झाले आहे, ह्याविषयी सविस्तर माहिती करून घेण्यास आवडेल.

In reply to by निनाद

यूपीपीए हा एक कायदा आहे आणि सीआरपीसी हा अश्या कैक फौजदारी कायद्यांचे कलेक्शन असणारा आणि त्यांच्या प्रोसिजर्स बद्दल माहिती देणारा एक लीगल कोड आहे (CrPC - क्रिमिनल प्रोसिजर्स कोड). त्यामध्ये असणार बेल प्रोव्हिजन्स खालीलप्रमाणे . (बेल उर्फ जमानत उर्फ जामीन ह्याची परिभाषा) . सीआरपीसी मधील बेल उर्फ जमानत उर्फ जामीन ह्यांच्या तरतुदी . हा असा छापील अर्ज असतो बेल उर्फ जमानत उर्फ जामीन मिळवण्यासाठी कोर्टात भरून द्यायला उगाच काहीही काय बोलता राव तरतुदी नाहीत वगैरे. आता बोलू यूएपीए बद्दल तर यूएपीए मध्ये बेल उर्फ जमानत उर्फ जामीन नसतो हे कुठून काढलेत आपण मधेच ते खरेच कळेनासे झाले आहे मला इथे. कारण खालील सेक्शन (मराठीत कलम) आहे यूएपीए मध्ये जे बेल कंडिशन बद्दल ढळढळीत सांगते सरळसरळ Section 43D(5) in The Unlawful Activities (Prevention) Act, 1967 (5) Notwithstanding anything contained in the Code, no person accused of an offence punishable under Chapters IV and VI of this Act shall, if in custody, be released on bail or on his own bond unless the Public Prosecutor has been given an opportunity of being heard on the application for such release: Provided that such accused person shall not be released on bail or on his own bond if the Court, on a perusal of the case diary or the report made under section 173 of the Code is of the opinion that there are reasonable grounds for believing that the accusation against such person is prima facie true. मला वाटतं हे शब्द अन हा परिच्छेद पूर्णतः self-explanatory स्वरूपाचा आहे. कोर्ट म्हणते जोवर आम्ही पब्लिक प्रोसिक्युटरचे पूर्ण म्हणणे ऐकून घेत नाही किंवा जोवर आरोपी आरोपपत्रात नमूद करून दिल्याप्रमाणे गुन्ह्याचा दोषी असल्याचे कोर्टासमोर माफक सिद्ध होत नाही तोवर त्याची बेल होऊ नये. तरीही जर त्या इशरत जहाँची जमानत होत असेल तर मला वाटतं फाईल केलेलं ऍप्लिकेशन, उच्च मसुदा वापरून लिहिलेलं असू शकतं. चार्जशीट फायलिंग ढिसाळ असू शकतं, पण जे काही असेल ते सेंटिमेंटल व्हॅल्यू नक्कीच नसते. त्यामुळे ते तसे पाहू पण नये. बॉटम लाईन - यूएपीए केसेसमध्ये बेल उर्फ जमानत उर्फ जामीन नक्कीच शक्य असते अगदी कितीही कठीण असली तरीही.....त्यामुळे तरतुदी नाहीत वगैरे बोलणे तितकेसे तथ्यांना धरून नाही

In reply to by जेम्स वांड

माझ्या मुद्द्याचे योग्य ते खंडन करून चूक दाखवल्याबद्दल धन्यवाद. येथून पुढे कायदेशीर बाबींमध्ये अजून दक्षता घेण्याचा प्रयत्न करेन - पण माझा कायद्याचा अभ्यास नाही. माझ्या ऐकीव माहितीमध्ये यूएपीए लागला की आरोपी आत जातो आणि मग जामिन मिळत नाही असेच होते. त्यामुळे यूएपीए लागण्याची दहशत असल्याचे दिसून येते - उदा. दिशा रवि ने ग्रेटा ला या भीतीबद्दल सांगितले होते असे वाचल्याचे आठवते. किंवा सर्व पुरोगामी शर्जिल उस्मानी ला हे कलम लावू नका म्हणून प्रयत्न करत होते असे ही काहीसे वाचल्याचे आठवते.

https://www.tv9marathi.com/maharashtra/aurangabad/aurangabad-woman-murd… प्रेमांत पडण्या आधी, मुलाचा इतिहास नक्कीच पारखून घ्या...कृपया, ह्याला धार्मिक रंग देऊ नये....

नाशिकमधील तांदूळ हडपाहडपीची ‘एसआयटी’ चौकशी करा; आमदार सातपुतेंची विधिमंडळात लक्षवेधी https://www.tv9marathi.com/maharashtra/nashik-the-issue-of-nutritious-r… शासनाच्या आदेशाचा आधार घेत बचत गटांना बाजूला सारून 13 कंत्राटदारांना सेंट्रल किचन अंतर्गत मुलांना पोषण आहार देण्याचे काम दिले. तेच काम नाशिकमधील पंचवटीतील गुंजाळबाबा नगर येथे निफाड येथील स्वामी विवेकानंद संस्थेच्या कंत्राटदाराकडे देण्यात आले. कंत्राटदार हृषीकेश चौधरी याने याचाच लाभ घेत तब्बल 281 पोते तांदूळ म्हणजे 15 हजार किलोच्या धान्यावर डल्ला मारल्याचे समोर आले आहे.

भाजपामध्ये घराणेशाही चालणार नाही, माझ्यामुळेच अनेक खासदारांच्या मुलांना…”; मोदी स्पष्टच बोलले https://www.loksatta.com/desh-videsh/tickets-has-not-given-to-mp-childr… उत्तम निर्णय... पण, त्याच बरोबर, गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना पण तिकीट देऊ नये आणि गुन्हा सिद्ध झाला असेल तर, पक्षांतून बाहेर पण काढलेले उत्तम ...

पाचही राज्यातील काँग्रेस राज्यप्रमुखांचा राजीनामा मागीतला आहे बाईंनी. निवडणूकीतील हार हे कारण. मज्जा आहे.

In reply to by धर्मराजमुटके

टॉपचे गांधीही कदाचित राजीनामा देतील पण भावनेच्या भरात जाऊन त्यांचा राजीनामा कोणीही स्विकारला नाही पाहिजे. काँग्रेसला गांधींची- विशेषतः राहुल आणि प्रियांका या भावंडांची खूप गरज आहे. अशावेळी ते दूर जाणे चालायचे नाही. मला वाटते की राहुल आणि प्रियांका काँग्रेसच्या नेतेपदावर असावेत असे काँग्रेस समर्थकांपेक्षा भाजप समर्थकांनाच जास्त वाटत असावे. ऑगस्ट २०२० मध्ये ग्रुप-२३ ने पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा हे पत्र लिहिल्यावर एक विनोद व्हायरल झाला होता. राहुलने परत पक्षाध्यक्ष व्हावे म्हणून त्यांच्या घरासमोर ५०० लोक धरणे धरून होते. त्यातील १०० काँग्रेस समर्थक होते आणि उरलेले ४०० भाजप समर्थक :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

काॅंग्रेस कडे चांगले नेतृत्व नाही हे सांगून भआजपचे वाईट नेतृत्व देशाच्या माथी मारले जातेय. नूकसान जनतेचेच होत आहे.

In reply to by Trump

केंद्र सरकार हे सर्व पक्षीय च असले पाहिजे काँग्रेस असू किंवा bjp केंद्रात एका पक्षाचे सरकार देशासाठी धोकादायक आहे.

In reply to by sunil kachure

आवरा!!! किती लिहीताय? तुम्ही काय पगारी आहात का प्रतिक्रिया देण्यासाठी?? सगळीकडे मताच्या पिंका टाकत असता. टिव्हीवर संजय राउत वात आणतात. येथे तुम्ही वात आणताय,
केंद्र सरकार हे सर्व पक्षीय च असले पाहिजे काँग्रेस असू किंवा bjp केंद्रात एका पक्षाचे सरकार देशासाठी धोकादायक आहे.

In reply to by Trump

खरे तर एकच बाजू चूक बरोबर काही न बघता रेटून नेणार्या तुमच्या सारख्या आयडी ना अजेंडा राबविण्यास विरोध करण्यासाठी लिहावे लागत आहे

In reply to by sunil kachure

मग संदर्भासकट लिहा. तुमचे लिखाण म्हणजे गाव बुद्रुक येथील संपादकाचा अमेरीकेला सज्जड इशारा असे अग्रेलख लिहीनारासारखा आहे. काही शेंडा नाही आणि बुडका की नाही.

In reply to by Trump

मिपावर, अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे... पटत नसलेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे, आपल्या हातात आहे ... चर्चा व्यक्तीगत पातळीवर उतरली की, त्या चर्चेत भाग घेण्यात अर्थ नाही... खेळीमेळीचे वातावरण काही लोकांच्या पचनी पडत नाही आणि वैचारिक मतभेद व्यक्त न करता आलेली माणसे, कधीकधी व्यक्तीगत पातळीवर उतरण्याची शक्यता असते. टीप, वरील प्रतिसाद Trump ह्यांनाच आहे,

In reply to by मुक्त विहारि

बहुतेक वेळा तेच करतो. श्री कचुरे कोणताही विषय सोडत नाहीत. बिनधास्तमध्ये लिहितात. खालील वाक्ये बघुन माझा संयम ढळला.
केंद्र सरकार हे सर्व पक्षीय च असले पाहिजे काँग्रेस असू किंवा bjp केंद्रात एका पक्षाचे सरकार देशासाठी धोकादायक आहे.

In reply to by Trump

हे मत, (केंद्र सरकार हे सर्व पक्षीय च असले पाहिजे काँग्रेस असू किंवा bjp केंद्रात एका पक्षाचे सरकार देशासाठी धोकादायक आहे.), मला पण अयोग्य वाटते ... मत पटत नसले तर सोडून द्यायचे. कसोटी क्रिकेट खेळतांना, संयमी फलंदाज, प्रत्येक चेंडू खेळत बसत नाही... ह्याबाबतीत, शरद पवार यांचे उदाहरण देतो, कितीही आरोप झाले तरी, (गोरे मॅडम ते खैरनार), मनाचा तोल जाऊ न देता, सार्वजनिक ठिकाणी, मौन धारण करून, ते आज देखील, कार्यरत आहेत. आरोप करणारे गेले पण शरद पवार अजून टिकून आहेत. शिवाय, काही लोकं हाकलले तरी परत येतातच, ज्या माणसांना आत्मसन्मान राखता येत नाही, अशा माणसांच्या मताला, कितपत प्राधान्य द्यायचे? वरील प्रतिसाद, Trump, यांनाच आहे...