लॅपटॉप घेताना अनेक जण गोधळतातयात
अनेकांना फार साधी कामे करायची असतात.
आणि तरीही गरज नसतील तर उद्या लागेल म्हणून प्रचंड ताकदीचा लॅपटॉप घेतला जातो - वस्तूत: हि ताकद कधीही वापरली जात नाही - किंवा फार क्वचित वापरली जाते .
अनेकदा दुकानदार तुम्हाला अति ताकदवान लॅपटॉप उद्या लागेल म्हणून विकतो , वस्तूत: तितकी ताकद कधीही लागत नाही, ताकदवान प्रोसेसर हे महाग असतात आणि त्याचे दुकानदाराला अधिक फायदा मिळतो .आज लॅपटॉप अतिशय मागणी आल्याने आणि चीन मधून पुरवठा बराच कमी झाल्याने लॅपटॉप च्या किमती - नवीन आणि जुन्या फार वाढल्या आहेत . आणि आता मार्केट खराब असल्याने पैसे वाचवणे ही गरज झाली आहे.
तसेच इंटेल चे आय सिरीज च्या जुन्या प्रोसेसर चे लॅपटॉप हि आय सिरीज चे आहेत म्हणून विकले जातात . यातील काही फार जुने असतात. थर्ड जनरेशन च्या आय ३ प्रोसेसर हे २०१२ ला लाँच झाले होते आणि २०१४ पर्यंत विकत होते फार फार तर २०१५ पर्यंत - म्हणजे हे ५ वर्षे जुने लॅपटॉप आहेत .बरेच नवीन पेंटियम हे सेकण्ड / थर्ड जनरेशन च्या आय ३ / आणि काही आय ५ पेक्षा पॉवरफुल आहेत - आणि जर बेसिक काम असेल तर पुरेसे आहेत .
बहुसंख्य लोकांची कॉम्प्युटर वर कामे असतात
१) इंटरनेट ब्राउजिंग - फार प्रोसेसिंग पॉवर लागत नाही .
यात मी मी सांगेन कि बरेच टॅब उघडून ठेवायची सवय असेल तर गुगल क्रोम वापरू नका .- त्याऐवजी ऑपेरा / ब्रेव्ह / इज असे ब्राउसर वापरून पहा - फायरफॉक्स - पूर्वी चांगला होता - आता तो हि लोड देतोय असे दिसले आहे .
२) व्हिडीओ कॉल - झूम वगैरे - याला हि फार प्रोसेसिंग पॉवर लागत नाही
३) मायक्रोसॉफ्ट ऑफिस -वर्ड . एक्सेल फार प्रोसेसिंग पॉवर लागत नाही पॉवर पॉइंट वापरायचा थोडी जास्त , पण काम चालून जाते .४) व्हिडिओ बघणे ( व्हीलसी वगैरे)
५) गाणी ऐकणेवरील कामासाठी फार प्रोसेसिंग पॉवर लागत नाही
बरीच सॉफ्टवेअर पण कमी प्रोसेसिंग पॉवर वर चालतात
अनेक प्रोग्रामिंग च्या युटीलिटी ही कमी प्रोसेसिंग पॉवर वर सहज चालतात.
त्याचबरोबर ऑनलाइन टीव्ही आपणास ब्राऊसर मध्ये बघता येईल
आय ३ हा प्रोसेसर फार जास्त होईल आणि आता किमती ही वाढल्या आहेत .
इंटेल ने पेंटियम हे तुलनेने स्वस्त प्रोसेसर काढले आहेत -
पेंटिअम मध्ये हि गोल्ड सिल्व्हर आणि क्वाड कोअर आहेत ( quad core - 4 cores)
तसेच एएमडी या कंपनीचे अनेक स्वस्त प्रोसेसर आहेत मी यात AMD A6 / A8 / A9 / A10 सुचवतो.
लॅपटॉप फार बाहेर नेण्याची गरज नाही तर आपण १५. ५ इंची स्क्रीन चा घ्या - हे तुलनेने स्वस्त आणि जड असतात - पण स्क्रीन तुलनेत मोठी असते .
सिनिअर सिटीझन / विद्यार्थी साठी चांगले .
रॅम हे कमीत कमी ४ जीबी - शक्यतो ८ जीबी घ्या - रॅम हे डीडीआर ४ प्रकारचेच घ्या डीडीआर ३ रॅम जुने तंत्रद्नाण आहे आणि ते स्लो असते.
हार्ड डिस्क शक्यतो एसएसडी प्रकारची घ्या - तिने चांगला स्पीड मिळतो पण जर साधी हार्ड डिस्क असेल तर आपणास सहज एसएसडी हार्ड डिस्क टाकू शकतो - साधारण २४० जीबी एसएसडी अडीच तीन हजारात यावी आणि विकत जिकडून घेता तिकडेच आपणास बदलून मिळेल . त्याला बदलण्याचा आणि त्यावर विंडोज परत लोड करण्याचा चार्ज किती ते विचारा
तर बेसिक लॅपटॉप साठी सुचवलेले स्पेसिफिकेशन
Processor - Intel Pentium or AMD A4/A6/A8/A9/A10 *
Ram - 8GB DDR 4 **
Hard Disk - Preferred SSD or 1 TB of hard disk***
Screen - 15.5 Inch
If you are used to num pad see if there is num pad
* याहून ही स्वस्त आणि स्लो प्रोसेसर आले होते पण आता ते मला तरी मार्केट मध्ये दिसले नाहीत - खरे तर ते ही चालून जावेत - हे प्रोसेसर म्हणजे Intel Atom Intel Celeron, Amd Sempron (mostly discontinued)
**बऱ्याचदा लॅपटॉप मध्ये ४ जीबी रॅम असते - तर अनेक लॅपटॉप मध्ये हे रॅम वाढवता येते - फक्त एक रॅम चा स्लॉट खाली आहे आणि किती रॅम वाढवता येईल त्याची चौकशी करा . तो दुकानदार रॅम वाढवून देतोय का ते विचारा .
***हार्ड डिस्क च्या जागी SSD टाकता येते - आणि त्याने स्पीड वाढतो .
आता वेगळ्या आकाराच्या वेगळा कनेक्टर असलेला आणि अधिक फास्ट अशा M. 2 हार्ड डिस्क आल्या आहेत ,
आणि त्यात हि २ प्रकार आहेत
m.2 SATA
m.2 NVME - हि सर्व प्रकारात फास्ट आहे
आपल्या लॅपटॉप ला कोणता m.2 स्लॉट आहे ते बघा आणि हा असेल तर नेहमीची हार्ड डिस्क ठेवून हि अजून एक लावतात येते - ऑपरेटिंग सिस्टीम व सर्व महतवाचे प्रोग्राम हिच्यावर घ्यावे .
हे बदलणे हे काहीवेळा कौशल्याचे होऊ शकते - त्यामुळे ते विचारून , योग्य ते पार्ट आणून सर्व्हिस सेंटर मधून करून घ्यावे आणि त्याबरोबर वॉरंटी वर काही परिणाम होणार नाही का हे पण विचारावे . आता रॅम / हार्ड डिस्क बदलणे साठी लॅपटॉप उघडावा लागतो
अधिक ची वॉरंटी - अनेकदा लॅपटॉप अधिक ची वॉरंटी विकतात - नॉर्मल वॉरंटी वर बहुतेक वेळा २ वर्षे वाढवून मिळतात - यात बॅटरी आणि अडाप्टर सोडून सर्व कव्हर होते - तरी मला तरी याचा फायदा मिळाला आहे - तर हि वॉरंटी घ्यावी . अनेक दा कंपनी च्या स्कीम असतात आणि वॉरंटी स्वस्तात वाढवून मिळते
कंपनी च्या स्कीम - या काय आहेत ते बघा - बर्याचदा खूप फायदेशीर असतात . अनेकदा या डुलकण आत नाहीत सर साईट वर जाऊन लॅपटॉप रजिस्टर करावा लागतो
तर यावरून आपणास आपल्या सर्वसामान्य गरजेसाठी लॅपटॉप सहन शोधता येईल अशी आशा करतो .
हेमंत वाघे
HuntMyJob.in
Coming Soon
Job Hunt Support – Basics, Preparation, Resume, Approach
वाचने
59546
प्रतिक्रिया
100
मिसळपाव
प्रतिक्रिया
एम एस आय गेमिंग
In reply to हाय एन्ड गेमिंग पीसी वर एखादा by अमर विश्वास
धन्यवाद चौकसजी
In reply to एम एस आय गेमिंग by चौकस२१२
कसा बनवला
In reply to धन्यवाद चौकसजी by अमर विश्वास
लॅपटॉप जुने प्रकरण आहे.
मॅकबुक / विंडोज लॅपटॅाप / आयपॅड
@हेमंत वाघे
In reply to मॅकबुक / विंडोज लॅपटॅाप / आयपॅड by स्वधर्म
खरे तर पेन्सिल जास्त गरजेची
In reply to मॅकबुक / विंडोज लॅपटॅाप / आयपॅड by स्वधर्म
सॉफ्टवेअरसहीत अनेक गोष्टी
In reply to मॅकबुक / विंडोज लॅपटॅाप / आयपॅड by स्वधर्म
सर,
In reply to सॉफ्टवेअरसहीत अनेक गोष्टी by गॉडजिला
हो आय पॅड चा तेव्हडा इश्यू आहे
In reply to सर, by स्वधर्म
लॅपटॉप घ्या. विंडोज घ्या.
In reply to मॅकबुक / विंडोज लॅपटॅाप / आयपॅड by स्वधर्म
छान माहिती..अतिशय उपयुक्त आणि नॉन टेक्निक भाषेत समजावलीत
Lenovo
खुप जास्त किंमत आहे.
In reply to Lenovo by हेमंतकुमार
ebay अथवा amazon वर तुम्हाला
In reply to Lenovo by हेमंतकुमार
Youtube वर व्हिडिओ बघून कळलं की
In reply to ebay अथवा amazon वर तुम्हाला by हरवलेला
स्वतःच बॅटरी तयार करायचा प्रयत्न करु नका
In reply to ebay अथवा amazon वर तुम्हाला by हरवलेला
सहमत.
In reply to स्वतःच बॅटरी तयार करायचा प्रयत्न करु नका by Trump
मोबाईल आणि लॅपटॉप
हे माहीत नव्हतं.
In reply to मोबाईल आणि लॅपटॉप by वामन देशमुख
मोबाईलात कूलिंग नसतं म्हणून का?
In reply to हे माहीत नव्हतं. by कंजूस
अक्रिय वातानुकुलन (passive cooling)
In reply to मोबाईलात कूलिंग नसतं म्हणून का? by वामन देशमुख
धन्यवाद !
म्हणजे चार्जिंग चालू ठेवून
In reply to धन्यवाद ! by हेमंतकुमार
अतिशय
मला माझ्या व्यावसायिक
Thinkpad बघा. बांधणी मजबुत
In reply to मला माझ्या व्यावसायिक by वामन देशमुख
+१ Thinkpad बघा. बांधणी मजबुत असते.
In reply to Thinkpad बघा. बांधणी मजबुत by Trump
dell Inspiron 7420 (i7 12th Gen 1255U)
In reply to मला माझ्या व्यावसायिक by वामन देशमुख
मी नुकताच हा घेतला.