Skip to main content

युक्रेनवरून तणाव

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 12/02/2022 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या रशियाच्या युक्रेन, युरोप आणि अमेरिकेबरोबरच्या संबंधांमध्ये बराच तणाव निर्माण झालेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रशियाने आपले सुमारे 1 लाख 10 हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर तैनात केलेले आहेत. त्यामुळे युक्रेनवर रशिया आक्रमण करण्याच्या तयारीत आहे, अशी भिती पाश्चात्य देशांकडून व्यक्त होत आहे. मॉस्कोकडून ती शक्यता फेटाळून लावली जात आहे. हा तणाव निवळावा यासाठी यात सहभागी असलेली प्रत्येक बाजू आग्रही आहे. मात्र त्याचवेळी यातील मुख्य घटक असलेले अमेरिका आणि रशिया आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. पण एकीकडे राजनयिक पातळीवरून हा तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न होत असतानाच दोन्ही बाजूंमध्ये आपापली शक्ती दाखवून देण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनच्या पूर्वेकडील डोनबास, दोनेस्क आणि क्रिमीया द्वीपकल्पामधील (Crimean Peninsula) आपल्या समर्थक फुटिरतावाद्यांना रशियाने पाठिंबा दिल्यापासून युक्रेनमधील स्थिती अस्थिर बनली आहे. कीवच्या वाढत्या रशियाविरोधी भूमिकांच्या पार्श्वभूमीवर 2014 मध्ये युक्रेनच्या रशियनबहुल आणि व्यूहात्मकदृष्ट्या महत्वाच्या क्रिमीया द्वीपकल्पावर रशियाने ताबा मिळवला. तेव्हापासून अमेरिका आणि युरोपीय संघाने रशियावर वेगवेगळे निर्बंध घातले आहेत. पण त्याचवेळी अमेरिकेकडून नाटोच्या (NATO) विस्ताराचे प्रयत्नही अविरतपणे सुरू आहेत, ज्यावर रशियाचा मुख्य आक्षेप आहे. युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यामुळे रशियाच्या सुरक्षेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणूनच युक्रेनला नाटोचे सदस्यत्व दिले जाऊ नये, ही मागणी मॉस्कोने आग्रहाने लावून धरलेली आहे. त्यावर विचार करण्याऐवजी अमेरिकेडून रशियाला आक्रमक ठरवून आपले धोरण पुढे रेटण्याचा प्रयत्न केला जात आहे. युक्रेनवरून निर्माण झालेल्या या तणावाचा आपल्या आणि एकूणच युरोपच्या सुरक्षेवर परिणाम होत असल्यामुळे हा प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यासाठी फ्रान्स, जर्मनीने पुढाकार घेतला आहे. युरोपीय देशांना रशियाशी संबंध सुरळीत सुरू ठेवणे आर्थिक, व्यापारी दृष्टीने आवश्यक वाटत आहे. पण दुसरीकडे अमेरिकेच्या स्वत:च्या भू-राजकीय गरजांमुळे युरोपीय देशांना स्वतंत्रपणे भूमिका घेणे अवघड होत आहे. या परिस्थितीतच गेल्या काही महिन्यांपासून युरोपात इंधनाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. इंधनाच्या टंचाईमुळे त्याचे दर युरोपात भडकलेले आहेत. त्यामुळे रशियाकडून गॅसपुरवठा होण्याशिवाय युरोपसमोर अन्य पर्याय नाही. नॉर्ड स्ट्रीम-2 चा मुद्दा युरोप मोठ्या प्रमाणात रशियातून निर्यात होणाऱ्या इंधनावर अवलंबून आहे. युरोपला हा पुरवठा सध्या युक्रेनमार्गेच नॉर्ड स्ट्रीम-1 वायूवाहिनीद्वारे होत आहे. या वायूवाहिनीमुळे युक्रेनला दरवर्षी सुमारे 1.2 अब्ज अमेरिकन डॉलरचा महसूल मिळत आहे. काही वर्षांपूर्वी कीवकडून या वाहिनीचे वापर शुल्क वाढवून मिळवण्यासाठी अडवणूक होत होती. त्याचा परिणाम युरोपच्या गॅसपुरवठ्यावर झाला होता. त्यामुळे जर्मनीने वाढती मागणी आणि सुरक्षा या कारणांनी बाल्टिक समुद्रातून नॉर्ड स्ट्रीम-2 (Nord Stream-2) वायूवाहिनी टाकण्यासाठी 2018 मध्ये मान्यता दिली. नॉर्मंडी आराखडा जर्मनी, फ्रांस, रशिया आणि युक्रेन यांचाय प्रतिनिधींनी फ्रांसमधील नॉर्मंडी येथे चर्चा केली होती. 6 जुलै 2014 रोजी नॉर्मंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या विजय दिवसाच्या 70 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या देशांचे नेते पहिल्यांदा भेटले होते आणि त्यामध्ये युक्रेनच्या दोनबास प्रांतातील संघर्ष मिटवण्यावर चर्चा झाली होती. या 4 देशांदरम्यानचा हा एक अनौपचारिक मंच आहे. याच मंचाच्या माध्यमातून युक्रेनचा प्रश्न चर्चेच्या आणि शांततापूर्ण मार्गी लावण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. लिंक https://avateebhavatee.blogspot.com/2022/02/blog-post_12.html

वाचने 118110
प्रतिक्रिया 434

प्रतिक्रिया

युक्रेन का युरोपियन आणि अमेरिकन प्रभावातून मुक्त करणे हा आहे हा हेतू लवकर साध्य होणार नाही. युक्रेन नी युद्ध टाळायचा प्रयत्न केला तरी मित्र मोठे कुटील आहेत. ते युद्ध लवकर संपू देणार नाहीत.

युक्रेन मधील माझ्या मित्रांशी माझा संपर्क तुटला आहे. काल पर्यंत त्यांच्या कडून स्टेटस वगैरे दिसत होते. युक्रेन ची मिलिटरी सोडल्यास इतर जनता सुद्धा बऱ्यापैकी देशभक्त आहे आणि सशस्त्र आहे. नवमाता असलेली माझी मैत्रीण काल पोलंड सीमेच्या दिशेने प्रवास करती झाली तिच्या सोबत तिचे वृद्ध आई वडील आणि ३ लहान मुले होती. तिचा पती युक्रेन आर्मीत असल्यायन तो युद्धभूमीवर गेला आहे. इतर पुरुषांनी बंदुका वगैरे घेऊन मोक्याच्या ठिकाणी स्थलांतर केले आहे. सध्यातरी इंटरनेट बंद पडला आहे असे वाटत आहे. मोल्दोवावर सुद्धा रशिया हल्ला करेल असे वाटत आहे.

In reply to by साहना

तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे? युक्रेनचे सैन्य देशभक्त आणि सशस्त्र नाही, असा अर्थ निघतो यातुन.
युक्रेन ची मिलिटरी सोडल्यास इतर जनता सुद्धा बऱ्यापैकी देशभक्त आहे आणि सशस्त्र आहे.
माल्दोवाला कशाला घेताय ह्यामध्ये? ते तर कायमस्वरुपी तटस्थ आहेत. संदर्भः मोल्दोव्हाच्या संविधानाच्या अनुच्छेद 11 मध्ये असे म्हटले आहे: "मोल्दोव्हा प्रजासत्ताक त्याच्या कायमस्वरूपी तटस्थतेची घोषणा करते. मोल्दोव्हा प्रजासत्ताक इतर राज्यांच्या सशस्त्र दलांना त्याच्या प्रदेशावर तैनात करण्याची परवानगी देत ​​नाही." अशाप्रकारे, मोल्दोव्हाची तटस्थता त्याच्या घटनेत निहित असल्याने, देशाची नाटो किंवा सीएसटीओमध्ये सामील होण्याची कोणतीही योजना नाही. Article 11 of the Constitution of Moldova states: "The Republic of Moldova proclaims its permanent neutrality. The Republic of Moldova does not allow the deployment of armed forces of other states on its territory." Thus, since Moldova's neutrality is enshrined in its constitution, the country has no plans to join either NATO or CSTO. https://en.wikipedia.org/wiki/Moldova%E2%80%93NATO_relations
मोल्दोवावर सुद्धा रशिया हल्ला करेल असे वाटत आहे.

In reply to by साहना

जनता देश भक्त आहे युक्रेन. ची. म्हणजे नक्की काय आहे. रशिया ची जनता ,बाकी देशाची जनता देश विरोधी आहे का? जनता सशस्त्र आहे. ह्या वाक्याचा पण अर्थ नाही समजलं. बंदूक,पिस्तूल ह्यांनी युद्ध होतात का हल्ली.? मग ती आधुनिक शस्त्र फक्त शो रूम मध्येच असतात का?

युक्रेनने अमेरिकेस मदत मागितली आहे. अमेरिका काय भूमिका घेते ते बघीतले पाहिजे. -दिलीप बिरुटे

भारताचे बरेच विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले आहेत. त्यांच्या साठीचे कीव बाऊंड एअर इंडिया विमान युक्रेनची एअरस्पेस बंद असल्याने दिल्लीत परतले.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

काही निर्ल्लज भारतीय विद्यार्थी "रशिया प्लिज हल्ला करा म्हणजे आमच्या परीक्षा रद्द होतील " असे काळ ट्विट करत होते.

In reply to by Trump

पाकिस्तान ने सैनिक मारले चिनने जमीन बळकावली तरी भारताने शांतता बाळगावी म्हणणारे जास्त मनोरूग्न म्हणावे लागतील.

In reply to by साहना

भारतीय विद्यार्थी "रशिया प्लिज हल्ला करा म्हणजे आमच्या परीक्षा रद्द होतील " असे काळ ट्विट करत होते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ह्या विद्यार्थ्यांनी खूप आधीच आपल्या विद्यापीठाकडे अर्ज केला होता कि आम्हाला जाऊ द्या आम्ही नंतर येऊन कार्यक्रम कम्प्लिट करू. वैद्यकीय शिक्षण असल्याने रिमोट शिकणे किंवा परीक्षा शक्य नव्हत्या. विद्यापीठाने त्यांचा अर्ज नामंजूर केला त्यामुळे एक तर संपुन डिग्री सोडणे कदाचित त्यांना शक्य झाले नसावे. विश्वगुरू भारताचे २०,००० विद्यार्थी मुलांत युक्रेन मध्ये जाऊन का शिकतात ह्यावर लोकांनी चिंतन करण्याची गरज आहे.

In reply to by साहना

तुमचा विश्वगुरू शब्दावर भलताच राग आहे. :)
विश्वगुरू भारताचे २०,००० विद्यार्थी मुलांत युक्रेन मध्ये जाऊन का शिकतात ह्यावर लोकांनी चिंतन करण्याची गरज आहे.

In reply to by Trump

विश्वगुरू मोदींनी स्वतःला उद्देशून म्हणले कि भारत देशाला ? भारत देशाला उद्देशून म्हणले असले तर असे स्वतःचं देशाचे ब्रॅण्डिंग करणे काय चुकीचे आहे ? नाहीतरी "गुरु " बिझिनेस मध्ये तरी भारताची मक्तेदारी आहेच कि .... कोणत्या रंगाचे आणि कोणत्या "थेअरी" चे पाहिजेत सांगा स पासून स कडे नेनारे, कि प्राणायाम शिकवणारे , कि शून्यातून विभूती निर्माण करणारे ! ..... !

In reply to by साहना

२०,००० विद्यार्थी मुलांत युक्रेन मध्ये जाऊन का शिकतात The cost of studying MBBS in Ukraine is very less compared with private medical colleges in India. The total cost of MBBS education for six years in Ukraine is about 16.25 Lacs.

रशिया ची बाजू ही इथे तरी न्यायाची आहे.रशिया च्या सीमेवर अमेरिका सारखा देश युक्रेन चा वापर करून प्रभाव निर्माण करत असेल रशिया सहन करूच शकतं नाही. भारत अमेरिका जवळ जातोय असे वाटले की चीन आक्रमक होतो . असे खूप प्रसंग आहेत. रशिया आक्रमक का झाला? अमेरिका त्याच्या वेशीवर आली

जगात कुठे ही युद्ध.. देशप्रेमी,मानव प्रेमी तर कुठे दिसत नाहीत. पण साठेबाज लबाड. वस्तू बाजारातून गायब करून त्याचा तुटवडा निर्माण करतात ..आणि प्रचंड महाग विकतात. कारण युद्ध फायदा देश प्रेमी साठे बाज. पेट्रोल , डिझेल महाग. युद्ध ज्या देशात होत आहे ते देश आणि इंधन वाढ ह्यांचा काही दुरून पण संबंध नसला तरी इंधन वाढ होते. लाभर्ती देश प्रेमी ऑईल कंपन्या ,त्यांचे मालक. सोने मात्र स्वस्त होत नाही सोन्यावर युध्दाचा परिणाम होत नाही. अजब आहे युद्ध होणे म्हणजे दिखाव करणारे देश प्रेमी ह्यांची चांदी. युद्ध ची स्थिती मी अनुभवली नाही पण मुंबई मध्ये ,दंगल,पूर ह्या मुळे निर्माण झालेली स्थिती बघितली आहे .. खूप कमी अगदी पॉइंट मध्येच percent काढावे लागतील अशी लोक मदत करणारी होती ..बाकी स्थिती चा फायदा उचलून स्वतःचा फायदा कसा होईल हे बघणारेच होते. खूप मोठ्या प्रमाणात देश प्रेमी संकट काळात कधीच दिसले नाहीत.

मला युरोपीयन युनियन (EU) काय भूमिका घेते त्यात जास्त स्वारस्य आहे! BREXIT नंतर युरोपीयन युनियनचे नेतृत्व करण्याची संधी फ्रान्स आणि जर्मनीला मिळाली आहे आणि आता त्यांना अमेरिकेच्या सुरात सूर मिसळणाऱ्या ब्रिटनची भूमिका विचारात घ्यायची आवश्यकता राहिली नाहीये. गेल्या दोन-तीन वर्षातल्या घडामोडींवर सोशल मिडियावर झालेल्या चर्चा वाचताना आणि तिथल्या मित्रमंडळींकडून ऐकलेल्या गोष्टींतुन युरोपीयन युनियनच्या सहभागी देशांतील नागरिक ज्या प्रकारे ब्रिटनची निर्भत्सना करताना दिसतात त्यावरून लोकमताचा अंदाज येतोय. आता फ्रान्स आणि जर्मनी, अमेरिका आणि ब्रिटनची तळी उचलतात, की कठोर शब्दात (कोरडा) निषेध नोंदवत अलिप्त रहात युरोपचे स्वतंत्र हितसंबंध निर्माण करण्याला प्राधान्य देतात हे पाहण्याची उत्सुकता आहे. तसेही अमेरिकेच्या निर्बंधाना हल्ली इराण पण जुमानत नाही तर रशिया त्यांना फार गांभीर्याने घेईल असे वाटत नाही. जाता जाता : अमेरिका आणि युकेने त्यांच्या सोयीसाठी जगभरातल्या अनेक देशांत हस्तक्षेप करून बरेच शत्रू निर्माण केले आहेत. ह्या युद्धाच्या निमित्ताने त्या देशांमध्ये अराजकता माजून तिथेही विद्यमान सरकार उलथवण्यासाठी उठाव / क्रांती वगैरे होते का हे पाहणेही औत्सुक्याचे असेल.

काही भाकिते. कुठल्याही पुराव्यावर आधारित नसून निव्वळ वैयक्तिक मते आहेत. नंतर किती खरी ठरतील पाहूया. मार्च २५ मध्ये पुन्हा इथे व्हिसिट करेन. - रशियन सैनिक हे अप्रशिक्षित, लढण्यास उत्सुक नाहीत असे असतील. - रशियन सैनिक अपेक्षेपेक्षा बराच मार खातील आणि ह्या युद्धांतून रशियन सैन्य अत्यंत ढिसाळ आहे असे दिसून येतील. - युक्रेन चे राष्ट्रपती वोलडोमीर ह्यांतून चांगले तावून सुलाखून प्रसिद्ध होतील. - क्यिव मध्ये रशियन सैन्य पोचण्यासाठी साधारण ७२ तास तरी लागतील. - पुतीन काही दिवसांत माघार घेतील पण कदाचित युक्रेन चा बऱ्यापैकी भाग आपल्या हाताखाली ठेवतील. - रशियन अर्थव्यवस्था बराच काळ कोलमडेल.

In reply to by साहना

रशिया वर अत्यंत कडक प्रतिबंध लावले जातील. रशियन अर्थव्यवस्था कोसळेल आणि पुतीन सत्तेवर असेपर्यंत ती कोसळलेली राहील. या सगळ्यामुळे रशिया स्वतः च तुटला नाही म्हणजे मिळवली. युक्रेनियन्स किती तीव्र विरोध करतात यावर त्या देशाचे भवितव्य अवलंबून राहील. पुतीन आपले पपेट सरकार सत्तेवर बसवेल, पण जर देशात अंतर्गत यादवी सुरू झाली तर ती रोखणे नवीन सरकारला शक्य नाही. पुतीन ला याची फारशी काळजी दिसत नाही. आर्थिक निर्बंध किती भयंकर असतात त्याची पुतीन ला कल्पना दिसत नाही.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

मग रशिया चीनकडे झुकणार. तैवान हा चीनचा प्रदेश आहे हे जाहीर करूनच मग पुतीनने युध्दाला सुरवात केली आहे. चीन रशिया युती भयंकर असेल. मला तरी यावरून इंदिरा गांधींची आठवण आली. रशियाशी करार करून मग बांगला देश युध्द छेडलं. असो. उंदीर मारणाऱ्यांनी किती तो विचार करायचा? ;)

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

शिटपोस्टिंग हे वाईट अर्थाने नाही म्हणलं. गंभीरतेचा अभाव, अश्या अर्थाने. जनरली देशांचे ऑफिशियल ट्विटर हँडल अश्या इन्फॉर्मल गोष्टी पोस्ट करत नाहीत, युक्रेन पूर्वीपासूनच त्याबाबत वेगळे आहे. रशियाबद्दल हमखास मिम्स टाकले जायचे त्यांच्याकडून.

शेखर गुप्तांनी गिडिओ राष्मान या पुलित्झरधारी ब्रिटिश पत्रकाराचा हा लेख रेकमंड केला आहे. हा लेखक अनेक वर्षांच्या अनुभवातून लिहितोय असे दिसते. काही टेकअवेज:
  • रशिया युक्रेनमधली केंद्रीय आणि स्थानिक- संपूर्ण शासनव्यवस्था बदलेल. लिस्टमधल्या युक्रेनियन्सचे जीव जातील.रशियन सैन्यासमोर युक्रेन सैन्याचा फार काळ टिकाव लागणार नाही.
  • पाश्चिमात्य देशांनी या वादात येऊ नये असे पुतीनने धमकावले आहे, आणि छुप्या शब्दात अनुवस्त्रांची धमकी दिली आहे.
  • नाटो सध्यातरी यात पडणार नाहीये. मात्र हवाई युद्धात जर रशियन विमान पोलंडची हवाई सीमा ओलांडतील तर पोलंड (नाटो सदस्य देश) कदाचित प्रत्युत्तर देऊ शकते.
  • युक्रेनमध्ये असलेल्या अमेरिकन अथवा युरोपियन नागरिकांची जीवितहानी झाल्यास त्या देशांवर नागरिकांचा दबाव वाढू शकतो.
  • युक्रेन युद्धाचा वापर करून पुतीन रशियामध्ये संपूर्ण हुकूमशाही स्थापित करेल.
  • रशियन उर्जास्रोतावर अवलंबून असलेल्या जर्मनी आणि इटलीच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतात.
  • रशियावरचे निर्बंध रशियाबाहेर संपत्ती असणाऱ्या रशियन नागरिकांसाठी वाईट असतील.

In reply to by कॉमी

शेखर गुप्ता हा एकदम चालू माणूस आहे. याला सोनिया गांधीने २००७ मध्ये पद्म पुरस्कार दिला होता हे ध्यानात ठेवा! धंदे के लिए कुछ भी! दिल्लीमध्ये असलेली अमाप संपत्ती कशी अचानक वाढली याचे अनेक सुरस किस्से हलक्या आवाजात पसरलेले आहेत. + पुलित्झरधारी किंवा मॅगेसेसे वगैरे मिळालेले/मिळवलेले लेखक म्हणजे अजेंडाधारी पत्रकारिता असणार याची खात्री बाळगता येते! तेव्हा यांचे लेख वाचतांना याने नक्की काय खेळी केली म्हणून याला पुरस्कार का मिळाला असावा असा प्रश्न नेहमी डोक्यात ठेवावा!

In reply to by निनाद

> + पुलित्झरधारी किंवा मॅगेसेसे वगैरे मिळालेले/मिळवलेले लेखक म्हणजे अजेंडाधारी पत्रकारिता असणार याची खात्री बाळगता येते! १००% जेंव्हा हिटलर ने "स्वरक्षण" म्हणून पोलंड वर आक्रमण केले तेंव्हा न्यू यॉर्क टाईम्स मधील दोन वार्ताहरांनी भाला मोठा लेख लिहून ह्यांत पोलंडचीच चूक कशी होती असा युक्तिवाद केला होता आणि त्यांना त्या लेखासाठी पुलित्झर कि काय तो पुरस्कार मिळाला होता. आपल्या केजरीवाल ला मॅगेसेसे पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे हे पुरस्कार कशाचेही द्योतक नाहीत. गुप्ताजी एक नंबरचे डांबिस, खोटारडे आणि नीच व्यक्ती आहेत. ह्यांच्या व्हिडिओना शेर करून ह्यांना महत्व देऊ नये.

In reply to by साहना

गुप्ताजी एक नंबरचे डांबिस, खोटारडे आणि नीच व्यक्ती आहेत. ह्यांच्या व्हिडिओना शेर करून ह्यांना महत्व देऊ नये.
त्यांचे कट द क्लटर, नॅशनल इंटेरेस्ट उत्तम असतात. https://www.youtube.com/hashtag/cuttheclutter https://www.youtube.com/results?search_query=National+Interest+with+She… कृपया तुमचे अभ्यासु समत्युल्य स्त्रौत द्यावेत.

पुढच्या वर्षी ह्या वेळेपर्यंत तिसर्या महायुध्दाने सर्वोच्च बिंदू गाठलेला असेल. चिनी सैन्य कलकत्ता नी दिल्ली वर बोम्बवर्षाव करत असेल भारतीय सैन्याने लाहोर नी ईस्लामाबाद नष्ट केलेलं असेल. चिन एकाच वेळी भारत नी जपानात घुसलेला असेल. भारत चिनच्या हल्ल्यानंतर युध्दात ऊतरेल. चिन - रशिया- पाकिस्तान नी अरब राष्ट्रे विरूध्द युरोप- अमेरीका- भारत असे युध्द पेटलेले असेल. मी असाच अंदाज चिन मध्ये कोरोना पिक वर होता तेव्हा बांधला होता तर माझ्यावर लोक फिदी फिदी हसत होते. नंतर माझा अंदाज खरा ठरला.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तिसरे महा युद्ध होणार नाही अतिशय घातक असणाऱ्या शस्त्र चा वापर होणार नाही. अणू बॉम्ब,हायड्रोजन बॉम्ब ,जैविक हत्यार ही वापरली जाणार नाहीत अमेरिका,युरोप असू किंवा रशिया. त्यांचा मेंदू शाबूत आहे. घातक शस्त्रांचा वापर म्हणजे . युद्धात सहभागी असो किंवा नसो सर्व जगाचा विनाश. आज खूप भयंकर हत्यार अस्तित्वात आहेत त्या मुळे तिसरे महायुद्ध हे हत्यार नी लढले जाणार नाही आर्थिक क्षेत्रात लढल जाईल. रशिया लं आर्थिक क्षेत्रात कमजोर केले जाईल. पण हत्यार वापरून विनाश नाही. तेच रशिया मित्रांशी मिळून युरोप ,अमेरिका ह्यांची आर्थिक कोंडी करेल पण घातक शस्त्र वापरणार नाही.

युक्रेनने शरणागती पत्करली तर शहाणपणाचे होईल. तेवढीच जिवीत आणि वित्तहानी टळेल.

In reply to by Trump

बॉल युक्रेनच्या कोर्टातून गेला आहे. त्यांनी शरणागती पत्करली काय आणि नाही काय, रशियन वर्चस्व ठरल्यातच जमा आहे असे आत्तातरी वाटते. युक्रेन काय करते यापेक्षा अमेरिका आणि युरोपियन राष्ट्र काय करणार त्यावर जास्त दिशा ठरेल. अमेरिकी निर्बंधांचे काय परिणाम होतील आणि त्यावर रशिया काय प्रत्युत्तर देईल, चायना काय करेल हे सगळे जास्त महत्वाचे वाटते.

नाटो वर प्रचंड दबाव आहे. पुढचे काही तास महत्वाचे आहेत. जर नाटो काही करणार असेल तर त्याचा निर्णय उद्या होईल. तो होईपर्यंत युक्रेन शस्त्रे खाली ठेवणार नाही.

नाटो काहीही करू शकणार नाही. एकतर युक्रेन नाटोचा सदस्य नाही. त्यातून रशियाशी दोन हात करायला आपले सैनिक कोणता देश पाठवणार आहे? फार तर युक्रेनला आर्थिक/ शस्त्रास्त्रांची मदत पाठवू शकतील पण ती तेथे पोचवायची कशी हा एक मोठा प्रश्न आहे. रशियन पाणबुड्या एकही जहाज तेथे नेऊ देणार नाहीत. पुतीन हे स्वतः के जि बी चे माजी अध्यक्ष असल्याने त्यांना आपल्या आणि इतर देशांची गुप्त बातमी कशी वापरायची याचे उत्तम ज्ञान आहे. जो बिडेन सारखा विसराळू अध्यक्ष कुठे आणि पुतीन कुठे बाकी कुंपणाच्या आडून भुंकणारे कुत्रे भरपूर असतात.

खरे ह्यांच्या ह्या पोस्ट शी सहमत.

ते agenda चालवत नाहीत .खरे तेच व्यक्त होतात. खूप आयडी एजेंडा चालवतात.खऱ्या स्थिती शी त्यांचे वाकडे असते. आणि मी पण जे वाटतं तेच लिहत असतो. तळी उचलत नाही.

अमेरिका जरी भान्ड्वलदार असली तरी एक अनारक्शित जातीतला भारतीय म्हणुन मी अमेरिकेचे खुप उपकार मानते. जर computer industry आणि त्यामुळे आलेले jobs नसते तर आज माझ्या सारख्या मध्यम वर्गाची परिस्थिती खुप वाइट असती. आरक्शणामुळे सरकारी नोकर्या मिळाल्या नसत्या. मध्यम हुशारीमुळे choice limited होते. अश्यावेळी कुठल्यातरी भारतीय manufacturing industry मधे खितपत पडावे लागले असते. अमेरिकेच्या computer industry मुळे भारतीय अर्थव्यवस्था पण जोमाने वाढली. अमेरिका आणि dollar माझ्यासारख्या भारतीय लोकान्साठी तरी महत्वाचे आहेत. communist/socialist देश फक्त गरिबी आणि छुपा साम्राज्यवाद पसरवतात. चीन अपवाद पण तो communist भान्ड्वलदार आहे. भारतासारख्या विविध धर्म्/जाती/देश असलेल्या देशात चीन सारखे model चालणे अशक्य आहे. हे युध्द लवकर सम्पु दे

In reply to by सुखीमाणूस

नुकतेच आयटी क्षेत्र निर्माण झाले होते,कॉम्प्युटर चा वापर वाढत होता. पुढची अर्थ व्यवस्था कॉम्प्युटर विषयातील ज्ञान वर अवलंबून होती. भारत अडखळत होता. पण पुढची स्थिती ओळखून भारतात कॉम्प्युटर चे शिक्षण सुरू झाले होते सरकारी संस्था आयआयटी,किंवा बाकी संस्था ते अभ्यासक्रम शिकवत होते. ही आयती शिक्षित लोकांची फौज अमेरिका नी आपल्या देशात स्थलांतरित केली. मार्केट पेक्षा जास्त पगार देवून .. भारतात हुशार लोक राहिली च नाहीत. देशाचे नुकसान झाले ही लोक इथेच राहिली असतो ब्रेन ड्रेन झालं नसते तर भारताने उत्तुंग भरारी मारली असती... ही दुसरी बाजू पण विचारात घ्या..स्पष्ट लिहल्या बद्धल क्षमस्व

In reply to by sunil kachure

भारतात हुशार लोक राहिली च नाहीत. सुरवातीला वाटले असेल तसे.... पण एकूण लोकसंख्याच एवढी प्रचंड आहे कि भारतात पुरेसे हुशार लोक आहेत ( हे मी भारतात राहत नसताना म्हणतोय हे लक्षात घ्या ) आणि आता तर भारतातततच एवध्या सुविधा आणि पैसे आहेत कि "स्थलांतर " करण्यामागची करणे कमी होत आहे ,, भारतासाठी चांगलेच आहे भारताचे कौतुक हे कि नुसतेच संगणक माहिती क्षेत्रात नाही तर उत्पादन क्षेत्रात पण भारत निर्यात करीत आहे .. त्यःचे विपणन नीट होत नाही कारण ते बरेचदा सरकारी बाबू लोकांच्या हातात असते म्हणून इंजिनीरिंग एक्स्पोर्ट प्रोमोशन कौंसिल चा गोंधळ पाहिला आहे

In reply to by चौकस२१२

त्यःचे विपणन नीट होत नाही कारण ते बरेचदा सरकारी बाबू लोकांच्या हातात असते म्हणून इंजिनीरिंग एक्स्पोर्ट प्रोमोशन कौंसिल चा गोंधळ पाहिला आहे
मी बरेचदा भारतीय वस्तु परदेशामध्ये बघ्यातल्या आहेत. त्यांचे आवरण आणि चिनी वस्तुंचे आवरण ह्यात खुप फरक असतो. चिनी वस्तुचे आवरण, माहितीपत्रक खुपच आकर्षित असते.

In reply to by चौकस२१२

त्या वेळी . जी आयटी किंवा कॉम्प्युटर मधील थोडे ज्ञन बाळगून होते त्यांना पण अमेरिका नी खूप मोठा पगार दिला जी खरोखर देण्याची गरज नव्हती येथील सर्व च भारताच्या साधन संपत्ती वर शिक्षण घेतलेले तिकडे गेले. आज तिचं लोक अमेरिकेचे पाठी रखे आहेत. आज स्थिती बदलली आहे त्यांना भारतीय लोकांची गरज नाही..म्हणून migration कायद्यात बदल करून शक्य होईल तितके नियंत्रण भारतीय नागरिक वर आणले जाईल भारताने ती बाब गंभीर पने घेण्याचं आज तरी काहीच कारण नाही.

In reply to by sunil kachure

जेनेटिक अभियांत्रिकी,मायक्रो बायोलॉजी,कृत्रिम बुध्दी मत्ता,ऑटोमेशन. हा क्षेत्रात भारत कुठेच नाही. ना भारतात ह्याचे शिक्षण देण्याची कुवत आहे. भारताची गरज संपलेली आहे.

https://youtu.be/gSQ6-14FEoQ जो बायडन चा पत्रकारांशी थेट संवाद, बरेच प्रश्न आव्हानात्मक होते, तरीही व्यवस्थित उत्तर दिलीत. त्याची झोपाळू, विसराळू म्हणून संभावना करायच्या आधी भक्तांनी आपले प्रधानमंत्री प्रेस शी काय आणि कसे बोलतात हे पाहावे.

रशियावरील सर्वांत गंभीर निर्बंध म्हणजे SWIFT वरील बंधन. SWIFT सिस्टम द्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर पैसे फिरतात. पण जर्मनी आणि इटली ने ह्या निर्बंधाला विरोध केला आहे आणि त्यामुळे हा निर्बंध अजून टाकला गेला नाही. इथे जर्मन भूमिका आणि त्यांचे भ्रष्ट नेतृत्व लक्षांत घेतले पाहिजे. मर्कल काकूंच्या आधी त्यांचे नेते होते गैरहड दादा. १९९८ ते २००५ पर्यंत हे जर्मनीचे नेते होते. हे पुतीन ह्यांचे घनिष्ट मित्र. इतके घनिष्ट कि सध्या बहुतेक रशियन कंपनीच्या बोर्डवर आहेत. रॉसनेफ्ट हि रशियाची सर्वांत मोठी तेल कंपनी ज्यावर अजून निर्बंध लादले नाहीत त्याच्या बोर्ड वर हे आहेत. नॉर्दस्ट्रीम च्या समभाग धारकांचे हे प्रमुख आहेत. https://www.linkedin.com/in/gerhard-schroeder/. थोडक्यांत काय तर उद्या भारताने सुद्धा हाच मॉडेल राबवून इम्रान खान ह्यांना BSNL च्या बोर्डवर किंवा विजय सुपर स्कुटर कंपनीच्या बोर्डचे चेअरमेन नेमावे. रशियन ऊर्जा कंपनीवर आपण बंधन टाकणार नाही हे अमेरिकेने आज वारंवार स्पष्ट केले आहे. त्याशिवाय जोपर्यंत नाटो मेम्बर्स वर हल्ला होत नाही तो पर्यंत आपण फक्त बघ्याची भूमिका घेणार असे सुद्धा अमेरिकेने स्पष्ट केले. थोडक्यांत काय तर युक्रेन सध्या एकाकी पडलेला आहे. निर्बंधांनी सामान्य रशियन लोकांचे तसेच अतिशय श्रीमंत लोकांचे हाल झाले तरी पुतीन ह्यांना वैयक्तिक फरक पडणार नाही. मॉस्को मध्ये रशियन लोकांनी पुतीन विरोधांत निदर्शने केली. रशियन उद्योगपती च्या शिष्टमंडळाने पुतीन ह्यांची भेट घेऊन युद्ध थांबवण्याची विनंती केली असे वाचनात आहे. डब्लिन मध्ये लोकांनी रशियन दूतावासाच्या पुढे घोषणा दिल्या आणि त्यांना लाल रंग फासला. युक्रेन च्या भारतातील राजदूतांनी मोदी ह्यांनी ह्या युद्धांत लक्ष घालून पुतीन ह्यांचे मन वळवावे अशी विनंती केली. युक्रेन ने ह्या आधी भारताच्या विरोधांत UN मध्ये भूमिका घेतली होती आणि पाकिस्तान ला T८० रणगाडे विकले होते, भारताच्या अणू चाचण्यांचा विरोध करून भारतावर निर्बंधांना युक्रेन ने पाठिंबा दिला होता. इत्यादी कारणांनी युक्रेन च्या बाजूने ठाम भूमिका भारत तरी घेईल असे वाटत नाही आणि माझ्या मते ते शहाणपणाचे आहे. युक्रेन शरणागती पत्करणार नाही आणि युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष देश सोडून जाणार नाहीत अशी लक्षणे आहेत. रशियन सैन्यापुढे युक्रेनियन सैन्याचा निभाव लागणार नाही ह्याची सर्वानाच जाणीव आहे. त्यामुळे शत्रूवर जास्ती जास्त नुकसान निर्माण करावे अशी युक्रेनियन सैन्याची भूमिका आहे. युक्रेनियन आर्मीच्या मते १२ तासांत खालील नुकसान रशियन सैन्याला झाले आहे. - 30 Russian tanks - 130 armored fighting vehicles - 5 aircraft - 6 helicopters - 200+ Military personnel ह्यातील साधारण ६ रशियन रणगाड्यांचे फोटो, अनेक ट्रक्स चे फोटो आणि २ जेट्स आणि ३ हेलिकॉप्टर्स चे फोटो व्हिडीओ इत्यादी उपलब्ध आहेत. २ रशियन सैनिकांना जिवंत पकडले गेले. त्याशिवाय ६ रशियन धार्जिण्या आतंकवादी सैनिकांना युक्रेनियन सैनिकांनी पकडले. एका जखमी रशियन सैनिकाला सुश्रुषा करतानाचे व्हिडीओ सुद्धा समोर आले.[२] युक्रेनचे प्रचंड नुकसान झाले आहे. सार्वजनिक रिकॉर्डिंग वरून दिसून आले कि रशियन नेव्हीने एक युक्रेनियन बेटावर हल्ला करून त्यांच्या सर्व सैनिकांना मारले. त्या सैनिकांनी रशियन नौदलाला "fu*k y*u" शिवी दिली हे त्यांचे शेवटचे शब्द. [६] चेर्नोबिल येथील अपघातग्रस्त आण्विक प्रकल्पवर सुद्धा रशियाने हल्ला केला. ह्या प्रकल्पाची सुरक्षा ज्या युक्रेनियन राष्ट्रीय दलावर होती त्यांनी बराच वेळ चकमक केली पण शेवटी रशियन जिंकले. सध्या तो पूर्णपणे त्यांच्या ताब्यांत आहे. ह्या शिवाय सीमेलगत ची काही शहरे रशियाने जास्त लढाई न करता ताब्यांत घेतली आहेत. कीव मधील दोन विमानतळ रशियाने जाळले असले तरी १००% त्यांच्या ताब्यांत आले नाहीत. ह्या भानगडीत रशियाची काही विमाने पाडण्यात आली. रशियाने इतर काही शहरांचे वीजपुरवठे, पाणी पुरवणे इत्यादी तोडले. अमेरिकन जावेलीन रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र युक्रेन ने अत्यंत प्रभावी पणे वापरले आहे असे दिसून येत आहे[३]. तरी सुद्धा रशिया कडे १५,००० पेक्षा जास्त रणगाडे असल्याने त्यांना विशेष फरक पडणार नाही. टर्की देशाचे ड्रोन वापरून किमान ३ तरी रणगाडे युक्रेन ने नष्ट केले [१] पण रशियाने आपल्या SAM क्षेपणास्त्राने ह्या ड्रोन्स ना पूर्णपणे उध्वस्त केले आहे. जावेलीन क्षेपणास्त्रे युक्रेन अनेक वर्षांपासून मागत होता आणि ओबामा ह्यांनी ते त्यांना देण्यास नकार दिला होता पण ट्रम्प ह्यांनी युक्रेन ला जावेलीन देण्यासाठी परवानगी दिली आणि त्यामुळे सध्या युक्रेन मध्ये हि पोचली. फेब्रुवारी ८ ला सुद्दा ह्या क्षेपणास्त्रांचा एक साठा युक्रेन ला पाठवला होता. सध्या सुमी ह्या शहरांत धुमश्चक्री सुरु आहे. युक्रेनियन सैनिक आणि नागरिक हे इमारतींचा आधार घेत रशियन सैन्यावर आघात करत आहेत तर रशियन सैनिक रणगाडे घेऊन पुढे सरकत आहेत अशी दृशे नजरेस येत आहे.[५] सध्याचा नकाशा : https://static01.nyt.com/newsgraphics/2022/02/18/russia-ukraine-livepag… प्रमुख युद्ध क्षेत्रे : राजधानी कीव वर प्रचंड हल्ला सुरु आहे. अमेरिकन माहिती प्रमाणे सर्वप्रथम युक्रेन चे वायुदल नष्ट करणे, त्यानंतर विमानतळांचा ताबा घेऊन किंव मध्ये सैन्य उतरवणे, युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांना ठार मारून किंवा पायउतार करून त्याजागी आपले लोक नेमणे आणि त्यांच्या द्वारे मिलिटरीला शरणागती पत्करण्यास लावणे अशी भूमिका पुतीन ह्यांची आहे. ह्याला "शिरच्छेद" धोरण म्हटले जाते. ह्याला छेद देण्यासाठी युक्रेनियन आर्मीने विविध विभागांतील कमांडर्स ना कमीत कमी आदेश दिले आहेत आणि विपुल प्रमाणात शस्त्रास्त्रे सर्व भागांत पोचवली आहेत त्यामुळे कीव रशियन ताब्यांत गेले तरीसुद्धा युक्रेनियन नागरिक आणि सैनिक रशियन सैन्यावर आपण हून आघात करू शकतील. आता हे कितपत होईल ते वेळच सांगेल. ओडेसा आणि खेरसोन ओडेसा हे शहर रशियाने ताब्यांत घेतले असले तरी तिथे त्यांना काबू ठेवणे कठीण जात आहे. त्यामुळे शहरांत रशियन सैन्य असले तरी ते पुढे सरकत नाही. ओडेसा हे एक बंदर आहे त्याच्या नौदलावर रशियाने हल्ला करून त्यांना पूर्णपणे नष्ट केले आणि आकाशांतून पॅराशूट घेऊन सैनिक उतरवले. त्याच्या बाजूलाच खेरसोन शहर आहे. ह्या दोघांवर ताबा लवकारांत लवकर मिळवावा ह्यासाठी रशिया प्रयत्नशील होती. ओडेसा मध्ये निऑन गॅस निर्मिती होते जी संगणक चिप्स च्या लेसर साठी वापरली जाते. जंगातील साधारण ७०% गॅस इथून येतो. पुतीन ह्यांना निऑन चा पुरवठा बंद करून युरोप ला जेरीस आणायचे आहे आणि चीन ला जवळ आणायचे आहे. खेरोशन शहरांतून एक इन्स्टा मुलगी सतत लाईव्ह अपडेट्स देत होती. तिच्या मते शेकडो रशियन आणि युक्रेनियन सैनिकांच्या शरीराचा खच पडला होता. तिच्या स्वतःचा घरावर रशियन शेल्स पडले होते आणि ती नंतर आपल्या गाडीने दुसऱ्या भागांत गेली. जाताना आजूबाजूला नष्ट झालेले रशियन रणगाडे, इतर वाहने दिसत होती. कीव हि राजधानी आहे आणि बेलारुसला अत्यंत जवळ आहे. रशियाने बेलारूस मधून युक्रेन मध्ये आक्रमण केले आहे. विनोदाची गोष्ट म्हणजे बेलारूस मध्ये असलेल्या रशियन सैनिकांनी बेलारूस मध्ये खूप धुडगूस घातला आणि खूप घाण केली असते बेलारूसी जनतेचे म्हणणे आहे. अर्थांत बेलारूस चा हुकूमशाह हा पुतीन च्या हातातील बाहुले असल्याने बेलारूस मधील लोकांना काय पाहिजे ह्याला कुत्रे विचारत नाही. अमेरिकन माहिती प्रमाणे बेलारूस मधील रशियन सैन्य अत्यंत ढिसाळ होते. इतके कि काही शेकडो सैनिकांना रेल्वे स्टेशन वर सोडण्यात आले पण पुढे काय ह्याची काहीच माहिती देण्यात आली नाही. म्हणजे आपले सैनिक इथे आहेत हेच मुले रशियन नेतृत्वाला ठाऊक नव्हते. त्यामुळे ह्या सैनिकांना खायला प्यायला सुद्धा नव्हते त्यामुळे पदरमोड करत हि मंडळी आजू बाजूच्या गावांत अन्न शोधत फिरत होती. त्यासाठी त्यांनी आपले डिझेल सुद्धा लोकांना गुपचूप विकले.[७] [११] किव वर ताबा मिळवायचा असेल तर पुतीन ह्यांना ते ताबडतोब करावे लागेल कारण खराब हवामान आणि रसद ह्या दोन गोष्टीमुळे रशियन सैनिक ह्या भागांत जास्त काळ लढू शकणार नाहीत. किव मधील हल्ले हे पुतीन ह्यांना बेलारूस मधून करावे लागतात आणि त्यासाठी बेलारूस ला पैसे आणि इतर गोष्टी द्याव्या लागतात. बेलारूस मधील जनता ह्या सर्वाला विटली आहेच. त्यामुळे जास्त काळ त्यांना इथे राहणे महागात पडेल. ह्या २४ तासांत रशियन सैन्याने किव च्या चारीबाजुना घेरून हल्ले सुरु केले असले तरी हवाई हल्ल्याना युक्रेन ने चांगले प्रत्युत्तर दिले आहे. किव मधील विमानतळांवर १००% ताबा अजून मिळवणे त्यांना शक्य झाले नाही त्यामुळे पायदळ अजून कीव मध्ये पोचले नाही. रणगाडे तिथे पोचण्यास बराच वेळ लागेल. Hostomel ह्या विमानतळावर रशियाने काही काळ ताबा मिळवला होता पण मागील ३ तासांत युक्रेनियन सैनिकांनी पुन्हा ताबा मिळवला आहे. ह्या चकमकीत एक रशियन विमान आणि साधारण ५० सैनिक मारले गेले. [८] काही रशियन सैनिक पळून आजू बाजूच्या जंगलांत वाट चुकून भटकत होते. [९] [१०] सुमी आणि खारकीव किव शहरापासून जवळ असलेले हे दुसरे शहर. खारकीव हे युक्रेन मधील दुसऱ्या नंबरचे शहर हे सुमी ला फारच जवळ आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इथून रशियन सीमा फारच जवळ आहे. ह्या दोन शहराचा संपूर्ण ताबा घेतल्यास रशिया इथे रसद पुरवठा आपल्या देशांतून करू शकते. बेलारूस ची गरज नाही. रशियन सैन्याने इथे प्रचंड मार खाल्ला. आधी युक्रेनचे साधारण १५ रणगाडे विमान हल्ल्यांत रशियाने इथे उध्वस्त केले पण युक्रेन ने सुद्धा इथे अनेक रशियन रणगाडे आणि सैनिकांना कंठस्नान घेतले. [१२] इथे रस्त्यांवर शरीरांचा खच पडला आहे. लोकांनी सबवे स्टेशन मध्ये आसरा घेतला आहे. रशियन सैनिकांनी इथे सामान्य लोकांना ठार मारले. एका तरुण मुलीच्या आईची हत्या तिच्या डोळ्यापुढे केली गेली. तिचा व्हिडीओ वायरल झाला. त्याची लिंक मी इथे देणार नाही. युक्रेनियन सैन्याने येथिल मोक्याचे पूल इत्यादी आधीच उडवून लावले आहेत. [१३] येथील एका सरकारी इमारतीवर रशियन झेंडा दिसत आहे असा एक व्हिडीओ प्रकाशित झाला होता पण हि इमारत नक्की कुठली हे अजून समजले नाही. [१३] NPR च्या मते ह्या शहराच्या बाहेर रशियाने शेकडो रणगाडे , आणि एक हजार पेक्षा जास्त ट्रक्स आणले आहेत त्यामुळे पुढील २४ तासांत इथे रशिया आपला जम बसवेल. सुमी शहर लहान असले तरी युक्रेनियन सैन्याने इथे मोठा तळ जमवला आहे. अनेक रशियन सैनिक इथून आपली वाहने सोडून जंगलांत पळून गेले. [ १४] --- TLDR १. रशियन सैन्य ह्या आक्रमणात प्रगती करत आहे आणि अपेक्षेप्रमाणे वरचढ दिसत आहे तरी सुद्धा पहिल्या २४ तासांत त्यांना जी अपेक्षा होती त्यापेक्षा त्यांनी खूप कमी प्रगती केली आहे. फक्त दक्षिण युक्रेन मधील त्यांची प्रगती त्यांच्या अपेक्षे इतकी आहे. २. युक्रेनियन सैन्याने अपेक्षेपेक्षा जास्त चांगले प्रत्युत्तर दिले आहे आणि रशियाला प्रत्येक शहर जास्त काळ ताब्यांत ठेवणे शक्य असेल असे वाटत नाही. ३. पुढील २४ तासांत रशिया १००% कीव घेण्यावर लक्ष केंद्रित करेल. हे झाले कि युद्धाचे संपूर्ण चित्र बदलेल. ४. नाटो वगैरे लोकांनी अजून पर्यंत काहीही महत्वाचे निर्णय घेतले नाहीत. रशियावरील निर्बंध सुद्धा बहुतांशी फुसके आहेत. [१] https://twitter.com/PuskasTrumpets/status/1496976399554523141 [२] https://twitter.com/GoodestBoyJon/status/1496940271271133190 [३] https://twitter.com/ThomasVLinge/status/1496856989682573322 [४] https://twitter.com/olex_scherba/status/1496850538478153736 [५] https://twitter.com/BNONews/status/1497008145893400577 [६] https://twitter.com/aletweetsnews/status/1497008826201124870 [७] https://www.theguardian.com/world/2022/feb/23/harsh-conditions-mean-rus… [८] https://twitter.com/DAlperovitch/status/1496960079114952706, https://twitter.com/KyivIndependent/status/1496950008339484672, https://twitter.com/Militarylandnet/status/1496805284068700161 [९] https://twitter.com/JaminLiouFu/status/1496963061353263116 [१०] https://twitter.com/NJExecutive/status/1496966840832061463 [११] https://twitter.com/NJExecutive/status/1496966840832061463 [१२] https://twitter.com/ThomasVLinge/status/1496810342038622210 [१३] https://twitter.com/OSINT_Ukraine/status/1496947184159399940 [१४] https://twitter.com/worldonalert/status/1497020907549868037, https://twitter.com/michaelh992/status/1496962758641922048

चान्गले वार्तन्कन असे म्हणवत नाही पण खरच पुर्ण माहीती मिळाली.

रशिया बहुधा युक्रेन वर संपूर्ण ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणार नाही परंतु तेथील पाश्चात्य धार्जिणे सरकार उलथून आपले बाहुले सरकार बसवण्याचा प्रयत्न करेल. त्यांची मूळ मागणी हीच आहे कि युक्रेनला नाटोचे सदस्यत्व मिळू नये. युक्रेन ताब्यात ठेवून तेथे कायम आपले सैनिक तैनात करून ठेवणे हे रशियाला फार महागात पडेल हे इतर देशांना चांगलेच माहिती आहे त्यामुळे युक्रेनच्या लष्कराला केवळ शस्त्रास्त्रे पुरवण्यापेक्षा जास्त अमेरिका( आणि नाटो) काहीच करणार नाही. पैसे फेकणे हे अमेरिकी सरकारला नवे नाही पण आपले सैनिक उतरवायला सज्जड कारण पाहिजे आणि तिसऱ्या देशासाठी आपले सैनिक रशियन लष्कराकडून मारवून घेणे हे कोणत्याही अमेरिकी अध्यक्षाला परवडणारे नाही. शिवाय अमेरिकी सैनिक ( यदाकदाचित) आलेच तर रशियन सैनिक त्यांना दुप्पट उत्साहाने मारण्यास पुढे येतील. युक्रेन मध्ये कुणाचेही सरकार आले तरी अमेरिक आणि त्यांच्या मांडलिक युरोपी सत्ताना काहीच फरक पडणार नाही. Ukraine exports mainly steel, coal, fuel and petroleum products, chemicals, machinery and transport equipment and grains like barley, corm and wheat. More than 60% of the exports goes to other former Soviet Republics countries with Russia, Kazkhstan and Belarus being the most important. Others include Turkey and China. यात असं कोणतंही अत्यंत महत्त्वाचं उत्पादन नाही ज्यावाचून पाश्चात्य देशांचे काही अडेल. उगाच यामुळे तिसरे महायुद्ध होईल म्हणून जगबुडी आली असा आव आणणारे तोंडावर पडतील हे नक्की.

In reply to by सुबोध खरे

तिसऱ्या महायुद्धाची शक्यता कमीच आहे. अमेरिकन निर्बंध सुद्धा पूर्णपणे फुसके निघाले त्यामुळे उद्या रशियन मार्केट सुद्धा साधारण १०-२०% वर येईल असे वाटते. पुतीन वर वैयक्तिक निर्बंध टाकले जातील का ह्या प्रश्नाला बायडन ह्यांनी उत्तर नाही दिले. त्याशिवाय रशियन ऊर्जा आयातीवर परिणाम होईल असे कुठलेही निर्बंध टाकले जाणार नाहीत असे ढळढळीत स्पष्ट केले. ह्यावरून अमेरिकन आणि मित्र देशांनी युक्रेन ला write off केले आहे असे स्पष्ट होते. NATO देशांनी अक्षरशः हिजड्यांची फौज निर्माण केली आहे. gender ट्रेनिंग, क्लीन फ्युएल, सोलर असल्या थेरांवर पैसे खर्च केले आहेत. त्यामुळे युद्ध झाले तरी अमेरिकन सोडल्यास इतर देशांकडे युद्ध करण्याची कुवत सुद्धा आहे असे वाटत नाही. जर्मन general ने खालील स्पष्टवक्तेपणा दाखवला. "In my 41th year of peace-time service, I would not have thought that I would have to experience a war," Lieutenant General Alfons Mais said on LinkedIn on Thursday. "And the Bundeswehr, the army which I have the honour to command, is standing there more or less empty-handed. The options we can offer the government in support of the alliance are extremely limited." ---

In reply to by साहना

खंडीय युरोपियन देशांनी अमेरीकी तैनाती फौज स्विकारली आहे. दुसर्‍या महायुध्द्दानंतर जर्मनी आणि जपान यांनी मोठ्या फौजा घेऊन, लष्करी ताकद होऊ नये अशी विजेत्यांची इच्छा होती. त्यामुळे जर्मनीच्या सैन्याधिकार्‍याचे बोलणे गैरलागु आहे. जर्मनी पुन्हा लष्करीकरणाकडे जाईल असे वाटत नाही. त्यासाठी पुन्हा राष्ट्रवादाचे आवाहन करावे लागेल. सध्या तरी त्याला कोणी तयार होईल असे वाटत नाही. जर्मनीची आणि युरोपची अर्थव्यवस्था उत्तम , लोकांना सुबत्तेची सवय आहे. कोणी युक्रेनमध्ये लढायला जाणार नाही.

रशिया 1) जगातील सर्वात मोठा आकार असलेला देश. २) लोकसंख्या खूप कमी. ३) बहुसंख्य ख्रिस्त धर्मीय, त्या मुळे धार्मिक संघर्ष होण्याची शक्यता कमी. ४) तंत्र आणि विज्ञान ह्या मध्ये आघाडीवर. अवकाश मोहिमा आणि अण्वस्त्र बनवण्यात आघाडीवर होता. सीमा वाद कोणत्याच देशाशी नाही. विपुल जमीन म्हणजे विपुल नैसर्गिक साधन संपत्ती बलदंड लष्करी takat. इतके सर्व ज्या देशांकडे आहे तो देश जगात सर्व च बाबतीत आघाडी असण्याला काहीच अडचण असण्याचे कारण नव्हत. भारत नी धार्मिक संघर्ष,जातीय वाद,गरिबी, सीमेवर तणाव , तंत्र आणि विज्ञान ह्या मध्ये खूप उशिरा कार्य चालू केले तरी प्रगती केली. मग रशिया कडे सर्वच बाबी अनुकूल आहेत. त्यांनी अमेरिका काय एकत्र पूर्ण जगाला मागे टाकून खूप प्रगती करायला हवी होती.

फक्त माती विकली तरी खूप श्रीमंत होईल इतकी माती पण त्यांच्या कडे आहे.

In reply to by Trump

मी जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्याची खरी उत्तर द्यायची झाली तर हजार पान पण पुरणार नाहीत. खूप गंभीर प्रश्न मी उपस्थितीत केलेले आहेत.

युक्रेन युध्दाचा अजुन एक युरोपियन लोकांना फायदा, चांगले शिकलेले आणि हुशार लोक युरोपमध्ये येतील, त्यामुळे युरोपमधील उद्योगांना स्वस्त मजुर मिळतील. सध्या पाश्चात्य देशांना चांगल्या मजुरांची चणचण आहे. सतत कोणत्या ना कोणत्या कारणांनी मजुर येत राहीले तर उद्योगांना नक्कीच फायदा होईल.