Skip to main content

ताज्या घडामोडी- फेब्रुवारी २०२२ - भाग ३

लेखक मदनबाण यांनी शुक्रवार, 11/02/2022 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या हिजाब वरुन मुद्दामुन बवाल केला जात आहे, यात राजकारण आहे हे देखील उघड आहे. याच विषयावर शबनम शेख हीने तिचे विचार मांडले आहेत. मालेगाव आणि कुत्ता गोळी यांचा घनिष्ठ संबंध का आहे?गंभीर गुन्हे करताना आरोपी कुत्ता गोळीच्या नशेत होते असे पोलिसांना आठळुन आलेले आहे. दोन धर्मात तेढ निर्माण करण्यासाठी सुनियोजित दंगल घडवुन आणण्याचे प्रयत्न होत आहेत का ? अश्या दंगलखोरांना कुत्ता गोळी देऊन मोठ्या प्रमाणात रक्तपात घडवला जाऊ शकतो का ? असे काही प्रश्न मनात उद्भवले आहेत.

वाचने 53798
प्रतिक्रिया 154

प्रतिक्रिया

In reply to by sunil kachure

हे नक्की का? ----- शेतकरी,गरीब वर्ग ,कामगार हे bjp चे विरोधी नाहीत. पण त्यांना बदनाम करणे सोडून द्यावे शेतकरी वर्गाच्या तोंडाला, ह्याच राज्यातील सध्याच्या राजवटीने, पाने पुसली... ST कर्मचारी वर्गाला कुणी उपाशी ठेवले? प्राणी संग्रहालयासाठी पैसे आहेत पण गरीब जनतेसाठी नाहीत ... ----- असो,

In reply to by चंद्रसूर्यकुमार

करहलमध्ये मुलायमसिंगांनी केलेल्या भाषणाचा थोडा भाग पुढे बघायला मिळेल. वयाचा परिणाम त्यांच्यावर अगदी स्पष्ट दिसत आहे. त्यांचा आवाज कापत आहे. या वयातल्या आपल्या वडिलांना प्रचारासाठी बोलवावे लागले याचाच अर्थ अखिलेशच्या पायाखालील वाळू घसरत आहे. मुलायमसिंगांविषयी असलेल्या सद्भावनेतून अखिलेश जिंकतीलही पण झालेले नुकसान समोर दिसत आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आणि अखिलेश यादवच कशाला? उमेदवाराचे वैयक्तिक कतृत्व काय आहे? त्याचे चारित्र्य काय आहे? त्याची स्वतःची ध्येय धोरणे काय आहेत? सर्वसामान्य जनतेला पाठिंबा देणारा आहे का? हे मुलभूत प्रश्र्न, जो पर्यंत, मतदारांना पडत नाहीत, तोपर्य॔त मतदारांच्या मानसिक गुलामगिरीचा फायदा घेणारेच निवडून येण्याची शक्यता आहे ...

In reply to by मुक्त विहारि

मुळ प्रश्न घराणेशाहीचा आहे. देशात सगळी आमदार, खासदार म्हणजे छोटी-छोटी संस्थाने सुरु झाली आहेत.

In reply to by Trump

घराणेशाही रूजतेच मग ते नंद घराणे असो किंवा मिंग घराणे लोकशाहीमुळे, आपला नेता निवडायचा अधिकार, लोकांना आहे आणि आता तरी लोकांनी, योग्य तो नेता निवडायलाच हवा. (गोव्यातील चर्चिल जर निवडून आला नाही तर, फारच उत्तम...)

In reply to by मुक्त विहारि

सांगितले की लोकप्रतिनिधी न विषयी .किती चारित्र्यसंपन्न लोक लोकसभेत आहेत ते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अखिलेश येऊ शकतो. हे गुंड लोक
  1. जेथे योगींना मतदान होऊ शकते अशा ठिकाणी आदल्या दिवशी जातात.
  2. मतदानाच्या आधीच त्या मतदारांच्या बोटाला शाई लाऊन टाकतात.
  3. योगीच्या मतदात्यांना मतदानच करता येत नाही.
मग उरलेल्या मुस्लिम आणि यादव मतदानावर अखिलेश सहजतेने जिंकतो. त्यामुळे अखिलेश येण्याची शक्यता खूप आहे! असे गठ्ठा मतदान बाजूला काढण्याचे प्रकार तेथे खुप जास्त झाले होते. सुरक्षा ठेवली तरच काही होऊ शकते - अन्यथा सपा तर येणारच!

In reply to by निनाद

हे EVM सारखं आहे की, हारले तर evm खराब आणि जिंकले तर evm बरोबर. तस इथं पण हारले तर सपा फ्रॉड, जिंकले तर निवडणूक योग्य. ट्रम्प ने इन्स्पिरेशन दिलीये- ज्या राज्यात जिंकतोय तिथे निवडणूक योग्य, हारतोय तिथे खराब. मला मिळालेले मेल इन balots चांगले, दुसऱ्यांना मिळालेले फ्रॉड. ट्रम्प त्याच्या समर्थकांना काय मेसेज पाठवतोय पैसे काढायला: स्रोत- बिझनेस इनसाईडर ट्रम्पला पैसे नाही दिले तर तुम्ही रॅडिकल लेफ्ट.लवकर पैसे द्या, आणि कम्युनिस्ट होण्यापासून स्वतःला वाचवा.

In reply to by निनाद

हे सपाला २०१७ मध्ये का करता आले नाही?तसे करता आले असते तर सपाचा इतका मोठा पराभव होऊच शकला नसता.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

जे २०१७ ला करता आले नाही ते पोलीस दल, सरकारी यंत्रणा योगी (भाजपाचे टफ गाय अशी प्रतिमा असलेले) यांच्या हातात असताना कसं करणार ?

In reply to by निनाद

एवढी गुंडगिरी ? सरकार काय झोपा काढत का ? काही हजार लोकांना आदल्या रात्री शाई लावणे कसे शक्य आहे ? १. योगी ला कोण मतदान करणार हे आधीच माहिती हवे. २. तिथे जाऊन मतदानाची शाई उपलब्ध करून त्या बोटावर लावायला हवी. ३. 10,000 असे मतदार शोधायला किती गुंड लागतील? एका तासात किती मतदारांना शाई लावून होईल ? लॉजिक आणि भक्त यांचा दूरवर संबंध नसतो

In reply to by कपिलमुनी

प्रार्थनास्थळे पण तोडू शकतात आणि मुर्ती पण फोडू शकतात ... आपण कदाचित, बिहार मध्ये, निवडणूकीच्या काळांत गेला नसाल. मुके, बहिरे आणि आंधळे, होता येत असेल, तर जरूर जा ... तीन बंदर आठवतील ...