मी पण वाचत सुटलो त्याची गोष्टी.....
लहानपणी शाळेतल्या पुस्तकांच्या पेटीने वाचनाची सुरवात झाली की घरातल्या चांदोबांनी, हे फक्त आता ती पुस्तकंच सांगू शकतील.
जादूच्या गोष्टी,परी राक्षस यांच्या गोष्टी वाचता वाचता आजोबांनी पोटमाळ्यावर ठेवले चांदोबा आणि अमृत हाती लागले. जिवदत्त आणि खङगवर्मा आणि अमृत मधले असे आमचे पुर्वज हे खास जीवलग.
कल्याण आणि उद्यम मासिकं वाचणे म्हणजे पालथ्या घड्यावरचे पाणीच.
नंतर हाताला लागले वि.के.फडके यांचे स्वामींचे चरित्र आणि बेलसरे यांचे गजानन महाराज चरित्र जे अजूनही माझ्याकडे आहे.
ग्रामपंचयत लायब्ररीने पुस्तकांची भुक भागवली. ती भुताळी जहाजं,समुद्री चाचे,दडवलेले खजिने आणि खजीन्याची बेट अजूनही साद घालतात.
लहान असताना माझ्या हातून रंग लागून खराब झालेले "चार दरवेश" दोन वर्षांपूर्वी लायब्ररीतून शोधून काढले. ते त्याचे एकाकीपण माझ्यासोबत शेअर करु पाहत होते.
नंतर पंचक्रोशीतील सर्व वाचनालयं धुंडाळून झाली, अमूल्य असे मोती हाताला लागले, "ज्ञानसागरातील हे शिंपले" परत हाताला लागले.
आता पुस्तकांनावीना वाचकांना एकाकी वाटतयं तसेच पुस्तकांनाही वाटत असेल का ?
वाचकांवीना एकाकी पुस्तकांची माणसांच्या सहवासाची आसं कधी पुर्ण होईल. पुस्तकांनाचा माणसांकडे जाण्याचा रस्ता या पुस्तकातच कुठे तरी दडलेले असेल हे नक्की, ते समजून घेणारा,त्यावर संशोधन करणारा संशोधक हा दूरावा दूर करण्याचा मार्ग शोधून काढेलच.
ज्ञानसागरातील हे शिंपले उघडून बघत राहूया, आपल्याला हवा तो मोती हाती लागे पर्यंत.
वाचने
6492
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान !
छान!
सुंदर
मस्त
सुंदर लेख !
ज्ञानसागरातील शिंपले...
धनंजय आणि छोटू
सुरवातीला खुप वाचन झाले,
'मुलांचा श्याम'चे सचित्र अंक
योग्य पुस्तके
लैच भारी..
In reply to योग्य पुस्तके by कपिलमुनी
काही पुस्तकं
पुर्वी वाचलेले लेखक आता
In reply to काही पुस्तकं by चौकस२१२
जादूची अंगठी ,हार अशा
मला आठवतेय, 6वी पास
ईसापनिती, अलिबाबा चाळीस चोर,
भा.रा.भागवतांनी अनुवाद
साहसकथा
चांदोबाचं गारूड