Skip to main content

ताज्या घडामोडी- फेब्रुवारी २०२२ - भाग ३

लेखक मदनबाण यांनी शुक्रवार, 11/02/2022 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या हिजाब वरुन मुद्दामुन बवाल केला जात आहे, यात राजकारण आहे हे देखील उघड आहे. याच विषयावर शबनम शेख हीने तिचे विचार मांडले आहेत. मालेगाव आणि कुत्ता गोळी यांचा घनिष्ठ संबंध का आहे?गंभीर गुन्हे करताना आरोपी कुत्ता गोळीच्या नशेत होते असे पोलिसांना आठळुन आलेले आहे. दोन धर्मात तेढ निर्माण करण्यासाठी सुनियोजित दंगल घडवुन आणण्याचे प्रयत्न होत आहेत का ? अश्या दंगलखोरांना कुत्ता गोळी देऊन मोठ्या प्रमाणात रक्तपात घडवला जाऊ शकतो का ? असे काही प्रश्न मनात उद्भवले आहेत.

वाचने 53795
प्रतिक्रिया 154

प्रतिक्रिया

सत्तेची मस्ती आणि सारखी सत्ता मिळत गेल्या मुळे काँग्रेस सुस्त झाली होती म्हणून तर लोकांनी काँग्रेस हटवून bjp ला बहुमत नी सत्तेवर बसवले ना. मग bjp वाले पण कामाचा विषय निघाला की काँगेस वर ढकलत असतील . तर bjp ला तरी सत्तेत का ठेवायचं.

In reply to by सुबोध खरे

काश्मीर च विषय निघाला की नेहरू जबाबदार ते जावून किती तरी वर्ष झाली. चीन चा विषय निघाला की काँग्रेस जबाबदार. आता सत्तेवर काँग्रेस नाही गरिबी च विषय निघाला की काँग्रेस जबाबदार. मग तुम्ही काही जाबाबदरी घेणार आहात की नाही. नसेल हिम्मत जबाबदारी घेण्याची तर सत्ता खाली करा. 1947 ल देश काय स्थिती मध्ये होता आणि मोदी ना सत्ता दिली तेव्हा देश कोणत्या स्थिती मध्ये . हे जनतेला माहीत आहे.

In reply to by sunil kachure

गोन्धळ दुर करायला उजव्या विचारसरणीच्या सरकारला नक्किच ३० ते १२० वर्ष लागतील. आणि त्यात परत मध्ये खन्ड पडला तर परत पहिल्यापासुन सुरुवात करावी लागेल... आत्ताच्या सरकारने जबाबदारी घेतली आणि शेतकरी कायदे आणले. तोही प्रयत्न हाणुन पाडला. तसही भाव नाही मिळाला तर शेतकरी माल रस्त्यावर ओतत होतेच... मोदी भरपुर बदल घडवुन आणतायत त्याचा प्रभाव दिसायला वेळ लागेल ३० ते १२० वर्ष.. बाकी निवड्णुक जाहिरनाम्यातले महिला सक्श्मिकारण मात्र कौन्ग्रेस्स ने फारच यशस्वी केले . जिथे तिथे बुरख्यातल्या महिलान्ची ढाल वापरतायत.. ब्रिटिश राज्यसत्तेने केलेल्या सुधारणा आयत्या मिळाल्या याना राज्य करायला.. गरिबी,भ्रष्टाचार , टोळीयुद्ध, बौम्ब्स्फोट यानी भारतीय जनता त्रासली. घराणेशाहिच्या बळावर अनिर्बन्ध सत्ता उपभोगली. आता चौथी पिढी पण पुर्वजान्च्या पुण्याइवर जगायचा प्रयत्न चालुच,

https://www.business-standard.com/article/news-ani/father-of-indian-gre…-ms-swaminathan-hails-modi-government-117061301213_1.html Swaminathan praised the Narendra Modi government’s handling of the country’s agriculture. He also said it had implemented several of the suggestions made by him as chairman of the earlier National Commission on Farmers (NCF, constituted in 2004 by the earlier government), while the former government only gave lip service. “The recent announcement of a remunerative price based essentially on the recommendation of NCF is a very important step to ensure the economic viability of farming... As for farmers’ agitations still continuing, a major demand is the waiving of loans and implementation of the NCF recommendations on MSP (minimum support price). Both these problems are now receiving attention and appropriate action,” Swaminathan wrote. https://www.business-standard.com/article/economy-policy/centre-laps-up…

In reply to by सुबोध खरे

NCF मध्ये शेतीमालाला जागतिक स्वस्त आयातीपासून संरक्षण देण्याची शिफारस केली होती. काही शेतीमालाला लागू केले पण प्रत्यक्षात संरक्षण देण्याची वेळ आली तेव्हा केंद्र सरकारचे पाय लटपटले.

In reply to by आग्या१९९०

उपलब्ध आहे म्हणून लागू करायचे नाही हे आपलेच शब्द आहेत ना? आता आपली चूक मान्य करण्याऐवजी सारवासारव कशाला करताय? मी म्हटलंच आहे ना? वैचारिक बद्धकोष्ठाला उपाय नसतो.

In reply to by आग्या१९९०

हो ना मोदी द्वेषाचा चष्मा काढला तरच पूर्ण हत्ती दिसेल शेपटी चाचपडून उगाच साप साप म्हणून ओरडा करण्यात काय हशील आहे?

हे नावा प्रमाणेच महान राष्ट्र आहे. सहकारी चळवळ असू किंवा समाज प्रबोधन असू ध्या महारष्ट्र नेहमीच पुढे राहिला आहे देशातील राज्यांशी तुलना केली तर महारष्ट्र मधील सर्व राजकीय नेते हे सू संस्कृत च आहेतं.. ह्या राज्याला लाभलेला प्रतेक मुख्य मंत्री देशाची तुलना केली तर अती उत्तम च होता. देशातील जनता ते मान्य करते. पण ह्या पाच वर्षात bjp नी महाराष्ट्र ची खूप बदनामी केली. सुशांत सिंग प्रकरण मध्ये त्यांनी अती च केले मी स्वतः bjp ला मत दिले आहे. पण येथून पुढे कधीच देणार नाही असे आता मत बनवले आहे Bjp नी त्यांचे राज्यातील सर्व नेते आहेत त्यांना नारळ देणे गरजेचे आहे. हीच लोक bjp चे ह्या राज्यात नेतृत्व करणार असतील तर bjp येथून पुढे ह्या राज्यात कधीच सत्तेवर येणार नाही

In reply to by sunil kachure

देशातील राज्यांशी तुलना केली तर महारष्ट्र मधील सर्व राजकीय नेते हे सू संस्कृत च आहेतं.. सर्व नाही "काहीच" आहेत.

Bjp नी जे राज्यपाल विविध राज्यात नेमले आहेत त्यांचा मोठा हातभार असेल. उदा बंगाल चे राज्यपाल आपण काय निर्णय घेतोय .महत्वाच्या पदावर बसून हेच त्यांना समजत नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत.

In reply to by sunil kachure

आपण काय निर्णय घेतोय .महत्वाच्या पदावर बसून हेच त्यांना समजत नाही. तुम्ही जा कि सल्लागार म्हणून. त्यांनाच कशाला श्री मोदीना आणि माननीय राष्ट्रपतींना सुद्धा देश कसा चालवायचा तो सल्ला द्या.

युक्रेन मधे जर काहे झाले तर भारत कोणाच्या गटात असेल? पाकिस्तान कोणाच्या गटात असेल? त्या युद्धाचा भारतावर काय परिणाम होईल?

In reply to by विजुभाऊ

Bjp समर्थक लोकांचे हेच bandhe आहेत. युक्रेन प्रकरणात अलिप्त राहणे आणि छुपा रशिया ल पाठिंबा देणे हे सोपे उत्तर आहे

मोदी साहेब हेच मुरलेले नेते आहेत.अटलजी नाहीत,प्रमोद महाजन नाहीत.अडवाणी ,सिन्हा, आणि बाकी अनुभवी लोकांना किंमत नाही. त्या मुळे पक्षाला योग्य मार्ग दर्शन नाही. पंतप्रधान काय काय सांभाळून घेणार. Bjp आयटी सेल प्रमुख bjp चा हितचिंतक आहे की bjp चा दुश्मन आहे हे समजत नाही. Bjp आयटी सेल च्या करामती बघून.

Bjp च्या केंद्रीय नेतृत्व नी मध्यम मार्ग न काढता युती तोडली आणि bjp सत्तेवर आली नाही ह्याचा राग फडणवीस,आणि चंपा आणि बाकी नेत्यांना आला आहे त्या मुळे त्यांचे प्रतेक पावूल,भूमिका ही bjp कशी बदनाम होईल हाच विचार करून टाकलेले आहे अंध भक्तांच्या हे कधीच लक्षात येणार नाहीं

विश्वप्रवक्त्यांची विनोदी पत्रकार परिषद पाहिली. आजूबाजूच्या शिवसेना नेत्यांची (उदाहरणार्थ दिवाकर रावते) दया आली. त्याहून जास्त दया मोठ्या अपेक्षेने जमा झालेल्या पत्रकार लोकांची झाली. एक तास वाया गेला आणि साडेतीन लोक कुठले हे न कळल्यामुळे (ऑफिस चं काम सोडून) चिडचिड झाली ती वेगळीच. सोमय्या आणि फडणवीस हे साडेतीन लोकांपैकी दोन हे कळलं. बाकीचे दीड?

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

दीड पैकी एक श्री मोदी आणि अर्धवट तर त्यांचा स्टार प्रचारक युवा नेता (नाव नाही सांगणार-दुसऱ्या पक्षात असला म्हणून काय झालं)

In reply to by सुबोध खरे

ट्विटर वर मा.विश्वप्रवक्त्याना बडवणे जारी आहे. आज त्यांनी खालील ट्विट केली. https://twitter.com/rautsanjay61/status/1493782014150860801?s=20&t=jSdN… कुणाचे नाव नसल्यामुळे लोकांनी मा.मु. आणि मा.ज्यु.मु. यांचे नाव घेत विश्वप्रवक्त्याची टवाळकी सुरू केली आहे. नंतर चं ट्विट हे आलं: https://twitter.com/rautsanjay61/status/1493806637475577856?s=20&t=jSdN… विनोदी प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.

संज्याच्या आजच्या पत्रकार परिषदेची उत्सुकता, कालपासून (अबप माझा) पाळीव पत्रकारानी इतकी शिगेला पोहचवली होती की संज्याची पत्रकार परिषद संपताच केंद्रातील भाजपा सरकार कोसळेल असे वाटले होते. मात्र कसले काय, आजच्या पत्रकार परिषदेत एकही गौप्यस्पोट नाही की कोणावे नाव नाही. आता म्हणे भाजपाच्या साडे-तीन नेत्यांची नावे उद्या सांगणार आहे.

संजय राऊत . १) केंद्रीय एजन्सी ह्या bjp नेत्यांच्या मोठ मोठ्या गैर कारभार कडे दुर्लक्ष करून महाराष्ट्र आणि बंगाल मध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांवर बालिश पने कारवाई करत आहे. २) भारताच्या इतिहासात केंद्रीय एजन्सी चा इतका गैर वापर कोणत्याच केंद्र सरकार नी केला नव्हता. ३)bjp नी नेमलेले राज्यपाल हे त्या पदाची इज्जत घालवत आहेत. अत्यंत बालिशपणा त्यांच्या निर्णयात दिसून येतो. ३)राजकीय नेत्यांना केंद्रीय एजन्सी मार्फत दबावात आणून bjp सरकार पाडण्याचे कारस्थान करत आहे पण हे सरकार पडणार नाही. हा बालिशपणा कर्तव्याची जाणीव असेल तर मोदी नी थांबवावा.

भाग्यनगर (पुर्वीचे हैदराबाद) येथे तेलंगणा राज्यातील मुस्लिम समुदायाने १६५४.३२ एकर - होय आकडा बरोबर आहे १६५४.३२ एकर! या मणिकोंडा येथील जमिनीशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात निदर्शने केली. सुप्रीम कोर्टाने गेल्या आठवड्यात मणिकोंडा जमिनीबाबत अनेक दशके चाललेल्या याचिकेवर राज्य सरकारच्या बाजूने निकाल दिला होता की, 'सर्व जमिनी केवळ राज्य सरकारकडेच राहिली पाहिजे'. या विषयी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि माजी राज्यसभा खासदार अझीझ पाशा यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व माजी खासदार आणि ऑल इंडिया तंझीम इन्साफचे अध्यक्ष सय्यद अजीज पाशा आणि डेक्कन वक्फ प्रोटेक्शन सोसायटीचे अध्यक्ष उस्मान अल हाजिरी, सेक्रेटरी सिटी सीपीआय, ईटी नरसिम्हा, ऑल इंडिया सुन्नी उलेमा बोर्डाचे अध्यक्ष हमेद शुत्तारी यांनी केले. मो.अफजल, अधिवक्ता, टीपीसीसीचे प्रवक्ते निजामुद्दीन, टीपीसीसीचे सचिव उस्मान रशीद खान, टीपीसीसीचे संघटक सचिव मो.खान, टीपीसीसीचे उपाध्यक्ष अशफाक खान, ज्येष्ठ काँग्रेस नेते, मो.सिराज खान, टीडीपी युवा अध्यक्ष, चारमिनार मो. रियाझ, मो. खलील, कार्यकर्ते, मो. इम्तियाज वक्फ, विद्यार्थी नेते, मो. रेहान, एम. ए. अखील आणि महिलांसह अनेक जण सहभागी झाले होते.

जगाच्या आज पर्यंत च्या इतिहासात कोणत्या देशाच्या पंतप्रधान किंवा राष्ट्रपती असणाऱ्या व्यक्ती .. दुसऱ्या देशात जावून तेथील निवडणुकीत भाग घेतला नाही .. मोदी अमेरिकेत जावून .. अगली बार ट्रम्प्त सरकार अशी घोषणा देतात. त्यांना ह्याचा विसर पडला आहे ते भारताचे प्रधान मंत्री आहेत . केवढा हा मूर्ख पना त्याचे फळ म्हणून बाईडन सरकार नी त्यांना अक्षरशः देशातून हाकलून दिले. असाच मूर्ख पना परत केला तर सर्व भारतीय लोकांना अमेरिका धक्के मारून बाहेर काढेल .तुलना यूपी बिहारी .. यादव मुख्य मंत्री त्यांच्या लोकांना रोजगार देण्यात पूर्ण नालायक आहेत .पण महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकीत त्यांची अक्कल दाखवायला यायचे . स्वतः रोजगार देण्यात नालायक आणि दुसऱ्या राज्यात त्यांची लोक पोटे भरत आहेत त्यांना पण संकटात टाकणार . मुंबई मध्ये देशातील सर्व राज्यातील लोक आहेत . पण इतका मूर्ख पना देशातील कोणत्या राज्याच्या मुख्य मंत्रांनी केला नाही त्याच कॅटेगरी मध्ये मोदी पण आहेत अगली बार ट्रम्प सरकार.

नारायण राणेंनी, पत्रकार परिषद घेऊन पार इज्जत काढलेय संपादकाची. :))

In reply to by कपिलमुनी

मुनी, सोमैया म्हणत आहेत... बंगले होते तर टॅक्स भरला... विकत घेतले... अ‍ॅग्रीमेंट केल. , टॅक्स भरला तर बंगले असायलाच हवे, बंगले नसतील तर त्या बंगल्यांचा टॅक्स का भरला ? जाता जाता :- बप्पी दा...गेले. :( एक एक करुन सगळे जात आहेत. एका पिढीचा अस्त होताना आपण पाहत आहोत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jimmi Jimmi Jimmi Aaja Aaja Aaja Aaja Re Mere... - Bappi Lahiri :- Disco Dancer

In reply to by मदनबाण

बातमी मध्ये सविस्तर खुलासा आहे. ऑन पेपर घराची नोंद होती म्हणून घरपट्टी भरली , नोंद अपडेट झाल्यावर भरली नाही. इतके सिम्पल आहे.

राणे ह्यांच्या जिवावर bjp महाराष्ट्रात सत्ता मिळवण्याचे स्वप्न बघत आहे. त्यांची पत्रकार परिषद दोन मिनिट तरी कोणी बघितली असेल का. महाराष्ट्र मध्ये तरी bjp नी चांगली लोक शोधून त्यांच्या हातात पक्षाची सूत्र द्यावीत.

रशिया- युक्रेन क्रायसिस, युरोप आणि सातत्याने काड्या सारणारी अमेरिका. गेले काही दिवस आपण पाहत आहोत की रशिया आणि युक्रेन युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत अश्या बातम्या मोठ्या प्रमाणात येत आहेत. अमेरिकेच्या बाजुने रोज काही ना काही बातमी पसरवली जात आहे, चीन चे विंटर ऑलिंपिक झाल्या शिवाय रशिया हल्ला करणार नाही, अमुक एक तारखेला रशिया हल्ला करणार, रशियाने हल्ला केला अशी बातमी आणि अनेक... माझ्या आकलना नुसार जर युद्ध झाले तर या सगळ्यात जास्त नुकसान जर कोणाचे होणार असेल तर ते युरोपचे होणार आहे आणि अमेरिकेला तेच हवे आहे. युद्ध झाले तर Nord Stream 2 पाईप लाईनचा करार होणार नाही, रशियावर निर्बंध लाधले जातील, युद्धाची झळ युरोपला देखील बसेल ती विशेषतः इंधनाच्या आणि गॅस च्या किंमती वाढल्याने आणि या बाबतीत रशियावर मोठ्या प्रमाणात अवलंबुन असल्याने त्यांचे संबंध चिघळतील व याचा फयदा अमेरिकेला उचलायचा आहे, ते युरोपला शेल गॅस विकण्यास अधीर आहेत. म्हणजे रशियाला आर्थिक दृष्ट्या कमकुवत करण्यासाठी, युरोपियन समुदायाचे रशियावरील इंधनाचे / गॅस / एलएनजी अवलंबित्व कमी किंवा बंद करुन स्वतःच्या शेल कंपन्यांचे उखळ पांढरे करण्यासाठी हे युद्ध होणे अमेरिकेसाठी महत्वाचे असेल. या खेळातले मेजर प्लेअर हे रशिया, अमेरिका आणि कतार आहेत. हल्लीच कतारच्या आमीरला बायडन भेट देऊन आले आहेत.कतार मध्ये अमेरिकेचे सेंट्रल कमांड आहे आणि फार मोठा एअर बेस आहे.कतार हा महत्वाचा नॉन नेटो सहयोगी असल्याचे अमेरिका आता सांगते. युद्ध झाले आणि रशियाकडुन युरोपचा गॅस / तेल यांचा पुरवठा झाला तो कतार ने सुरळीत ठेवावा. कतार बोइंग विमान खरेदीचा करार देखील झाला, म्हणजे अमेरिकन कंपनीला फायदा. तेव्हा युद्ध झाले तर युरोप हा गर्तेत जाईल आणि अमेरिका स्वतःच्या शेल कंपन्यांचा आधार घेऊन स्वतःला गर्तेत जाण्या पासुन रोखु शकेल असे एकंदर गणित आत्ता तरी समोर दिसते. इयर ऑफ टायगर हे सध्याचे चीन चे नविन सुरु झालेले वर्ष आहे. चीन मध्ये प्रचंड अस्वस्थता आत्ताच्या घडीला आहे, शी जिनपिंगला तिथल्या काही गोटातुन विरोध उत्पन्न झाल्याचे समजण्यात येत असुन तिथले रिअल इस्टेट मार्केट वेगाने कोसळत आहे [ बिल्ड बिल्ड बिल्ड मॉडलचा शेवट ] आणि त्याचा परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवर आणि चीनी लोकांच्या जीवनमानावर होत आहे. यातुन लक्ष वळवण्यासाठी चीन मुख्यत्वे २ गोष्टी करु शकतो. जर रशिया आणि युक्रेन क्रायसिस चिघळला तर जगाचे लक्ष युरोप मध्ये असेल त्याचा फायदा घेऊन चीन आपल्या बॉर्डवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण करेल्,इयर ऑफ टायगर... वाघ रात्री शिकार करण्यात माहिर असतो... तेव्हा चीन रात्रीची वेळ निवडेल. युरोप आणि हिंदुस्थानातील परिस्थीतुन तो तैवान ताब्यात घेण्याचा वेगळा प्रयत्न देखील तो करुन पाहु शकतो. संदर्भ :- IMF warns China's property stress poses spillover risk China’s Technocrat Builders Create Equivalent Of 27 Empty New York Cities Vanke says the ‘golden age’ of China’s property is over as bellwether developer girds for hard times

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jimmi Jimmi Jimmi Aaja Aaja Aaja Aaja Re Mere... - Bappi Lahiri :- Disco Dancer

स्त्रियांनी अंगभर कपडे घालावे असे एखाद्या हिंदू नेत्याने म्हणायचा अवकाश.... सगळे पुरोगामी तुटून पडतात... आता बोलती बंद..... https://www.siasat.com/wearing-hijab-will-protect-muslim-women-from-get…

फुकट मिळतय म्हणुन तेच तेच प्रतिसाद टाकणारी काही लोक त्रासदायक आहेत. इथे नक्कीच खुप चान्गले आणी विविध पैलुन्वर विचार करायला लावणारे लेख आणि मत वाचायला मिळतात. मिपा व्यव्स्थापक हे सन्स्थळ चालवण्यासाठी अर्थिक भार उचलत असणार आहेत. माझी अशी विनन्ती आहे की लिहायची इच्छा असणार्या सभासदान्कडुन एकरकमी ठेव घ्यवी जी सभासद्त्व रद्द केले की परत करता येइल. म्हणजे जो लेखनाचा कचरा टाकला जातो तो थाम्बेल. लिहायला पैसे वाचायला फुकट असा मार्ग असावा... यातल्या तान्त्रिक अडचणी माहीत नाहीत.सुचल म्हणुन टन्कल....

https://www.loksatta.com/maharashtra/muskan-khan-name-in-urdu-house-res… कर्नाटकात हिजाब परिधान करण्यास विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एका गटास मुस्कान खान या विद्यार्थिनीनेही सडेतोड उत्तर दिले होते. मुस्कानची ही कृती धैर्य दाखवणारी असल्याने येथील एका घरास तिचे नाव देण्याची इच्छा महापौर ताहेरा शेख यांनी जाहीर केली होती. त्यानुसार सभेत सत्ताधारी गटाने आणलेला नामकरणाचा ठराव बहुमताने मंजूर झाला. या ठरावास भाजपने तीव्र विरोध केला तर शिवसेनेचे सदस्य तटस्थ राहिले. जनता दलाच्या शान-ए-हिंदू यांनी घरास शहरातील अन्य नामांकित व्यक्तींचे नाव देण्याचा आग्रह धरत या ठरावास विरोध दर्शविला. जनता दलाचा समावेश असलेल्या महागठबंधन आघाडीची मात्र या ठरावास मूकसंमती असल्याचे चित्र दिसले.

In reply to by मुक्त विहारि

भयंकर आहे हे असे कारस्थान! चुकीचे पायंडे पाडले जात आहेत. हे नाव राज्य सरकारने बदलले पाहिजे आणि तेथे मराठी भवन असे नाव दिले पाहिजे!

In reply to by मुक्त विहारि

असे म्हणायचे नाही. हिंदु एकत्र येऊ शकतात आणि येतात ही वस्तुस्थिती आहे. हिंदु संघटीत होतात हे घडलेले आपण इतिहासापासून पाहतो आहोत. अन्यथा हिंदवी स्वराज्य स्थापन झालेच नसते!

2008 Serial Blast Case : अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात 49 आरोपींना दोषी ठरवलं असून त्यापैकी 38 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. -- एकाच वेळी इतक्या लोकांना एकत्र फाशी द्यायचा निर्णय, भारतातील एकमेच असावा.

In reply to by प्रसाद_१९८२

प्रत्यक्षात किती लोक खरोखर फासावर जातात हे बघायचे. हा फक्त खालच्या न्यायालयाचा निकाल आला आहे. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय बाकी आहे. पुढे राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज बाकी आहे. त्यावेळी प्रतिभा पाटील यांच्यासारखा कोणी राष्ट्रपती असेल तर वर्षानुवर्षे त्यावर कोणताही निर्णय होणार नाही. प्रत्यक्ष फाशी द्यायची वेळ येईल तेव्हा मग अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण, हर्ष मांदेर वगैरे विचारवंत थयथयाट करतील आणि फाशी टाळायचा आटोकाट प्रयत्न करतील. खरोखर किती लोक आणि कधी फासावर जातात तेच बघायचे. बाकी २००२ मधील गुजरात दंगलींमुळे व्यथित झालेले हे 'भटके हुए नौजवान' आहेत हे समर्थन कोणी केले की नाही अजुनपर्यंत?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

महाराष्ट्रात असलेले उलेमा ए हिंदचे लोक यांना कायदेशीर मदत देत आहेत. शिवसेनेचे राज्य आणि त्याम्छा मुख्य मंत्री असतांना यांना ही मदत देण्याची हिंमत होतेच कशी? पवारांचे ठीक आहे. ते तर मुस्लिम धार्जिणेच कुटंब आहे!

खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. हा केंद्रीय मंत्री !

जे bjp करत आहे त्याला महत्वाचे कारण आहे .bjp चे १०५ येवून पण त्यांना सत्ता मिळाली नाही ही गोष्ट त्यांच्या मनाला खूप लागलो आहे नाही राज्याचे महत्वाचे सोडून उथळ आरोप करणारा विरोधी पक्ष महाराष्ट्र च्या इतिहासात कधीच नव्हता. ह्या उथळ प्रकारच्या आरोप मुळे bjp चीच प्रतिमा खराब होत आहे पुढच्या निवडणुकीत १०५ चे २५ होण्याची शक्यता च त्या मुळे निर्माण होईल. Bjp नी आता जरा गंभीर होवून ,जबाबदार विरोधी पक्षा सारखे वागावे

In reply to by sunil kachure

आपण ..... 1. साधू हत्याकांड झाले तरी गप्पच बसायचे का? 2. तांदूळ घोटाळा झाला, तरी गप्पच बसायचे का? 3. एखाद्या स्त्रीला शिवी दिली तरी, गप्पच बसायचे का? 4. निवृत्त नौसैनिकाला मारहाण केली तरी, गप्पच बसायचे का? 5. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली तरी, गप्पच बसायचे का?

In reply to by मुक्त विहारि

पोलिस,न्यायालय त्या साठी आहेत ना .की bjp ल ही वरची चार उदाहरण जास्त महत्वाची वाटत आहेत त्या मध्ये तो navy ऑफिसर हा bjp कार्यकर्ता पहिला आहे navy चे नाव फक्त स्वार्थ साधण्यासाठी. सुशांत चा तपास सीबीआय करत आहे.त्यांचं प्रश्न केंद्राला विचारा. महाराष्ट्राच्या नशिबात bjp हा पक्ष सत्तेत पण नको आणि विरोधी पण नको. इतकी लोकांची मत बदलतील असे वागू नका यूपी मध्ये लोकांना चिरडून नेत्याचा पोरगा बाहेर पण आला.तिथे नाही लाज वाटत. यूपी मध्ये रोज भयंकर गुन्हे घडत आहेत. ते पाहिले स्वतःचे सरकार सुधारावा.

In reply to by मुक्त विहारि

एकेकाळी देशभक्त आणि हिंदु तारणहार असलेली संघट्ना अशी काकाने आणि बारबालेले लयाला घालवलेली पाहून कसेतरी वाटते. साधू हत्याकांड हा तर अमानुषतेचा कळस आहे. आणि त्यावर काहीच कारवाई नाही...

In reply to by निनाद

बारबालेले ?
एकेकाळी देशभक्त आणि हिंदु तारणहार असलेली संघट्ना अशी काकाने आणि बारबालेले लयाला घालवलेली पाहून कसेतरी वाटते. साधू हत्याकांड हा तर अमानुषतेचा कळस आहे. आणि त्यावर काहीच कारवाई नाही...

बर्‍याच दिवसात अरविंद केजरीवाल नामक भामट्यावर काही लिहिले नव्हते. ते आता इथे लिहितो. १. गेल्या १८ दिवसांपासून दिल्लीमध्ये शेकडो अंगणवाडी कर्मचारी मुख्यमंत्री निवासापासून काही अंतरावर धरण्यावर बसल्या आहेत. स्थायी स्वरूपी नोकर्‍या मिळाव्यात, पीएफ, आरोग्यविमा वगैरेंची व्यवस्था व्हावी अशा त्यांच्या मागण्या आहेत. एबीपी वर त्याविषयी https://news.abplive.com/videos/news/delhi-anganwadi-workers-strike-con… ही बातमी उडत उडत आली आहे. पण इतर कोणत्याही मेनस्ट्रीम मिडियातील चॅनेलवर त्याविषयी बातमीही नाही. कारण केजरीवाल आणि आप या लोकांचा लाडका आहे हे असावे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की या आंदोलक स्त्रियांची छेड काढणे, विनयभंग वगैरे प्रकार आपच्या काही कार्यकर्त्यांनी केले आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायचे आदेश महिला आयोगाने पोलिसांना दिले आहेत. म्हणजे दिल्लीत आपण शिक्षण आणि आरोग्यव्यवस्थेत फार मोठी क्रांती आणली या टिमक्या हे सद्गृहस्थ करदात्यांच्या पैशावर केरळपासून नागालँडपर्यंत पेपरात जाहिराती देऊन करणार आणि त्याचवेळेस अंगणवाडी या अगदी ग्रासरूटवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना वार्‍यावर सोडणार. इतकेच नव्हे तर यांचे कार्यकर्ते त्या स्त्रियांची छेड काढणार आणि विनयभंग करणार. त्यांच्याविरोधात पक्षाकडून काही कारवाई केल्याचे (पक्षातून काढणे वगैरे) ऐकिवात नाही. कसे करतील? बरेच लोक विसरले असतील पण मी एक गोष्ट विसरलेलो नाही. २०१६ मध्ये आपच्या एका महिला कार्यकर्तीचा विनयभंग केला या आरोपावरून आपच्या दुसर्‍या एका कार्यकर्त्याला तुरूंगात टाकले गेले होते. तो जामिनावर सुटला. हा कायद्याच्या प्रक्रीयेचा भाग होता त्याबद्दल केजरीवालांना दोष नक्कीच देत नाही. पण तो जामिनावर सुटल्यावर त्या महिला कार्यकर्तीला मानसिक दडपण आले. अशावेळेस त्याच केजरीवालांनी 'कशाला भांडण वाढवतेस- कॉम्प्रोमाईज कर लो' असे आपल्याला सांगितले होते हा आरोप त्या महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी आज तकला दिलेल्या मुलाखतीत केला होता. त्यानंतर तिला आणखी डिप्रेशन आले आणि तिने आत्महत्या केली. https://www.dnaindia.com/india/report-watch-aap-activist-who-committed-… असल्या माणसाकडून अंगणवाडी सेविकांविषयी कसलाही सहानुभूतीपूर्वक विचार होईल याची अपेक्षाच नाही. २. परवाच कुमार विश्वास या आपच्या माजी नेत्याने केजरीवालांनी आपल्याला पंजाबचा मुख्यमंत्री किंवा स्वतंत्र देशाचा (म्हणजे खलिस्तानचा) पहिला पंतप्रधान व्हायला आवडेल असे सांगितले होते हा दावा केला आहे. अर्थात अशा कोणी केलेल्या दाव्यावर लगेच विश्वास ठेवायची गरज नाही. पण इतर काही गोष्टी केजरीवाल आणि आप पंजाबी फुटिरतावाद्यांबरोबर आहे या संशयाला नक्कीच बळ देतात. उदाहरणार्थ २०१७ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळेस प्रचारादरम्यान केजरीवाल एका माजी खलिस्तानी दहशतवाद्याच्या घरी मुक्कामाला उतरले होते, रेफरेंडम २०२० या कॅनडा आणि लंडनमधील खलिस्तानी तत्वांनी केलेल्या मागणीला पाठिंबा देणारी वक्तव्ये आपच्या नेत्यांनी करणे वगैरे. केजरीवालांवर हा आरोप करणारे कुमार विश्वास हे एकटेच माजी सहकारी आहेत असे अजिबात नाही. अभिनेत्री गुलकिरत कौर पानंग (गुल पानंग) ला २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केजरीवालांनी चंडिगडमधून पक्षाची उमेदवारी दिली होती. त्यांनीही २०१८ मध्ये हाच आरोप केला होता. https://www.thehindu.com/news/national/other-states/had-warned-aap-abou… इतकेच नव्हे तर पंजाबमधील दहशतवाद चिरडणार्‍या के.पी.एस गिल यांच्यासारख्या ज्येष्ठ पोलिस अधिकार्‍यानेही तेच म्हटले होते. https://indianexpress.com/elections/punjab-assembly-elections-2017/aap-… असला पक्ष पंजाबमध्ये निवडणुक जिंकला तर तो देशाच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी दिवस असेल हे नक्कीच. म्हणूनच या घाणेरड्या पक्षाविरोधात आणि त्याच्या समर्थकांविरोधात मी मिपावर गेल्या ७-८ वर्षांपासून अगदी मोहिमच उघडली आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

केजरीवाल हा भामटाच आहे या विषयी सहमत आहे! ही कीड जितकी लवकरात लवकर भारतातून जाईल तेव्हढे बरे. हा इसम धडधडीत रेटून खोटे बोलण्यात वाकबगार आहे.

शेठला दिल्लीत आपटल्या पासून केजरीवाल वर भक्तांचा राग ! फेकूचांदने त्यांना पाकिस्तानी एजंट वगैरे म्हणले होते. एवढा माहिती आहे तर अटक का करत नाहीत ?? नुसत्या बाता आणि फेका

In reply to by कपिलमुनी

केजरीवाल एक पाकिस्तानी आणि खलिस्तानी एजंट असल्यास त्याच्यवर कार्वाई करण्यास फार जास्त उशीर केला गेला आहे. तसेच दिल्लीतील जनतेचे पैसे वापरून देशभरात जाहिराती करणे आक्षेपार्ह आहे त्याची ही चौकशी व्हायला पहिजे. राहुल गांधींच्या मदतीने याचा तपास झाला तर अजून उत्तम.

In reply to by निनाद

एका राज्यातील जाहिरती दुसरीकडे करणे चुकीचे आहे, उदा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केलेल्या जाहिराती, केजरीवाल करत असलेल्या , ममता बॅनर्जी , आणि सध्या योगी करत असलेल्या जाहिराती ! सगळे चुकीचे

In reply to by कपिलमुनी

अटक का करत नाहीत? कायद्याची काही मूलभूत माहिती करून घ्या. केवळ तुमचा चेहरा आवडत नाही म्हणून जवळच्या पोलीस स्थानकाचा निरीक्षक तुम्हाला आत टाकू शकणार नाही. actionable evidence म्हणजेच कार्यवाही करण्या इतपत पुरावा असावा लागतो. असंख्य सरकारी अधिकारी भ्रष्ट आहेत पण त्यांच्या विरुद्ध न्यायालयात संशयाच्या पलीकडे सज्जड पुरावा जमा करणे हि गोष्ट सोपी नाही. अन्यथा राजकारणात त्याचे भांडवल करून संवेदनशील मतदाराना भावनात्मक आव्हान करून त्याचा गैरफायदा उठवता येतो हे आपण श्रीमती इंदिरा गांधी यांच्या बद्दल पाहिलेले आहे. असे करू नये इतपत राजकीय शहाणपण श्री मोदींना आहे. शिवाय श्री मोदी कधी कायद्याच्या प्रक्रियेत ढवळाढवळ करत नाहीत. अन्यथा ते चार वेळेस मुख्यमंत्री आणि दोन वेळेस पंतप्रधान स्वबळावर झाले नसते. मग तुम्ही त्याना कितीही शिव्या द्या नाहीतर दूषणे द्या किंवा कितीही असभ्य जळजळ व्यक्त करा

अहमदाबादमधील एका विशेष न्यायालयाने २००८ च्या अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा जाहीर केली . या निकालात न्यायालयाने या प्रकरणात दोषी ठरलेल्या ४९ दहशतवाद्यांपैकी तब्बल ३८ दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती, तर उर्वरित ११ दहशतवाद्यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. देवबंदस्थित इस्लामिक संघटना उलामा-ए-हिंदने दोषींना फाशी देण्यास विरोध केला असून गरज पडल्यास ते उच्च न्यायालय आणि अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊ, असे म्हटले आहे. इस्लामवादी संघटना जमियत उलेमा-ए-हिंदने मागील वर्षी जुलैमध्ये उत्तर प्रदेशमध्ये अटक करण्यात आलेल्या अल-कायदा दहशतवाद्यांच्या बचावासाठी मदत केली होती. जमियत उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मौलाना अर्शद मदनी यांनी उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केलेल्या अल-कायदाच्या संशयित दहशतवाद्यांना कायदेशीर मदत जाहीर केली होती. अटक करण्यात आलेल्या दहशतवादी संशयितांपैकी एकाच्या वडिलांनी जमियत उलेमा-ए-हिंदला कायदेशीर मदतीसाठी पत्र लिहिले होते. परिणामी, जमियत उलेमा-ए-हिंदच्या कायदेशीर मदत समितीचे अध्यक्ष गुलजार आझमी यांनी उत्तर प्रदेश एटीएसने अटक केलेल्या दोन दहशतवादी संशयितांना कायदेशीर मदत देण्याचा निर्णय घेतला. या विरुद्ध कोणत्याही हिंदू संघटनेने मात्र आवाज उठवलेला नाही. त्यांचे संपर्क https://jumaharashtra.com/jamiat-ulama-maharashtra-trustees/ आणि https://www.facebook.com/Muslims.of.India.Page/photos/gulzar-azmi-a-man… येथे दिसून येतात पण त्याची खात्री नाही. तरीही येथे असलेल्या इ मेल पत्त्यांवर राष्ट्रप्रेमी नागरिकांकडून निषेध नोंदवला जाऊ शकतो असे दिसते.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक आता रंगतदार टप्प्यात आली आहे. सुरवातीला योगी हरणार, अखिलेश परत एकदा मुख्यमंत्री बनणार असे वातावरण उभे केले गेले होते पण परिस्थिती तशी नाही असे आता दिसायला लागलेले आहे. १. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर शहर या गोरखनाथ मठाच्या ठिकाणातील मतदारसंघातूनच विधानसभा निवडणुक लढविणार असे भाजपने जाहीर केले. त्यापूर्वी आदित्यनाथ अयोध्येतून किंवा मथुरेतून निवडणुक लढविणार असे चित्र उभे केले गेले होते (की माध्यमांमध्ये मुद्दामून पेरले गेले होते). त्यामुळे ते गोरखपूरमधून निवडणुक लढविणार म्हणजे त्यांना अयोध्या-मथुरेतून विजयाची खात्री नाही म्हणून ते आपल्या घरच्या मतदारसंघातून निवडणुक लढवत आहेत असे म्हटले जाऊ लागले. अखिलेश यादव तर 'योगींची घरवापसी झाली' अशाप्रकारचा बोलघेवडेपणा करून बसले. पण त्यामुळे प्रश्न उभा असा राहिला की योगी आदित्यनाथ विधानसभा निवडणुक लढवत तरी आहेत पण अखिलेश यांचे काय? त्यामुळे अखिलेश यांचीही 'घरवापसी' झाली आणि त्यांनी मैनपुरी जिल्ह्यातील करहल विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढवायचा निर्णय घेतला. स्वतः मुलायमसिंग यादव यांच्या राजकीय जीवनाची सुरवात याच भागातून झाली. तसेच या मतदारसंघात यादव मतदारांची संख्या लक्षणीय आहे. असे असताना या मतदारसंघातून अखिलेश यांचा विजय सगळ्यांनी गृहितच धरला होता. इतकेच नाही तर आपण करहलमध्ये दोनदाच येणार- एकदा उमेदवारी अर्ज भरायला आणि दुसर्‍यांदा जिंकल्याचे प्रमाणपत्र घ्यायला आणि आपण आपला वेळ पक्षाच्या इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी देऊ असेही अखिलेशनी म्हटले. पण आपल्याला निवडणुक तितकी सोपी राहिली नाही हे त्यांच्या लक्षात आलेले दिसते. भाजपने अखिलेशच्या विरोधात मुलायमसिंगांचे पूर्वाश्रमीचे सहकारी सत्यपालसिंग बघेल यांना उमेदवारी दिली आहे. हे गृहस्थ सध्या आग्र्याचे खासदार आणि मोदींच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री आहेत. हे मुलायमसिंगांचे एकेकाळचे सहकारी असल्याने यादव कुटुंबियांची मर्मस्थाने त्यांना अचूक माहित आहेत आणि त्याचाच वापर अखिलेश यांच्या विरोधात करत आहेत असे दिसते. तसेच योगींच्या पाच वर्षांच्या काळात उत्तर प्रदेशात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्वीपेक्षा बरीच सुधारली आहे .राज्याच्या अनेक भागात अखिलेश मुख्यमंत्री असताना रात्री ८ नंतर बाहेर पडायचे धैर्य स्त्रियांना आणि मुलींना होत नसे ती परिस्थिती आज राहिली नाही. तसेच पोलिस ठाण्यात कोणा यादव किंवा मुस्लिमाविरोधात तक्रार दाखल करता येणे तितके सोपे नव्हते कारण त्यांच्यापैकी गुन्हेगारी आणि गुंड तत्वांना समाजवादी पक्षाच्या राजवटीत राजाश्रय होता. या सगळ्याचा सर्वाधिक त्रास स्त्रियांना आणि मुलींना होत होता. ती परिस्थिती सुधारल्याने महिला वर्गात योगींच्या बाजूने सुप्त लाट आहे अशा बातम्या आहेत. त्यातूनच मग भाजप उमेदवार बघेल यांच्या ताफ्यावर हल्ला करायचा प्रयत्न समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी (खरं तर गुंडांनी) केला. आचारसंहिता लागू झाल्याने योगी सरकार १००% काम करू शकत नाही अशा स्थितीत विरोधी उमेदवारावरच हल्ला करायचा प्रयत्न होत असेल तर मग त्यांचे सरकारच आले तर काय होईल हा एक संदेश राज्यभर गेलाच. २०१२ मध्ये अखिलेश मुख्यमंत्री झाल्यावर 'नवी समाजवादी पार्टी' आपण लोकांपुढे आणू ही गर्जना त्यांनी केली होती त्यात तितकेसे तथ्य नव्हते हे स्पष्टच आहे. समाजवादी पक्ष हा पूर्वीही गुंडांचाच पक्ष होता आणि आजही गुंडांचाच पक्ष आहे. अशा परिस्थितीत आपल्या पायाखालची वाळू सरकू लागू लागली आहे हे लक्षात आल्यावर अखिलेशनी करहलमध्ये प्रचार करायला सुरवात केली. परवा तर ८२ वर्षांच्या मुलायमसिंग यादव यांनाही प्रचारासाठी त्यांनी करहलमध्ये बोलावले. प्रचाराचे भाषण करताना मुलायमसिंगांना आपल्या मुलाचेच नाव आठवत नव्हते आणि इथून पक्षाच्या उमेदवाराला विजयी करा असे भाषण त्यांनी केले अशा बातम्या आहेत. बहुदा वयानुरूप स्मृतीभ्रंश वगैरे त्रास त्यांना सुरू झालेला दिसतो. मुलायमसिंगांना प्रचारासाठी बोलावायला लागले याचाच अर्थ अखिलेशसाठी सगळे काही आलबेल नाही हे स्पष्ट आहे. त्याच सभेत अखिलेशचे काका शिवपालसिंग पण उपस्थित होते. त्यांना बसायला खुर्चीही दिली गेली नव्हती अशाही बातम्या आहेत. तेव्हा अखिलेशना स्वतःचीच निवडणुक जड जाणार असे दिसते. २. ५ वर्षांपूर्वी काका शिवपालसिंग यादव यांच्याबरोबर अखिलेशनी भांडून भूस पाडला होता. त्यांच्याशी यावेळी समेट केला आणि सुरवातीला त्यांच्या मर्जीतल्या १०० उमेदवारांना उमेदवारी दिली जाईल असे बोलले जात होते. तो आकडा हळूहळू कमी व्हायला लागला. आता तर एकट्या शिवपालसिंग यादवना जसवंतनगरची उमेदवारी दिली गेली आहे आणि त्यांच्या मर्जीतल्या इतर कोणालाही उमेदवारी दिली गेलेली नाही त्यामुळे शिवपालसिंगही नाराज आहे अशा बातम्या आहेत. ३. अखिलेशनी लहानसहान अनेक पक्षांबरोबर युती केली आहे. पण आता जागावाटपातील कुरबुरी पुढे यायला लागल्या आहेत. अशी युती केलेल्या पक्षांमध्ये अपना दलाचा एक फुटिर गट आहे. एका मतदारसंघात (नाव विसरलो) या गटाला जागा दिली गेली होती. पण आयत्या वेळी समाजवादी पक्षाने आपला सायकल चिन्हावर स्वतःचा उमेदवार जाहिर केला. अशा गोष्टींमुळे युतीत कुरबुरी वाढतात आणि त्यातून कटुता वाढते. ४. राज्याच्या पश्चिम भागात (मेरठ, बागपत वगैरे) जनाधार असलेल्या राष्ट्रीय लोकदलाच्या जयंत चौधरींशी अखिलेशनी युती केली. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या भागात भाजपला निवडणुक जड जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण उमेदवार निवडताना चुका झाल्या आहेत अशा बातम्या आहेत. म्हणजे रालोदला दिलेल्या जागांपैकी काही ठिकाणी मुळचे समाजवादी पक्षाचे नेते असलेलेच आयत्या वेळी पक्षांतर करून रालोदमध्ये गेले आणि त्यांना रालोदची उमेदवारी दिली गेली. त्यामुळे जयंत चौधरींचे समर्थक जाट मतदार नाराज झाले आहेत अशा बातम्या आहेत. तसेच समाजवादी पक्षाने या भागात मोठ्या प्रमाणात मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे. जाट मतदार समाजवादी पक्षाच्या मुस्लिम उमेदवारांना मत देईल ही शक्यता कमी असेही म्हटले जात आहे. त्यात समाजवादी पक्षाने २०१३ च्या मुझफ्फरनगर दंगलींचा आरोप असलेल्या आझमखानांना रामपूरमधून उमेदवारी दिली आहे. तसेच कैरानामधूनही अशाच दंगलीचा आरोप असलेल्या एका मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपच्या मागे हिंदू मतदारांचे 'कॉन्सॉलिडेशन' होईल अशी शक्यता आहे. आज तिसर्‍या फेरीसाठीचे मतदान आहे. पहिल्या तीन फेर्‍यातच समाजवादी पक्षाला काही करता येऊ शकेल. मतदान जसे पूर्वेकडे सरकेल त्याप्रमाणे समाजवादी पक्षाचे प्राबल्य कमी होत जाईल. तसेच योगी सरकारने कोरोना काळात लोकांना घरपोच रेशन दिले तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतून अनेकांची घरे झाली, उज्वला योजनेतून सिलेंडर मिळाले याविषयीही राज्यात चांगले मत आहे असे व्हिडिओ बघितले आहेत. कदाचित मी स्वतः भाजप समर्थक असल्याने माझ्याकडून तेच व्हिडिओ बघितले गेले असतील ही शक्यता आहेच. पण अशा योजनांचा सगळ्यात जास्त फायदा गरीबांना होतो. हा वर्ग बसपाचा पारंपारिक मतदार राहिला आहे. तसेच बसपा आता या निवडणुकांमध्ये महत्वाचा खेळाडू नाही हे पुरेसे स्पष्ट झाले असल्याने तशाही मायावती मुख्यमंत्री होणार नाहीत तेव्हा त्यापैकी काही मते तरी योगींकडे येतील असे मला वाटते. सुरवातीला भाजपचे १३ आमदार (दोन मंत्र्यांसह) समाजवादी पक्षात गेले त्याचा बराच बोलबाला झाला. सगळे मिळून ८० भाजप आमदार सपात जातील असे म्हटले जात होते. त्यापैकी काहीही झालेले दिसत नाही. स्वामीप्रसाद मौर्य समाजवादी पक्षात गेले. पण त्याचवेळी काँग्रेसच्या आर.पी.एन सिंग यांनी भाजपत प्रवेश केल्याने आपल्या पडरौना मतदारसंघातून आपल्याला निवडणुक कठीण जाईल हे स्वामीप्रसाद मौर्यंच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी फाझिलनगर या शेजारच्या मतदारसंघातून निवडणुक लढवायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे २०१७ मध्ये फाझिलनगरमधून निवडून आलेल्या समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने बंडखोरी केली आहे. एकूणच चित्र गुंतागुंतीचे आहे. यावेळी योगी आरामात बहुमत मिळवतील असे वाटते. २०१७ चा आकडा गाठतील/ ओलांडतील का हेच बघायचे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

त्यातही हिजाबचा मुद्दा ऐन उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आणला गेला त्याचा पण मतदानावर काहीतरी परिणाम होईल असे वाटते. हा मुद्दा नक्की कोणी आणला हे समजता येणे कठीण आहे. भाजपच्या बाजूने जरी हा मुद्दा सुरवातीला पुढे आणला गेला असला तरी आश्चर्य वाटू नये. काहीही असले तरी उत्तर प्रदेशच्या वातावरणात एक गोष्ट लक्षात घेणे महत्वाचे असते. समजा मुस्लिमांचे समाजवादी पक्षाकडे धृवीकरण झाले तर हिंदूंचे धृवीकरण दुसर्‍या बाजूला व्हायचे प्रमाण उत्तर प्रदेशात जास्त आहे. त्यातही मुस्लिम स्त्रिया काही प्रमाणात भाजप उमेदवारांना मत देतात असे दिसते. त्यासाठी ट्रिपल तलाकविरोधात भाजपची भूमिका जबाबदार असावी. पश्चिम उत्तर प्रदेशात साहरणपूर जिल्ह्यात देवबंद म्हणून एक विधानसभा मतदारसंघ आहे. तिथे मुस्लिम बहुसंख्या असूनही तिथे भाजपचा उमेदवार जिंकला होता. दुसरे म्हणजे उज्वला योजनेतून मिळालेले सिलेंडर आणि सुधारलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीमुळे मुस्लिम स्त्रियांनाही फायदा झालाच. नवर्‍याबरोबर मतदानाला जाताना इतरांना सांगताना समाजवादी पक्षाला मत देणार असे सांगितले तरी प्रत्यक्षात मात्र तसे मत देतीलच असे नाही.अशा अगदी १०% मुस्लिम स्त्रिया जरी असल्या तरी भाजपला ती लॉटरी होऊ शकते. दुसरे म्हणजे समजा यादवांचे समाजवादी पक्षाकडे धृवीकरण होत आहे असे दिसत असेल तर मग यादवेतर ओबीसींचे धृवीकरण दुसरीकडे होते. उत्तर प्रदेशात यादव ही डॉमिनन्ट जात आहे आणि यादव विरूध्द इतर हा सुप्त संघर्ष असतोच. आता ही मते दुसरीकडे म्हणजे कुठे जाणार? तर अशा मतांना जायला भाजपशिवाय दुसरा पर्यायच नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Bjp सत्तेवर असणे खूप गरजेचे आहे हे लोकांना चांगले पटले होते देशात खूप मोठे यश bjp ला त्या मुळे मिळाले काँगेस राज्यात पुरोगामी,मुस्लिम ह्या जमाती ॲक्टिवे होतात. पाकिस्तान,मुस्लिम हे खूप सौम्य धोके आहेत ..पण पुरोगामी मंडळी भारताच्या मुळा लं सुरुंग लावून भारत बरबाद करण्याचे प्रयत्न करतात जनतेला माहीत आहे.. पण bjp नी हे समजून घेतले पाहिजे शेतकरी,गरीब वर्ग ,कामगार हे bjp चे विरोधी नाहीत. पण त्यांना बदनाम करणे सोडून द्यावे महाराष्ट्र प्रगत आहे . तिथे bjp नी चुतीया गिरी बंद करावी .. वागणूक सुधारावी जनता त्यांच्या बरोबर च आहे.

In reply to by sunil kachure

तथाकथित पुरोगामी आणि मुस्लिम तर एकत्र दिसतात.
पाकिस्तान,मुस्लिम हे खूप सौम्य धोके आहेत ..पण पुरोगामी मंडळी भारताच्या मुळा लं सुरुंग लावून भारत बरबाद करण्याचे प्रयत्न करतात