Skip to main content

ताज्या घडामोडी- फेब्रुवारी २०२२ - भाग २

लेखक निनाद यांनी सोमवार, 07/02/2022 04:03 या दिवशी प्रकाशित केले.
मद्रास उच्च न्यायालयाने हिंदू याचिकाकर्त्याला चर्च बाबत सहिष्णुता दाखवण्याचे निर्देश दिले आहेत. तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील नेदुविलाई येथे नव्याने बांधलेल्या चर्चमध्ये लाऊडस्पीकरच्या वापराबाबत याचिकाकर्त्याने रात्रंदिवस लाऊडस्पीकरच्या वापरामुळे त्रास होत असल्याची तक्रार केली होती. हे मद्रास उच्च न्यायालयाने सांगितले आहे! सी किशोर म्हणून ओळखल्या जाणार्‍या याचिकाकर्त्याने मद्रास उच्च न्यायालयात एक रिट याचिका दाखल केली. त्यांनी कन्याकुमारीच्या जिल्हाधिकार्‍यांनी वाई थंगराज याला चर्च बांधण्यासाठी दिलेल्या परवानगीला आव्हान दिले. थंगराज हा दिवसा आणि रात्री ध्वनिक्षेपकाद्वारे प्रार्थना करून उपद्रव निर्माण करत असल्याची तक्रार त्यांनी केली. चर्चने आपल्या घराच्या दिशेने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असल्याचा आरोपही त्यांनी केला होता आणि लाऊडस्पीकर आणि संबंधित सीसीटीव्ही कॅमेरे हटवण्याचे निर्देश देण्याची विनंती न्यायालयाला केली होती. -- अवांतरः सध्या मुथुवेल करुणानिधी स्टॅलिन तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. स्टॅलिन यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेज उच्च माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले आहे. द्रमुक पक्षाची स्वतःची मते आहेत जी मुळात पेरियार विचारसरणीने बनलेली आहेत. आणि ही विचारसरणीने प्रत्येक हिंदू श्रद्धा जसे की देव, मंदिरे, हिंदू संस्कृती आणि परंपरा इत्यादींना विरोध करते. या विरोधासाठीच करण्यासाठी द्रमुक पक्षाची स्थापन केली गेली होती. २०१४ पासून मात्र द्रविडी पक्षाचे समर्थक हिंदूना विरोध करण्यासाठी पक्षाची स्थापना करण्यात आली होती हे लपवण्याचा प्रयत्न करतात असे दिसून येते. पक्षाचे अध्यक्ष एमके स्टॅलिन हे घोषित नास्तिक आहेत, द्रमुक पक्ष हिंदूविरोधी आहे असे अनेकदा दिसून आले आहे. त्यांचे दिवंगत वडील आणि द्रमुकचे माजी प्रमुख एम. करुणानिधी हेही नास्तिक होते.

वाचने 19770
प्रतिक्रिया 149

प्रतिक्रिया

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातील होशंगाबाद जिल्ह्याचे नर्मदापुरम असे नामकरण करण्यास मान्यता दिली आहे. जिल्ह्यातील बबई शहराचे नाव माखन नगर असे नामवंत हिंदी कवी आणि पत्रकार माखनलाल चतुर्वेदी यांच्या नावावर करण्यास मान्यता दिली आहे. "मध्य प्रदेश सरकारने होशंगाबादचे नाव बदलून नर्मदापुरम आणि बाबईचे नाव बदलून माखन नगर करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता, जो मंजूर झाला आहे," श्री चौहान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. शहराला पूर्वी नर्मदा नदीच्या नावावरून नर्मदापूर असे म्हणत असत. नंतर माळवा सल्तनतचा क्रूर आक्रमक शासक होशंग शाह घोरी याच्या नावावरून हे नाव बदलून होशंगाबाद करण्यात आले. त्याला अल्प खान म्हणून ओळखले जात असे. खरे तर याचे अफ्गाणी वडील दिलावर खान घोरी दिल्लीचा सुलतान फिरोजशाह तुघलक याच्या दरबारात कामाला होते. पुढे याला तात्कलिक जमिनदारी मिळाली. पण त्याने याचा फायदा घेऊन आपलीच एक लहान मुस्लिम सल्तनत काढली. याने येथली र्मदा नदीच्या तीरावरची अनेक प्राचीन मंदिरे पाडली होती. भोजशालाही याच मुस्लिम आक्रमकांनी नष्ट केली होती. इतिहासाच्या एका क्रूर आणि काळ्या कालखंडातली ही चूक सुधारून आता इतिहास पूर्ववत करण्यात आला आहे.

हिजाबचा हिसाब 2024ला करणार, कर्नाटकातील हिजाब वादाचे सोलापुरात पडसाद; चक्काजाम https://www.tv9marathi.com/maharashtra/other-district/hijab-controversy… कालच एका साम्यवादी मुली बरोबर गप्पा मारल्या. कधीकधी, साम्यवादी लोकांबरोबर टाईमपास करायला मजा येते... तिच्या मते, धर्म घरांत आणि एक समान नागरी कायदा बाहेर .... कधी नव्हे ते, ह्या बाबतीत तरी, तिचे आणि माझे एकमत झाले ...

मनी लाँड्रिंग प्रकरणात पत्रकार राणा अयुब यांच्यावर ईडीची कारवाई; १.७७ कोटींची संपत्ती जप्त https://www.loksatta.com/mumbai/ed-takes-action-against-journalist-rana… चौथा स्तंभ, सडत चाललेला वाटतो. दिगू कधीच वेडा झाला....

https://www.sarkarnama.in/desh/allegation-on-sps-ex-ministers-son-murde… माझा भाजपवर विश्र्वास दृढ होत चालला आहे...

https://zeenews.india.com/marathi/maharashtra/bhangarwala-cheted-rs-200… हे केंद्र सरकार, योग्य वेळी चांगले निर्णय घेत आहे...

सोनिया गांधींनी २०२० पासून भरलं नाही बंगल्याचं भाडं; १० रुपये पाठवत भाजपा नेत्याने सुरु केली वर्गणी मोहीम https://www.loksatta.com/desh-videsh/rent-of-congress-headquarters-soni… कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष हिंदू हितवादी नाहीत आणि जनतेच्या भल्यासाठी पण नाहीत.... हे माझे वैयक्तिक मत आहे ...

करमुसे मारहाण प्रकरणात देखील, पोलीसांवर कारवाई झाली साधू हत्याकांड झाले आणि कारवाई पोलीसांवर झाली आणि नुकतीच किरीट सोमैय्या यांना मारहाण झाली आणि पोलीसांवर कारवाईची टांगती तलवार ..... (https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/centre-team-to-visit…) ह्या राजवटीत, रक्षकांवरच कारवाई करण्याची वेळ का येत आहे? दोष नक्की कुणाचा?

सचिन वाझे माफीचा साक्षीदार होण्यास तयार; ईडीला पाठवलं पत्र https://www.google.com/amp/s/marathi.abplive.com/news/mumbai/sachin-vaz… ह्या राजवटीत नक्की काय सुरू आहे?