Skip to main content

ताज्या घडामोडी- फेब्रुवारी २०२२ - भाग २

लेखक निनाद यांनी सोमवार, 07/02/2022 04:03 या दिवशी प्रकाशित केले.
मद्रास उच्च न्यायालयाने हिंदू याचिकाकर्त्याला चर्च बाबत सहिष्णुता दाखवण्याचे निर्देश दिले आहेत. तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील नेदुविलाई येथे नव्याने बांधलेल्या चर्चमध्ये लाऊडस्पीकरच्या वापराबाबत याचिकाकर्त्याने रात्रंदिवस लाऊडस्पीकरच्या वापरामुळे त्रास होत असल्याची तक्रार केली होती. हे मद्रास उच्च न्यायालयाने सांगितले आहे! सी किशोर म्हणून ओळखल्या जाणार्‍या याचिकाकर्त्याने मद्रास उच्च न्यायालयात एक रिट याचिका दाखल केली. त्यांनी कन्याकुमारीच्या जिल्हाधिकार्‍यांनी वाई थंगराज याला चर्च बांधण्यासाठी दिलेल्या परवानगीला आव्हान दिले. थंगराज हा दिवसा आणि रात्री ध्वनिक्षेपकाद्वारे प्रार्थना करून उपद्रव निर्माण करत असल्याची तक्रार त्यांनी केली. चर्चने आपल्या घराच्या दिशेने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असल्याचा आरोपही त्यांनी केला होता आणि लाऊडस्पीकर आणि संबंधित सीसीटीव्ही कॅमेरे हटवण्याचे निर्देश देण्याची विनंती न्यायालयाला केली होती. -- अवांतरः सध्या मुथुवेल करुणानिधी स्टॅलिन तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. स्टॅलिन यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेज उच्च माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले आहे. द्रमुक पक्षाची स्वतःची मते आहेत जी मुळात पेरियार विचारसरणीने बनलेली आहेत. आणि ही विचारसरणीने प्रत्येक हिंदू श्रद्धा जसे की देव, मंदिरे, हिंदू संस्कृती आणि परंपरा इत्यादींना विरोध करते. या विरोधासाठीच करण्यासाठी द्रमुक पक्षाची स्थापन केली गेली होती. २०१४ पासून मात्र द्रविडी पक्षाचे समर्थक हिंदूना विरोध करण्यासाठी पक्षाची स्थापना करण्यात आली होती हे लपवण्याचा प्रयत्न करतात असे दिसून येते. पक्षाचे अध्यक्ष एमके स्टॅलिन हे घोषित नास्तिक आहेत, द्रमुक पक्ष हिंदूविरोधी आहे असे अनेकदा दिसून आले आहे. त्यांचे दिवंगत वडील आणि द्रमुकचे माजी प्रमुख एम. करुणानिधी हेही नास्तिक होते.

वाचने 19770
प्रतिक्रिया 149

प्रतिक्रिया

In reply to by चौकस२१२

विरोधाभास कसलाच नाहीये. स्वतःच्या मर्जीने हिजाब घालायचा असेल तर जबरदस्तीने रोखण्याचा विरोध आहे. मुस्लिम मुलींना शिक्षण मिळावं म्हणून गोळी खाणारी मुलगी "हिजाब घालून शाळेत प्रवेश मिळणार नाही" यावर मौन राखून बसली असती तर खरा विरोधाभास झाला असता. पण जर व्यक्तिगत निर्णय, या संकल्पनेवर विश्वास नसेल तर विरोधाभास वाटू शकतो. हिजाब घालू नये असे मत असले तरी हिजाब वापरण्यावर बंदी नको असे वाटू शकते हे समजत नसेल तर समजून घ्या. आधी सुद्धा मलालाची मागणी मुलींच्या शिक्षण घेण्याच्या निर्णयाचा आदर व्हावा हीच होती आणि आता सुद्धा मुलींच्या हिजाब वापरण्याच्या निर्णयाचा आदर व्हावा हीच आहे. शून्य विरोधाभास.

In reply to by कॉमी

मुलींनी कॉलेजमध्ये तोकडे कपडे घातले तरी त्याला विरोध करायचा आणि संपूर्ण शरीर झाकले तरी विरोध करायचा. त्यापेक्षा मुलींकडे बघण्याचा दृष्टीकोन का बदलत नाहीत? ते अधिक सोपे असावे.

In reply to by कॉमी

आग्यांच्या विषयांतराच्या करणार्‍या प्रतिसादावर तुमची सहमती थोडी खटकली. तर मूळ मुद्दा, मुस्लिम स्त्रीयांना, घरांत व सार्वजनिक स्थानांत,हिजाब वापरण्यापासून भारतांत तरी कुणी सरसकट रोखलेले नाही (अवांतरः मलाला जो नोबेल पुरस्कार घेऊन जगभर मिरवते, त्या नोबेलच्या मूळ भूमींत, नॉर्वेतच तसे कायद्याने रोखलेले आहे, पण सध्या ते असोच). मात्र काही सार्वजनिक ठिकाणी तेथील गणवेश घातलाच पाहिजे, ह्याविषयी वाद आता का होतो आहे? भारतांतील बहुतेक सर्वच शाळांतून गणवेश सक्तिचा असतो, हे अगदी मला आठवते तेव्हापासून म्हणजे पन्नाशीच्या दशकापासूनच सुरू आहे. ह्याचप्रमाणे अनेक सेवांतही गणवेश जरूरी असतो व तो तसा असावाही. उदा. बँकांत, दुकानांत, सिनेमागृहांत, सिक्युरीटीची कामे करणारे, तेथील कर्मचारी सहज ओळ्खता यावेत, हा एक मुख्य उद्देश ह्यामागे आहे. ह्याबद्दल मूलभूत चर्चा का व्हावी? राहिला प्रश्न त्या गणवेशांपेक्षा स्वतःचे, कुठल्याही कारणाने वेगळे काही करण्याचा. तर, असे केल्याने, गणवेशाच्या संकल्पनेलाच अर्थ राहत नाही. इथपतच हिजाब/ धोतरे/साढ्या (गणवेश, पँटचा असल्यास) विरोध/ बंदी आहे. शिखांच्या बाबतीत मात्र फार कालापासूनच अपवाद केला गेलेला आहे, पण त्यांना फक्त फेटे घालण्यापुरतेच ते मर्यादित आहे. आता, ह्यांत कुणीही धार्मिक बाबींवरून किंवा, मॉरॅलिटीच्या प्रश्नावरून विरोध केलेला नाही, तेव्हा असे म्हणणे गैरलागू आहे,

In reply to by प्रदीप

हिजाबाची मोरॅलीटी नक्की चर्चेत आहे. कॉलेजचे कारण युनिफॉरमिटी हेच असले तरी वेगवेगळ्या चर्चांमध्यें मोरालिटी नक्की आहे. शेखर गुप्तांचे ५० वर्ड एडिट ट्विट आलेले, त्यात हिजाबाचे समर्थन म्हणजे पुरोगामीत्वाला सोडून आहे असे म्हणणे मांडलेले, हिजाब ही रिग्रेसिव्ह प्रथा आहे आणि तीवर बंदी आणली तर ते पुरोगामीच होईल, असा आडून नजरीया गुप्तांनी मांडलेला.

In reply to by कॉमी

कॉलेजने, हिजाब परिधान करून शाळेत आलेल्या मुलींना, आत येण्यास नकार देतांना, कसलीही धार्मिक टिपण्णी केली नव्हती. हा केवळ गणवेशाचाच प्रश्न आहे. उदा. प्रियंका गांधीनी आजच एका प्रेस कॉन्फरन्समधे स्त्रीया कसलाही वेश परिधान करू शकतात- अगदी बिकीनीही, वगैरे निरर्थक मलाली टिपण्णी केली आहे. तेव्हा जर कुणी खरोखरच बिकीनीच घालून गेल्या असत्या, तरीही त्या कॉलेजाने हीच भूमिका घेतली असती, पण मग अर्थात, त्यावरून असा धार्मिक स्चरूपाचा गदारोळ करता आला नसता. कॉन्ग्रेससारख्या खुळचट पक्षाचे सोडा, पण तथाकथित विचारवंतांची आता होते आहे, तशी कसरत झाली नसती (म्हणजे, पुरोगामीपणाची झूल वावरता वावरता, हिजाब वापरण्याचे समर्थन करायचे-- कारण म्हणे व्यक्तिस्वातंत्र्य!). गणवेश घालण्यामगे एक निश्चीत शिस्तीची भूमिका आहे. तिथे व्यक्तिस्वातंत्र बाजूस ठेवायचे, हा साधा कॉमन सेन्स आहे. उदा. माझ्या लहानपनापासूनच, कॉन्वेण्ट शाळेत मुलींना कुंकू लावून येण्यास मनाई आहे. त्यांच्या पुरती ती बरोबरच आहे. ज्या मुलींना तेथे जायचे आहे, त्यांनी त्या गणवेश- नियमाचे पालन केलेच पाहिजे. नपेक्षा त्यांनी त्या शाळेत जाऊच नये. हे माझ्या माहितीतले साधे आचरण आहे. पण, इथे हिजाब घातलेल्यांना प्रवेश नाकारला गेला, ह्यावरून रीतसर वैचारीक व शारीरीक दंगल पेटवण्यांत आली, कारण तोच मूळ अ‍ॅजेंडा होता व आहे. म्हणजे, काळजीपूर्वक ह्या आंदोलनामागील व्यक्तिसमूहाने, असा वेश निवडला की चर्चा सहज भरकटेल. मूळ कारण-- गणवेशाचे उल्लंघन. चर्चा -- धार्मिक वेष, व्यक्तिस्वातंत्र्य इत्यादी. अवांतरः ह्यावरून मला, ऐशीच्या दशकांत घडलेला एक प्रसंग आठवला. सेंट्रल रेल्वेच्या माटुंगा/ परळ येथील वर्क्शॉपमधे काम करणारा एक पुरुष कामगार, स्कर्ट घालून येऊ लागला. आता , इथे गणवेशाचे उल्लांङ्हन वगैरे नव्हते. पण सर्वमान्य शिष्टाचार (ड्रेस कोड) ला त्यामुळे धक्का बसत होता. ह्यामागे त्याचे म्हणणे एव्हढेच होते की स्कर्ट वापरल्याने कापडाची व म्हणून त्याच्या पैशाची बचत होते आहे. मग व्यक्तिस्वातंत्र्य वगैरे कौतुके तेव्हा नव्हती. त्यामुळे कासलाही गाजावाजा न होता ती केस रेल्वे प्रशासनाने हाताळली, सदर व्यक्तिस समज देण्यात आली व पुरुषी पोशाख घालून येण्यास त्याला भाग पडले.

In reply to by कॉमी

मान्य. पण लहानपणापासुन ब्रेनवॉश (मराठी शब्द?) करायचे आणि नंतर स्वत:हुन निवड केली म्हणुन सांगायचे.
विरोधाभास कसलाच नाहीये. स्वतःच्या मर्जीने हिजाब घालायचा असेल तर जबरदस्तीने रोखण्याचा विरोध आहे. मुस्लिम मुलींना शिक्षण मिळावं म्हणून गोळी खाणारी मुलगी "हिजाब घालून शाळेत प्रवेश मिळणार नाही" यावर मौन राखून बसली असती तर खरा विरोधाभास झाला असता.

In reply to by Trump

या बाबत सहमत आहे. पण ब्रेनवॉश आहे की नाही कसे ठरवणार ? आणि, हिजाब घालू नये किंवा स्त्री पुरुष स्मानतेसाठी शाळेत शिकवले असते तर खंदे समर्थन दिले असते.

In reply to by कॉमी

तो प्रश्न आहे. मग द्या लहान मुलांना सर्व धर्मांचे आणि रिलिजनचे शिक्षण, आणि मोठे झाल्यानंतर निवडु स्वत:चा मार्ग. बघा किती मुस्लिम आणि क्रिश्चन तयार होतात ते. माझ्या माहीतीतले बरेचरे हिंदु तयार होतील.
या बाबत सहमत आहे. पण ब्रेनवॉश आहे की नाही कसे ठरवणार ?

In reply to by कॉमी

शाळा किंवा कॉलेज चा गणवेश असताना हिजाब चा हट्टहास कशासाठी? वटलस तर शाळेच्या पहिल्या पायरी पर्यंत हिजाब घालुन यावा आणि शाळा संपली की बाहेर पडल्या पडल्या परत हिजाब घालावा, पण शाळा कॉलेज मध्ये असे पर्यंत फक्त गावणेशच पाहिजे.

In reply to by कॉमी

गणवेशात हिजाब पाहिजे हा हट्टहासच केला तर तो गणवेशच राहील का? उद्या आर्मी, पोलिसवाले पण म्हणतील आम्ही गणवेश घालू पण वरून आमचा पठाणी किंवा आमच्या धर्मात जे लिहिलंय ते वरून घालू ते चालेल का? त्या कॉलेज मधील मुलींनी डोक्यापासून पायापर्यंत स्वत ला झाकुन घेतलंय अत्ता आतमध्ये कॉलेज चा गणवेश आहे का नाही ते कसा बघणार?

In reply to by रात्रीचे चांदणे

उद्या आर्मी, पोलिसवाले पण म्हणतील आम्ही गणवेश घालू पण वरून आमचा पठाणी किंवा आमच्या धर्मात जे लिहिलंय ते वरून घालू ते चालेल का? यावर पुरोगाम्यांची दातखिळी बसेल. मुळात शाळेत गणवेश कशासाठी असतो तर विद्यार्थी श्रीमंत गरीब कोणत्याही जातीधर्माच्या असला तरी सर्वाना एकाच पातळीवर आणून समानतेचे तत्व शिकवणे हे आहे. बऱ्याच शाळांमध्ये सर्वाना एकच भोजनही दिले जाते किंवा काही शाळांत केवळ भाजी पोळीच आणायची असा नियम याच साठी असतो बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

उद्या आर्मी, पोलिसवाले पण म्हणतील आम्ही गणवेश घालू पण वरून आमचा पठाणी किंवा आमच्या धर्मात जे लिहिलंय ते वरून घालू ते चालेल का? यावर पुरोगाम्यांची दातखिळी बसेल.
येतोय, येतोय. शाळेतील हिजाबच्या "लढ्यानंतर" पुढील प्रवेश तोही असेल.

In reply to by रात्रीचे चांदणे

गणवेशात हिजाब वापरला तर तो कसा असावा असे सांगता येऊ शकते, रन्ग वैगेरे. शिखांना पगडीसाठी सूट आहे, कृपाण ठेवण्यासाठी आहे. आर्मी आणि पोलिसांना सुद्धा आहे.
उद्या आर्मी, पोलिसवाले पण म्हणतील आम्ही गणवेश घालू पण वरून आमचा पठाणी किंवा आमच्या धर्मात जे लिहिलंय ते वरून घालू ते चालेल का?
तसा आग्रह कोणी केल्याचं ऐकिवात नाही, किंवा धर्मात सुद्धा पुरुषांसाठी पोषाख बंधनकारक केल्याचं ऐकिवात नाही. चुभुद्याघ्या.

In reply to by कॉमी

धार्मिक कारण देऊन दाढी ठेवण्यासाठी बऱ्याच वेळा परवानगी मागितली होती पण नाकारण्यात आली आणि कोर्टानेही परवानगी दिली नाही. शिखांची पगडी आणि हिजाब याची तुलना करता येणार नाही कारण मुस्लिममध्ये हिजाब compulsory नाही. मुळात गणवेश असताना हिजाब पाहिजे हा हट्टहास कशासाठी? आज एक धर्म हिजाब घालून येईल उद्या हिंदू मुली आमच्या धर्मात अमुक कपडे पाहिजे म्हणून भांडत बसतील परवा ख्रिश्चन मुली वेगळ्या कपड्याचा आग्रह करतील म्हणजेच एका शाळेत ३-४ गणवेश होतील.

In reply to by रात्रीचे चांदणे

माझ्या माहितीप्रमाणे काही लोकांच्या मताप्रमाणे हिजाब मुस्लिम धर्मानुसार बंधनकारक आहे, तर काहींच्या नाही.
आज एक धर्म हिजाब घालून येईल उद्या हिंदू मुली आमच्या धर्मात अमुक कपडे पाहिजे म्हणून भांडत बसतील परवा ख्रिश्चन मुली वेगळ्या कपड्याचा आग्रह करतील म्हणजेच एका शाळेत ३-४ गणवेश होतील.
असे आतापर्यंत होते आहे का खरं? मग कल्पित अडचणी का सोडवत बसायच्या ? आतापर्यंत त्या मुली हिजाब वाप्रतच होत्या की.

In reply to by कॉमी

. माझ्या माहितीप्रमाणे काही लोकांच्या मताप्रमाणे हिजाब मुस्लिम धर्मानुसार बंधनकारक आहे, तर काहींच्या नाही. आस कस चालेल, लोकं स्वतः च्या सोयीनुसार कायद्याचा अर्थ काढतील. बऱ्याच इंग्रजी शाळेत मेहंदी, टीका किंवा गंध, कुंकू याला परवानगी नाही.

In reply to by कॉमी

कॉमी, आता मात्र तुम्ही विनाकारण काहीतरी विवाद करताहात, असे वाटू लागले आहे. म्हणजे, एखाद्या जागेतील, नियम एका गटाला तोडण्यासाठी परवानगी देतांना, इतर गटही उद्या तसली मागणी करतील, ह्या साध्या मुद्द्याकडे डोळेझाक करायची. मग जेव्हा ती नदी पार करण्याची वेळ येईल, तेव्हा त्याचा विचार करायचा!! कमॉन कॉमी, तुमच्याकडून इतक्या भुसभशीत भूमिकेची अपेक्षा नाही.

In reply to by प्रदीप

असा प्रॉब्लेम आत्तापर्यंत आलेला दिसत नाहीये. शिखांना पगडी आणि कृपाण ठेवताना सुद्धा असा विचार झाला नव्हता. तरी स्पष्टीकरण- अर्थात पुढे अशे मागणी कोणी केल्यास त्यांना सुद्धा परवानगी मिळावी.

In reply to by कॉमी

असा प्रॉब्लेम आत्तापर्यंत आलेला दिसत नाहीये.
नाही, ना! भारतांतील मुस्लिमही अशी मागणी करीत होते काय? हिंदू भगव्या शाली घालून शाळेत जात होते काय? पण आता हवा बदलली आहे. कारण ह्यामागे सरळसरळ षडयंत्र कार्यरत आहे. विनाकारण सामाजिक चिथावणी देण्याचे, आव्हाने देण्याचे काम अगदी प्लॅनिंग करून सुरू आहे. अलिकडेच गुरूग्राम येथे रस्त्यावर मुस्लिमांनी नमाज पढणे सुरू केले होते, तोही ह्याचाच एक भाग होता.
तरी स्पष्टीकरण- अर्थात पुढे अशे मागणी कोणी केल्यास त्यांना सुद्धा परवानगी मिळावी.
म्हणजे, तुम्हाला कसलाही गणवेश, कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी मान्य नाही, तर!! जाता जाता, कॉमी देशांत असली कौतुके अजिबात चालत नाहीत, हे तुम्हाला ठाऊक असेलच!

In reply to by प्रदीप

धार्मिक परिधान सुद्धा एकसारखी असावीत- असे असू शकते. हा हा प्रकार वापरायचा असल्यास तो असा असा असावा. चिथावणी देणे नक्की सुरु आहे. शाहरुख खान थुंकला म्हणे. कॉमी देशांमध्ये काय आहे ह्याच्याने मला काही फरक पडत नाही.

In reply to by कॉमी

शाहरुख खान थुंकला म्हणे.
ते मानणे हे अतिशय मूर्खपणाचे आहे, त्याने त्याच्या धर्मरीतिनुसार, फुंकर घातली. पण हे, काही टोकाच्या हिंदूत्ववाद्यांच्या प्रतिक्रियांना स्पष्ट शब्दांत सुनवणारे, मी अनेक हिंदूत्ववादीही पाहिले आहेत. त्यांच्या, कानौघडणी करणार्‍या पोस्ट्स वाचल्या आहेत. आणि हाच मोठा फरक त्यांच्यात, व तथाकथित पुरोगाम्यांत आहे.

In reply to by कॉमी

मुलींच्या शिक्षण घेण्याच्या निर्णयाचा आदर व्हावा हीच होती आणि आता सुद्धा मुलींच्या हिजाब वापरण्याच्या निर्णयाचा आदर व्हावा हीच हिजाब सक्ती म्हणजे पुररुषांचे वर्चस्व असे बरेच जण बोलतात हे "सत्य" ताटाखाली ठेव्याचे असेल तर ठेवा मग चालुद्या "स्वखुशीने हिजाब" वैगरे मलाला जर अश्या धार्मिक पुरुषी वर्चस्वाच्या आणि अन्यायाचं विरुद्ध आहे ( आणि त्यात शंका घ्यायला जागा नाही तिने त्यासाठी गोळी खाल्ली आहे ) तर मग तिला हे हिजाब आणि पुढे बुरख्याच्या संकल्पेन मागे दडलेले पुरुषी ( इस्लाम चा आधार घेत राबवलेले ) वर्चस्व दिसत नाही का? म्हणू विरोधाभास असे मी म्हणालो एवढेच

In reply to by चौकस२१२

तिला गोळी घालून ठार मारायचा प्रयत्न कोणी केला? तर पाकिस्तानातील धर्मांध आणि मूलतत्ववादी तत्वांनी. काश्मीरवर कबजा कोण मिळवू बघत आहे? तर तीच मूलतत्ववादी तत्वे. तरीही त्या तत्वांविरोधात काहीही न बोलता बरोबर ३७० कलम रद्द झाल्यानंतर तिला काश्मीरी स्त्रिया आणि लहान मुलांविषयी कळवळा वाटायला लागला होता हा योगायोग म्हणायचा का? असल्या व्यक्तीकडून कसली अपेक्षा ठेवायची?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ती सरतशेवटी पाकिस्तानी आहे. ती काशमीरबाबत भारताच्या बाजूने का बोलेल ? ती ऑर्डिनरी पाकड्यांसारखेच बोलणार ना. पण तुम्ही दिलेल्या ट्विट मध्ये ती पुष्कळच व्हेग आहे. न पटण्यासारखं काही लिहिलेलं नाहीये त्यात. तुम्ही ३७० चा काँटेक्स्ट सांगितला नसता तर चांगलंच लिहिलंय म्हणलो असतो मी.

In reply to by कॉमी

ती सरतशेवटी पाकिस्तानी आहे. ती काशमीरबाबत भारताच्या बाजूने का बोलेल ? ती ऑर्डिनरी पाकड्यांसारखेच बोलणार ना.
तोच तर प्रॉब्लेम असतो. पाकडे भारताविरोधात अगदी एकसुराने आणि एकदिलाने बोलतात आणि वागतात. पण भारतात मात्र अफजलगुरूसारख्याची 'पुण्यतिथी' साजरी करणार्‍या तुकडेतुकडे गँगला डोक्यावर घेणारे लोक असतात. असल्या लोकांना भारतात विचारवंत वगैरे म्हणतात. इतर देशात असल्या लोकांना ठार मारायला कमी केले जाणार नाही. एकेकाळी म्हणजे मनमोहनसिंगांच्या काळात अशा लोकांना सरकारी मानमरातबही मिळायचा. त्यांच्याविरोधात काही बोलले तर मग राष्ट्रवादाची झिंग चढली आहे वगैरे अजूनही बोलले जात असते.
तुम्ही ३७० चा काँटेक्स्ट सांगितला नसता तर चांगलंच लिहिलंय म्हणलो असतो मी.
८ ऑगस्ट २०१९ या तारखेला ते लिहिले आहे म्हणजे त्यातच आले की सगळे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चालू विषयाशी या सगळ्याचा काय संबंध समजलं नाही. का ऍड हॉमीनेम (मराठी प्रतिशब्द ?) करायचा होता ?

In reply to by कॉमी

नाही कसा? प्रत्येक गोष्टीत आम्ही आमचा देश आणि त्याचे हितसंबंध बघत असतो आणि तुमच्यासारख्यांना देश वगैरे असे काही असते हेच मान्य नसते. हा फरक आहे. कर्नाटकातल्या घटनेवर मलाला ही कठपुतली बोलली. त्यानंतर तिचा पूर्वेतिहास काय आहे आणि ती काश्मीरविषयी नक्की काय आणि कोणत्या संदर्भात बोलली आहे हे तपासून बघणे तुमच्यासारख्यांना गरजेचे वाटत नसेल पण मला वाटते. शेवटी आमच्यासाठी आमचा देश (माझ्यासारखेच वाटणार्‍यांसाठी- आपला देश) हा आमच्या अस्तित्वाशीच निगडीत आहे त्यामुळे त्याचा संबंध प्रत्येक ठिकाणी येणारच. जाऊ दे. तुमच्यासारख्यांना नाही कळणार.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ठीक, म्हणजे ऍड होमिनेमच आहे.
Typically this term refers to a rhetorical strategy where the speaker attacks the character, motive, or some other attribute of the person making an argument rather than attacking the substance of the argument itself.
मराठी- मांडलेल्या मुद्द्याऐवजी व्यक्ती, गुण, उद्देश इत्यादींवर हल्ला करणे.

In reply to by कॉमी

अश्या गोष्टी विस्कळीतच लिहायच्या असतात. अडचणीत आले की म्हणजे दुसरा अर्थ काढता येतो.
पण तुम्ही दिलेल्या ट्विट मध्ये ती पुष्कळच व्हेग आहे. न पटण्यासारखं काही लिहिलेलं नाहीये त्यात. तुम्ही ३७० चा काँटेक्स्ट सांगितला नसता तर चांगलंच लिहिलंय म्हणलो असतो मी.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

असल्या व्यक्तीकडून कसली अपेक्षा ठेवायची? दुटप्पि आणि ढोंगी पणा आणि मागे लपलेला कडवे पणा बाहेर आला

दक्षिण कोरियन ऑटोमोबाईल ह्युंदाई मोटर्सने त्यांच्या पाकिस्तानी कंपनीने तथाकथित 'काश्मीर सॉलिडॅरिटी डे' ला पाठिंबा दिल्याने वाद निर्माण झाला होता, त्यावर खेद व्यक्त केला आहे. तरीही परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी तडकाफडकी दक्षिण कोरियाच्या राजदूताला भेटीस बोलावले. कोरिया प्रजासत्ताकचे परराष्ट्र मंत्री चुंग युई-योंग यांच्याशी भेट घेतली आणि इतर द्विपक्षीय बाबींवर चर्चा करण्याबरोबरच या मुद्द्यावर भारताची नाराजी व्यक्त केली. श्री योंग यांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त केला.

In reply to by निनाद

हा प्रकार नुसत्या ह्युंडाईनेच नाही तर पिझ्झा हट, डॉमिनोज वगैरेंनी पण केला आहे. एकाच वेळेस अनेक कंपन्यांकडून हा प्रकार होणे यामागे काहीतरी प्लॅन असावा असे दिसते. या कंपन्या बहुराष्ट्रीय आहेत आणि त्यांचा पाकिस्तानातही व्यवसाय चालतो. अशावेळी पाकिस्तानातून काहीतरी खोडसाळपणा झालेला दिसतो. आपला भारतातील बिझनेस पाकिस्तानातील बिझनेसपेक्षा कित्येक पटींनी जास्त आहे तेव्हा भारतीयांना दुखावून चालणार नाही हे न समजण्याइतक्या त्या कंपन्या खुळ्या नसाव्यात. तरीही या प्रकाराची भारतात संतप्त प्रतिक्रिया उमटली हे चांगले झाले. तुमचा व्यवसाय वगैरे तुमच्या घरी. आमच्या देशाशी पंगा घ्यायचा नाही हे सामान्य लोकांनी उघडपणे सांगितले त्यामुळे या कंपन्यांना नाक घासत शरण यावे लागले. असा अ‍ॅटिट्यूड आपण दाखवायलाच हवा.कोणीही येऊन आपल्याला टपलीत मारून जातो आणि आपण ते ऐकून घेतो हा प्रकार यापुढे चालणार नाही हे जगाला समजलेच पाहिजे. आणि तसे केल्यास त्याची किंमतही मोजावी लागेल हे पण जगाला समजले पाहिजे. भारतातून ह्युंडाई गाड्यांच्या काही ऑर्डर रद्द झाल्या असेही वाचले. ते कितपत खरे आहे हे माहित नाही. पण असल्यास ते खूप चांगले. हा मनमोहनसिंगांचा भारत नाही तर मोदींचा भारत आहे हे जगाला समजले तरी खूप झाले. दुसरे म्हणजे सामान्य भारतीयांना आपल्या 'राष्ट्राविषयी' प्रेम आहे हे परत एकदा उघड झाले हे पण चांगले झाले. कारण गेल्या काही वर्षांपासून राष्ट्र म्हणजे ग्लोरिफाईड म्युनिसिपालटी वगैरे डावे विचारवंत लोक बोलत होते त्याला परत एकदा चपराक बसली हे चांगले झाले. परवा रागा पण लोकसभेत भारत हे राष्ट्र नाही वगैरे काहीतरी बरळला आणि पुरोगामी विचारजंतांनी त्याला डोक्यावरही घेतले. असल्या घाणेरड्या बांडगुळांना सामान्य भारतीय किंमत देत नाहीत हे पण जगापुढे आले हे पण चांगले झाले.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

भारत हे संघ राज्य च आहे .आणि भारत हे संघराज्य आहे म्हणून च त्यानी प्रगती केली आहे. भारत संघ राज्य आहे म्हणूनच देश एकत्र आहे. राहुल गांधी योग्य तेच बोलले आहे. विविध ,संस्कृती,भाषा असणाऱ्या ह्या देशात केंद्रीय सरकार नी त्यांची मत लादू नयेत. त्यांच्या वर केंद्रीय सरकार कोणतीच एक भाषा लादू नये. एक देश एक भाषा असली धोरण देशात अशांतता निर्माण करतील. राज्यांना जे हवं आहे तेच केंद्राने द्यावे त्यांच्यात लुडबुड करू नये. Bjp पक्ष म्हणून वेगळेच बोलत असतो. पंतप्रधान वेगळेच बोलत असतात. आणि आयटी सेल वाले भलतेच काही तरी बोलत असतात राजीव गांधी ना प्रतिउत्तर देताना आयटी सेल चे प्रमुख असेच बरळले. त्यांना हे पण माहीत नाही. भारतीय राज्य घटनेनं च भारत हे संघ राज्य.आहे अशी भारताची व्याख्या केली आहे. भारताच्या पारपत्र वर ते छापलेले असतेच.

In reply to by sunil kachure

एक देश एक भाषा असली धोरण देशात अशांतता निर्माण करतील. राज्यांना जे हवं आहे तेच केंद्राने द्यावे त्यांच्यात लुडबुड करू नये. झाली परत १८८ प्रभूंची आठवण

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. समाजवादी पक्षाने आझम खान यांना रामपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली असून त्यांनी निवडणूक प्रचारासाठी अंतरिम दिलासा मिळावा यासाठी २२ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. भूमाफिया समाजवादी नेते आझम खान यांच्यावर ८४हून अधिक खटले दाखल आहेत आणि दोन वर्षांपासून सीतापूर तुरुंगात आहेत!

बहुजनांची डोकी फिरवण्यासाठी भंपक राजकारणी राष्ट्रप्रेमाची गोळी खायला घालतात. ते बिचारे मग परदेशी पणत्या, इलेक्ट्रिक लायटिंग इत्यादी मालावर बहिष्कार घालतात. पिझ्झा खाणारे , परदेशी गाड्या वापरणारे खाऊनु पिऊन आपले राष्ट्रप्रेम चोख बजावतात. आतापर्यंत अमेरिकेने पाकिस्तानला आर्थिक आणि लष्करी मदत केली तेव्हा किती राष्ट्रप्रेमी भारतीय अमेरिकेतील नोकऱ्या सोडून भारतात परत आले?

In reply to by आग्या१९९०

अमेरिकेत भारतातील बहुजन नौकाऱ्या करत नाहीत का?

In reply to by आग्या१९९०

बहुजनांची डोकी फिरवण्यासाठी भंपक राजकारणी राष्ट्रप्रेमाची गोळी खायला घालतात या पेक्षा आपण जर " सर्व नागरिकांना .." असे म्हणले असते तर पटले असते एकेवळ अर्थात राष्ट्रप्रेमाची , इंडिया इस इंदिरा " असल्या गोळ्या बरेच वर्षे वाटाळ्या गेलया आहेत ,, त्यामुळे सवय असावी आतापर्यंत अमेरिकेने पाकिस्तानला आर्थिक आणि लष्करी मदत केली तेव्हा किती राष्ट्रप्रेमी भारतीय अमेरिकेतील नोकऱ्या सोडून भारतात परत आले? चांगला प्रश्न आहे त्याची उत्तरे देतो पटतील असे नाही पण बघा - अमेरिका हा एक स्वतंत्र देश आहे त्यामुळे तिथे राहणाऱ्या भारतीय वंशांचं लोकांना जर अमेरिकन सरकारचे पाकीस्तान संबंधी धोरण आवडले नाही तर त्यानं तेथील लोकशाही मार्गाने फक्त आपले मत मांडता येते... आणि त्यापुढे जाऊन जे काही तेथील लोकशाही सरकार ठरवेल हे एक नागरिक म्हणून मान्य करावे लागते ,, पाकिस्तान वर बहिष्कार फक्त वयक्तिक पातळीवर ते घालू शकतात . किंवा राजकीय डम असले तर लॉबी - अधिकृत निषेध वैगरे भारताचे सरकार करू शकते

In reply to by चौकस२१२

भारतातील लोकही लोकशाही पद्धतीने निषेध व्यक्त करू शकतात, झुंडशाही करायची काय गरज आहे? आपल्या देशात गोवा सोडल्यास खाण्याचे स्वातंत्र्य नाही, संशयावरून लोकं कायदा हातात घेतात आणि हत्या करण्यापर्यंत मजल जाते. अधिकृत निषेध वैगरे भारताचे सरकार करू शकते चीनचे नांव घ्यायची आपल्या पंतप्रधानांची हिंमत होत नाही.

In reply to by आग्या१९९०

ह्यांनी उघड भारता विरुद्ध भूमिका घेतली तरी .अमेरिका ,ब्रिटन मधील उत्तम राज्य व्यवस्था आणि सू संपन्न जीवन शैली चा उपभोग घेणारे देश प्रेमी भारतीय भारताची बाजू घेणार नाहीत ना ते तेथील ऐश आरमी जीवन सोडून . विरोध म्हणून ते अमेरिका ,ब्रिटन सोडून भारतात येतील. शून्य शक्यता. उपदेश फक्त बाकी लोकांसाठी असतो.

In reply to by sunil kachure

विरोध म्हणून ते अमेरिका ,ब्रिटन सोडून भारतात येतील. काय हो तुमच्य्या आयुष्यात तुम्ही राहत असलेलया देशात / राज्यात / गाव , जे सरकार आहे त्यांची एखादी भुमिका तुम्हाला आवडली नाही तर लगेच तो देश / राज्य / गाव लगेच सोडता का? किती "पटत नाहीये" याच्यावर हा निर्णय आहे आणि तांत्रिक दृष्ट्या जे थेतील नागरिक झालेत ( म्हणजे एन आर नाही तर पूर्ण परदेशी नागरिक ) त्यांना ( तांत्रिक दृष्ट्या) भारत काय किंवा इतर देश काय सारखेच असायला पाहिजेत , खाजगीत तुम्ही काय करायायचे ते करा अर्थात " हे परदेशात गेलेले भरतोय ना फक्त अप्पलपोटी स्वार्थी पैशायचंय च फक्त मागविले गुलाम अशी भावना " असेल तर तुमचे चालुद्या

अमेरिकेत भारतातील बहुजन नौकाऱ्या करत नाहीत का? अक्कल आली की सगळेच राष्ट्रप्रेम मायदेशात सोडून परदेशात जातात.

In reply to by आग्या१९९०

म्हणजे जे परदेशात जातात ते राष्ट्रप्रेमी नसतात तर?

'आपला धर्म घरातच ठेऊन बाहेर पडावे' असा सल्ला, हिंदुच्या सणावारांना व प्रथांबाबत देणारे तथाकथित फुरोगामी, कर्नाटकातील हुबळी हिजाब प्रकरणात मात्र मुग गिळून गप्प आहेत. वर या शांतीदूतांना हिजाब घालुनच शाळा-कॉलेजात यायची खाज असेल तर त्या सरळ मदरशात का जात नाहीत. 'पहले हिजाब बादमे किताब' असे म्हणणार्‍या या शांतीदूताना शिक्षणात किती रस आहे ते या घटनेवरुन दिसतच आहे.

हिजाब वादा मुळे देशाचा काही फायदा होईल काही ठाम निर्णय होतील ह्याची शून्य खात्री. हीजाब मुळे मुस्लिम स्त्रियांना मुस्लिम धर्म इज्जत देईल शून्य शक्यता. हिजब बंदी केली तर हिंदू ना काही फायदा होईल शून्य शक्यता. एक मात्र सत्य आहे . हिंदुत्व वादी,मुस्लिम वादी,पुरोगामी , डावे ह्या सर्व राजकीय पक्षांची मात्र ह्या प्रकरणात चंगळ आहे.. सर्वांची व्होट बँक मजबूत होईल भारत बुडाला तरी चालेल पण आमचा राजकीय फायदा झाला पाहिजे. हीच सर्व राजकीय पक्षांची धोरणे आहेत. मध्यम मार्ग स्वीकारून मीडिया ल बाहेर ठेवून. सर्व जण मिळून योग्य मार्ग काढू अशी भाषा एका पण राजकीय पक्षांची नाही. सामान्य लोकांनी ह्या राजकीय खेळत कोणाची डोकी फोडू नयेत. फक्त मजा बघावी.

हिजाब वरून जे त्या मुस्लिम मुली वर अन्याय होत आहे असे रडगाणे गात आहेत ह्या मधी देशातील आणि विदेशातील सर्व ढोंगी आहेत. मुस्लिम महिला बुरखा किंवा हिजाव स्व मर्जी नी वापरतात . हेच मुळात साफ खोटे आहे. त्यांच्या वर अनेक धार्मिक बंदन लादली आहेत. स्त्रिया ना मुस्लिम धर्मात किंमत नाही ना त्यांच्या मताला कोण विचारात. अन्याय होत आहे त्यांच्या धर्मात स्त्रियांवर. कोणताच ढोंगी, पुरोगामी,मुस्लिम वादी, ह्यावर एक शब्द बोलत नाहीत. स्त्री मुक्ती वाले हिंदू धर्माच्या स्त्रियांना त्यांचे मुक्ती चे दिव्य ज्ञान देत अस्तात. आणि आपल्या हिंदू स्त्रिया त्यांच्या पाठी आंधळ्या सारख्या धावत असतात मुस्लिम स्त्री ला स्त्री मुक्ती वाले त्यांचे मुक्ति चे दिव्य ज्ञान का देत नाहीत.

देशाची वाटचाल यादवी युध्दाकडे चालू आहे असे परखड मत लालू यादवने म्हटले आहे. https://maharashtratimes.com/india-news/karnataka-hijab-row-rjd-chief-l… या हलकटाने वर्षानुवर्षे बिहारची जितकी वाट लावायची तितकी लावली, पैसे खा खा खाल्ले, सत्तेचा दर्प आणि अहंकार जितका लालूत होता तितका क्वचितच इतर कोणा राज्यकर्त्यामध्ये बघायला मिळाला असेल. आणि असला माणूस अक्कल पाजळत आहे. थर्डक्लास गुड फॉर नथिंग मनुष्य.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मुळात काही लोकांची ईच्छाच आहे की देश यादवी युध्दाकडे जावा म्हणजे मोदींना दोष देऊन परत सत्तेत बसता येईल, ग्रेटा ला टूलकिट ह्यासाठीच तयार करून दिले असेल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

बिहार ची काळजी फक्त लालु नी करावी.देश याढवी युद्धात गेला तर . बिहारी नोकरी,शिक्षण, मजुरी करायला कुठे जातील. बिहार तर ना शिक्षण देवू शकतं, ना नोकऱ्या देवू शकत . ना रोजगार देवू शकत.

https://fortune.com/2022/02/04/india-elon-musk-modi-no-special-tax-brea…
ही अजुन एक मस्त बातमी. एलोन मस्क भारतात कार विकायला तयार आहे पण बनवणार मात्र चीन मधे; वरुन मला टॅक्स मधे सवलत द्या वगेरे वगेरे मागणी. हे सरकार अगदी मस्त काम करते आहे हा याचा पुरावा ... भारतात कार विकायची असेल तर इथेच बनवावी लागेल हे त्याला कळले आहे पण उगाच प्रेशर टॅक्टीस चालु आहे. बाकी ... मागे त्याने चिवचिवाट केला तेव्हा "आमच्या कडे या आमच्या कडे या" असे आपले बरेच राज्ये बोलत होती तेव्हा त्यांना हे माहीत नव्हते काय? मस्क फक्त दुकान चालु करायचे म्हणतो आहे कारखाना नाही हे त्यांना आमंत्रण देताना माहीत नव्हते काय?

भारताचे केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी इलॉन मस्कच्या अतार्किक मागण्या पूर्ण करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. कार बनवणाऱ्या कंपनीला भारतात कारचे उत्पादन सुरू होईपर्यंत कोणतीही सवलत मिळणार नाही , असे त्यांनी स्पष्ट केले . इलॉन मस्क यांना त्यांच्या चीनमध्ये बनवलेल्या कार विकण्यासाठी भारतीय बाजारपेठेचा वापर करायचा आहे. यात ही रोचक हे आहे की यासाठी प्रयत्न काँग्रेस चे सदस्य करत आहेत. लोकसभेत काँग्रेस सदस्य मोदी सरकारला विचारत आहेत की ते टेस्लाला त्यांच्या इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारपेठेत विकण्यासाठी मदत का करत नाहीत. भारतीय बाजारपेठेत टेस्ला स्वस्त करण्यासाठी काँग्रेसने भारत सरकारला खास टेस्लासाठी आयात शुल्क कमी करण्यास सांगितले आहे. यावर भारताचे केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी काँग्रेस आणि इलॉन मस्कच्या अतार्किक मागण्या पूर्ण करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. मोदी सरकारच्या काळात चीनमध्ये उत्पादन आणि भारतात विक्री करणे शक्य नाही असे स्पष्टपणे सांगितले आहे. मस्क ला चीनमध्ये फार जास्त रस आहे. एलोन मस्क यांनी चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनला ५० लाख युआन दिले आहेत. काँग्रेसला चीन मध्ये बनवलेल्या गाड्या भारतात विकण्यात इतका रस का असावा बरे? यात भारताचा काय फायदा त्यांना अपेक्षित असावा?

In reply to by निनाद

भारतात उत्पादन करा. पण कच्चा माल भारतातील च वापरा ही पण अट हवी. कच्चा माल पुरवण्याची जबाबदारी अडाणी अंबानी ह्यांना नसावी. लघु उद्योगांना ती जबाबदारी द्यावी चीन मध्ये उत्पादन करून भारत सरकार चे टॅक्स भरून टेस्ला भारतात विक्री करू शकते. भारत त्यांना रोखू शकत नाही.. जागतिक व्यापार करार तसा अधिकार देत नाही तरी रोखले तर युरोपियन राष्ट्र चढून बसतील. .मोदी सरकार ते करूच शकणार नाही. उत्पादन इथे नाही तर इथे विक्री नाही हा निर्णय भारत सरकार घेवूच शकत नाही. उगाच फेकाफेक करू नका

In reply to by sunil kachure

भारतात कारचे उत्पादन सुरू होईपर्यंत कोणतीही सवलत मिळणार नाही उत्पादन इथे नाही तर इथे विक्री नाही हा निर्णय भारत सरकार घेवूच शकत नाही. असे त्यांनी कुठे म्हटलेले आहे? उगाच फेकाफेक करू नका दुसऱ्यावर आरोप करण्यापूर्वी जरा नीट वाचत चला

In reply to by सुबोध खरे

खरे सर, धन्यवाद! भारतात कारचे उत्पादन सुरू होईपर्यंत कोणतीही सवलत मिळणार नाही , असे त्यांनी स्पष्ट केले. भारतात उत्पादनही करायचे नाही पण सवलत मात्र मिळवायची असे होऊ शकत नाही असा मुद्दा आहे. मी तो वर ठळक पण केला आहे. यात काही फेकाफेकी दिसत असेल तर त्याला माझा नाईलाज आहे. तुम्ही मंत्र्यांना याचा जाब विचारू शकता - किंवा तुमच्या वतीने तो जाब काँग्रेस ने आधीच विचारला आहे. आणि त्यालाच हे उत्तर दिले आहे. हे उत्तर त्यांनी फेकले असेल तर असेल ती फकाफकी! खरे सर, ही एगदी टिपिकल मुद्दा भरकटवण्याची पद्धती आहे. या आधी whataboutism वापरून झाले आहे. त्यात युक्तिवादाचे थेट खंडन किंवा खंडन न करता ढोंगीपणाचा आरोप करून प्रतिस्पर्ध्याची बदनामी करण्याचा प्रयत्न होतो किंवा भलताच मुद्दा काढला जातो. आता दुसरी पद्धत चालली आहे - पण याला काय म्हणतात ते माहित नाही. ते एक पुस्तक /हँडबुक होते ना डाव्यांचे की आंदोलने कशी करावीत आणि समोरच्याला नामोहरम कसे करावे यावरचे (त्याचे नाव आठवत नाहीये आत्ता मला) हे सगळे प्रकार त्यातलेच आहेत.

In reply to by निनाद

तुम्हाला नाही लिहिलं हो त्यांनी. तो मध्ये 188 प्रभूंचा प्रतिसाद दिसतोय का तुम्हाला? त्यांना लिहिलं आहे.

In reply to by sunil kachure

कच्चा माल पुरवण्याची जबाबदारी अडाणी अंबानी ह्यांना नसावी. लघु उद्योगांना ती जबाबदारी द्यावी
कोण ठरवत असत हो, कोण कुणाला काय माल द्यायचा ते ? सरकार ठरवते का हो ?

In reply to by कॉमी

त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत बसाल तर मूळ मुद्दा राहील बाजूला. पूर्वी "टेंडर काढलेले आहे, आताच अप्लाय करा, नंतर अंबानी अदानी ला मिळाले म्हणू नका" प्रकारचा एक विनोद होता. तोही आता जुना झाला.

हिजाब प्रकरणाला JNU, सोलापूर, बीड, कोलकता आणि पाकिस्तान मधूनही पाठिंबा मिळत आहे. कपडे न घातलेला जैन विद्यार्थी शाळेत चालेल का?

In reply to by रात्रीचे चांदणे

कपडे न घातलेला जैन विद्यार्थी शाळेत चालेल का?..... . काहीही. अगदी काईच्याकाई लॉजिक. एकतर जैना मध्ये फक्त दिगंबर संप्रदायाचे आणि ते ही दीक्षा घेतलेले साधू दिगंबर राहतात. तेही शिक्षणानंतर किंवा शिक्षणा ऐवजी साधुत्व स्विकारतात. ते काही दिगंबर राहण्याचा समस्त जैन धर्मीय सोडा दिगंबर जैन लोकांना पण उपदेश करत नाहीत. त्यामुळे कुणी जैन विद्यार्थ्याने सामाजिक जीवनात नग्नतेचा आग्रह धरण्यात मुद्दाच नाही. तसे होत ही नाही. धार्मिक प्रथेनुसार नग्नता तर हिंदू नागा साधू पण पाळतात. त्यांचा आधार घेऊन कुणी हिंदू वागेल का.. हिजाब, कृपान किंवा गंध वगैरे सर्वसामान्याच्या प्रथा किंवा सर्वसामान्य नागरिकांसाठी धार्मिक रीवाज आहेत. तो विषय वेगळा आहे.

In reply to by सुरिया

लॉजिक काईच्याकाई आहे हे मान्य आहे म्हणजे सध्यातरी नक्कीच आहे. पण मूळ मुद्दा आहे की शाळेमध्ये धार्मिक करणं देऊन एकाला सवलत दिली की दुसरापण सवलतिची मागणी करू शकतो. एखाद्याला शिक्षण घेत असतानाच साधुत्व घायची हुक्की आली तर काय करणार? आज हिजबला परवानगी दिली की उद्या हिंदू भगवी उपरणी घालून येतील तर जय भीमवाले निळी उपरणी घालतील.

In reply to by रात्रीचे चांदणे

मूळ मुद्दा दिगंबर पंथाच्या जैन मुलाने आपल्याला धार्मिक स्वातंत्र्यासाठी शालेत किंवा कॉलेजात विवस्त्र येण्याचा अधिकार असावा असे म्हटले तर काय हा आहे. त्याने रोज कपडे घातलेले असले तरी चालेल. बाहेर हिजाब घालायचा नाही पण केवळ धार्मिक स्वातंत्र्यासाठी हिजाब घालायचा हक्क पाहिजे. हा मुद्दा येथे थांबणार नाही. उद्या कॉलेजात नमाज पढण्यासाठी सुटी हवी किंवा नमाज पढण्यासाठी वेगळी खोली उपलब्ध करून द्यावी याची पण मागणी येऊ लागेल. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. घटनात्मक हक्क आणि मूलभूत हक्क यातील फरक समजून घ्या. मूलभूत हक्क हा कधीही डावलला जाऊ शकत नाही. पण घटनात्मक हक्काला मुरड घालता येऊ शकते. याला reasonable restriction म्हणतात.

In reply to by सुबोध खरे

मुख्य म्हणजे माझ्या पाल्याला शाळेत 3 वेळा भजन करायचा अधिकार पण मिळायला हवा. 180 डेसिबल च्या आवाजाने. आम्ही करतो.

कर्नाटक हिजाब विवाद हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असल्याचे समोर येते आहे. आंतरराष्ट्रीय टूलकिट बनवले गेले असल्याची शक्यता आहे. कारण फ्रेंच फुटबॉलपटू पॉल पोग्बाने भारतीय महाविद्यालयांमध्ये हिजाबला समर्थन देणारी पोस्ट शेअर केली आहे. मुस्लिम मुलींच्या मागणीला विरोध करणाऱ्या हिंदू विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. यात काही मुले मुस्लिम मुलींना हिजाब घालण्यासाठी त्रास देत असल्याचा दावा केला होता. पोग्बाने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर शेअर केलेला एक मिनिटाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर “इस्लाम इज माय दीन” या अतिरेकी इस्लामी पेजने पोस्ट केला होता. भारतीय लोकांच्या अस्तित्त्वात नसलेल्या समस्या वाढवण्यासाठी परदेशी घटकांचा वापर केला जातो आहे.

In reply to by निनाद

हे ठरवून केलेले काम आहे असे विजय पटेल यांनी दाखवून दिले आहे.