लतादीदींच्या जाण्याने एका स्वरयुगाचा अंत झाला.
आपण आज काहीच बोलू नये. बोलताच येत नाही, अशी ही अवस्था आहे.
भावपूर्ण आदरांजली.

वाचन संख्या
8220
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरोबर बोललात.
खरंच गेल्या ?
मेरी आवाज ही पहचान है
आपण आज काहीच बोलू नये.
भावपूर्ण श्रद्धांजली.
भावपुर्ण श्रद्धांजली !
बाकी आसवांनी सांडले
मेरी आवाज ही पहचान है.
In reply to बाकी आसवांनी सांडले by कर्नलतपस्वी
आठवणीत सदैव राहील.
भावपुर्ण श्रद्धांजली
काय बोलावे सुचत नाहीये
__/\__
भावपूर्ण सुरस्मरण _/\_
दीदींची इच्छा.
भावपूर्ण श्रद्धांजली
पळभर तुमचं- आमचं कार्य.
In reply to भावपूर्ण श्रद्धांजली by वामन देशमुख
न जाने क्यु....
आता विसाव्याचे क्षण..,.
खरोखर एक युग संपले. अगदी लहान
भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांची गाणी
अखेरचा हा तुला दंडवत सोडून
स्वरसमाधी
दिदी गेल्या...
एक हृद्य आठवण
काहीच बोलू नये असंच वाटतंय खरंतर याक्षणी...
भावपूर्ण श्रद्धांजली
स्वरसम्राज्ञी
भावपूर्ण श्रद्धांजली
- वंदे मातरम (वर्षः १९५२; चित्रपट: आनंदमठ)
- वंदे मातरम (वर्षः १९९८; भारतबाला प्रॉडक्शन्स म्युझिक अल्बम)
तसेच ग्रेस यांच्या 'भय इथले संपत नाही' या कवितेला आपल्या स्वरांनी लतादिदींनी ज्या प्रकारे गायलय त्याला तोड नाही. भारतीय संगीत ऐकणार्या जवळपास ७ ते ८ पिढ्या (एकोणिसाव्या सतकात जन्मलेले ते एकविसाव्या शतकात जन्मलेले) लतादिदींच्या स्वरांनी मंत्रमुग्ध होत राहिल्या अन यापुढेही होत राहतील. माझ्या ६ वर्षांच्या कन्येलाही लतादिदी व आशाबाई यांची गाणी ऐकताच गायिकेचं नाव ओळखता येतं याचं एक बाप म्हणून खूप समाधान वाटतं.लता दिदी सदोदित आपल्या सोबत
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर.
लता मंगेशकर, देशातल्या सर्वाधिक लोकप्रिय गायिका. लतादीदींचे निधन झालं आणि सर्व स्वर व्याकुळ झालेले आपण पाहिले. लता मंगेशकर आपल्या काना-मनात कायम राहतील. आज त्या आपल्यात नसल्या तरी त्यांनी गायलेली गाणी युगानेयुगे वाजत राहतील आणि लतामंगेशकर अजरामर राहतील यात काही वाद नाही. लता मंगेशकरांनी वयाच्या पाचव्या वर्षी आपलं गाणं गायला, शिकायला सुरुवात केली आणि आज तीसहजारांपेक्षा अधिक गाण्यांचा हिमालय, एक पट त्यांनी उभा केला.
लता मंगेशकर यांच्या संबंधी अनेक लेख, बातम्या आपण वाचल्या असतील. असंख्य घटना. प्रसंग, हे सर्व वाचावे आणि ऐकावे असेच वाटते. आपली आणि लता मंगेशकर यांची भेट झालेली नाही, पण त्या आपण सर्वांना आपल्या कुटुंबीयातल्याचा वाटल्या. आपले कोणी मिपाकर आणि त्यांची भेट झालीही असेल, कदाचित ते त्यांचा अनुभव लिहितीलही.
लता मंगेशकरांचा जन्म, २८ सप्टेंबर १९२९ ला मध्य प्रदेश इंदूर शहरात झाला. त्यांचे पाळण्यातले नाव हृदया. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लता मंगेशकर ही आपल्या आई-वडिलांचे सर्वात ज्येष्ठ अपत्य. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे. मंगेशकर कुटुंबीय मूळचे गोव्याचे. त्यांचे मूळ आडनाव नवाथे. सांगली येथे दीनानाथ मंगेशकर यांना मास्टर ही पदवी प्राप्त झाली. लतादिदी सांगलीतील सध्याच्या मारुती चौकातील दांडेकर मॉलच्या जवळील ११ नंबरच्या सरकारी शाळेत आपल्या लहान भावंडांसह शाळेत शिकायला जात असत. एक दिवस लहानगी आशा रडू लागली. तेव्हा एका शिक्षकांनी छोट्या लताला खूप रागावले. तेव्हापासून लतादीदीचे शाळेत जाणे बंद झाले. तेव्हा एक शिक्षक घरी येऊन त्यांना शिकवत असे. नंतर काही काळाने मंगेशकर कुटुंबाने सांगली शहर सोडले.
इ.स. १९४२ मध्ये लता मंगेशकर अवघ्या १३ वर्षांची होत्या तेव्हा वडील हृदयविकाराने निवर्तले. तेव्हा मंगेशकरांचे एक आप्त तसेच नवयुग चित्रपट कंपनीचे मालक - मास्टर विनायक ह्यांनी लताच्या परिवाराची काळजी घेतली. त्यांनी लताबाईंना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाचा प्रारंभ करून दिला. लता मंगेशकर यांच्या 'नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी' हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या किती हसाल (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटासाठी गायले, पण हे गाणे चित्रपटातून वगळले गेले. मराठी गाण्यापासूनच दिदींच्या करिअरला सुरुवात झाली. मास्टर विनायकांनी लताबाईंना नवयुगच्या पहिली मंगळागौर (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका दिली. ह्या चित्रपटात त्यांनी नटली चैत्राची नवलाई हे दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेले गीत गायले.
मास्टर विनायक यांच्याबरोबर मंगेशकर कुटुंबीयही मुंबईला आले. लता दीदींचं अर्धवट राहिलेलं संगीताचं शिक्षण इथे पुढे सुरू ठेवण्याची संधी त्यांना मिळाली.उस्ताद अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) यांच्याकडून त्यांनी हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली. इथेच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. वसंत जोगळेकरांच्याच १९४६ सालच्या ‘आप की सेवा में’ या हिंदी चित्रपटात संगीतकार दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘पा लागू कर जोरी’ हे पहिले गीत दीदींनी गायले. 'बडी मा' मधे लता मंगेशकर याच काळात एक भजनही त्यांनी गायलं. (माता तेरे चरणो मे) एकीकडे चित्रपटात गाणी म्हणता म्हणता दीदींनी आपलं संगीताचं शिक्षण चालूच ठेवलं होतं. उस्ताद अमानत खाँ (देवासवाले) आणि पंडित तुलसीदास शर्मा यांच्याकडून दीदींना नंतरची तालीम घेतली. त्यानंतर त्यांच्या प्रत्येक गाण्याला श्रोत्यांनी प्रचंड डोक्यावर घेतले.
इ.स. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अलीखाँ भेंडीबाजारवाले यांनी नवनिर्मित पाकिस्तानला देशांतर केले, तेव्हा लतादीदी अमानत खाँ (देवासवाले) यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या. उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मांकडूनही लताबाईंना तालीम मिळाली. इ.स. १९४८ मध्ये मास्टर विनायकांच्या मृत्यूनंतर संगीतकार गुलाम हैदरांनी लताबाईंना मार्गदर्शन केले. त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये नूरजहाँ, शमशाद बेगम आणि जोहराबाई (अंबालेवाली), ह्यांसारख्या अनुनासिक आणि जड आवाज असलेल्या गायिका जास्त लोकप्रिय होत्या. सुरूवातीला लता मंगेशकर आपल्या गाण्यात तेव्हाच्या लोकप्रिय असलेल्या नूरजहाँचे अनुकरण करीत असे, पण नंतर लता मंगेशकर यांनी स्वतःच्या गाण्याची एक आगळी शैली बनवली. त्या काळात हिंदी चित्रपटांतल्या गाण्यांचे गीतकार प्रामुख्याने मुस्लिम कवी असत, त्यामुळे गाण्यांच्या भावकाव्यात भरपूर उर्दू शब्द असत. ते शिकून घेण्यासाठी लता मंगेशकर यांनी शफ़ी नावाच्या मौलवींकडून उर्दू उच्चारांचे धडे घेतले.
लोकप्रिय चित्रपट महल(इ.स. १९४९) चे आयेगा आनेवाला आयेगा हे गाणे लताच्या कारकीर्दीला एक महत्त्वाचे वळण देणारे ठरले. (गाण्याचे संगीतकार खेमचंद प्रकाश होते, तर चित्रपटात गाणे अभिनेत्री मधुबालाने म्हटले होते.)
वर्ष १९५० च्या दशकात, लता मंगेशकर यांनी अनिल विश्वास, शंकर-जयकिशन, नौशाद, सचिनदेव बर्मन, सी. रामचंद्र, हेमंत कुमार, सलिल चौधरी, खय्याम, रवी, सज्जाद हुसेन, रोशन, मदन मोहन, कल्याणजी आनंदजी, मास्टर कृष्णराव, वसंत देसाई, सुधीर फडके, हंसराज बहल आणि उषा खन्ना या संगीत दिग्दर्शकांनी स्वरबद्ध केलेली गाणी गायली. पुढे बैजू बावरा (१९५२ ) मुगल ए आजम ( १९६० ) श्री ४२० (१९५५) चोरी चोरी आणि मधुमती (इ.स. १९५८) यातलं ’आजा रे, परदेशी हे गाणं तर आजही तितकेच लोकप्रिय आहे. "सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका" म्हणून इथे त्या नावलौकिकास आल्या आणि पुढे हजारो पुरस्कार आणि गौरव त्यांना मिळत गेले. आणि हा प्रवास पुढे ’भारतरत्न (२००१) अव्याहतपणे सुरु राहीला.
१९७० पासून पुढे तर त्यांच्या गाण्यांची नुसती धुम होती. या दशकाच्या सुरूवातीस, त्यांनी इतर गैर-फिल्मी अल्बम रिलीज केले, जसे की त्यांचा गालिब गझलांचा संग्रह, मराठी लोकगीतांचा अल्बम (कोळी-गीते), गणेश आरतींचा अल्बम (सर्व त्यांचा भाऊ हृदयनाथ यांनी रचलेले) आणि एक अल्बम श्रीनिवास खळे यांनी रचलेले संत तुकारामांचे "अभंग". आणि पुढे पाकिजा चित्रपटातील गीताच्या. ”चलते चलते यूही कोई मिल गया था” ”इन्ही लोगोने इन्ही लोगो ने” ही आणि इतर कमाल गाणी ठरली. आवाजात गोडवा आणि गाण्यांनी लतागाण्यांना बहर आलेला होता.
मग पुढे आपण येतो वर्ष १९८० मध्ये, सिलसिला ( १९८१ ) फ़ासले, विजय, चांदनी ( १९८९) यातली गाणी तर सुपर डुपर हीट ठरली. प्रेम रोग, प्यार झुकता नही, राम तेरी गंगा मैली, राम लखन, संजोग. नगीना, आणि पुढे तर कितीतरी चित्रपट गाणी...रुदाली (1993) मधील "दिल हम हूम करे" हे भुपेन हजारी यांच्याबरोबर गायललें हे एक आठवणीतलं उत्तम गाणं. मला कायम आवडतं. असा हा गाण्यांचा प्रवास अगदी...30 मार्च 2019 पर्यंत लतादिदीनी भारतीय सैन्य आणि राष्ट्राला श्रद्धांजली म्हणून मयुरेश पै यांनी संगीतबद्ध केलेले "सौगंध मुझे इस मिट्टी की" हे गाणे रिलीज केले इथपर्यंतचा प्रवास संघर्षाचा, गोड आवाजाचा आणि अद्भुत, चमत्काराचा असा हा मोठा प्रवास.
आपण लिहून थकून जाऊ इतकी गाणी. लता मंगेशकर यांची हीट गाणी सर्च केलं की कितीतरी गाणी आपल्या पुढ्यात येतात. सहगायंकांबरोबरची कितीतरी मराठी, हिंदी, आसामी इतर भाषांतील असंख्य गाणी.'स्वरसम्राज्ञी' लता मंगेशकर यांनी जवळजवळ वीस भाषांमध्ये तीस हजारांपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. हे लेखन आणि माहिती कायम अपूर्णच राहील.
काही दिवसांपूर्वी पळसखेडा इथे पद्मश्री ना.धो. महानोर यांच्या भेटीस गेलो होतो, तेव्हा त्यांनी लता मंगेशकरांची आठवण सांगितली होती. लता मंगेशकर भेटीस तिथे आल्या होत्या तेव्हा तेथील गोड अशा सीताफळांना ना.धो.महानोर यांनी 'लताफळ' असे नाव दिले. अशा लता मंगेशकरांच्या लतायुगात आपण जन्मलो, गाणी ऐकत लहानाचे मोठे झालो. सुख दुःखात आपणास या गीतांनी कायम साथ दिली पुढेही देत राहतील.
लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. पसायदान. माहिती संकलन : मराठी विकी, मटा, लोकसत्ता. सौजन्याने. आभार. -दिलीप बिरुटे
मत