सत्य आहे पण नावे आणि काही स्थळे बदलली आहेत.
रिना वय २७ आमच्या ओळखीच्या व्यक्तीच्या ड्रायव्हरची मुलगी. परंपरागत व्यवसाय मासेमारी पण हिच्या वडिलांनी तो सोडून गाडी चालवणे आणि सुतारकाम सुरु केले. साधे कौलारू घर, मातीच्या भिंती. पर्वरीच्या बाहेर ग्रामीण भागांत नारळांची छोटीशी बाग आणि त्याच्या मागे हे घर. आई एका सहकारी बँकेत प्युन सदृश्य नोकरीवर. तसे कुटुंब गरीब असले तरी अतिशय सभ्य आणि कुणाच्या अध्यात ना मध्यात. रीना १२ पास. काय काम करते तर एका हॉटेलांत रिस्पेशनिस्ट म्हणून आहे असे वडिलांनी सांगितले. ज्या परिसरांत होती तिथे मला पार्टी साठी जागा हवी होती. त्यावेळी हि साधारण २३ वर्षांची असेल. अचाट लोकेशन, मस्त लोक आणि अत्यंत जबरदस्त तयारी हिने फक्त फोन करून केली. मला खूपच आश्चर्य. मी थोडी मैत्री वाढवली. इंस्टावर हि होती. साधे सोज्वळ फोटो. गणेश चतुर्थी, नारळांची बाग, आजचे मासे इत्यादी. मनगटावर एक टॅटू. पण काही हजार फॉलोवर्स. बहुतेक मंडळी रोडछाप रोमिओ, कॉलेज कुमार इत्यादी. प्रत्येक पोस्ट ला ५०-६० लाईक्स.
फक्त एक दिवस एका फॅन्सी रेस्टोरंटचा फोटो. हे रेस्टोरंट ताज मधील रेस्टोरंट होते हे मी डेकोर वरून तात्काळ ओळखले. आता लोक खोटे फोटो आपले म्हणून टाकतात पण हिच्या फोटोंत तिचा टॅटू वाला हात स्पष्ट दिसत होता. काही वेळांतच फोटो डिलीट झाला. मग मी हिचे इतर मित्र पहिले त्यातील काहींना तात्काळ ओळखले. ह्यांचे नाईट क्लब्स गोव्यांत होते. मग जास्त शोधून हिचा दुसरा इन्स्टा सापडला. मी थेट कॉल केला. आधी तिने उडवाउडावीची उत्तरे दिली पण मी जजमेंटल नाही म्हटल्यावर सर्व कथा समोर आली. हिचा दुसरा इन्स्ता अकाऊंट सुद्धा तिने मला दिला.
थोडक्यांत हि कथा समोर आली. एखादी सध्या गरीब मध्यमवर्गीय घरांतील मुलीला इन्स्ता वर हेरले जाते. दिसायला सुंदर असली थोडी आत्मविश्वास दाखवणारी असली तर मग तिला फोन येतो "मी श्रिया, अमुक PR मार्केटिंग तर्फे. आपण आपल्या भागांतील लोकल इन्स्ता सेलेब्रिटी आहात आपण स्पॉन्सर वाले फोटो टाकाल काय ?" मुलगी खुश होते आणि हो म्हणते. काही फोटो टाकायला ५०००, १०,००० अशी रक्कम घरबसल्या मिळते. मग हीच श्रिया तिला अमुक रेस्टोरंट मध्ये ट्रेनिंग साठी बोलावते. तिथे अतिशय सुंदर मुले मुली असतात. मस्त पैकी फुकट छान जेवण आणि मेकअप इत्यादी शिकवलं जातो. काही दिवसांत हि मंडळी मित्र होतात. मग नाईट क्लब मध्ये तोकड्या कपड्यांत ह्यांना आमंत्रण मिळते आणि तिथे फक्त राहायचे पैसे मिळतात. तिथे नेटवर्किंग होऊन आणखीन कामे मिळतात. ह्यांत VIP लोकांच्या लग्नात होस्टेस ते ट्रेड शो मध्ये होस्टिंग अख्या विविध प्रकारच्या कामाची संधी मिळते.
मला ऐकताना मजा आली. शेवटी हे प्रकरण वेश्याव्यवसायाकडे येऊन थांबले असेल असे वाटले पण नाही. तिने ओळख करून दिलेल्या नाईट क्लब मालकाने मला आणखीन माहिती दिली. वेश्या प्रकरणात रिस्क जास्त आणि पैसे कमी आहेत असे त्याने सांगितले. ह्या धंद्यात सर्वांत जास्त फायदा प्रोटेक्ट करणाऱ्या माणसाला होतो, काम करणाऱ्या मुलीला नाही. बहुतांशी लोकल आमदार वगैरे मंडळी ह्या असल्या धंद्यात असतात आणि त्यांच्या नादाला शहाण्या माणसाने लागू नाही असे त्याचे मत होते. तरी सुद्धा काही मुली काही श्रीमंत लोकांना आवडू शकतात. पण तिथे काय होते ह्यांत ह्याला रस नव्हता. (casual sex भरपूर प्रमाणात चालते पण त्याची माहिती ह्या फोरम वर नको). ड्रग्स सुद्धा भरपूर प्रमाणात चालते. रिना ने गोव्यांत मला भरपूर गांजा उपलब्ध करून दिला होता तसेच हशिश वाले हुक्का बारची ओळख करून दिली होती (इथे ठराविक लोकांनाच प्रवेश मिळतो) , तिने स्वतः esctasy वगैरे ट्राय केले होते पण कोकेन आणि हिरोईन टाळले होते. तिच्या काही मैत्रिणींची हालत पाहून तिने हा निर्णय घेतला होता.
बऱ्याच गोष्टी मी रिना कडून नंतर ऐकल्या. काही कार शो साठी ती दुबईला जाऊन आली होती. तिथे एका व्यक्तीने तिला OnlyFans वर काम करण्याची ऑफर दिली होती पण तिने घेतली नाही. काही काळ एका एजंट च्या मदतीने तिने लाईव स्ट्रीम्स करून पैसे कमावण्याचा विचार केला होता पण त्यातील लोक अत्यंत बे भरवशाचे होते आणि पैसे मिळत नव्हते म्हणून तिने सोडून दिले. (ह्यांत काही व्यक्ती मुलीला फक्त व्हिडीओ कॉल करून बोलायला पैसे देतात. ह्यांत मग विविध मागण्या आणि त्यासाठी जास्त पैसे ऑफर केले जातात. नक्की प्लॅटफॉर्म काय आहे ठाऊक नाही. )
एका मुंबईच्या व्यक्तीने तिला धोका दिला. तिला वेब्सिरीज शूट करू असे सांगितले. पहिला एपिसोड पायलट आहे आणि सर्वानी फ्री मध्ये काम करायचे. मग हा पायलट विविध लोकांना दाखवून पैसे उभारायचे असे सांगितले. शूटिंग लोणावळा मध्ये होते. कुठल्याच सिन मध्ये १००% नग्नता नसेल असे सांगितले होते आणि जास्तीत जास्त बॅकलेस सिन असेल असे सांगितले होते. पण प्रत्यक्षांत शूटिंग थोडे जास्तच घाणेरडे करण्याच्या डिरेक्टर चा प्रयत्न होता. तिने विरोध केला तर तिला शिव्या देण्यात आल्या आणि जबरदस्ती करण्यात आली. पण तिने त्यांना जुमानले नाही.
मेकअप विषयावर तिला सध्या बरीच गती असल्याने तिला विविध VIP लग्नात मेकअप आर्टिस्ट म्हणून मागणी होती त्यानिमित्ताने गोव्यांत तसेच अनेक काँट्रॅक्स मिळाली. रिना ला टॅटू चे भयंकर प्रेम आहे. मला वाटले फक्त हातावरच असेल पण आज पर्यंत तिने एकूण ३० टॅटू काढले आहेत, नितम्ब पासून पोटापर्यंत अनेक ठिकाणी. प्रत्येक टॅटू काही ना काही कारणास्तव. कोविड झाला तर त्याची आठवण म्हणून एक टॅटू इत्यादी. तिच्या पालकांनी बराच विरोध केला होता म्हणे. काही टॅटू त्यांना ठाऊक सुद्धा नाहीत. सध्या ती TIKTOK आणि इंस्टाग्राम वर स्टार आहे. तिच्या छुप्या ID ला हजारो फॉलोवर्स असून विविध ठिकाणाची जाहिरात करण्यासाठी तिला हजारो रुपये मिळतात.
ह्या सर्व कामाचे दुष्परिमाण तिच्या मते म्हणजे दोन जिवने जगणे. लोक आपल्याला एस्कॉर्ट/वेश्या समजतील हि भीती आणि काही लोकांनी जबरदस्ती करण्याचा केलेला प्रयत्न.
इथे मी काहीही व्हॅल्यू जजमेंट करत नाही. किस्सा मनोरंजक वाटलं म्हणून लिहिला.
वाचने
27136
प्रतिक्रिया
71
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्या सर्व कामाचे दुष्परिमाण
निर्लज्जम सदा सुखी. तुम्हाला
In reply to ह्या सर्व कामाचे दुष्परिमाण by रावसाहेब चिंगभूतकर
तसं असतंच असं नाही. माणूस हा
In reply to निर्लज्जम सदा सुखी. तुम्हाला by ॲबसेंट माइंडेड…
बरेच प्रोफेशन
कष्ट विकणे,स्किल विकणे,बुद्धी विकणे ,हे समजू शकतो पण शरीर विकणे
In reply to बरेच प्रोफेशन by sunil kachure
Straight from horses mouth
In reply to बरेच प्रोफेशन by sunil kachure
भारी आहे हा व्हिडिओ !
In reply to Straight from horses mouth by कॉमी
'मोबईल + ड्र्ग्स + माणुस' ही
ऐकावे ते नवलच.
पैसे इन्स्ता देत नाही. पैसे
In reply to ऐकावे ते नवलच. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
अरेबिअन नाईट्स
जबरी
खतरनाक किस्स्सा !
उत्तम लेख.
सध्या तरी आईवडिलांना काही तरी
In reply to उत्तम लेख. by Trump
असेच असेल.
In reply to सध्या तरी आईवडिलांना काही तरी by साहना
बरेच बॉयफ्रेंड आहेत. त्यामुळे
In reply to असेच असेल. by Trump
खोल विचार केला तर
जास्त विचार केले की असे त्रास
In reply to खोल विचार केला तर by sunil kachure
सामान्य ते असामान्य
पाश्चिमात्यकरण पाश्चिमात्यकरण
> पाश्चिमात्यकरण
In reply to पाश्चिमात्यकरण पाश्चिमात्यकरण by सुरसंगम
तोच प्रश्न मलाही पडतो.
In reply to > पाश्चिमात्यकरण by साहना
तुमचा हा पाराग्राफ ढापुन
In reply to > पाश्चिमात्यकरण by साहना
बिनधास्त . फक्त
In reply to तुमचा हा पाराग्राफ ढापुन by रावसाहेब चिंगभूतकर
वाह!
In reply to > पाश्चिमात्यकरण by साहना
जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
In reply to वाह! by निनाद
फिलीपाईन्स हा पण कॅथोलिक आहे.
In reply to वाह! by निनाद
हा प्रतिसाद निव्वळ अप्रतिम
In reply to > पाश्चिमात्यकरण by साहना
अगदी अगदी.
In reply to हा प्रतिसाद निव्वळ अप्रतिम by प्रसाद गोडबोले
त्याला करणे आहेत
रियल टच व स्पंदिक
"दूरस्थ उत्तेजना" सारखे शब्द
In reply to रियल टच व स्पंदिक by गामा पैलवान
रोचक
In reply to "दूरस्थ उत्तेजना" सारखे शब्द by साहना
OnlyFans चा मुकाअ
In reply to "दूरस्थ उत्तेजना" सारखे शब्द by साहना
शेवटी काय लैगिक चाळे आणि
In reply to "दूरस्थ उत्तेजना" सारखे शब्द by साहना
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Simplicity is the ultimate sophistication.” :- Leonardo da Vinci.इतर प्राणी 'हस्त'मैथुन करतात
In reply to शेवटी काय लैगिक चाळे आणि by मदनबाण
मात्र कुत्रे हंपिंग सर्रास
In reply to इतर प्राणी 'हस्त'मैथुन करतात by कॉमी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Simplicity is the ultimate sophistication.” :- Leonardo da Vinci.फेसबुक म्हणजे मेटा च्या
In reply to शेवटी काय लैगिक चाळे आणि by मदनबाण
> हस्त मैथुन करणारा या
In reply to शेवटी काय लैगिक चाळे आणि by मदनबाण
खुप नवीन माहीती. धन्यवाद.
In reply to > हस्त मैथुन करणारा या by साहना
पुस्तक खरोखरच मनोरंजक आहे आणि
In reply to खुप नवीन माहीती. धन्यवाद. by Trump
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोहब्बत सरेआम नही बस एहसास होना चाहिए, हम उन्हे चाहते हैं ये पता सिर्फ उन्हें होना चाहिए।डॉल्फिन माहीती.
In reply to > हस्त मैथुन करणारा या by साहना
धन्यवाद.
In reply to "दूरस्थ उत्तेजना" सारखे शब्द by साहना
वटी काय लैगिक चाळे आणि लैगिक दृष्ट्या विचलित
लैंगिक दृष्ट्या विचलित
__/\__
आम्हास पॉर्न वगैरेचा नीट
In reply to __/\__ by गवि
प्रतिमा खळळकन भंगली का मनातली
In reply to आम्हास पॉर्न वगैरेचा नीट by प्रचेतस
प्रतिमा खळळकन भंगली का मनातली
In reply to प्रतिमा खळळकन भंगली का मनातली by गवि
काळ हे सर्व दु:खांवर औशध आहे.
In reply to प्रतिमा खळळकन भंगली का मनातली by प्रचेतस
:D
In reply to काळ हे सर्व दु:खांवर औशध आहे. by गवि
काळ हे सर्व दु:खांवर औशध आहे.
In reply to काळ हे सर्व दु:खांवर औशध आहे. by गवि
# जप हो प्रचु.
In reply to प्रतिमा खळळकन भंगली का मनातली by गवि
मोठे उद्योग सहभागी आहेत
तुम्ही नक्की काय लिहिताय ते
In reply to मोठे उद्योग सहभागी आहेत by sunil kachure
स्त्री आणि मुक्ती ....
In reply to तुम्ही नक्की काय लिहिताय ते by रावसाहेब चिंगभूतकर
तेच म्हणत होतो हा कोचरे नको
> गिरिश कर्नाड यांच कुठला
In reply to तेच म्हणत होतो हा कोचरे नको by सुरसंगम
Vaiytik टीका
In reply to तेच म्हणत होतो हा कोचरे नको by सुरसंगम
हे ओनलाईन वाचायला मिळेल काय?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Simplicity is the ultimate sophistication.” :- Leonardo da Vinci.सर्व प्रतीसादकांचे(एक सोडून).....
लेख आणि प्रतिसाद, आवडले
अँटी-नॉच मूव्हमेंट
नेहमी प्रमाणे माहीतीपुर्ण
रोचक धागा आणि माहितीपुर्ण
एक सहज तुलना
कोणत्या ही व्यक्ती च वागणं
रिनाचे हळु हळु काक्ष होते ते
संभोगशिक्षण व उपचार(therapy) आणि रोजगार संधी