आणखी एक किस्सा
लेखनप्रकार
आणखी एक किस्सा
काल माझ्याकडे एक सद्गृहस्थ आले होते. वय वर्षे ४३ हे एका प्रथितयश आय टी कंपनीत सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये काम करत असतात. त्यांना आम्लपित्त होत होतं त्यासाठी.
व्यायाम शून्य, एका जागी बसून सकाळी ९ ते रात्री ९ काम, वेळी अवेळी जेवण, मसालेदार तेलकट जेवण रोजचंच.
(आय टी मध्ये भरपूर पगार मिळणाऱ्या टिपिकल माणसाची कथा)
सोनोग्राफी केली. बाहेर खाल्ल्यामुळे पोट बिघडून आतड्याला सूज आलेली होती.
आणि यकृतात चरबी ठासुन भरलेली दिसत होती.
मी त्यांना विचारलं, वजन किती आहे? त्यावर ते म्हणाले ९८ किलो.
त्यांची उंची ५ फूट ७ इंच आहे. त्यांना विचारलं घरी कुणाला मधुमेह आहे का?
त्यावर ते म्हणाले वडिलांना होता.
होता?
हो, वडील हृदयविकाराने गेले. ५७ व्या वर्षी
मी त्यांना म्हटले कि मधुमेह अनुवांशिक आहे. तुमचे वय ४३ आहे या वयाला तुमचे वजन ६८ किलो हवे, त्या ऐवजी ९८ किलो आहे म्हणजेच ३० किलो जास्त आहे. याचा अर्थ ४५ % जास्त आहे.
एक गोष्ट सांगतोय. तुमच्याकडे ट्रक आहे ज्याची क्षमता १० टन आहे त्यात रोज जर १४.५ टन वजन भरले तर काय होईल? इंजिन वर ताण येईल, सस्पेन्शन खराब होईल आणि टायर लवकर झिजतील.
हीच स्थिती तुमच्या शरीराची आहे. तुमच्या हृदयावर, पाठीच्या कण्यावर ताण पडतो आणि गुढघे लवकर खराब होतात.
येथे ट्रक आणि शरीर यातील साम्य संपते. कारण संध्याकाळी ट्रकची चावी बंद करून तुम्ही इंजिन बंद करू शकता.
परंतू तुम्ही चालत आहात, येथे आडवे पडले आहात, झोपला आहात तरी प्रत्येक क्षणी तुमच्या हृदयावर ४५ % अधिक दबाव पडतो आहे.
त्यात तुमच्या वडिलांना हृदयविकार होता त्यांना मधुमेह आहे याचा अर्थ तुम्हाला जी गुणसूत्रे मिळाली आहेत त्यात तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता नक्कीच जास्त आहे.
त्यावर त्यांची पत्नी म्हणाली कि अहो यांचे मोठे भाऊ आहेत त्यांची वयाच्या ४५व्य वर्षी ( दोन वर्षापूर्वीच) अँजियोप्लास्टी झाली आहे.
मी त्यांना स्पष्ट शब्दात म्हणालो कि तुम्ही टाइम बॉम्ब वर बसला आहात. वेळेत यावर उपाय आणि उपचार करा.
मी तुम्हाला भाषण देतो आहे त्यात माझा पाच पैशाचा फायदा नाही. पण हे भाषण हृदयविकार झाल्यावर तुम्हाला देण्यात काय हशील आहे?
हे केवळ एशियन हार्ट इन्स्टिट्यूट मध्ये २ वर्षे विभाग प्रमुख म्हणून काम करताना ३००० बायपास आणि जवळ जवळ ८००० अँजियोप्लास्टीचे रुग्ण पहिले आहेत त्या अनुभवावरून सांगतो आहे.
पुढच्या पाच वर्षात तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता १० % असेल पण तुम्ही त्या १० टक्क्यात आहात कि उरलेल्या ९० टक्क्यात आहात हे तुमच्या ज्योतिषाला विचारून घ्या.
१२५ किलोची माणसे सिगरेट पितात दारू पितात मधुमेह असतो तरी ९० वर्षापर्यंत जगतात.
एक उदाहरण देतो आहे.-- तुमच्या घरात २ माणसे आहेत आणि घराचा पाण्याचा पाईप १/२ (अर्ध्या) इंचाचा आहे तुम्हाला पाणी पुरतंय.
हेच घरी ४ माणसं आली तर पाणी कमी पडतं.
याउलट तुमच्या घराचा पाण्याचा पाईप मुळात १ इंचाचा असेल तर चार काय सहा माणसाने आली तरी पाणी कमी पडणार नाही.
हीच स्थिती तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांची आहे.
तुमच्या रक्तवाहिन्या अनुवांशिकतेमुळे मुळातच अरुंद आहेत त्यामुळे तुमची हृदयविकार येण्याची शक्यता इतर माणसांपेक्षा कितीतरी जास्त आहे. त्यात तुमचं जसं वय वाढेल तशा रक्तवाहिन्या अधिकच कठीण होत जातील आणि हृदयाचा रक्त पुरवठा कमी होईल.
तुम्ही माझ्याकडे आलात ते पोट बिघडलं म्हणून त्यावर तुमचे फॅमिली डॉक्टर औषध देतील च. त्याचा मी सांगतो आहे त्याच्याशी तसा संबंध नाही
पण मी सांगतो आहे ते जास्त गंभीरपणे घ्या म्हणून त्यांना कळकळीने सांगितले.
त्या सद्गृहस्थानी आणि पत्नीने सिन्सिअरली आम्ही आतापर्यंत या गोष्टी हसण्यावारी नेत होतो.
पण आता नक्की गंभीरपणे उपाय आणि उपचार करु आणि लाईफ स्टाईलच बदलू म्हणून सांगितले आणि रजा घेतली
वाचने
10768
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
मोलाचा सल्ला
उत्तम सल्ला..
पण
In reply to पण by निनाद
५० पण खूप झालं
In reply to ५० पण खूप झालं by कासव
५० पण खूप झालं
५० लाच राम म्हणावे लागले तर
In reply to ५० लाच राम म्हणावे लागले तर by सुबोध खरे
नक्की माहित नाही पण जेष्ठ
प्रत्यक्षात लाइफ स्टाइल
In reply to प्रत्यक्षात लाइफ स्टाइल by sunil kachure
दारू वाईट,सिगारेट वाईट, जंक
अनेकांना बिलकुल जमत नाही.
आणि यकृतात चरबी ठासुन भरलेली
In reply to आणि यकृतात चरबी ठासुन भरलेली by Bhakti
सध्या रुटीन पोटाच्या
लाईफ स्टाईल बदलणे हे शक्य
व्यायाम शून्य, एका जागी बसून
छान!
धन्यवाद डॉक्टर
मला असे वाटते
ह्याचा प्रोग्राम अगोदर च
प्राक्तनात जे काही आहे ते
In reply to प्राक्तनात जे काही आहे ते by सुबोध खरे
तो अर्थ नाही
डिस्कवरी टर्बो चानेल
In Asian Indians, risk of CAD
शिस्तबद्ध जीवन
In reply to शिस्तबद्ध जीवन by कर्नलतपस्वी
जगायचं कसे हे तर आपण ठरवू शकतो.
वाह मस्त
In reply to वाह मस्त by प्रसाद गोडबोले
मध्यंतरी, ह्याच विषयावर मी एक धागा काढला होता ...
In reply to मध्यंतरी, ह्याच विषयावर मी एक धागा काढला होता ... by मुक्त विहारि
मस्त
In reply to मस्त by प्रसाद गोडबोले
हो