पार जळगावहून वांगी आले होते.ही वांगी आकाराने ओव्हल मोठी ,फिक्कट हिरवी असतात.यात बिया कमीअ असतात.२०१६ साली जळगावी वांग्यांना GI tag ही मिळाला आहे.
शेवटी हे एकच राहिले होते.तेव्हा जळगावी भरीतची पाकृ लिहिण्याची आणि चित्रित करायचे ठरवले.हा पदार्थ हल्लीच शिकल्यामुळे करून खायला घालायला उत्साह वाटतो आणि झटपटीत होतो.
साहित्य :
१.पावशेर जळगावी वांगे
२.एक वाटी कांद्याची पात (चिरलेली)
३.एक वाटी कच्चे शेंगादाणे
४.अर्धी वाटी भाजलेले शेंगादाणे
५.एक वाटी चिरलेला ओला कांदा
६.५-६ हिरव्या मिरच्या
७.७-८ लसून पाकळ्या
८..कोथिंबीर चिरलेली
९.फोडणीचे साहित्य
कृती:
१.वांग्याला तेल लावावे.सुरीने चुहू बाजूंनी टोचे मारून घ्यावेत.त्यात चार लवंगा खोचून घ्याव्यात .
२.वांगी आचेवर भाजून घ्यावेत.जळगावात धान्य काढल्यानंतरच्या उरलेल्या काड्यांवर शेतात भाजतात.
३.वांगे भाजताना बरोबर हिरव्या मिरच्याही भाजून घ्याव्यात.
४.भाजलेल्या वांग्याचे वरचे टरफल काढून टाकावे.भाजलेले वांगे वाटून/ठेचून घ्यायचे .यासाठी लाकडी खलबत्त्ता(बडगी) वापरला जातो .वा पाटा वरवंटा .यात कोणतेही धागे न राहता एकजीव व मऊ होणे महत्वाचे.
५.हिरव्या मिरच्या व लसून एकत्र वाटून घ्यावेत.
६.फोडणीसाठी कढईत दोन मोठे चमचे तेल गरम करावे .जिरे ,मोहरी.मिरची लसून वाटण टाकावे.
७.भाजलेले आणि कच्चे शेंगादाणे परतून घ्यावेत.
८.यात चिरलेला ओला कांदा परतून घ्यावा.नन्तर चिरलेली कांद्याची पात टाकून परतून घ्यावी.
९. आवडीनुसार हळद ,मीठ ,कोथिंबीर टाकावी.तिखट जास्त हवे असेलं तर तिखटही वापरू शकता.
१०.आता वाटलेला वांग्याचा गर यात टाकून परतून घ्यावा .१० मिनिटे वाफ येऊ द्यावी.
११.गरमा गरम जळगावी भरीत भाकरी बरोबर खायला तयार.
-भक्ती
वाचने
16600
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
तोंडाला पाणी सुटले.
:)
In reply to तोंडाला पाणी सुटले. by गोरगावलेकर
लवंगा टोचुन वांगे भाजल्याने
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kallolam... :- Padi Padi Leche Manasuफरक वाटतो. धन्यवाद :)
In reply to लवंगा टोचुन वांगे भाजल्याने by मदनबाण
व्वा. हा पदार्थ धुळ्यात
धन्यवाद अबा :)
In reply to व्वा. हा पदार्थ धुळ्यात by अमरेंद्र बाहुबली
व्वा व्वा छान
ओह!
In reply to व्वा व्वा छान by सरिता बांदेकर
वाह..!
धन्यवाद सर :)
In reply to वाह..! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पूर्वी काळे वांगे भरिताला
काळी वांगी भरतासाठी नाही
In reply to पूर्वी काळे वांगे भरिताला by आग्या१९९०
वाह
:) होय.
In reply to वाह by निनाद
मला सगळ्याच प्रकारच्या वांग्याचे भरीत आवडते
:) धन्यवाद.
In reply to मला सगळ्याच प्रकारच्या वांग्याचे भरीत आवडते by टर्मीनेटर
असे अनेक खान्देशी पदार्थ आहेत
झटपट ?
भरीत हा निगुतीने करायचा
In reply to झटपट ? by सौन्दर्य
मिळतात.
In reply to झटपट ? by सौन्दर्य
अहाहा
सर्वांचे आभार !
उत्तमच मांडणी
वाह! चांगली यादी!वरण बट्टी
In reply to उत्तमच मांडणी by जेम्स वांड
व्हिडियो
उत्तम , माहिती! धन्यवाद
In reply to व्हिडियो by निनाद