Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by निनाद on Wed, 01/05/2022 - 04:22
इलेक्ट्रॉनिक्स, वाहन आणि मेडिकल तंत्रज्ञान साठी भारत त्याच्या जवळपास सर्व सेमीकंडक्टर गरजांसाठी १००% परदेशी उत्पादकांवर अवलंबून आहे. अशा पार्श्वभूमीवर - केंद्रीय मंत्रिमंडळाने सेमीकंडक्टर (मराठी: अर्धसंवाहक?) आणि डिस्प्ले उत्पादन उद्योगांच्या विकासासाठी ₹७६,००० कोटींच्या प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली. या मोठ्या बातमी कडे फारसे लक्ष वेधलेले दिसत नाही. यामुळे धोरणात्मक महत्त्वाच्या क्षेत्रात भारताचा पाय रोवला जाईल अशी आशा आहे. पुढील सहा वर्षांत २० हून अधिक सेमीकंडक्टर डिझाइन, घटक उत्पादन आणि डिस्प्ले फॅब्रिकेशन (फॅब) युनिट्सची स्थापना केली जाईल. आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचा सेमीकंडक्टर हा पाया आहे. आर्थिक स्वावलंबनाच्या या क्षेत्रांमध्ये भारताच्या तांत्रिक नेतृत्वाचा मार्ग ही येथूनच जाणार आहे. या विकासा साठी मोठा धोरणात्मक निर्णय आहे. एक वेगळी इकोसिस्टम देशात तयार केली जात आहे. मंजूर केलेले व्यापक प्रोत्साहन सेमी-कंडक्टर लॅबोरेटरी चे आधुनिकीकरण आणि व्यापारीकरण केले जाणार आहे - हा यातला फार महत्त्वाचा भाग आहे. याशिवाय सेमीकंडक्टर डिझाईन कंपन्यांच्या वाढीस मदत केली जाईल. सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले शाश्वत इकोसिस्टम विकसित करण्यासाठी दीर्घकालीन धोरणे चालविण्यासाठी, एक विशेष आणि स्वतंत्र इंडिया सेमीकंडक्टर मिशन ची स्थापना होते आहे. भारतीय उत्पादकांसह तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आणि सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स असे आघाडीचे उत्पादक यामध्ये असतील अशी आशा आहे. आज भारत हे चिप डिझाइनचे प्रमुख जागतिक केंद्र आहे. जगात सेमीकंडक्टर उद्योगातील अनेक अभियंते हे भारतीय आहेत पण ते भारतीय आस्थापनांमध्ये संशोधन आणि नोकरी करत नाहीत. ही संधी आता उपलब्ध असेल असे वाटते. मग या आधी हा सेमीकंडक्टर उद्योग भारतात नव्हता का? तर होता! पण तो पूर्णपणे गलितगात्र राहील याची संपूर्ण काळजी या आधीच्या सरकारांनी घेतली होती. पण आता आलेल्या या योजना आणि त्याची इकोसिस्टम देशात तयार केली जाणे म्हणजे पायाभूत प्रगतीची प्रथम पायरी आहे असे वाटते. या योजनेतून आता भारतीय सेमीकंडक्टर संशोधन विभागात आता तरी करंट जाईल की नाही यावर तज्ञ सदस्यांची मते जाणून घ्यायला आवडतील.
  • Log in or register to post comments
  • 28375 views

प्रतिक्रिया

Submitted by मुक्त विहारि on Wed, 01/05/2022 - 06:30

Permalink

विशेष पर्व, ह्या पुस्तकांत ह्याची थोडीफार माहिती आहे

स्वयंपुर्णतेकडे टाकलेले, हे महत्वाचे पाऊल आहे
  • Log in or register to post comments

Submitted by राजेंद्र मेहेंदळे on Wed, 01/05/2022 - 13:55

Permalink

नाक दाबले की तोंड उघडते

साधे सोपे एम्बेडेड प्रोग्राम्स आय सी चिप्समधे लिहिले/कोरलेले असतात जे आपली घरगुती उपकरणे (टि.व्ही/फ्रीज्/वॉशिंग मशीन) चालविण्यापासुन ते मोठी मशिनरी चालविण्यापर्यंत बरेच काही करत असतात. पण सध्या जगभरातच सेमि कंडक्टर्स आणि आय सी चिपचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याला कारणे अनेक असतील जसे की नैसर्गिक साधनांचा तुटवडा (सिलिकॉन), मनुष्यबळाचा अभाव(कोविड्मुळे) , देशांमधील ताणलेले व्यापारी संबंध वगैरे. पण त्याचा भयानक परीणाम फॅक्टर्‍या , वाहन निर्मिती, आय टी, मेडिकल, ऑटोमोबाईल, प्रॉडक्शन अशा सगळ्याच क्षेत्रात जाणवतोय. कोविडोत्तर सगळीकडे मागणी वाढत आहे, पण प्रॉडक्शन नसल्याने पुरवठा थांबला आहे. उदा.सिस्को सारख्या कंपन्यांची उपकरणे जी ऑर्डर दिल्यावर ४-६ आठवड्यात मिळायची त्याला ४-६ महिने लागत आहेत. अशा परिस्थितीत आपण स्वयंपूर्ण होणे हे प्रत्येक देशाचे ध्येय असलेच पाहिजे. चीन तैवान जपान वगैरे देशांवर अवलंबुन चालणार नाही. भारतात उशिरा का होईना, या गोष्टीची जाणीव झाली आणि पावले उचलायला सुरुवात झाली हे आनंददायक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 01/05/2022 - 14:42

In reply to नाक दाबले की तोंड उघडते by राजेंद्र मेहेंदळे

Permalink

जाणीव आधीच झाली होती

मनू छाब्रीया, यांनी तसे सुतोवाच पण केले होते ... पण, 1970 च्या सुमारास, Meltron, Keltron ह्या Electronic कंपन्या, निम्न सरकारी होत्या आता त्या लाल फितीच्या कारभारातून बाहेर पडायला, 50 वर्षे लागली ... करपलेल्या भाकर्या, भाजप मुळे, फिरायला लागल्या... भाजपला पर्याय नाही...
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Wed, 01/05/2022 - 16:20

Permalink

एक सुचवतो की लेख तांत्रिक माहितीचा ठेवा.

राजकारण आणलेत की धोबीघाट होतो. ---------- ही बातमी अगोदरच वाचली आहे. भारत फक्त जमीन आणि कर्मचारी देणार. तंत्रज्ञान बाहेरच्या कंपन्यांचे आहे. २. आता कोविड काळात आपल्याला ही गुंतवणूक महागात पडली आहे. ३. तीन वर्षांपूर्वी करायला हवी होती. ४. जेव्हा उत्पादन बाहेर पडेल आणि जगातल्या इतर कंपन्या कोविड लाट ओसरल्याने धडाक्यात काम करतील तेव्हा भाव पडतील. ५. मेक इन इंडिया - कल्पना ठीक आहे पण स्पर्धात्मक विचार हवा. ६. बाकी आमच्याकडे काम करणाऱ्या हुशार माणसास शोषून खालीच ठेवायचे आणि वरच्या पदांवर आतील गोटातील ठोंबे भरून कंपनीची सूत्रे हातातून जाऊ द्यायची नाहीत हे धोरण असल्याने इकडे काहीही होत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 01/05/2022 - 17:17

In reply to एक सुचवतो की लेख तांत्रिक माहितीचा ठेवा. by कंजूस

Permalink

राजकारण आणलेत की धोबीघाट होतो.

स्वयंपुर्णतेकडे जाणे, हीच भाजपची वाटचाल असल्याने, विश्र्वास वाटतो..
  • Log in or register to post comments

Submitted by तर्कवादी on Wed, 01/05/2022 - 18:20

In reply to एक सुचवतो की लेख तांत्रिक माहितीचा ठेवा. by कंजूस

Permalink

सहमत

राजकारण आणलेत की धोबीघाट होतो.
बरोबर आहे. प्रत्येक विषयाचा संबंध राजकारणाशी जोडला जाऊ नये. देशाकरिता हितकारक निर्णय घेवून योग्य पद्धतीने राबवणार्‍या कोणत्याही सरकारचं निर्मळपणे कौतुक व्हावं. मग ते सरकार कोणत्याही पक्षाचं का असेना. आणि अमुक पक्षाचं सरकार म्हणजे नेहमीच वाईट आणि तमुक पक्षाचं सरकार म्हणजे नेहमीच चांगलं असं काही नसतं. काही ना काही चुका सगळेच करतात आणि काही ना काही चांगले निर्णयही सगळेच घेतात.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 01/05/2022 - 18:22

In reply to सहमत by तर्कवादी

Permalink

नक्कीच ...

पण, दुर्दैवाने, कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाहीत, ही वस्तुस्थिति नाकारता येत नाही...
  • Log in or register to post comments

Submitted by तर्कवादी on Wed, 01/05/2022 - 20:29

In reply to नक्कीच ... by मुक्त विहारि

Permalink

पुन्हा तेच

पण, दुर्दैवाने, कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाहीत, ही वस्तुस्थिति नाकारता येत नाही..
म्हणजे १९९१ ला नरसिह राव सरकारने घेतलेले मुक्त अर्थव्यवस्थेसंबंधीचे निर्णय जनतेच्या हिताचे नव्हते असंच तुमचं मत असेल तर असो.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 01/05/2022 - 21:06

In reply to पुन्हा तेच by तर्कवादी

Permalink

ह्याचा परिणाम काय झाला?

नरसिंह राव, यांची गच्छंती... पी.व्ही. नरसिंह राव, सोनिया गांधी, यांना जुमानत न्हवते... गांधी घराण्याच्या विरोधात, (ज्याला "कॉंग्रेसच्या विरोधात", असे गोंडस नाव आहे) जे जे गेले, त्यांची गांधी घराण्याने गच्छंतीच केली, मग ते निर्णय जनतेच्या भल्यासाठी असले तरी ... सरदार वल्लभभाई पटेल ते बाबासाहेब भोसले, व्हाया अरस आणि मोरारजी देसाई... असो ....
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Wed, 01/05/2022 - 21:18

In reply to पुन्हा तेच by तर्कवादी

Permalink

अहो तर्कवादी.

अहो तर्कवादी. हे २०२२ आहे, १९९१ नाही. त्या काँग्रेस आणि आताच्या काँग्रेसमध्ये खुप फरक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्कवादी on Fri, 01/07/2022 - 17:07

In reply to अहो तर्कवादी. by Trump

Permalink

सहमत

हे २०२२ आहे, १९९१ नाही. त्या काँग्रेस आणि आताच्या काँग्रेसमध्ये खुप फरक आहे.
बरोबर आहे .. १९९१ जुने झाले म्हणून तेव्हाच्या काँग्रेसबद्दल बोलायची आता गरज नाही. आणि २०२२ मध्ये काँग्रेस सत्तेत नाही म्हणून या काँग्रेसबद्दलही बोलायची आता गरज नाही
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on गुरुवार, 01/06/2022 - 11:20

In reply to सहमत by तर्कवादी

Permalink

प्रत्येक विषयाचा संबंध

प्रत्येक विषयाचा संबंध राजकारणाशी जोडला जाऊ नये हो तात्विक दृष्ट्या जरी हे पटत असले तरी राजकारण येते ते या कारणामुळे कि अनेक वर्षे एकाच पद्धतीची अर्थव्यवस्था असावी असा धोशा होता आता त्यात बदल होत असले तर सध्याचं सरकारचे (भाजपचे ) कौतुक केले तर काय बिघडते असो काँग्रेस ने पण " काहीच केले नाही" असे नाही, सुरवातीच्या काळात जो स्वालंबनावर भर होता त्यातून अनेक संस्था उभ्या राहिल्या हे हि मान्य भेल हिंदुस्थान अएरॉनॉटिक्स , इसरो , भाभा , एन आय डी अहमदाबाद आणि अर्थात आय आय टी ते आय टी आय
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on गुरुवार, 01/06/2022 - 12:14

In reply to प्रत्येक विषयाचा संबंध by चौकस२१२

Permalink

राजकारणावरच चर्चा

होत राहू नये ही इच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on गुरुवार, 01/06/2022 - 14:19

In reply to एक सुचवतो की लेख तांत्रिक माहितीचा ठेवा. by कंजूस

Permalink

राजकारण आणलेत की धोबीघाट होतो.

पण तीन वर्षांपूर्वी करायला हवी होती हे सांगुन तुम्हीच सरकार कसे निकम्मे ते दाखवुन दिलेत!
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on गुरुवार, 01/06/2022 - 17:18

In reply to राजकारण आणलेत की धोबीघाट होतो. by अनिरुद्ध.वैद्य

Permalink

अहो ते मागणी - उत्पादनाबद्दल आहे.

राजकारणाशी निगडीत नाही. जेव्ह चिपसना भयानक मागणी नव्हती. २०१९ ओक्टोबरपासून चीनमध्ये कोविडची कुणकुण सुरू झाली आणि २०२० मार्चपर्यंत जगात लाट पसरली. घरून काम, ओन लाईन शिक्षण, डिजिटल डिवाईसेसची गरज दहापट झाली. चिप्सची मागणी वाढली. तर तंत्रज्ञानवाले महागात विकणार नाही का?
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on Sun, 01/09/2022 - 13:49

In reply to एक सुचवतो की लेख तांत्रिक माहितीचा ठेवा. by कंजूस

Permalink

कश्याला सुचवता काका

राजकारण आणलेत की धोबीघाट होतो
धागा लेखकांना स्वतः तंत्रिकमध्ये रस नाही हे त्यांच्या लेखातील ठळक केलेल्या वाक्यातून उत्तम अधोरेखित होते आहे, परत मुविंचे मूर्तिमंत आगमन इथे झालेले आहे त्यामुळे आता तांत्रिक वगैरे आशा सोडलेल्या बऱ्या. मार्व्हल सुपरहिरो आहेत मुवि, आता फक्त एकदा मुविंनी "पाककृती" सदरात मस्त अनौचित्यपूर्ण ह्याला पर्याय नाही त्याला पर्याय नाही वगैरे रटाळ पुराण लावले का मनःशांती मिळेल. अन त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता ते लवकरच शक्य होईल असे दिसते....
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on Mon, 01/10/2022 - 05:08

In reply to कश्याला सुचवता काका by जेम्स वांड

Permalink

असे नाही

खरोखरच पुर्वीच्या सरकारांनी हा उद्योग भारतात येऊ नये म्हणून प्रचंड प्रयत्न केले आहेत. ६० च्या दशकात फेयर चाईल्ड ही कंपनी तर भारतात फाऊंड्री आणायला उत्सुक होती. पण तिला येऊच दिले नाहे! त्या नंतर सुमारे २० वर्षे काहीही केले नाही. मग अचानक एक दिवस सीएसेल ची स्थापना केली. या कंपनीनी उत्तम कार्य सुरू केले. पण अगदी ऐन भरात असताना या कंपनीला आगच लागली! आणि मग ती कंपनी कधी रिकव्हर झालीच नाही! आगीचे कारण कधीच कळले नाही... थोडक्यात काय भारतात डोकेबाज लोक, नावीन टेक, आणि त्यासाठी लागणारी व्यवस्था असताना प्रयत्न पूर्वक भारताला अंधारात लोटले गेले. याची कारणे पूर्णपणे राजकीय आणि आर्थिक आहेत या विषयी माझ्या मनात शंका नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on Wed, 01/12/2022 - 20:19

In reply to असे नाही by निनाद

Permalink

नक्कीच

पण त्या आगीचे कारण कळले नसता ते राजकीय कसे असेल ? अशी एक शंका मला पडते आहे, बाकी राजकारणात तितका रस नाही ह्या बाबतीत किंवा उगाच तुम्हाला चॅलेंज करण्याचा सोस पण नाही इतकी ग्वाही देतो. ह्या बाबतीत तुमच्याकडून अजून जाणून घेणे नक्कीच आवडेल मला, कारण प्रसंगी चूक दुरुस्त करून स्वतःच्या ज्ञानात भर घालणे हे एजंडे रेटण्यापेक्षा कधीही उत्तमच असं माझं वैयक्तिक मत आहे
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Wed, 01/05/2022 - 18:21

Permalink

अ ति श य उत्साहवर्धक बातमी.

अ ति श य उत्साहवर्धक बातमी. आनंदीत करणारी. हा प्रकल्प मोठे यश मिळवेल यात शंका नाही. Image removed. सेमीकंडक्टर : अर्धवाहक "सेमीकंडक्टर मिशन"च्या या निर्णयात सहभागी नेतृत्व, संघ आणि समर्थक या सर्वांचे मनापासून अभिनंदन ! निनाद साहेब, याच्या प्रगतीचे वेळोवेळी अपडेट पोस्टत रहा ! त्याचीही उत्सुकता आहे. लेख आणखी तांत्रिक केला तरी हरकत नाही !
  • Log in or register to post comments

Submitted by सौंदाळा on Wed, 01/05/2022 - 19:05

In reply to अ ति श य उत्साहवर्धक बातमी. by चौथा कोनाडा

Permalink

हेच म्हणतो

हेच म्हणतो रच्याकने 'निनाद' बिल्ला नं १९!! वा. बिरुटे सर आणि अन्य मोजके अपवाद वगळता इतके जुने लोक दिसत नाहीत हल्ली.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on Fri, 01/07/2022 - 10:42

In reply to हेच म्हणतो by सौंदाळा

Permalink

धन्यवाद!

धन्यवाद!!
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Fri, 01/07/2022 - 11:42

In reply to हेच म्हणतो by सौंदाळा

Permalink

हे "बिल्ला नं १९" हे काय

हे "बिल्ला नं १९" हे काय प्रकरण आहे ? कळले नाही !
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on Fri, 01/07/2022 - 11:44

In reply to हे "बिल्ला नं १९" हे काय by चौथा कोनाडा

Permalink

१९ सदस्य क्रमांक

मिपा सदस्य क्रमांक आहे तो. पहिले १५ तात्याकडेच होते. १६ प्रियाली असावी, १७ सर्कीट होता बहुदा, १८ गुंडोपंत आणि १९ वा मी!
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Fri, 01/07/2022 - 11:56

In reply to १९ सदस्य क्रमांक by निनाद

Permalink

ग्रेट. माहित नव्हते !

ग्रेट. माहित नव्हते ! बाप रे, सो ओल्ड ! १४ वर्षे जुना, मिपाच्या जन्मा इतका ! अभिनंदन, निनाद ! हॅट्स ऑफ, इतकी वर्षे सातत्याने क्रियाशील राहण्यासाठी ! माझा बिल्ला क्रमांक कसा शोधता येईल ?
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Fri, 01/07/2022 - 11:59

In reply to ग्रेट. माहित नव्हते ! by चौथा कोनाडा

Permalink

बिल्ला क्रमांक

माझा बिल्ला क्रमांक कसा शोधता येईल ?
२४१७५
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Fri, 01/07/2022 - 13:19

In reply to बिल्ला क्रमांक by Trump

Permalink

बिल्ला क्र. : चोवीस हजार

बिल्ला क्र. : चोवीस हजार एकशे पंच्याहत्तर ! धन्यू ट्र्म्प ! _/\_
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 01/05/2022 - 19:17

Permalink

बराच काळ ज्या घडामोडी

बराच काळ ज्या घडामोडी घडाव्यात याची वाट पाहत होतो त्या आपल्या राष्ट्रात घडताना पाहुन आता विशेष आनंद होतो. आपला देश चीप मेकिंग आणि सेमीकंडक्टर मेकिंग मध्ये जगात १ नंबर होवो ही कामना करतो._/\_ काही दुवे :- Tata Group in talks with Taiwan companies to make chips in India India in talks with Taiwan for domestic semiconductor-manufacturing hub; trade, investment pacts also discussed India, Taiwan eyeing FTA, look at setting up semiconductor manufacturing hub Intel & Vedanta Plans Semiconductor Manufacturing Unit In India जाता जाता :- हर बार सिर्फ मोदी सरकार ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Maai Bappa Vithala
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 01/05/2022 - 19:57

In reply to बराच काळ ज्या घडामोडी by मदनबाण

Permalink

चीप मेकिंग बद्दल खात्री नाही...

पण सेमी कंडक्टर आणि इतर मुलभूत Components बद्दल (रेझिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर इत्यादी,) ह्या बद्दल खात्री वाटते...
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Wed, 01/05/2022 - 22:02

In reply to चीप मेकिंग बद्दल खात्री नाही... by मुक्त विहारि

Permalink

चीप मेकिंग बद्दल खात्री नाही.

चीप मेकिंग बद्दल खात्री नाही... पण सेमी कंडक्टर आणि इतर मुलभूत Components बद्दल (रेझिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर इत्यादी,) ह्या बद्दल खात्री वाटते...
प्रिसिजन प्लास्टिक मोल्डींग बद्दल हेच बोललं जायचं, "भारतात हे जमणं शक्यच नाही, जपान, मलेशिया कोरिया इथूनच मोल्ड बनवावे लागतील" पण आता भारतात प्रोसिजन मोल्डस बनतात ! चीप मेकिंग हे ही नक्कीच घडेल, घडणारच !
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Wed, 01/05/2022 - 23:28

In reply to चीप मेकिंग बद्दल खात्री नाही. by चौथा कोनाडा

Permalink

टाईम टेक्नोप्लॉस्ट कंपनी यात

टाईम टेक्नोप्लॉस्ट कंपनी यात काही करते का?
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on गुरुवार, 01/06/2022 - 11:24

In reply to टाईम टेक्नोप्लॉस्ट कंपनी यात by शाम भागवत

Permalink

टेक्नोप्लॉस्ट कंपनी

टेक्नोप्लॉस्ट कंपनी म्हणजे वि आई पी बॅग बनवणारी ? ( नाशिक अंबड )?
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on गुरुवार, 01/06/2022 - 12:23

In reply to टेक्नोप्लॉस्ट कंपनी by चौकस२१२

Permalink

व्हीआयपी बहुतेक ब्लोपास्ट

व्हीआयपी बहुतेक ब्लोपास्ट असावी
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on गुरुवार, 01/06/2022 - 11:13

In reply to चीप मेकिंग बद्दल खात्री नाही. by चौथा कोनाडा

Permalink

भारतात प्रोसिजन मोल्डस बनतात

भारतात प्रोसिजन मोल्डस बनतात छान , आता थी न वॉल ( अतिशय पातळ असे मार्जरींन किंवा तत्त्सम पदार्थांसाठी ) लागणारे मोल्ड पण बनत असावेत ! सिमेन्स ची स्वतःची टूल रुम पूर्वीपासून उच्च दरजाची होती ( पण ते फक्त अंतर्गत वापरासाठी ) आनि गोदरेंज/ टेल्को / बजाज / लेल्यांड ची पण आणि बंगलोर ला स्विस सरकारचं मदतीने उभारलेली पण याशिवाय वाहन उत्पादनामुळे तर यात बरीच प्रगती झाली असणार
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on गुरुवार, 01/06/2022 - 11:29

In reply to चीप मेकिंग बद्दल खात्री नाही. by चौथा कोनाडा

Permalink

उत्पादन क्षेत्रात

खरंच भारतात उत्पादन क्षेत्रात काम कऱ्याला खूप व आहे ऑस्ट्रेल्यात आलो तेव्हा ५ गाड्या बनवणाऱ्या कंपन्या होत्या आता शून्य कधी कधी मी मनात म्हणतो कि आपल्याला खालील तीन ४ देशआत जास्त वाव आहे भोसरी - जर्मनी- चीन- कॅलिफोर्निया ( डिझाईन इन यु एस , मेड इन आशिया ) आणि सिंगापोर ( पण महाग जागे मुळे उत्पादन मलेशिया आणि थायलंड ला हलवले आहे )
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Wed, 01/05/2022 - 22:54

Permalink

सुमारे ४० वर्षांपूर्वी

सुमारे ४० वर्षांपूर्वी अस्मादिकांनी इलेक्ट्रॉनिक्स शिकायला सुरुवात केली आणि गेली पस्तीस वर्षे त्यात काम करत आहे. अनेक स्थित्यंतरे पाहिली. एक वर्ष व्हॉल्व सुधा वापरले. हा विषय खूप मोठा आहे आणि धागा विषयातल्या मुद्द्याचे साधे सोपे उत्तर नाही. साधारण दोन हजार साली सेमिकंडक्टर लॅब चंदीगड आणि हिंदुस्तान सेमिकंडक्टर्स यांनी भारतात अर्धसंवाहक आधारित सुटे भाग तयार करायचे सुरुवातीचे प्रयत्न केले. जगात पाच नॅनो मीटर तंत्रज्ञान वापरत असताना आपल्या देशी कंपन्या १८० नॅनोमीटर्स मधे काम करतात. परदेशी गुंतवणूकीशिवाय कांहीही होणे नाही. आपले कुशल अभियंते कामाच्या शोधात जगभर निघून जातात. (आपल्याकडे वाळू मुबलक आहे म्हंजे चिप बनवायला काईच प्रॉब्लेम नाही असं वाटणारे महाभाग देशात भरपूर आहेत.) इथे काही करायचं तर यासाठी अवाढव्य खर्च आणि कुशल मनुष्यबळ लागते ते आपल्याकडे अपुरे आहे. याशिवाय या प्रक्रियेत विषारी रसायने तयार होतात त्याची विल्हेवाट लावणे खर्चिक आहे. अनेक क्षेत्रांत लेड विरहित उत्पादनांची मागणी असल्याने एकूण हे खर्चिक होत आहे.मनुष्यबळ सोडले तर भारतात इतर सर्व खर्च जास्तच आहेत, पण मेक इन इंडिया सवलती आणि चीनला नापसंती या दोन कारणांचा फायदा घेत कांही प्रगती झाली तर बरेच आहे. रहाता राहिले राजकारण.. त्याबद्दल इथे न बोललेलेच बरे. लायसन्स राज आणि भारताला नक्की कसला समाजवाद (!) हवा हे न ठरल्यामुळे अनेक दशके नुकसान झालेच. आता फक्त पुढे पहाणे श्रेयस्कर ठरेल.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Wed, 01/05/2022 - 23:33

In reply to सुमारे ४० वर्षांपूर्वी by खेडूत

Permalink

हे पाप जनता राजवटीतील

हे पाप जनता राजवटीतील तेव्हांच्या उद्योग मंत्र्याचे म्हणजे जॉर्ज फर्नांडिस यांना आहे. कारण कामगार नेत्यातून ते एकदम उद्योगमंत्रीच झाले. त्यांनी इंटेल व आयबीएम यांनाही कोकाकोलाच्या पंगतीला बसवून भारतातून हाकलून लावले. त्यानंतर मात्र प्रत्येक प्रश्नावर "कामगार नेते" या एकमेव चष्म्यातून पहावयाचे थांबवल्यावर मात्र ते आमूलाग्र बदलले. पण यासगळ्या गडबडीत अमेरिकेने आपला मोर्चा चीनकडे वळवला. अन्यथा चीन व भारत यामधे १९७८ पर्यंत काहीच फरक नव्हता.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on Mon, 01/10/2022 - 05:09

In reply to हे पाप जनता राजवटीतील by शाम भागवत

Permalink

सहमत आहे

हे फालतू लोक सत्तेत आले नसते तर बरेच काही बदलले असते भारतात.
  • Log in or register to post comments

Submitted by रावसाहेब चिंगभूतकर on गुरुवार, 01/06/2022 - 11:30

In reply to सुमारे ४० वर्षांपूर्वी by खेडूत

Permalink

यातलं फारसं माहीत नसल्याने एक

यातलं फारसं माहीत नसल्याने एक बाळबोध प्रश्न. समजा 180 nm वापरले सुरवातीला तर काय फरक पडेल? काहीच नसण्यापेक्षा आपल्या कार्स थोड्या जुन्या technology वर चालू देत की. प्रेसिजन, skilled ऑटोमॅशन वगैरे R&D ने काही वर्षात येईल. पण शक्य असणाऱ्या technology वापरून तातडीने स्वयंपूर्ण होणे इतके न आवडणारे का आहे? थोडक्यात तुलना करायची म्हणजे अगदी BMW टाइप च्या गाड्या घेण्यापेक्षा महिंद्रा च्या गाड्या देशातच बनत असतील तर चालवून घेऊ की आपण.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on गुरुवार, 01/06/2022 - 12:20

In reply to यातलं फारसं माहीत नसल्याने एक by रावसाहेब चिंगभूतकर

Permalink

चालवून घेऊ?

जिओफोन नेक्सट दिवाळीत आणला त्याचा रिव्यू https://youtu.be/bii0-idOiIs जुना प्रसेसर, जिओसिम कार्डालाच लॉक्ट, कसं होणार? त्याच किंमतीत रेडमी का घ्या सांगतात पाहा.
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on गुरुवार, 01/06/2022 - 14:15

In reply to सुमारे ४० वर्षांपूर्वी by खेडूत

Permalink

नमस्कार खेडुत,

नमस्कार खेडुत,
जगात पाच नॅनो मीटर तंत्रज्ञान वापरत असताना आपल्या देशी कंपन्या १८० नॅनोमीटर्स मधे काम करतात.
ह्याबद्दल अजुन माहीती लिहीता का? शक्य नसेल तर दुवे दिले तरी चालतील.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 01/06/2022 - 14:24

In reply to नमस्कार खेडुत, by Trump

Permalink

जमल्यास माहिती द्या, अशी विनंती

अद्याप तरी Bad Boyes विसरलेलो नाही .... मवाळ भाषेत ... B B ROY
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on गुरुवार, 01/06/2022 - 21:50

In reply to सुमारे ४० वर्षांपूर्वी by खेडूत

Permalink

येस खेडूत, येऊ द्यात शेपरेट

येस खेडूत, येऊ द्यात शेपरेट धागा ५० /१८० नॅनोमीटर्स वर. - यातील अल्पज्ञानी चौ.को.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on Fri, 01/07/2022 - 11:07

In reply to सुमारे ४० वर्षांपूर्वी by खेडूत

Permalink

१८० नॅनोमीटर्स

१८० असेल तरी काही बिघडत नाही असे मला वाटते. आणि हे पुढे प्रगत होत जाईलच! मिडरेंज आणि लो-एंड चिप्समुळे चिप्सची भविष्यातील बहुतांश मागणी पूर्ण होऊ शकते. अगदी चीन सुद्धा २८ नॅनोवरच प्रामुख्याने काम करत आहे. १८० नॅनो म्हणजे काही अगदी कमी नाही असे वाटते. आपल्यापैकी अनेकांना AMD ऍथलॉन थंडरबर्ड किंवा इंटेल सेलेरॉन आठवत असतील ते प्रोसेसर्स १८० नॅनो चे होते. आजही हे प्रोसेसर्स अगदीच टाकाऊ आहेत असे म्हणता येत नाही. कारण लो-एंड वापरात ते उपयोगी पडू शकतात.
  • Log in or register to post comments

Submitted by नेत्रेश on गुरुवार, 01/06/2022 - 23:59

Permalink

५ नॅनोमिटर अजुन ईंटेलकडे पण नाहेये

ईंटेल सारखी १० वर्षांपुर्वी आघाडीवर असलेली सेमीकंडक्टर कंपनी पण सध्या प्रोसेस टेक्नॉलॉजी मध्ये TSMC या तैवानी कंपनीच्या ५ वर्ष तरी मागे पडली आहे. आत्ता ईंटेल १० नॅनोमिटरच्या चिप्स तयार करत आहे. २०२३ मध्ये त्यांच्या ७ नॅनोमिटर चिप्स येतील. विमान आणी स्कुटर मधे जेवढा फरक आहे साधारण तेवढा फरक ७ नॅनोमिटर आणी १८० नॅनोमिटर टेक्नॉलॉजीनध्ये आहे. बजाजला विमान बनवायची टेक्नॉलॉजी स्वतः तयार करुन चांगले विमान बनवायला जेवढा वेळ आणी पैसा लागेल तेवढाच आपल्याला १८० नॅनोमिटर पासुन ७ नॅनोमिटर पर्यंत जायला लागेल. त्यापेक्षा TSMC सारखी कंपनी जर भारतात प्लांट टाकणार असेल तर त्यांना संपुर्ण करमाफी, जमीन, पाणी, वीज फुकट देउनही आपला प्रचंड फायदाच होईल. अशा प्लांटमधे काम केलेले मनुष्यबळ पुढे जाउन भारतीत बनावटीचे प्लांट तयार करतील आणी परदेशावरचे अवलंबन कमी होइल. चीने ने ही हेच केले आहे. पाश्चीमात्य देशातील कंपन्यांचे प्रॉडक्ट स्वस्तात बनउन तंत्रज्ञान हस्तगत केले, व नंतर स्वतःच्या कंपन्या काढल्या.
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Fri, 01/07/2022 - 11:23

In reply to ५ नॅनोमिटर अजुन ईंटेलकडे पण नाहेये by नेत्रेश

Permalink

विमान आणी स्कुटर मधे जेवढा

विमान आणी स्कुटर मधे जेवढा फरक आहे साधारण तेवढा फरक ७ नॅनोमिटर आणी १८० नॅनोमिटर टेक्नॉलॉजीनध्ये आहे.
खरोखर इतका फरक आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by नेत्रेश on Fri, 01/07/2022 - 14:46

In reply to विमान आणी स्कुटर मधे जेवढा by Trump

Permalink

जास्तच असेल कदाचित

आपल्याला कीती पल्ला गाठायचा आहे त्याची कल्पना यावी म्हणुन तुलना दीली आहे. ही प्रोसेस संपुर्णपणे देशात विकसित करणे अशक्य आहे. त्यासाठी जगातल्या टॉप ५ फाउंडरीज पैकी कुणीतरी भारतात प्लांट उभारावा लागेल. तो यशस्वी झाल्यास बाकी कंपन्याही येतील. तसेही आताचा घडीला या प्रमुख अमेरीकन कंपन्यांसाठी प्रामुख्याने भारतीय वंशाचे अभियंतेच चिप्स डिझाईन, व्हेरीफीकेश आणी टेस्टींग करीत आहेत. फाऊंड्रीज आणी चिप पॅकेजींग पण भारतात आले तर तंत्रज्ञानासाठी आपल्याला सतत बाहेरील देशांवर अवलंबुन रहावे लागणार नाही. अर्थात हे व्हायला प्रचंड राजकीय ईच्छाशक्ती या आणी भावी सरकार मध्ये हवी.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्कवादी on Fri, 01/07/2022 - 17:16

In reply to ५ नॅनोमिटर अजुन ईंटेलकडे पण नाहेये by नेत्रेश

Permalink

TSMC सारखी कंपनी जर भारतात

TSMC सारखी कंपनी जर भारतात प्लांट टाकणार असेल
असा काही प्रकल्प नियोजित आहे का ? तसेच ७ नॅनोमिटरचे चीप इतर कोणत्या देशात बनवले जाते ? जपान , जर्मनी, अमेरिका, फ्रान्स, यूके ई देश याबाबत किती प्रगत आहेत ? संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक शस्त्र/ उपकरणांकरिता किती नॅनोमीटरच्या चीप्स लागतात ?
  • Log in or register to post comments

Submitted by नेत्रेश on Sat, 01/08/2022 - 05:24

In reply to TSMC सारखी कंपनी जर भारतात by तर्कवादी

Permalink

तैवान आणी साउथ कोरीया आघाडीवर आहेत.

तैवान (TSMC and United Microelectronics ) आणी साउथ कोरीया (samsung) आघाडीवर आहेत. त्यानंतर अमेरीका (global foundries, Intel, वगैरे) आणी चिन (China Semiconductor) आहेत. Technology च्या बाबतीत TSMC आघाडीवर आहे व त्यानंतर Intel. (अवांतरः TSMC (चीनच्या भीतीने बहुतेक) आता अमेरीकेत अब्जावधी डॉलर्स टाकुन मोठी फाउंड्री उभारत आहे. Intel ही भरपुर पैसा ओतुन आणाखी आधुनीक फाउंड्री उभारत आहे. तैवानने सेमीकंडक्टर क्षेत्रात घेतलेल्या आघाडीमुळे चीन तैवानला गी़ळायचा प्रयत्न करत आहे तर पाश्चात्य देश तैवानला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत) संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक शस्त्र/ उपकरणांकरिता (माझ्या माहीतीप्रामाणे) सर्वात आधुनीक चीप्स वापरत नाहीत. ते खुप extreme temperature ला चालणार्‍या आणी २ ते ३ generation मागे असलेल्या proven technology च्या चिप्स वापरतात. अत्याधुनीक चिप्स या नवीन computation power hungry अ‍ॅप्लिकेशन्स मध्ये वापरतात (Artificial Intelligence, Cloud computing and storage, Autonomous / self driving cars, etc.)
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on Sat, 01/08/2022 - 06:40

In reply to तैवान आणी साउथ कोरीया आघाडीवर आहेत. by नेत्रेश

Permalink

जागा

हा अगदीच ढ प्रश्न असेल पण विचारतोच!:) प्रश्न असा पडलेला आहे की, प्रोसेसर लहान लहान करण्याचा प्रयत्न का चालला आहे? नवीन बोर्ड वर जागा तर चिकार आहे. मग प्रोसेसर लहान कशाला करत बसायचा? त्यातून खूप उष्णता तयार होते. मग त्याला हिट सिंक लावा वगैरे करत बसावे लागते. त्या ऐवजी स्प्रेड आऊट प्रोसेसर असेल तर हे प्रश्न आपोआपच मिटतील. शिवाय प्रोसेसर फेल होण्याचे प्रमाण कमी होईल. तज्ञ प्रकाश टाकतील का?
  • Log in or register to post comments

Submitted by नेत्रेश on Sat, 01/08/2022 - 06:58

In reply to जागा by निनाद

Permalink

लहान processor ला कमी पॉवर लागते.

खरतर transistor चा आकार लहान होतो. प्रोसेसरमधल्या transistor ची संख्या वाढतेच. पण आकार लहान होतो. लहान transistor कमी voltage वर चालतो, व त्यामुळे त्याला कमी पॉवर लागते. त्यामुळे कमी उष्णता निर्माण होते. त्यामुळे जास्त स्पिडने चालवता येतो. त्यामुळे जास्त computing power मिळते. कमी उष्ण्तेमुळे Cooling fan लागत नाही व बोर्ड्चा व पर्यायाने final product आकार कमी होतो, तयार करायला कमी पैसे लागतात, product सुंदर होते, लोक जास्त पैसे मोजायला तयार होतात, कंपन्यांचा जास्त फायदा होतो. कंपनीचा शेअर वर जातो. सगळ्या employees भक्कम बोनस मिळतो, शेअर होल्डर खुश होतात. समस्त भू लोक आनंदतो. (हे जरा जास्त झाले, पण सगळ्या नद्या जशा समुद्राला मिळतात, तसे सगळे शोध, सगळी advanced technology, वगैरे सगळे शेवटी पैशांपर्यंत येउन थांबते.)
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com