Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 04/23/2009 - 06:59
  • Log in or register to post comments
  • 22600 views

प्रतिक्रिया

Submitted by काळा डॉन on गुरुवार, 04/23/2009 - 10:02

In reply to पिंडा by विनायक प्रभू

Permalink

आयला चुक

आयला चुक असेल तर दुरुस्त करतो म्हणजे काय? काल्पनिक कथा आहे होय? मला वाटल सत्यकथा आहे. पहिल्या भागात तुम्हि लिहिलेलं मुळ केसच्या ऑडीओ स्क्रिप्टमधले एफ वर्ड्स मी गाळलेले आहेत, आणि बरेचसे शब्द मवाळुन लिहीले आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 04/23/2009 - 10:23

In reply to आयला चुक by काळा डॉन

Permalink

गृहीत

चूक असेल. वेळ आली तर गरजेप्रमाणे बदल होत नाही का? मी फक्त तीने म्हटलेले जसे चा तसे मांडले आहे. कमाल आहे बॉ.
  • Log in or register to post comments

Submitted by काळा डॉन on गुरुवार, 04/23/2009 - 10:28

In reply to गृहीत by विनायक प्रभू

Permalink

तिच्या

तिच्या बोलण्यात चूक असेल तर "तुम्हि" का दुरुस्त करताय मग?
  • Log in or register to post comments

Submitted by शक्तिमान on गुरुवार, 04/23/2009 - 11:19

In reply to तिच्या by काळा डॉन

Permalink

+१

भले शाब्बास!
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 04/23/2009 - 09:44

Permalink

अहो

असे काय करताय. चार वर्षानंतरचे म्हणते आहे ती. ते सुद्धा स्वबळावर.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 04/23/2009 - 09:49

Permalink

प्रकाटाआ

प्रकाटाआ
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on गुरुवार, 04/23/2009 - 09:48

Permalink

मारुती कुणाचा झाला?

मुक्तसुनित ह्याना १००+ समर्थन फक्त पैसा कसाही मिळवणे व त्यातुन सर्व काही विकत घेता येते ही वृती माणसामध्ये झपाट्याने फोफावत आहे. आपण जे काही चुक बरोबर करतो त्याच्या समर्थनासाठी कारणे देखिल लगेच तयार केली जातात.आजोबाची नजर तुम्हाला तशी वाटली म्हणजे तुम्ही देखिल त्याना काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केला असला पाहिजे नाहीतर ९वीतच सुख प्राप्त केले नसते.मी सोडले तर समाजातील प्रत्येक घटक माझा फायदा उचलायला तयार आहे अशी मानसिकता बनायला मग वेळ कसा लागेल?त्या आईवडिलाची काय चुक ,त्यानी तुम्हाला वाढवताना घेतलेले कष्ट सुखासमोर व पैशासमोर कस्पटास्मान झाले का?मुळातच आपल्या चुकाना पवित्र करुन घेण्याचा प्रकार आजकाल सर्वत्र पहावयास मिळतो आहे. सामजिक मुल्ये,नितीमता ह्या फक्त दुसर्‍यानेच पाळल्या पाहिजेत हा विचार समाजस्वास्थ्याला घातक आहे.तिचे वागणे समर्थनिय होवुच शकत नाही. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on गुरुवार, 04/23/2009 - 09:53

In reply to मारुती कुणाचा झाला? by वेताळ

Permalink

+१ सहमत. थोड

+१ सहमत. Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments

Submitted by शरदिनी on गुरुवार, 04/23/2009 - 10:10

Permalink

हे सारे

हे सारे वाचून अश्रू आले. ... काय भयंकर लोक आहेत. आणि तिचं काही चुकलं नाही, आणि तिला समर्थन करणारेही लोक आहेत... ... आणि ती वडिलांना मारते की काय , कशासाठी ते कळले नाही... हे सगळं व्यक्तिस्वातंत्र्याचे वृथा कौतुक केल्याने घडते आहे..... ...
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 04/24/2009 - 09:43

In reply to हे सारे by शरदिनी

Permalink

यात कोठेही

यात कोठेही ती मुलगी वडिलाना मारते असे आलेले नाही. नसलेल्या गोष्टी आणून का उगाच नक्राश्रु ढाळताय? आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी
  • Log in or register to post comments

Submitted by मराठमोळा on गुरुवार, 04/23/2009 - 10:16

Permalink

मुक्तसुनीत

मुक्तसुनीत यांच्याशी सहमत. तसेच.. माझ्या मते प्रेत्येक माणसात एक सायको असतो. कुठे ना कुठे हा सायको आपले डोके वर काढत असतो. जास्त आय क्यु असलेल्या व्यक्ती मानसिक दृष्ट्या खुप चंचल/अस्थिर असतात. योग्य दिशा मिळाल्यास खुप काही चांगले करु शकतात, परंतु जर ह्या लोकांमधे जर विकृती वाढली तर मात्र त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. तसेच आजकाल माझी लाईफ, मी, मला जे बरोबर वाटते तेच मी करणार, दुनियेने मला काय दिले, आई वडिलांनी फक्त त्यांचे कर्तव्य केले अशी एक भावना वाढत आहे. प्रत्येकाला आपले आयुष्य जगण्याचे स्वातंत्र्य आहे असे म्हणुन काही लोकं या गोष्टीचे समर्थन सुद्धा करतात. पण मला सांगा जर एखाद्या व्यक्तीला रस्त्यावर नागवे फिरावेसे वाटले, खुन/चोरी करावीशी वाटली तर त्याला विकृती म्हणणार का सुज्ञ जास्त आय क्यु असलेला स्वतःचे डिसिजन स्वतः घेणारा हुशार व्यक्ती? (कारण माणुस हा समाजशील प्राणी आहे हे विसरुन चालणार नाही.) ह्या कथेतील मुलगी ही मानसिक दृष्ट्या विकृत आहे. (केस हाताळणार्‍या डॉक्टरांशी असहमत) भविष्यात ती पस्तावेल हे नक्की (जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात गेली तरी). आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 04/23/2009 - 10:31

In reply to मुक्तसुनीत by मराठमोळा

Permalink

पण मला

पण मला सांगा जर एखाद्या व्यक्तीला रस्त्यावर नागवे फिरावेसे वाटले, खुन/चोरी करावीशी वाटली तर त्याला विकृती म्हणणार का सुज्ञ जास्त आय क्यु असलेला स्वतःचे डिसिजन स्वतः घेणारा हुशार व्यक्ती?
रस्त्यावर नागवं फिरणारा आणि खून/चोरी करणारा विकृतच! मला सांगा ही मुलगी असं काही करते हे नक्की कोणाकोणाला माहित असणार? आणि त्याचा समाजावर वाईट परिणाम कसा होणार?
भविष्यात ती पस्तावेल हे नक्की
कशी काय, कशावरून?? अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on गुरुवार, 04/23/2009 - 10:41

In reply to पण मला by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

अहो अदिती ताई

मांजर जरी डोळे बंद करुन चोरुन दुध पित असेल तरी जग त्याला बघत असते. ती जर असले काम करीत असेल तर त्याचा बोभाटा व्हायला किती वेळ लागणार आहे? पुढे तिच्या नवर्‍याला जर हे कळाले तर त्याची हालात काय होईल.जरी तिने त्याला सर्व सांगुन लग्न केले तर तो तिला पैशासाठी ते काम परत करण्यास का भाग पाडणार नाही? समजा तिने त्याला सोडुन दिले तर म्हातारपणी कोण तिच्या कडे जाणार?अहो अशा किती तरी आयुष्य जगणार्‍या पोरी पुढे अंमली पदार्थ सेवनाने आपले आयुष्य उध्दस्त करुन घेतात.किती तरी असे आयुष्य जगणार्‍या फॅशनमॉडेल आज रस्त्याकडेला भिक मागतात हे तुम्ही बघितले असेलच. चुक ते चुक. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 04/23/2009 - 10:52

In reply to अहो अदिती ताई by वेताळ

Permalink

१. हा

१. हा इतिहास लपवून ही मुलगी कोणाशी लग्नं करेल असं मला वाटत नाही. २. या इतिहासामुळे हे किंवा इतरही काही इच्छेविरुद्ध करायला लावणार्‍या मुलाशी ही मुलगी लग्नं करेल असंही मला वाटत नाही. आणि केलंच तर त्याला 'अच्छा, टाटा, बाय-बाय' करण्याएवढी धमक तिच्या अंगात नक्कीच आहे. ३. समजा ती म्हातारपणी व्यक्तीगत आयुष्यात एकटीच असेल तर तिच्याकडे कोणी कशाला 'जायला' पाहिजे? बुद्धी वापरून पैसा मिळवता येतो, तसंच आपल्यासारखे चार मित्र-मैत्रिणीही जोडता येतात. ही मैत्री आयुष्यभर पुरते. माझे आजोबा वय वर्ष ३६ ते ९२ एकटेच राहिले. खेड्यात रहायचं म्हणून कधीही आमच्याबरोबर राहिले नाहीत. आनंदात जगले आणि समाधानाने गेले. पण कधीही दुसरं लग्नं करायचा विचार केला नाही. ४. अजूनही ह्या कानाचं त्या कानाला कसं कळणार? आणि कळलं तरीही त्याने समाजावर वाईट परिणाम नक्की कसा होणार? इथेसुद्धा बर्‍याचशा लोकांचं मत काय, की हा प्रकार साफ अमान्य आहे. म्हणजे मिपाकर समाजावर या गोष्टीचा वाईट परिणाम झाला का? माझ्या मते, नाही. ज्याने त्याने आपापली मतं, मार्ग आधीच ठरवले आहेत. कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम होऊ शकतो तो फक्त लहान मुलांवर! त्या मुलांना या गोष्टी नक्की कुठून कळतात?? यापेक्षा जास्त वाईट परीणाम तर घरातला इडीयट बॉक्स करतो. तो आवरतो का आपण एक समाज म्हणून? घरात लहान मुलांसमोर नाही नाही ते बोलून त्यांना आपणच वाईट सवयी लावतो ते आवरतो का? फॅशनच्या जगाबद्दल मला पूर्ण अज्ञान आहे, पण तरीही फॅशन मॉडेल आणि (कोणत्याही) बुध्दीमान माणसाची तुलना मला हसवून गेली. त्याबद्दल सॉरी. अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 04/23/2009 - 10:18

Permalink

छान चर्चा..!

छान चर्चा..! चालू द्या! :) मास्तर, एकदा माझ्यासोबत मुंबैला चला. तुम्हाला फोरासरोड, फॉकलंड रोड, कामाठीपुरा सगळं फिरवून आणतो. त्यानंतर मस्तपैकी काँग्रेस हाऊसला आमच्या शबनमआपाच्या कोठ्यावर किंवा बनारसी चाळीतल्या आमच्या रौशनीच्या लेकीच्या कोठ्यावर जाऊ, दारू पिऊ आणि मुजरा पाहू! येता काय बोला? वाटलं तर आपल्या रामदासबाबालाही सोबत घ्या! :) चलाच एकदा! हे समुपदेशन वगैरे सगळं विसरून जाल! च्यामारी उगाच कुणाकुणाचे तकलादू प्रश्न तुम्हाला हाताळत बसायला नकोत! :) मी पर्वट नाही हे माझ्या पालकांना सांगाल का? तिला म्हणावं गधडे, नववीत शेण खातांना पालकांना विचारून खाल्लं होतंस का? रांडच्ये, पंचतारांकीत हाटेलात त्या कुठल्याश्या अशीलाला मारे त्याचे डोके मांडीवर घेऊन अंगाई गीत गात झोपवतेस ते तुझ्या पालकांना विचारून करतेस का? मग पालकांशी बोलायला आताच गं बरा तुला हवा आहे समुपदेशक?? मिपाकरहो, मारुती च्या तोंडात बोट आहे. तो काही बोलु शकत नाही. बघा पालकांना काही सल्ला देतो येतो का तुम्हाला. मास्तर, तिच्या पालकांना माझ्याकडे द्या पाठवून. चांगला सल्ला देईन त्यांना! बाय द वे, पंचतारांकीत हाटेलात एक टाईम भेटायचे ती पोरगी किती पैशे मागते हे कळलं तर बरं होईल! मी पण थोडा टाईम तिच्या मांड्यांवर डोकं ठेऊन झोपेन म्हणतो..! :) आपला, (मध्यरात्रीची मुंबई बघितलेला) तात्या नवलकर.
  • Log in or register to post comments

Submitted by काळा डॉन on गुरुवार, 04/23/2009 - 10:26

In reply to छान चर्चा..! by विसोबा खेचर

Permalink

तात्या

तात्या छप्परतोड प्रतिसाद! मास्तर, आता म्हणा की "हम्म्म! तुमचा दोष नाही "
बाय द वे, पंचतारांकीत हाटेलात एक टाईम भेटायचे ती पोरगी किती पैशे मागते हे कळलं तर बरं होईल! मी पण थोडा टाईम तिच्या मांड्यांवर डोकं ठेऊन झोपेन म्हणतो..!
नको वेताळबाबा म्हणतोय पैशाने विकत घेणारे पण गुन्हेगार :)
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 04/23/2009 - 10:32

In reply to छान चर्चा..! by विसोबा खेचर

Permalink

तात्या

इथेच द्या ना सल्ला. देणारे आहेत. म्हणुन घेते.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 04/23/2009 - 10:38

In reply to तात्या by विनायक प्रभू

Permalink

सल्ला

सल्ला इतकाच की, पोरगी आपल्या अपेक्षेप्रमाणे वागेल ही अपेक्षा सोडून द्या म्हणावं! तिला जसं जगायचं तसं जगू द्या...! जास्त डोक्याला ताप करून घेऊ नका म्हणावं! आणि पोरीला सांगा, तुझ्या आईबापाची काळजी तू घे. त्याकरता रिकामचोट मला येऊन पिडू नको. तू हायेस ना मोठी शाणी तिच्यायला? मग आईबापसाला सौताच काय ते उत्तर दे..! भेंचोत, खाणार सगळा गाव आणि निस्तरणार समुपदेशक? हा काय धंदा? :) बाझवला तिच्यायला! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 04/23/2009 - 10:40

In reply to सल्ला by विसोबा खेचर

Permalink

+१

तात्यांच्या प्रतिसादातले काही शब्द वगळता या प्रतिसादाशी अगदी सहमत. पुणे-सातारा रस्ता किती सुंदर असला तरी रेल्वेगाडी त्यावरून जाणार नाही. अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 04/23/2009 - 10:42

In reply to सल्ला by विसोबा खेचर

Permalink

भेंचोत,

भेंचोत, खाणार सगळा गाव आणि निस्तरणार समुपदेशक? हा काय धंदा? सर्व चर्चेतले सगळ्यात आवडलेले वाक्य !!! :) मास्तर, चालु द्या !! --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by काळा डॉन on गुरुवार, 04/23/2009 - 10:43

In reply to सल्ला by विसोबा खेचर

Permalink

समुपदेशन

समुपदेशन १ नंबर ! =)) आणि लगे हाथ मांडीवर गाईगाई करायचा रेट पण विचारुन घ्या.. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 04/23/2009 - 10:45

In reply to सल्ला by विसोबा खेचर

Permalink

त्रास

पालकांना आहे. मुलीला अजिबात नाही. त्यांच्या समाधानाकरता गेली समुपदेशकाकडे. तुमचा सल्ला लय भारी.
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on गुरुवार, 04/23/2009 - 10:33

Permalink

तात्या इतके करण्यापेक्षा लग्न करुन बघा

मांडीवर डोक ठेवुन झोपी जाण्याचे तुम्ही विसरुन जाल.लग्नानंतर दगडावर पण डोके टेकले की आपोआप झोप येते.बघा हा उपाय करुन. खुप पैशे वाचतील. =)) खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on गुरुवार, 04/23/2009 - 10:45

In reply to तात्या इतके करण्यापेक्षा लग्न करुन बघा by वेताळ

Permalink

नाय बुवा!!

लग्नानंतर दगडावर पण डोके टेकले की आपोआप झोप येते.बघा हा उपाय करुन. लग्न केल्यानंतर दगडावर डोके टेकून झोपायची पाळी येते हे तात्याला कशाला सांगताय..... :) तो शहाणा.... लग्न न करता नुसतीच धमाल करतोय.... आणि लॉन्गटर्म पैशेही वाचवतोय..... विचारा त्याला की किती मैत्रिणींना दागिने घेऊन द्यायला लागलेत त्याला.... चांगली साडी कधीही दागिन्यांपेक्षा स्वस्तच पडते..... अहो खुळे की काय तुम्ही!!!! :)
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 04/23/2009 - 10:52

In reply to नाय बुवा!! by पिवळा डांबिस

Permalink

चांगली

चांगली साडी कधीही दागिन्यांपेक्षा स्वस्तच पडते..... तसं नाय! एकदा एकीला लाडात येऊन एका तोळ्याची चेन देण्यापर्यंत खुळावलो होतो! छ्या! मांडीवर डोकं ठेऊन घटकाभर झोपण्याकरता चेन लईच महाग पडते राव! पण तेव्हा हे समजत नव्हतं. कोवळं वय होतं! ;) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by काळा डॉन on गुरुवार, 04/23/2009 - 10:59

In reply to चांगली by विसोबा खेचर

Permalink

मांडीवर

मांडीवर डोक ठेवुन झोपणारा वेडझव असतय म्हणतो मास्तर! :SS
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 04/23/2009 - 11:03

In reply to मांडीवर by काळा डॉन

Permalink

हो

आणि मुलीच्या भाषेत गलिबल फुल्स
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 04/23/2009 - 10:48

Permalink

नक्की

पिडां नी सांगितल्याप्रमाणे तात्या गलिबल ४०+ फुल नक्की नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 04/23/2009 - 10:52

Permalink

मास्तर, पण

मास्तर, पण मला एक प्रश्न पडला की आपली पोरगी वाया गेली हे पालकांना पोरीने सांगितल्यावरच कसे कळले ? घरात, बाहेर वावरतांना झालेला फरक लक्षात येत नाही का? की दिवस रात्र ते ही मिठ्या मारुन पडलेले असायचे? बाकी पत्ता द्या बरे... च्यामारी मी पण ४०+ च आहे... हिमालयातुन मम्मईला जात आहे.. भेटुन घेतो एकदा. बरेच दिवसांत झोपलो नाही कुणाच्या मांडीवर डोके ठेवुन :) --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 04/23/2009 - 10:55

Permalink

तुम्ही

माडीवर डोके टेवायचे पैसे मोजणारे वेड्झवे नक्की नाय हो.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 04/23/2009 - 11:04

Permalink

हे वाचुन

हे वाचुन येव्हडच कळल की नितीमत्ता, स्वतःची अक्कल , व्यक्तीस्वातंत्र्य वगैरे साले सगळे उगा वापरलेले भर भक्कम नावाचे मुखवटे ! शरीराची भुक भागवणे हेच खरे उद्दीष्ट ! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on गुरुवार, 04/23/2009 - 11:24

Permalink

या मुलीने

या मुलीने न-नैतीक "पवित्रा" घेतला आहे. तो केवळ रिकग्नाईज केला तर बाकी प्रश्न निकालात निघतात. चौकोनाला गोलात (किंवा गोलाला चौकोनात, तुम्ही ठरवा) बसवण्याचा प्रयत्न करण्यात अर्थ नसतो. हाच सल्ला, मला वाटते वेगळ्या शब्दांत, अदिती, विसोबा वगैरेनीही दिला आहे. आधी वाटले होते, धक्का बसणार नाही. पण धक्का बसला. वेगळाच. या मुलीची स्पष्टता सौम्य धक्कादायक ठरली. न-नैतीकतेचे तत्त्वज्ञान करण्याची तिची हातोटी तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. अर्थात, त्यासाठीही माझेच स्टिरिओटाईप्स कारणीभूत आहेत, असे माझे माझ्याविषयीचे वैयक्तिक मत आहे. ही कमेंट इतरांबाबत नाही. या मुलीची स्पष्टता आणि तिचा आयक्यू यांची सांगड मी तरी घालणार नाही. असल्या मोजपट्ट्या काळाच्या ओघात माणूसच बाद ठरवत असतो. डिसफंक्शन, डिसऑर्डर, रिबेलियन, केऑस थेअरी या केसमध्ये मांडता येत नाही, एका डॉक्टरला मांडता येऊ नये यातच सारे काही आले. या थेअरीज मानवी वर्तनाचे विश्लेषण करण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा ठरू शकत नाहीत. माणसाचे वर्तनही इव्हॉल्व्ह होत असते. थेअरीही इव्हॉल्व्ह व्हावी लागते. भविष्यातील अशा एखाद्या थेअरीसाठी ही मुलगी आणि हिच्यासारखे इतर अनेक जण आजच पायाभरणी करताहेत. एक केस म्हणून. त्याचे स्वागत करावयाचे की नाही ही वैयक्तिक निवड झाली. पण कुणी काहीही निवड केली म्हणून वास्तव बदलणार नाही. ते तसेच विकसीत होत राहील. बाकी बऱ्याच गोष्टी वाचल्यानंतर मलेशिया-सिंगापूर येथे कोठे तरी पॉर्न उद्योगात असणाऱ्या एका भारतीय हिरॉईनची एका टॅब्लॉईडमध्ये आलेली मुलाखत आठवली. त्यात ती मुलगी म्हणतेच, "त्या चित्रपटांव्यतिरिक्त मी इतर कोणाहीसोबत आजवर झोपलेले नाही. सामान्य मुलीप्रमाणेच मलाही माझे घर, संसार या गोष्टी हव्याच आहेत." त्या मुलीलाही आपल्याला असा जोडीदार मिळेल याची खात्री होती. पाहणीतील काही घटना असे दाखवतात की, हो असे जोडीदार मिळतात. कसलीही उदात्तता न ठेवता, केवळ त्या जगण्यासाठीची साथ या भावनेतूनही अशा जोड्या जमल्या आहेत. टिकल्या आहेत. कारण अखेर, ही जी साथ असते ती शरिरापुरती नाही आणि त्यावरून साथीची निष्ठा ठरवता येत नसते, हे अशा दोन व्यक्तींनी स्वीकारले तर बाकी प्रश्न येतात कुठे त्यांच्यालेखी? ते कधीच निकालात निघालेले असतात. आपण मारे नैतीक-अनैतीक, कोणी साथीदार मिळेल की नाही याच्या चर्चा करत राहतो, ते जगतात, जगण्यातील सुख-दुःखं झेलतात. पुढे जातात. वेल, ऑल टूगेदर, दीज थिंग्ज मे नॉट मेक अ सेन्स टू मी, ऑर अस; बट दे आर देअर फॉर शुअर. अॅटलीस्ट ऑन फेसव्हॅल्यू.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 04/23/2009 - 11:31

In reply to या मुलीने by श्रावण मोडक

Permalink

+१

श्रावण, मला काय म्हणायचं होतं हे मलाच नीट कळत नव्हतं (आणि म्हणून मांडता येत नव्हतं). तुमचा प्रतिसाद वाचून ते लगेच समजलं. अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 04/23/2009 - 11:50

In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

२+

मी पण सहमत. वेल सेड भौ
  • Log in or register to post comments

Submitted by दिगम्भा on गुरुवार, 04/23/2009 - 12:46

In reply to २+ by विनायक प्रभू

Permalink

+१

फार धक्का बसण्यासारखे वाटले नाही. हल्ली बहुतेक मुलां/मुलींचे विचार असेच असतात असे वाटते, वर्तनात फरक असू शकेल तो सुद्धा "जनाची" कमीजास्त वाटेल तेवढ्यापुरता. असेच सगळे एखाद्या पुरुषाने म्हटले व केले असते तर कदाचित एवढी टीका झाली नसती. खरे तर बरेचसे (अधिकाधिक वरच्या पदावर नोकरी करणारे) पुरुष/स्त्रिया बौद्धिक वेश्याव्यवसाय करत असतात असे माझे मत आहे. आणि कधीकधी तो शरीर विक्रयापेक्षा कितितरी वाईट व अप्रामाणिक असतो. श्रावण, अदिती, तात्या यांच्याशी सहमत. - ३५५/११३ दिगम्भा
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on गुरुवार, 04/23/2009 - 12:51

In reply to या मुलीने by श्रावण मोडक

Permalink

या थेअरीज

या थेअरीज मानवी वर्तनाचे विश्लेषण करण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा ठरू शकत नाहीत. माणसाचे वर्तनही इव्हॉल्व्ह होत असते. थेअरीही इव्हॉल्व्ह व्हावी लागते.
आम्ही बी हेच म्हंतो. आंतरजालावरील आयड्यांच्या वर्तनाचे विश्लेषणाबाबत देखील हे खरेच आहे. कारण ती माणसेच आहेत.
कसलीही उदात्तता न ठेवता, केवळ त्या जगण्यासाठीची साथ या भावनेतूनही अशा जोड्या जमल्या आहेत. टिकल्या आहेत. कारण अखेर, ही जी साथ असते ती शरिरापुरती नाही आणि त्यावरून साथीची निष्ठा ठरवता येत नसते, हे अशा दोन व्यक्तींनी स्वीकारले तर बाकी प्रश्न येतात कुठे त्यांच्यालेखी? ते कधीच निकालात निघालेले असतात. आपण मारे नैतीक-अनैतीक, कोणी साथीदार मिळेल की नाही याच्या चर्चा करत राहतो, ते जगतात, जगण्यातील सुख-दुःखं झेलतात. पुढे जातात.
परस्परांच्या उपयुक्ततेच्या मुल्यांची चाचपणी सतत होत असते. जोड्या टिकणे हे त्यावर अवलंबुन आहे. हे उपयुक्ततामुल्य जेव्हा एकांगी होईल त्यावेळी देखील या जोड्या एक दुर गेल्या मुळे तुटतील. तसेच दोन्ही अंगाने जरी विचार केला व परस्परांचे उपयुक्तता मुल्यांचा निरोपयोग होउ लागेल अथवा ते मुल्य उपद्रवमुल्याकडे झुकु लागेल त्यावेळी देखील हेच घडेल. नंतर दुसर्‍या जोडीदाराच्या शोधात. पुढे पुन्हा हेच. हेच वास्तव जगण आहे. व्यवहार हाच आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on गुरुवार, 04/23/2009 - 17:44

In reply to या मुलीने by श्रावण मोडक

Permalink

एमोरॅलिटी (अ-नैतिकता)

या मुलीने न-नैतीक "पवित्रा" घेतला आहे. तो केवळ रिकग्नाईज केला तर बाकी प्रश्न निकालात निघतात. मी माझ्या पहिल्याच पोस्ट मधे या एमोरॅलिटीचा निर्देश केलेला आहे. इतक्या भीषण , झपाट्याने कालबाह्य होणार्‍या मूल्यांच्या या काळात , एकंदर निरागसता , honor या गोष्टींचे नव्या पीढीला वाटणारे महत्त्वदेखील खूप वेगाने संपुष्टात येत असावे काय ? ही मूल्ये आपल्या आयुष्यात चिरस्थायीच असतात असे माझे म्हणणे नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on गुरुवार, 04/23/2009 - 19:51

In reply to एमोरॅलिटी (अ-नैतिकता) by मुक्तसुनीत

Permalink

अवांतर

मुक्तसुनीतराव, अमॉरल - न नैतीक, इम्मॉरल - अनैतीक (हे माझे अर्थ). अ-नैतीक म्हणजेच न-नैतीक असे येथे तुमच्या म्हणण्याच्या आशयासंदर्भात लक्षात येते आहेच. तुम्ही जो निर्देश केला, तोच मी येथे थोडा अधिक स्पष्ट मांडला इतकेच. पण तिची 'न-नैतीक भूमिका/वैचारिक बैठक' आहे, असे माझे मत नाही. तिचा तो पवित्रा आहे असे माझे मत आहे. पवित्रा या शब्दाला मी अवतरणंही टाकली आहेत. हा पवित्रा तिच्या त्या उच्च आयक्यूचा परिणाम असू शकतो. हा आयक्यू असण्यासाठी वैचारिक बैठक हवीच असते, असे मला वाटत नाही. त्यामुळे अशा आयक्यूतून टोकाची तर्ककठोर भूमिका मांडण्याची क्षमता असू शकते. पण ती वैचारिक असेलच असे नाही. त्यामुळे ही भूमिका तर्काच्या चौकटीत न फेटाळण्याजोगी असते. चौकट तर्काऐवजी साधक-बाधक विचारांची असेल तर वेगळी मते संभवतात. श्रेयस काय आणि प्रेयस काय असा हा वाद आहे. प्रेयसच श्रेयस कसे. हे दाखवण्याची हातोटी त्या मुलीकडे आहे. ती तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. अर्थात, मी त्या हातोटीला फसणार नाही. पण केवळ ती मुलगी आहे म्हणून नैतीक-अनैतीकतेचे डोस पाजत बसणारही नाही. अतिअवांतर : आयक्यूच्या मोजणीच्या मापदंडांमध्ये सामाजिक भान हा मापदंड असतो का? कारण ते सापेक्ष असते. (मी रेल्वेत बसलो आहे) मला झाडं मागे पळताना दिसताहेत. मी बसलेली रेल्वे पुढे जाते आहे (झाडं आहेत तिथंच आहेत).
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 04/23/2009 - 12:41

Permalink

मास्तर;

मास्तर; वपुंचे "ऐक सखे " वाचल्यावर यातली बरीच उत्तरे मिळाली होती. आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी
  • Log in or register to post comments

Submitted by खालिद on गुरुवार, 04/23/2009 - 13:15

Permalink

उत्तर

प.पू.ह. भ. प. अयप्पास्वामी वेंकटसुब्रम्हण्यम यांचा एका वाक्यातील उपदेश याच काय तर सर्व प्रश्नांचे उत्तर देउन जातो "जगा आणि जगू द्या" याच तत्वज्ञानाचे निरूपण करताना पुढे ते म्हणतात, "प्रत्येकाने स्वतःचेच बघावे. दुसर्‍याचे बघायला गेल्यास आत्मप्रौढी अथवा न्यूनगंड निर्माण होउ शकतो."
  • Log in or register to post comments

Submitted by विसुनाना on गुरुवार, 04/23/2009 - 14:01

Permalink

जालिंदरबाबांच्या दरबारी

जालिंदरबाबा सध्या अशाच विद्रोही विचारांच्या, विस्तृतमनाच्या एका शिष्येच्या शोधात आहेत असे खात्रीलायकरित्या समजते. यापुढे तिने तिचा न-नैतिक पवित्रा टाकून आध्यात्मिक पवित्रा घ्यावा. सदर कन्यका त्यांची पट्टशिष्या म्हणून शोभेल आणि तिची (तिच्यासाठी आणि तिच्या पालकांसाठीही) योग्य त्या मार्गाने उन्नती होईल. म्हटलेच आहे ना - जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. तरी या सूचनेचा गांभिर्याने विचार व्हावा असा सल्ला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on गुरुवार, 04/23/2009 - 16:48

In reply to जालिंदरबाबांच्या दरबारी by विसुनाना

Permalink

राधेश्याम महाराज

=)) =)) तो मी नव्हेच मधील राधेश्याम महाराजाची आठवण आली. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by सँडी on गुरुवार, 04/23/2009 - 16:03

Permalink

कॅरॅक्टर?

कॅरॅक्टर? आवडले! सुर्‍याने भोकसुन मारणे काय आणि रिव्हॉल्वरने गोळ्या घातल्या काय? शेवटी खुन तो खुनच! फरक एवढाच की रिव्हॉल्वर धुवावी लागत नाही. अवांतरः प्रतिसादही आवडले! :) -सँडी काय'द्याच बोला?
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on गुरुवार, 04/23/2009 - 17:49

Permalink

मुलीचा

आयुष्याबद्दलचा विचार फारच एका टोकाचा आणि एकांगी वाटतो. पण समुपदेशकानी ही वेश्यावृत्ती मुलीच्या मनात आली कोठून याची विचारणा केली का ?आपन होऊन स्विकारलेली लाईफस्टाईल कदाचीत फार थोडक्या शेल्फ लाईफची असेल याची जाणिव तिला आहे का ? वेश्यावृत्ती ही लक्ष्य साध्य करण्यासाठी सोयीचा आणि जवळातजवळ असणारा मार्ग .(शॉर्टकट) हा मार्ग स्विकारला असेल तर हा मला त्या मुलीचा दुबळेपणा वाटतो.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 04/23/2009 - 19:34

In reply to मुलीचा by रामदास

Permalink

लेख

लेखावर चांगली चर्चा झाली. काही सुचना आणि सल्ले खरेच चांगले होते. छोटा डॉनची सुचना आवडली. कदाचीत जे डॉक्टर करु शकले नाहीत ते ही चर्चा वाचून मुलीला योग्य निर्णय घेण्यास उद्युक्त करेल.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on गुरुवार, 04/23/2009 - 19:44

In reply to मुलीचा by रामदास

Permalink

शॉर्टकट

वेश्यावृत्ती ही लक्ष्य साध्य करण्यासाठी सोयीचा आणि जवळातजवळ असणारा मार्ग .(शॉर्टकट) हा मार्ग स्विकारला असेल तर हा मला त्या मुलीचा दुबळेपणा वाटतो
शॉर्टकट मारणे ही भावना तात्विक नसेल पण व्यवहारी आहे. सोयीचा व जवळचा मार्ग निवडणे हे लांबचा व खडतर मार्ग निवडण्यापेक्षा साहजिक आहे. पत्रकार भवन मधे कार्यक्रमात एकदा अशीच चर्चा चालू होती. माझा प्रश्न होता कि एखाद्याने अर्थाजनासाठी आपली बुद्धीमत्ता भाड्याने देणे वा एखादीने आपले शरीर वापरण्यासाठी भाड्याने देणे यात हेतुत फरक काय? एक जण आपली बौद्धीक संपदा वापरतो तर दुसरी शारिरिक संपदा वापरते / तो . पहिल्याला समाजमान्यता आहे दुसर्‍याला नाही. पण समाजात मान्यता नसली तरी ती गोष्ट समाजात आहे. कारण ती समाजाची गरज आहे. त्या मुलीच्या आयुष्यातील पुढील घटना ठरवतील कि तिचा निर्णय योग्य होता कि नाही. खर तर नैतिक अनैतिक कल्पनाच सापेक्ष आहेत. समाज मनाला ही बाब खटकते हे मात्र नक्की. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by मन्जिरि on गुरुवार, 04/23/2009 - 21:24

Permalink

धक्कादायक

बापरे,किति महाभयानक आहे कुथे था॑बणार हे सर्व ?पुर्वि वाटायच ज्या घरात आइ वडिला॑चे स॑बध निट नस्तात्/अति श्रिम॑त घरात असे असु शकते पण भ्रमच निघाला
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on गुरुवार, 04/23/2009 - 22:12

Permalink

+१

मंजिरीशी सहमत. भयंकरच आहे सगळं! कुठे आणि कधी थांबणार देव जाणे! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on गुरुवार, 04/23/2009 - 23:55

Permalink

लेखापेक्षा चर्चेने

सध्या बोलती बंद आहे !!! एक नक्की की आय.क्यू.१६५ वगैरेला काही अर्थ नाही. तिच्या वागण्याचे भविष्यात बरे/वाईट जे काही परिणाम असतील त्यांचा तिलाच (सर्वाधिक) फरक पडणार आहे. आपल्या प्रत्येक निर्णयावर पुढच्या अनेक घटना आणि त्यांचे परिणाम अवलंबून असतात. त्या मुलीचे जे होईल ते माहिती नाही पण तिच्या आईवडिलांसाठी मात्र नक्की वाईट वाटतंय. त्यांची काही चूक नसताना फक्त तिचे आई-वडील आहेत म्हणून त्यांच्या मनाची फरपट. 'त्रास करून घेऊ नका' असं सांगण्याइतकं सोपं नक्कीच नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 04/24/2009 - 00:01

In reply to लेखापेक्षा चर्चेने by संदीप चित्रे

Permalink

'त्रास

'त्रास करून घेऊ नका' असं सांगण्याइतकं सोपं नक्कीच नाही. सोपं नक्कीच नाही, पण दुसरं तरी त्यांना काय सांगणार? मुलीला जसं जगायचं तसं जगू दे की! तिच्या मर्जीने, तिच्या खुशीने! तात्या.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com