नेहमी बर्यापैकी वापरातल्या खाद्य पदार्थात (आधुनिक वैद्यकशास्त्राच्या दृष्टीने) समस्या असू शकते याची सहसा कल्पना नसते. मागच्या वर्षाभरात मी अभ्यासलेले म्हणजे जायफळ, सुगंध आवडत असेल तर चंदना सोबत उगाळून पदार्थाच्या बाजूला ठेवावे पदार्थात टाकू नये.
असेच गेल्या दोनचार वर्षा पासून हलके हलके कानावर पडायला लागले ते कडू दुधी भोपळ्याबद्दल. दुधी भोपळा माझ्या विशेष आवडीचा नाही पण क्वचीत भाजी किंवा कोशिंबीर (रायता) या प्रकारात खाण्यात येत असतो. अलिकडे गुजराथी हांडवा प्रकारातूनही दुधी वापरला. मी कमी खात असलो तरी माझ्या वडीलांच्या अयुष्यभर सातत्याने दुधी खाण्यात राहीला त्यांना कधी समस्या आल्याचे पाहिले नसल्याने काही भ्रांती असेल असे समजून नजरे आड करण्याकडे कल होता पण या आठवड्यातून परिवारातून पुन्हा दुधी खाऊ नका असे निरोप आले म्हणून थोड्यावेळापुर्वी आंजावर अभ्यासले तर कडू दुधीभोपळा त्यातील Cucurbitacin या रसायनातील विशीष्ट घटक प्रमाणाबाहेर झाल्यास टॉक्झिक अनारोग्यकारक ठरू शकतो असे दिसते.
वृत्तांवरून गंभीर समस्या जास्तकरून दुधीच्या ज्यूस घेणार्यांना अधिक येत असण्याची शक्यता वाटते. समस्या खरे म्हणजे केवळ दुधीभोपळ्याबद्दल मर्यादीत नसून काकडी वर्गीय भाज्या ज्यात कारले ते टरबूज वर्गीय फळ(भाज्यांचा) समावेश असावा. इंग्रजी विकिपीडियातील Cucurbitacin लेखातील माहिती बरोबर असेल तर अगदी चांगल्या भाजीबियांची पेरणी केली तरी कडू भाजी सोबत मिश्र परागिकरण (क्रॉस पॉलीनेशन) झाले तरी चांगल्या काकडी वर्गीय पिकांचेही कडू पिकात रुपांतरण होऊ शकावे. अर्थात इतर कारणांबद्दलही शास्त्रीय अभ्यासाची गरज असावी.
तुर्तास आमच्या परिवार कडू दुधी भोपळ्याच्या भितीने ग्रस्त होण्याची बरीच शक्यता आहे पण या वर्गातील सगळ्याच भाज्या कशा टाळता येतील हा प्रश्न माझ्या डोक्यात घोळतो आहे. लाल भोपळा गेल्या दोन चार वर्षापासून आहारात समावेश केला आहे. कारले तसेही कडू असते त्याचे विषारी होण्या इतपत कडूपण कसे ओळखावे की कारले विषारीच असते अशा प्रश्नांची आधूनीक शास्त्रीय माहिती प्राप्त होण्याची गरज असावी.
कडू काकडी सहज लक्षात येते पण कडू नसलेला दुधीभोपळाही तसा बेचव प्रकार असल्याने दुधी भोपळा वापरण्याच्या आधी चव घेऊन बघीतले जाणे सहसा होत नाही पण मुलतः विकत घेतानाच न चिरलेला दुधी भोपळा कडू असल्याचे कळण्याच्या काही विश्वासार्ह युक्ती आयडीया आहेत का? किंवा दुधी भोपळा चिरल्यावर तो कसा तपासता येईल.
* चर्चेत कृपया आधूनिक शास्त्रीय किंवा स्व अनुभवाधारीतच माहिती देण्यावर कटाक्ष ठेवावा.
* निव्वळ ऐकीव माहिती शेअर करण्याचे टाळण्यासाठी अनेक आभार. आयुर्वेद धाग्याचा मुख्य विषय नाही त्यामुळे आयुर्वेद प्रतिसाद अगदीच आवश्यक असल्या शिवाय टाळण्यासाठी अनेक आभार
* शुद्ध लेखन चर्चा आणि अवांतर टाळण्यासाठी अनेक आभार.
वाचने
11948
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
समस्त महाराष्ट्राचे भावोजी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Muza - Noya Daman (ft. Tosiba & Meem Haque) | Official Lyric Videoनिसटलेल्या गोष्टी आणि सुरस कथा.
खिरे,दुधी भोपळा किंवा
In reply to निसटलेल्या गोष्टी आणि सुरस कथा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत.
In reply to खिरे,दुधी भोपळा किंवा by आग्या१९९०
हे कसं जमवायचं ?
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मग ते पैसे दान गेले म्हणत
In reply to हे कसं जमवायचं ? by सौन्दर्य
खरे आहे तोच काय तो मार्ग
In reply to मग ते पैसे दान गेले म्हणत by जेम्स वांड
प्रा. डॉ. सरांनी आमची आठवण
In reply to निसटलेल्या गोष्टी आणि सुरस कथा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्वतःचा अनुभव सांगतो. ही कडवट
"थोडक्यात, पहिल्या घासाला
In reply to स्वतःचा अनुभव सांगतो. ही कडवट by मनो
वेलवर्गीय भाज्यांना कसदार
शास्त्रीय आधार?
In reply to वेलवर्गीय भाज्यांना कसदार by आग्या१९९०
शास्त्रीय प्रयोगाधारीत
In reply to शास्त्रीय आधार? by माहितगार
..कि मी वर नोंदवलेला
In reply to शास्त्रीय प्रयोगाधारीत by आग्या१९९०
मागच्या वर्षाभरात मी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Madhura Nagarilo... :- Pelli SandaDनक्की काय अभ्यास केला ?
त्यातील रासायनीक घटक आणि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Madhura Nagarilo... :- Pelli SandaDउगाच कशाला
In reply to त्यातील रासायनीक घटक आणि by मदनबाण
toxicचा परिणाम सर्वांवर होत
In reply to उगाच कशाला by माहितगार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Madhura Nagarilo... :- Pelli SandaDहम्म
In reply to उगाच कशाला by माहितगार
Toxic - विषाक्त
जनावरांनी वेलींना तोंड लावले
भाजी विकणारे
केवळ वर्णनावरुन नेमके लक्षात
In reply to भाजी विकणारे by कंजूस
स्थानिक भाजीवाले
In reply to केवळ वर्णनावरुन नेमके लक्षात by माहितगार
कडू दुधी पण
In reply to स्थानिक भाजीवाले by कंजूस
फोटो
मल्याळम शेती