आपण बऱ्याचदा सिनेमामध्ये पहातो कि रुग्ण चालता चालता अचानक कोसळतो, हॉस्पिटलमध्ये तिथला स्टाफ आपले सारे कौशल्य पणाला लावून प्रसंगी विजेचे झटके देऊन रुग्णाला परत सचेतन करतो. एखादी व्यक्ती कोसळते तेव्हा सुरुवातीची काही मिनिटे खूप महत्त्वाची असतात अस ऐकून आहे, पण हे सार फक्त सिनेमातच असत असा अनुभव आजवर दोनदा घेतला आहे.
प्रसंग १:
आमच्या मातोश्री (वय वर्ष ६८) दोन दिवस gas सारखा त्रास होतो आहे अस सांगत असल्याने त्या अनुषंगाने घरगुती उपाय चालू होते. दोन दिवसात काही फरक पडेना तेव्हा डॉक्टरांकडे बोलावणे धाडले, त्यांनी ब्लड प्रेशर तपासले, ते नॉर्मल होते. मग रक्तातील साखर तपासली ती पण नॉर्मल होती, म्हणाले कि हॉस्पिटलमध्ये नेऊन संपूर्ण तपासणी करूया. त्याप्रमाणे त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो जिथे तिचे उपचार चालू होते, जाताना आई स्वतःच्या पायाने चालत गाडीत बसली पण हॉस्पिटलमध्ये पोहचल्यावर ती म्हणाली कि गुडघे भरून आले आहेत, व्हील-चेअर आण मग तिला व्हील-चेअरवर बसवून आत नेले. थोड्यावेळाने तिथले डॉक्टर आले म्हणाले यांची पल्स लागत नाही आहे बहुतेक या गेल्या आहेत. आता काय करावे सुचेना, त्यांना म्हटले कि अहो आता आमच्याशी बोलत आत आली आणि तुम्ही म्हणताय गेली, तुम्ही जरा ते विजेचे झटके देऊन पहा ना, तर म्हणे थोडीशी पल्स असती तर झटके दिले असते, पण त्या आता गेल्या आहेत, तुम्ही पाहिजे तर डेथ सर्टिफिकेट घ्या नाहीतर दुसरीकडे घेऊन जा. आणि जर इथून असेच घेऊन गेलात तर आम्ही डेथ सर्टिफिकेट देणार नाहि.
प्रसंग २:
आमचे वडील (वय वर्ष ७९) आमच्या बरोबर गावाच्या जत्रेला जाऊन आले होते. आल्यानंतर थोडा थकवा जाणवतो आहे अस म्हणत होते. आम्ही देखील प्रवासाच्या दगदगीचा त्रास असेल या निकषाला ग्राह्य मानून शांत होतो. दुसर्या दिवशी ते बसल्या जागे वरून उठेना म्हणून डॉक्टरांकडे बोलावणे धाडले, त्यांनी ब्लड प्रेशर तपासले, ते नॉर्मल होते. मग रक्तातील साखर तपासली ती पण नॉर्मल होती, या वेळेस देखील म्हणाले कि हॉस्पिटलमध्ये नेऊन संपूर्ण तपासणी करूया. या वेळी गाडीत आमच्याशी बोलता बोलता बाबा अचानक घोरायला लागले, पण आम्ही आवाज दिला कि सावध होत होते, पण हॉस्पिटलमध्ये पोहचता पोहचता ते गाडीत आडवे झाले. आम्ही गाडी आपत्कालीन सुविधाच्या दरवाज्यात घुसवली, भाऊ धावत गेला आणि म्हणाला कि emergency आहे, तर तिथला स्टाफ हलत डुलत ५ मिनिटांनी स्ट्रेचर घेऊन आला, आणि परत आमचे खाजगी वाहन असल्यामुळे स्ट्रेचरवर चढवायला पुढची १० मिनिट घालवली. आत गेल्यावर पुन्हा तेच यांची पल्स लागत नाही आहे बहुतेक हे गेले आहेत. बाकी सगळी प्रश्नोत्तरे वरील प्रमाणेच.
आता सगळे म्हणतात कि Sudden Cardiac Attack मुळे दोघेही गेलेत, खरं खोट देवास ठाऊक.
मला फक्त इथल्या जाणकारांना एकच प्रश्न विचारायचा आहे कि Sudden Cardiac Attack ची लक्षणे मुळात कशी ओळखावी ?? आणि आपल्याकडे आशा व्यक्तीला वाचवायचा वेळ किती असतो किंवा असतो का??
कारण दोनही प्रसंगात दोघांच सार काही नॉर्मल होत, तरीही आज आम्ही पोरके झालो आहोत.
वाचने
10620
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
उपयुक्त माहिती
लक्षणे जाणवल्यानंतर साधारण एक
In reply to उपयुक्त माहिती by हेमंतकुमार
रुग्णसापेक्ष
In reply to लक्षणे जाणवल्यानंतर साधारण एक by तर्कवादी
डॉक्टर सरांशी सहमत.
In reply to रुग्णसापेक्ष by हेमंतकुमार
आमच्या आईचे निधन अशाच प्रकारे
मनो जी
वांडोबा, तुम्हाला मुद्दा
In reply to मनो जी by जेम्स वांड
ओके
In reply to वांडोबा, तुम्हाला मुद्दा by मनो
शेर भाई
झटका आपला येण्याचा इशारा सतत वेगवेगळ्या मार्गाने देत असतो
gas मुळे अस्वस्थ वाटत आहे हि
In reply to झटका आपला येण्याचा इशारा सतत वेगवेगळ्या मार्गाने देत असतो by शेर भाई
कुठलीही आरोग्य चाचणी नॉर्मल
In reply to gas मुळे अस्वस्थ वाटत आहे हि by सुबोध खरे
दु:खात सहभागी आहे.
काय उपाय ?
In reply to दु:खात सहभागी आहे. by कंजूस
उपाय.
In reply to काय उपाय ? by तर्कवादी
ओवा
In reply to उपाय. by कंजूस
ती वेळ अशी येते की . .
In reply to ओवा by सौन्दर्य
किती वेळ असतो
In reply to ती वेळ अशी येते की . . by कंजूस
रक्त फिरवण्याचे काम हार्ट करत असते.
In reply to किती वेळ असतो by शेर भाई
Golden Minuts
In reply to रक्त फिरवण्याचे काम हार्ट करत असते. by कंजूस
माहिती मिळेल का ??
In reply to दु:खात सहभागी आहे. by कंजूस
आपल्या दुःखात सहभागी आहे.
१० वर्षांपूर्वी ह्रदयातील दोन
मातृ-पितृ वियोगाने आपणास जे
मदनबाण.....
शिस्तबद्ध जीवन प्रणाली.....
एकंदरीन वेळ आल्यावर काहीही उपयोगी नाही
कॅारोनरी थ्रोम्बायसिस
ह्रदयविकार
असाही विचार करून पहा
विचार बरेच आहेत हो.........
In reply to असाही विचार करून पहा by स्वधर्म