Skip to main content

हिंदू कधी एकत्र येणार?

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 20/06/2021 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
रेफरन्स: राजा शिवछत्रपती, लेखक, बाबासाहेब पुरंदरे (पान क्रमांक, 54,55,56) गाभा एक आणि गोष्टी अनेक, आदिलशहाचा दरबार संपला. सरदार आणि शिलेदार मंडळी बाहेर पडत होती. नेमके त्याच गडबडीत, खंडागळे यांचा हत्ती पिसाळला आणि हत्तीला आवर घालायला, छत्रपती शिवाजी महाराज यांचे मामा पुढे सरसावले, तर हत्तीचे रक्षण करायला छत्रपती शिवाजी महाराज यांचे चुलत काका पुढे सरसावले... पुढे झालेल्या धुमश्र्चक्रीत, जाधव आणि भोसले घराण्यातील कर्ती मंडळी बळी पडली... ह्याच्या पण आधी, सिकंदरला साथ देणारे हिंदूच होते.मागच्या आठवड्यात देखील, शिवसेना भवन येथे हीच घटना घडली ... गेल्या अडीच हजार वर्षांपुर्वी जे होत होते, तेच आजही होत आहे... हिंदू कधी एकत्र येणार?

वाचने 69629
प्रतिक्रिया 209

प्रतिक्रिया

In reply to by गॉडजिला

बरं इतर धर्मानचा उगम भारतभूमीत झाला असता तर काही ना काही जुगाड मारून ते शेवटी हिंदूच असं तरी ठसवता आले असते पण आता तेही शक्य नाही...त्यामुळे जेवढ्या लवकर शहाणपण येईल तेव्हडे बरे असे म्हणण्या खेरीज अन्य काहीच तूर्त शक्य नाही
तुमचा हा प्रतिसाद पाहुन आमच्या आधीच्या अनुमानाला दुजोरा मिळाल्याचा आनंद झाला . तुमची भाषा शैली आणि लेखनातील विचार पाहुन तुम्ही गट क्र. २ चे पर्फेक्ट रीप्रेझेंटेशन करता असे म्हणायचे होते . सारखं सारखं लिहित बसायचा कंटाळा आलाय , आता मी फक्त " २ " इतकाच प्रतिसाद देत जाईन आपल्या विचारसरणीच्या प्रतिसादांवर ! इत्यलम

In reply to by प्रसाद गोडबोले

हरकत नाही तुम्हाल आनंद मिळणार असेल तर हे वास्तव नसूनही स्त्रीहट्ट व बालहट्ट पुरवला पाहीजे या सवयीने मी आनंदाने वाचेन... कंटाळा करू नकोस, लिहते राहा...

असे आव्हान केले की संबंधित व्यक्ती ना ते बरोबर समजते.बरोबर सर्व हिंदू समाज एकत्र येतो. एकत्र येण्या अगोदर तो धर्म म्हणजे काय,हिंदू धर्म आहे का? असल्या फालतू प्रशांचे उत्तर शोधत बसत नाही. आपण कोणाशी जास्त जवळचे आहोत हे त्यांना बरोबर समजतो. धर्म म्हणजे काय,हिंदू म्हणजे कोण. हे असले प्रश्न फक्त अती विद्वान लोकांना पडतात. सामान्य लोकांना नाही

In reply to by Rajesh188

असे आव्हान केले की संबंधित व्यक्ती ना ते बरोबर समजते.बरोबर सर्व हिंदू समाज एकत्र येतो. एकत्र येण्या अगोदर तो..
इतर बाबींनी विखुरलेला असतो...

योग्य वेळी एकत्र येतो. उदा .९३ ची दंगल. जेव्हा हिंदू धर्मावर संकट येते तेव्हा सर्व विखुरलेला समाज एक होतो. धार्मिक बंधनात न राहता मत मांडण्याचा अधिकार,स्वतंत्र फक्त हिंदू धर्मात आहे .हिंदू हे हिंदू धर्मावर टीका करू शकतात त्यांना धर्मातून तीव्र विरोध होत नाही. बाकी धर्मात हे स्वतंत्र नाही. उदा. Tasleema. रश्दी. बाकी गुपचूप घडामोडी घडणाऱ्या खतरनाक धर्मा विषयी माहीत नाही. पण हिंदू आणि मुस्लिम हे दोनच धर्म कधीच काही लपवत नाहीत. जे असते ते स्पष्ट असते.

जग पालथे घातले असते तर त्यांना जगात इतरत्र काय चालू आहे ते नक्की समजले असते अन एक दिवस खाडकन मुस्काटात मारून झोपेतून जागे केल्याप्रमाणे अवस्था झाली नसती... आजही हिंदूंनी स्वतः चा निष्पक्ष अभ्यास करायची तयारी केली तर ते कोणत्याही आक्रमणाला तोंड द्यायला सिद्ध होऊ शकतात.. (काही बालगोपाळ आम्हाला नक्कीच गट क्रमांक एक अथवा दोन असे काही लेबल चिटकवतील, त्यांचे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणून स्वागत करत आहे)

इस्लामिक ट्रस्टकडून शेकडो हिंदू मुलींचे धर्मांतर, पोलिसांच्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासा https://www.lokmat.com/national/conversion-hundreds-hindu-girls-islamic…

https://www.esakal.com/maharashtra/nilesh-rane-criticism-on-supriya-sul… कॉंग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष हिंदू हितवादी नाहीत, हे माझे वैयक्तिक मत आहे....

राम गणेश गडकरी पुतळा प्रकरण करणे किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणणे (अर्थातच भाजपात यायच्या अगोदर) हे पण त्यांची हिंदूंच्या विषयी असलेली कळकळ मानावी काय ? कारण आजतागायत त्यांनी त्या विषयात माफी मागितलेली ऐकिवात नाही, का त्यांचा त्या त्या विषयातील स्टँड पक्षाला (हल्ली त्यांनी बस्तान मांडलेल्या पक्षाला) मंजूर आहे म्हणायचं ? का अखिल हिंदू एकत्रीकरण कार्यक्रमाला ब्राह्मणद्वेषाची झालर असलेली चालेल म्हणता ? जाता जाता ह्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं आली की एक हिंदू म्हणून मी तुमच्याशी जो बंधुभाव शेअर करतो तो द्विगुणित होईलच, हा हिंदू एकत्र येणारच, कारण जर हुकूमशाहीत जगण्याचा प्रश्न असला तर मी कधीही एखाद हिंदू हुकूमशाहीच प्रेफर करीन ! (कन्फ्युज द्विज ब्राह्मण) वांडो. स्वाभिमानी कर्तृत्व

In reply to by जेम्स वांड

त्यामुळे, अशा गोष्टींवर मी वाद घालत नाही .... उडदामाजी काळे-गोरे असायचेच, काळे उदीड पण आपलेच असतात...

In reply to by कपिलमुनी

पण, जातीभेद पाळणारे आणि आडनावा वरून माणसाची पारख करणारे, अशा लोकांपासून मी जरा दूरच राहतो ....

In reply to by मुक्त विहारि

पण, जातीभेद पाळणारे आणि आडनावा वरून माणसाची पारख करणारे, अशा लोकांपासून मी जरा दूरच राहतो .... >> +१ जन्मावरुन ज्या वेळी वर्ण सुरु झाले त्या वेळेपासुनच हिंदु धर्माची अधोगती चालु झाली.

In reply to by मुक्त विहारि

विषय वेगळा नाहीए ना हो खरंच, बघा म्हणजे मी प्रयत्न करतो तुम्हाला समजेल मला काय म्हणायचं आहे ते, शेवटी काय आपण दोघे साधी माणसे, म्हणजे बघा सिम्पल आहे, आमचे मुवि किंवा आम्ही बसणार हिंदू तेतुका मेळवावा टाईप कढ काढत, पण जर त्या मोबदल्यात, त्या सदिच्छेच्या अगेंस्ट मला फक्त "धूर्त भटूरडा" "कृष्णाजी भास्करची औलाद" "बामने सगळे हलकटच" ऐकायला मिळत असेल, किंवा दरेक बाधक घटनेचे पडसाद अन कार्यकारणभाव माझ्या जातीशी जोडताना दिसत असले तर

मी का हिंदू सगळे एकत्र करण्याचे काम करू ?

हा धर्म ब्राह्मणेत्तर हिंदूंचा पण आहे न ? मग घ्यावे की त्यांनीही तितकेच यत्न धर्मरक्षणाला, धर्मसाठी कळकळ बाळगून जर शेवटी मला जातीशी संलग्न विखारच मिळणार असेल तर मी किती दिवस हा व्यस्त व्यवहार चालवायचा अन का ? मी का माझे ब्राह्मणी संस्कार अन आयडेंटिटी जपत ज्यु लोकांप्रमाणे स्वतःची वांशिक ओळख बनवून जपू नये ? कारण एवीतेवी आजकाल ब्राह्मणांचे शिरकाण (ज्यूंचे झाले होते तसे) करायच्या कामना तर रोजच ऐकायला मिळतायत ना

In reply to by जेम्स वांड

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच... खूद्द छत्रपती शिवाजी महाराज, यांना देखील, त्यांच्या नातेवाईकांनी कूठे मदत केली? छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून देण्यात, गणोजी राजेशिर्के यांनी मदत केली.. चुका दोन्ही बाजूंनी झाल्या आहेत... आता तीच चूक परत परत किती वेळा करायची? इतिहास मला एक गोष्ट सांगतो की, विजयनगर साम्राज्य नष्ट झाले, देवगिरी नष्ट झाली, ... आता तरी आपण एकत्र यायला पाहिजे...

In reply to by मुक्त विहारि

मुविंसाठी हिंदू असणे म्हणजे एखादी विचारधारा असणे नसावे. जन्मलेला हिंदू म्हणजे हिंदू, किंवा शिक्का बदललेला हिंदू म्हणजे हिंदू. मग तो हिंदूनमधल्या सबग्रुपचा द्वेष का करत असेना- तो हिंदूच.

In reply to by कॉमी

एखाद्या जातीचा सरसकट द्वेष करणारे, आज किंवा उद्या बदलतील किंवा बदलणार नाहीत .... पण, पाकिस्तान आणि बांगलादेश, मधील घटते हिंदू बघता, मी तरी जाती-भेदात अडकू शकत नाही ....

In reply to by मुक्त विहारि

जातीभेदाच्या बंधनात न अडकण्याचे "ऑप्शन" नाही ना आमच्याकडे, कारण ब्राह्मण म्हणून आम्ही कितीही जातीभेद पाळत नसल्याचे कंठशोष करून ओरडलो तरीही आम्ही तो पाळत नाही ह्यावर ब्राह्मणेतर हिंदू बांधव भरवसा ठेवत नाहीत ना ! एका कृष्णाजी भास्कर, मंबाजीच्या मागे एक मुरारबाजी देशपांडे अन एक बाजीराव पेशवे असल्याचे मान्य नाही लोकांना, दादू कोंडदेव (उच्चारी विखार ब्राह्मणेत्तर पद्धतीचा) अन गडकरी मंजूर नाही लोकांना. आपण मला सांगावेत मी ब्राह्मण म्हणून किती दिवस ह्या स्वप्नात जगावे ? नकोय आपण इतर जातीय लोकांना हे वास्तव आहे का नाही ?

In reply to by जेम्स वांड

जातीभेदाच्या बंधनात न अडकण्याचे "ऑप्शन" नाही ना आमच्याकडे
दुर्दैवाने खरे आहे. "बामना" विरुद्ध चा द्वेष शहरांपेक्षा खेड्यांत जाणिवपुर्वक जोपासला जातोय.

In reply to by जेम्स वांड

शहरात कमी आहे असेही समजणे खूपच मोठ्ठा गैरसमज असेल सर.
तुम्ही म्हणता तसेही असेल पण शहरात तो इतका प्रकर्षाने जाणवत नाही हे खरे. कदाचित धकाधकीच्या वातावरणात आपल्याला तितके निरिक्षण करायला वेळ नसेल असेही असू शकेल. मात्र टोकदारपणा कमी असावा.

In reply to by जेम्स वांड

वैयक्तिक अनुभव दोन्ही प्रकारचे मिळाले... पण, इतर जातीतल्या मित्रांचे सकारात्मक अनुभव जास्त मिळाले. विशेषतः सर्वांगीण वाचन करणारे, वैयक्तिक पातळीवर आणि सामाजिक पातळीवर जातीभेद मानत नाहीत.....हाच अनुभव आला ...

In reply to by मुक्त विहारि

आपण हिंदू एकतेबद्दल तर वैयक्तिक पातळीवर नाही चर्चा करत आहोत ना. आपण सम्यक विचार करतोय, नाहीतर "वैयक्तिक" विचार करता १९४७, १९७१ इत्यादी काळातच ज्या हिंदूंनी पाकिस्तान अन बांगलादेशात राहायचा आत्मघातकी निर्णय घेतला त्यांच्या लोकसंख्या वाढो का कम होवो आपल्यास तोषीस लागण्याचे कारण नाही ना. सम्यक पातळीवर मुटके सर म्हणतात तसेच चित्र आहे. @ धर्मराज मुटके सर, शहरे म्हणजे जर मुंबई पुणे म्हणत असाल तर दैनंदिन जीवन धकाधकीचे असल्यामुळे ब्राह्मणद्वेष जाणवत नाही, पण इतर शहरे पक्षी अगदी नाशिक, नागपूर, औरंगाबाद टाईप शहरांत पण हा प्रकार जोरात जाणवतो. संघटनांची नावे मी लिहीत नाही पण कित्येक जातींच्या संघटना ह्या आपापल्या मेळावे अधिवेशनात असा स्टँड क्लिअर घेत असतात, कधी कधी वाटते ब्राह्मण असे नेमके काय चुकत असावेत बरे ? पण असो, तूर्तास प्रश्न इतकाच आहे की अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उमटायला सुरुवात व्हायच्या ह्या काळात ब्राह्मण लोकांनी तरी हिंदू एकता, धर्मरक्षण, नीतिमत्ता, राजकारण इत्यादी सारखी बिनफायद्याच्या बाळंतपणात सुईण असल्याची भूमिका का अन कश्याला वठवावी ?

In reply to by जेम्स वांड

खिळ्या साठी नाल गेली, नालेपाई घोडा गेला घोड्यापाई स्वार गेला अन् स्वारापाई राज्य गेले मी तरी असा खिळा होऊ इच्छित नाही ... शिवाय, असा जातीद्वेष करणार्या माणसांमुळे, माझे आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांचे काहीही नुकसान झाले नाही. जातीभेद पाळणारे, स्वतःचेच मानसिक आरोग्य, खराब करत असतात.

In reply to by मुक्त विहारि

असं नाही पण नम्रपणे सांगू इच्छितो की हा तुम्हाला वैयक्तिक आलेल्या अनुभवांचा प्रश्न नाही ना सर, प्रश्न वैयक्तिक नाही ना पण, विस्मरण झाले असल्यास आदरपूर्वक आठवण करून देऊ इच्छितो की विषय आहे

हिंदू कधी एकत्र येणार?

आय होप तुम्ही आता तरी समजून घ्याल

In reply to by जेम्स वांड

ब्राह्मण विरुद्ध इतर हा विषयच धारदार मुळात. त्यात मागच्या १००/१२५ वर्षांपासून हळूहळू हे बीज फोफावत गेलंय. नंतर आपल्या राजकीय पक्षांनी फोडा आणि राज्य करा ही नीती पुन्हा पुन्हा वापरली आणि हा आता विषवृक्ष झालाय. असो. ब्राह्मण असल्यामुळे असे अनुभव जाणवले आहेत हेही खरंय. अवांतरः श्री गोंदवलेकर महाराजांनी यावर एक सुंदर भाष्य केलंय. त्यांना जेव्हा कुणी विचारलं की हा विषय कसा संपेल, तेव्हा ते म्हणतात - "ब्राह्मणांनी अभिमान सोडावा आणि ब्राह्मणेतरांनी द्वेष. यानं हा विषय संपण्यास मदत होईल."

In reply to by राघव

"ब्राह्मणांनी अभिमान सोडावा आणि ब्राह्मणेतरांनी द्वेष. मराठी मनात कायम ब्राह्मण द्वेष पसरवणारी असे अनेक लांडगे,कोल्हे, तरस...इ.इ.इ यांची कमी नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Muza - Noya Daman (ft. Tosiba & Meem Haque) | Official Lyric Video

In reply to by जेम्स वांड

वांड साहेब आपल्या यातना उद्वेग आणि त्यामागची कारण मीमांसा समजते आहे ... खास करून महाराष्ट्रात ... कौरव पांडव यांचे बाहेरील आक्रमण आले तर १०५ असे काहीसे आहे हे.. तेवहा आपण "हिंदू काज" पासून फार दूर जाणार नाही अशी अशा करतो ... एक समांतर उदाहरण देतो हिंदू शीख या बद्दल पण माझे असेच मत आता झालया .. मी जमेल तिथे शिखांना आपण भाऊ आहोत , हिंदूंचा द्वेष का क रता,, आम्हाला तुम्ही जवळचे असे विचार मांडण्याचा प्रयत्न केले आंतरजालावर .. पण त्यांच्यातील हिंदून विषयी द्वेष सध्या तरी वाढलेला दिसतोय ?( कृषी आंदोलन संदर्भात म्हणतोय) त्यामुळे मला हि " खड्यात गेली ती हिंदू शीख एकता " असे वाटायला लागलय ..

बाकी, पॉप्युलेशन एक्सप्लोजनचे आंशिक का होईना, मिथबस्टिंग झाले आहे. कोणत्याही जोरजबरदस्तीच्या लोकसंख्या नियंत्रण कायद्याची आवश्यकता नाही हे स्पष्ट झाले आहे. https://www.google.com/amp/s/www.indiatoday.in/amp/india/story/india-fe…

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ज़रूरी तो नहीं के शायरी वो ही करे जो इश्क में हो, ज़िन्दगी भी कुछ ज़ख्म बेमिसाल दिया करती है।

हिंदू कधी एकत्र येणार?
सद्यस्थितीत तरी कधीही नाही. एकत्र येण्यासाठी काहीतरी साम्य असावे लागते. त्यानंतर एकत्र येण्याची शक्यता निर्माण होते. मुळात हिंदू कुणाला म्हणावे याचेच सर्वमान्य निश्चित निकष नाहीत. कुणीतरी (योगी आदित्यनाथ?) पुढाकार घेऊन काही निकष ठरवले, ते सर्व हिंदूंनी मान्य केले, ते सर्व हिंदूंवर बंधनकारक केले, त्या निकषांची परिपूर्तता करणाऱ्यांना काही बक्षीस दिले, न करणाऱ्यांना पुरेशी शिक्षा दिली तर हिंदू ज्या उद्देशासाठी एकत्र यायला हवे आहेत ते साध्य होण्याची शक्यता निर्माण होईल. तोपर्यंत... चर्चा करत राहुयात.

In reply to by वामन देशमुख

सर, योगी आदित्यनाथ वगैरे स्वप्नरंजन ठीक आहे पण हिंदूंचे स्टॅंडर्डायजेशन म्हणजे नेमके काय ? ह्यावर थोडा डिटेल प्रकाश टाकता येईल का सर ? म्हणजे बघा बेसिक मध्ये फरक असलेले लोक पण हिंदू म्हणून एकत्र असतात द्वैतवादी-अद्वैतवादी, विविध गोत्र, तर कुठं अजून काही पूजा पद्धतीत फरक, कोणाच्या पूजनात मांसाहारी नैवेद्य, कोणाला कांदालसूण वर्ज्य, आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील घाटावरील देशस्थ, आमच्याकडे तांदळाच्या कण्यांची खीर फक्त श्राद्ध पक्षाच्या जेवणाला, तेच आमच्या बंधुराजांच्या दाक्षिणात्य ब्राह्मण सौभाग्यवतींच्या घरी शुभकार्याला तांदळाचे पायसम मस्ट. हे वानगीदाखल उदाहरण देतोय वैयक्तिक पण जर उद्या ह्यातलं एक स्टँडर्ड केलं तर दुसऱ्यानं कुठं जावं बोंबलत चुना लावत ? कारण अश्याने एका फटक्यात त्याचं हिंदुत्वच रद्द होईल की हो. मुळात एक देव एक पुस्तक पॅटर्नमध्ये हिंदू ढाळले तर मला वाटतं त्याहून मोठं दुर्दैव हिंदूधर्माचे दुसरे नसेल.

In reply to by जेम्स वांड

हा प्रतिवाद या चर्चेत / मिपावरील इतर कोणत्याही चर्चेत सहभागी झालेल्या कुणा विशिष्ट सदस्याचा उपमर्द करण्याच्या हेतूने लिहिलेला नाही. नमस्कार
सर, योगी आदित्यनाथ वगैरे स्वप्नरंजन ठीक आहे
अहो माझा अक्खा प्रतिसादच स्वप्नरंजन आहे. योगी आदित्यनाथ हे त्यातील केवळ एक प्लेसहोल्डर आहेत.
म्हणजे बघा बेसिक मध्ये फरक असलेले लोक पण हिंदू म्हणून एकत्र असतात
एकत्र असतात? कुठे असतात? १९४७ साली पाकिस्तानातल्या हिंदूंसोबत एकत्र होते? १९९० साली काश्मिरातल्या हिंदूंसोबत एकत्र होते? २०२१ साली पश्चिम बंगालातल्या हिंदूंसोबत एकत्र होते? हो, जिहादी मुस्लिमांकडून जाळपोळ, हत्या, बलात्कार, सर्वनाश करून घेण्यात कदाचित एकत्र असतील.
वानगीदाखल उदाहरण देतोय वैयक्तिक पण जर उद्या ह्यातलं एक स्टँडर्ड केलं तर दुसऱ्यानं कुठं जावं बोंबलत चुना लावत ?
पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, इराण येथील हिंदू जिथे बोंबलत चुना लावत गेलेत तिथे जावे.
अश्याने एका फटक्यात त्याचं हिंदुत्वच रद्द होईल की हो
अश्या असंख्य फटक्यांतून पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, इराण येथील हिंदूंचे, हिंदुत्वच नव्हे तर मनुष्यत्व रद्द झाले आहे.
मुळात एक देव एक पुस्तक पॅटर्नमध्ये हिंदू ढाळले तर मला वाटतं त्याहून मोठं दुर्दैव हिंदूधर्माचे दुसरे नसेल.
सामाजिक एकत्रीकरण करण्यासाठी धार्मिक एकत्रीकरण करणे आवश्यक असते हे हिंदूंनी इस्लामकडून शिकावे. हिंदूंचा देव एक आहे की तेहतीस प्रकारांचे देव आहेत, हिंदूंना देव आहेत का, हिंदू आस्तिक / नास्तिक राहू शकतात का आहेत ही चर्चा करण्यासाठी आधी हिंदूंना हिंदू म्हणून शिल्लक राहावे लागेल. शिल्लक राहण्यासाठी आधी एकत्र यावे लागेल... एकत्र येण्यासाठी काहीतरी साम्य असावे लागते. त्यानंतर एकत्र येण्याची शक्यता निर्माण होते. मुळात हिंदू कुणाला म्हणावे याचेच सर्वमान्य निश्चित निकष नाहीत. कुणीतरी (प्लेसहोल्डर) पुढाकार घेऊन काही निकष ठरवले, ते सर्व हिंदूंनी मान्य केले, ते सर्व हिंदूंवर बंधनकारक केले, त्या निकषांची परिपूर्तता करणाऱ्यांना काही बक्षीस दिले, न करणाऱ्यांना पुरेशी शिक्षा दिली तर हिंदू ज्या उद्देशासाठी एकत्र यायला हवे आहेत ते साध्य होण्याची शक्यता निर्माण होईल. तोपर्यंत... चर्चा करत राहुयात.

In reply to by वामन देशमुख

एकत्र येण्यासाठी काहीतरी साम्य असावे लागते. त्यानंतर एकत्र येण्याची शक्यता निर्माण होते. ---

In reply to by मुक्त विहारि

एकत्र येण्यासाठी काहीतरी साम्य असावे लागते. त्यानंतर एकत्र येण्याची शक्यता निर्माण होते.
एकत्र येण्यासाठी कोणीतरी समान शत्रुसुद्धा चालतो..

या " हिंदू कोण "असल्या व्याख्येत अडकून पाडण्यापेकशा ... सरळ याचे कडे एक सामाजिक प्रश्न म्हणून बहिताले तर , जो स्वतःला हिंदू समजतो आणि ज्याला देशात हिंदूंची उपेक्षा होऊ नये असे वाटतं असले तो हिंदू एवढे पुरे .. धार्मिक असलेच पाहिजे असे नाही ! हा फुकाचा वाद आणि चर्चा आहे ती टाळली तर उत्तम सर्वात महत्वाचे हे आहे कि १) भारतीय हिंदू हा असहिष्णू आहे वैगरे जो अप्र्रचर्र चालू आहे तो थांबवणे २) सर्वांनां सामान नागरी कायदा आणून कोणाचे हि लांगुनचालन थांबवणे आणि यातून देश उभारणी ला मदत करणे एवढया गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे जास्त महत्वाचे आहे मग तांदुळाची खीर मर्तिकाला कर्यायाची कि सणासुदीला हे गौण आहे असे वाटते स्वरकरांसारख्यानं बहुतेक हेच "हिंदुत्व" अभिप्रेत असावे असे राहून राहवून वाटते माझ्य सारखा अधार्मिक हिंदू ( मंदिरात जाणार नाही कदाचित पण मंदिर बांधण्याच्या हक्काला पाठिंबा ) सगळ्या प्रकरणाकडे केवळ एक सामाजिक प्रश्न म्हणून बघतो ... एकीकडे भारत हा सर्वधर्मसंभावी राहावा पण मुद्डमून हिंदूंची अवहेलना होऊ नये , खरा इतःस मुद्डमून पुसलं जातो आणि जात होता तो थांबवावा

In reply to by चौकस२१२

असं नाय, पण एकंदरीत पाहता हा वाद फुकाचा नाही, जात हे अनवॉन्टेड असेल पण आजही भारतीय हिंदू समाजाचे वास्तव आहे, ते नाकारून चालणार नाही तर डोळसपणे पाहून ठामपणे हँडल करावे लागणार आहे. असे मला ठाम वाटते, अनुभवांती.


In reply to by जेम्स वांड

फुकाचा या अर्थाने कि "आधी हिंदू म्हणजे काय ते ठरवा" असला ... त्यापेक्षा आहे तो हिंदू टिकवा असे .. जातीचा काही संधर्भ मला द्यायचा नव्हता

मुस्लीम समाज केवळ निवडणुकांपुरताच का?; खासदार जलील यांचा राष्ट्रवादी, काँग्रेसला सवाल! https://www.loksatta.com/pune/why-muslim-society-only-for-elections-mp-… हे असेच, कॉंग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी, हिंदू धर्मा बाबतीत केले आहे ....

मुस्लिमांनो, पॉलिटिकल सेक्युलॅरिझम धुडकावून लावा; ओवेसींचं मुसलमानांना आवाहन.... https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/asaduddin-owaisi-attacks-… ---------- मला तरी, भाजप शिवाय पर्याय नाही .....

मुलींचं जबरदस्तीने ख्रिश्चन धर्मात धर्मांतर?, मदर तेरेसांनी स्थापन केलेल्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ संस्थेवर गुन्हा दाखल https://www.loksatta.com/desh-videsh/religious-conversion-allegations-o… गुजरातमध्ये ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ या ख्रिश्चन संस्थेवर धर्मांतराचा आरोप करण्यात आला आहे. ही संस्था मदर तेरेसा यांनी स्थापन केली होती. या धर्मांतराप्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या बालसुधारगृहात राहणाऱ्या मुलींना ख्रिश्चन बनविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आता परमपूज्य राहुल गांधी आणि त्यांचे मित्रपक्ष, यावर काय प्रतिसाद देतात? हे बघणे रोचक ठरेल

In reply to by मुक्त विहारि

मुलींचं जबरदस्तीने ख्रिश्चन धर्मात धर्मांतर?, मदर तेरेसांनी स्थापन केलेल्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ संस्थेवर गुन्हा दाखल
...
आता परमपूज्य राहुल गांधी आणि त्यांचे मित्रपक्ष, यावर काय प्रतिसाद देतात? हे बघणे रोचक ठरेल
सहमत आहे. त्याशिवाय, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यावर काय प्रतिक्रिया देतात काय कृती करतात हे पाहणे रोचक ठरेल. ... अवांतर: मोदींना सत्तेत येऊन आठ वर्षे होत आलीत तरीही असे प्रकार सुरु आहेत असे दिसते. मोदी / भाजप / संघ त्यांची व्यक्त-अव्यक्त उद्दिष्टे साध्य करण्यात खरोखरच सक्षम / सशक्त आहेत का?

In reply to by वामन देशमुख

अवांतर: मोदींना सत्तेत येऊन आठ वर्षे होत आलीत तरीही असे प्रकार सुरु आहेत असे दिसते. मोदी / भाजप / संघ त्यांची व्यक्त-अव्यक्त उद्दिष्टे साध्य करण्यात खरोखरच सक्षम / सशक्त आहेत का? सक्तीचे किंवा अमिश दाखवून धर्मांतर हा प्रश्न फक्त ४७ पासून नाही तर त्या कितीतरी आधीपासून आहे हे आपल्याला सर्वांनां माहित आहेच त्यामुळे "८ वर्षात बदलून दाखवा हि अपेक्षा जरा जास्त होते आहे असे वाटतेय. आणि सरकार कोणाचे का हि असेना आधी समाजाने खरी सर्वधर्मसमभावाचं खऱ्या आणि योग्य अर्थाने स्वीकार केलं तर पुढे सरक्कर हिंमत दाखवेल उदाहरण " समान नागरी कायदा" यातील नुसते " "स" हा शब्द कोणी उच्चारला तर काय कांगावा काँग्रेस आणि डावे करतात हे माहित नाही का? याशिवाय बाहेरून चे दबाव वेगळेच ( मदर तेरेसा आता "संत" असल्यामुळे त्याबद्दल हिंदु दःर्जिण्या भाजप ने काह्ही बोलले तरी देशातील आणि बाहेरील ख्रिस्ती आणि देशाबाहेरील विलिंग इडियट डावे हातात हात घालून "उजवया " फॅसिष्ट भाजप सरकार वॉर काय हलला चढवतात ते दिसतंय ना? तरी हि अपेक्षा कि ८ वर्षात का नाही केले बर केले तर लोक म्हणणार कि हे काय आधी महागाई हटवा , त्यावर लक्ष केंद्रित करा (धर्मांतर झाले तर काय एवढा फरक !) दुर्दैवाने त्या गांधी बाबाला एका उजव्या विचारसरणीचं माणसाने मारले त्यामुळे १०००० वर्षे तरी भाजप ला सुखाने सत्ता राबवू दिली जाणार नाही त्यापेकशा परत काँग्रेस ला आणुयात सत्तेवर आणि पुढील ५ वर्षात ते - समान मधील "स" उच्चारायची हिंमत दाखवतील अशी अशा करूयात , आणि तसे नाही केले तर सिहासन मधील दि काशटा च्या भाषेत " त्याचाच सरकार ला विधासभे समोर जोडे मारू " काय म्हणता !

In reply to by चौकस२१२

निदान आता तरी हे गुलामगिरीचे जोखड हिंदूंनी फेकून दिले पाहिजे

In reply to by मुक्त विहारि

काही हिंदू १२००-१५०० तर काही मागील २००० वर्षांपासून गुलामगिरीचे मानेवर असलेले जोखड फेकून द्यायची भाषा करतात. जातीभेद नष्ट करण्याचं जोखड जोवर एकच समाजाची जबाबदारी मानलं गेलं आहे तोवर घंटा हिंदू एकत्र येतात हो मुवि सर, तुम्ही अजून लड लावा धाग्यांची, त्यानं काय फरक पडतोय.

In reply to by जेम्स वांड

काहीच प्रयत्न न करता, दुसरा ते करेल, अशी अपेक्षा मी तरी बाळगत नाही ...

In reply to by मुक्त विहारि

अडाणी अशिक्षित माणूस फक्त सच्चा भावनांवर पर्वत हलवून सोडेल मुवि सर, त्याबाबतीत शंकाच नाही बघा, फक्त कसं आहे जे फॅक्ट आहे ते आहे, आमचे खरे सर म्हणतात तसं तुम्ही बसा प्रोसिजरनं तपास करत तसं काहीसं, फक्त आम्हीही म्हणतो की बुआ प्रोसिजर काहीतरी सेट हवी, तीच नाही तर आपण काय करू शकतो !.

In reply to by जेम्स वांड

दस की लकडी, एक का बोजा त्यामुळे, आपण आपला खारीचा वाटा उचलायचा अशिक्षित खार देखील, वेळ पडली तर, रामसेतू बांधायला मदत करतेच की...

In reply to by मुक्त विहारि

गरिबांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे हे आकाशातील प्रेमळ प्रभुने सांगितले... हो १००/१०० गुण पण हि मदत करतांना त्यामागे त्यांचे धर्मांतर करणे (आज नाही तर उद्या) हा मुळ छुपा हेतू असतो हे आपल्यातीलच "अति उदारमतवादी हिंदूंना" जो पर्यंत समजत नाही तो पर्यंत हिंदूंची अशीच कत्तल ( वैचारिक ) होत राहणार .. मरा लेको यु दिसर्व टू बी कन्वर्टेड .. तुमची तीच लायकी फक्त हे हिंदूंनो तुम्ही जेवहा येशूचं चरणी जाल तेवहा मग तिथे जाऊन जात हा शब्द विसरा .. तो रोग फक्त आम्हा नीच हिंदूंच्यातच आहे ! नाही का ! एकदा का ख्रिस्ती झालात कि मग जाट शीख नि दलित शीख नाही , ब्राह्मण ख्रिस्ती नाही कि मराठा ख्रिस्ती नाही .. ख्रिस्तस ते मान्य नाही

“धर्म म्हणजे अफूची गोळी, ती वाटून लोकांना मूळ प्रश्न विसरायला लावू नयेत,” मोदींच्या काशी यात्रेवरुन शिवसेनेची टीका https://www.loksatta.com/maharashtra/shivsena-saamana-editorial-pm-nare… हीच का ती, हिंदूत्ववादी शिवसेना?

In reply to by मुक्त विहारि

>>>धर्म म्हणजे अफूची गोळी, ती वाटून लोकांना मूळ प्रश्न विसरायला लावू नयेत. अगदी खरं आहे. विषयच संपला. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मग, ही बाजू इतर धर्मियांना पण समजून घेतली पाहिजे ... टाळी एका हाताने वाजत नाही ... उदारमतवादी हे फक्त हिंदूंनीच असावे का? अद्याप तरी हिंदू उदारमतवादी आहेत, ह्यामुळेच, अफगणिस्तान मधला शीख समुदाय, भारतातच आला...

In reply to by मुक्त विहारि

“धर्म म्हणजे अफूची गोळी, ती वाटून लोकांना मूळ प्रश्न विसरायला लावू नयेत,” मोदींच्या काशी यात्रेवरुन शिवसेनेची टीका
शिवसेना ही बाटलेली काँन्ग्रेस आहे, त्यामुळे जास्तच कडवी आहे. सध्याची शिवसेना बघुन मला हे गाणे आठवते.

In reply to by मुक्त विहारि

मोदींच्या काशी यात्रेवरुन बोम्ब पन पण कानडा अमेरिका आणि ऑस्ट्रलिया चे राष्ट्रप्रमुख ख्रिसमस अधिकृत रित्या साजरा करतात ते चालते ! इस्लामी रिपब्लिक ऑफ पाकिस्तान चालते ,इंडोनेशिया चा राष्ट्रपती कुरणावर हात ठेऊन शपत घेतो ते चालते मलेशिया दूतावासाच्या आवारात मशीद चालते ! याला कारण दाव्याचा भोंदू पणा .. सेकुलर म्हणजे बहुसंख्याक असलेल्या हिंदूं चालीरितीनची कोणतीही छाप भारत सरकार वर पडू द्यायची नाही ( आणि एकीकडे श्रीमती वद्रा अगदी संस्कृत श्लोक सभेत म्हणतात , त्यांचे भाऊ राय अमी पण जनेऊ उधारी म्हणून मिरवतात .. ते चालते ...सगळे ढोंगी

“मुस्लिमांनी भारतावर राज्य करण्यासाठी जास्त मुलं जन्माला घालावीत”; एमआयएम नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य https://www.loksatta.com/desh-videsh/give-birth-to-more-children-to-mak… -------- उदारमतवादी हिंदूंना किती समजावून सांगणार?

https://www.thelallantop.com/bherant/tarikh-banda-singh-bahadur-was-cap… देवगिरीच्या, यादव घराण्याचे पण असेच हाल केले होते ... इतकेच कशाला? छत्रपती संभाजी महाराज यांचे देखील असेच हाल केले होते .... आता तरी, हिंदूंनी, जातीभेद विसरून, एकत्र यायलाच पाहिजे...

In reply to by मुक्त विहारि

एका शीख माणसाला म्हणले, तो मला उलट म्हणाला की सगळ्यांनी शीख धर्म स्वीकारावा, जातीभेद विसरतो कश्याला मित्रा त्यागून टाक आणि जातीविहिन शीख धर्मात ये, त्यांच्यामते शीख आणि हिंदुधर्म वेगवेगळे आहेत एक नाहीत. काहीतरी अशिक्षित मार्गदर्शन करा ना त्याला काय सांगावे ह्यावर.

In reply to by जेम्स वांड

मी तुमच्या प्रतिसादांवर, टिप्पणी देऊ शकत नाही.... तुमची विचारसरणी वेगळी आहे आणि माझी विचारसरणी वेगळी आहे...

In reply to by मुक्त विहारि

मी तर तुमचा खंदा समर्थक आहे, अशिक्षित असण्यात सुख अन राष्ट्रहित असल्याचे पण मला तहहयात मान्य असेल, मी फक्त आपला उदात्त हिंदू एकतेचा विचार लोकांना सांगितल्यावर येणारे प्रतिसाद तुमच्यापर्यंत पोचवतोय इतकेच. ह्या जनतेतून येणाऱ्या प्रतिसादांना काय उत्तर द्यावे ह्याचे मार्गदर्शन फक्त मी मागतो बापडा. तुमच्याइतके उत्तम ते कोणी देऊ शकणार नाही, त्यामुळे कृपया गैरसमज करून घेऊ नयेत ही नम्र विनंती &#128144 &#128144