युवर बाॅस इज नॉट ऑलवेज राईट..
मी एका रेडिओ स्टेशन वर काम करत होते. तिथं माझे नियरेस्ट बाॅस-म्हणजे माझ्या पोस्टच्या फक्त एकच स्तर वरचा असलेले बाॅस होते. त्यांना आपण क्ष म्हणू. आमच्या दिल्ली ऑफिस मधून एकदा एक ७/८पानी बाड आलं. इंग्रजी भाषेत. त्यात भारताच्या प्रगतीचा आढावा घेणारा मजकूर होता. ते 'क्ष'नी मला दिलं. म्हणाले,"बाई याचं भाषांतर करा. अर्जंट आहे. एअरवर घालवायचंय."
माझं एक वैशिष्ट्य आहे. माझ्या इतक्या वर्षांच्या नोकरीत ,अगदी मी तरुण आणि लहान वयाची असताना आणि अगदी रिटायर होईपर्यंत माझ्या ऑफिसातल्या एकाही पुरुष किंवा स्त्री कलीगने मला नावाने कधीही हाक मारली नाही. प्रत्येक जण "अहो बाई"च म्हणायचे. शेजारी पाजारी ही नावानं हाक न मारता (यात बायका , पुरुष दोघेही आले)"अहो वहिनी"म्हणायचे. माझी पर्सनाॅलिटी भारदस्त असावी असा मी निष्कर्ष काढला. असो.तर क्ष नी मला भाषांतर करायला ते कागद दिले. चांगले चार, पाच दिवस खर्च करून ,मान मोडून ते क्लिष्ट भाषांतर मी करून दिले. मूळ इंग्रजी मॅटरला ते मराठी भाषांतर पिन लावून जोडले. आणि त्यावर "सबमिटेड"असे लिहून सही केली आणि ते क्ष कडे सबमिट केले. मग मी तो विषय डोक्यातून काढून टाकला.
जवळपास महिन्याने स्टेशन डायरेक्टरांनी क्ष ना बोलावून विचारलं,"मी तुम्हांला दिल्ली ऑफिस मधून आलेलं एक इंग्रजी मॅटर भाषांतर करून घ्या असं सांगितलं होतं. ते एअरवर गेलं का? त्याचं स्टेटमेंट दिल्ली ऑफिस मध्ये मागवलंय." त्यावर क्ष कावरे बावरे झाले. त्यांनी माझे नाव सांगून सांगितले,"त्या बाईंनी ते अजूनही भाषांतरच केलेलं नाही." स्टेशन डायरेक्टरांनी मला केबीन मध्ये बोलावून घेतलं आणि विचारलं.मी म्हटलं,"मी ते भाषांतर महिन्यांपूर्वी च सबमिट केलंय." क्ष माझ्यावर मी खोटं बोलत असल्याचा आरोप करायला लागले.
मी स्टेशन डायरेक्टरांना म्हटलं,"मला प्लिज क्ष यांच्या रॅकला हात लावायची परवानगी देता का? मी ते भाषांतर शोधून काढते." विचित्र स्थिती झाली होती.
पण स्टेशन डायरेक्टरांनी परवानगी दिली. मी , साहेब आणि क्ष त्यांच्या केबिनमध्ये गेलो. मी त्यांच्या रॅकमधून ते भाषांतर आणि मूळ इंग्रजी मॅटर शोधून काढले. क्ष चा चेहरा पडला. ते म्हणाले ,"हे यांनी आत्ता इथे आणून ठेवलंय."
मी म्हटलं,"भाषांतर झालेलं असताना,काम पूर्ण झालेलं असताना मी ते माझ्याजवळ इतके दिवस कशासाठी ठेवू. मी त्यावर "सबमिटेड"असं लिहिलंय, सहीही केलीय. मग मी ते माझ्या खोलीत पाडून का ठेवेन?"
क्ष चाचरत म्हणाले,"मला काय माहीत?".
मी म्हटलं,"या फाईलवर धूळ बसलीय. याचा अर्थ असा की,ती इथं बरेच दिवस पडून आहे. दुसरा पुरावा म्हणजे ह्या कागदांना जी पिन लावलीय तिची बाहेर आलेली दोन्ही टोकं गंजलेली आहेत (यात तसा फारसा पुरावा नव्हता. तरी...) शिवाय तुमच्या दोघांच्या देखतच ही फाईल मी इथून शोधून काढलीय. याचाच अर्थ असा की ही फाईल इथं खूप दिवस पडून आहे."
सुदैवानं स्टेशन डायरेक्टरांना माझं म्हणणं पटलं. त्यांनी क्ष कडे एक "लुक" टाकला. आणि खांदे उडवले. मला केबिनमध्ये बोलावून साहेब म्हणाले,"यापुढं एक धडा घे."सबमिटेड"असं लिहून सही केलीस की सहीखाली तारीख टाकत जा. न विसरता. पूर्ण करियरभर माझा हा सल्ला लक्षात ठेव.!"
लहानशी गोष्ट. पण खूप मोलाची ठरते अनेकदा. तेव्हापासून मी तो दंडक पाळला. घरगुती बाबतीतही. पेपरचं बिल पे केलं. सही, तारीख. दुधाचं पेमेंट केलं, सही तारीख. आणखी एक नवीन शहाणपण. पलिकडच्याचीही "रिसीव्ह्ड"म्हणून सही घेणे, तारीख..
अनुभव हाच गुरू..
वर्गीकरण
प्रतिक्रिया
प्रोफेसर
संदर्भ लागला नाही हा लेख
फारच छान सल्ला.
मस्त आठवण.
+१ स्वाक्षरी नंतर सही करतोच.
अरे बा
किस्सा आवडला ...
माझेही काही अनुभव...
असे नमुने सर्वत्र असतात.
हा हा
छान अनुभव मांडला आजी!
एका सरकारी प्रकल्पावर काम करताना
लेखातील आणि काही
कोणाला आणि कशासाठी देतोय तेही एका ओळीत लिहावे.
बिंदुगामी...
आता धन्यवाद म्हणणे आले.. पण
मिपा प्रभाव.
आदरणीय गविशेठ यांचा स्वभाव
ओह नो...
ज्याला आयडीप्रुफचा गैरवापर
ते तर आहेच. मूळ फोटोकॉपीच्या
चिंधीचोर गिरी .
जेव्हा त्याची चूक त्याचा बॉस काढतो तेव्हा
आपले लेखन नेहमीच आवडते.
छान अनुभव
धन्यवाद.
बाँस इज आँलवेज राईट....
मधुशाळा