मी पिंपळ...
एक शतक तरी मी उभा आहे..
अलिप्त, नि:संग, एकटा...
असंख्य चिमणी पाखरं
माझ्या फाद्यांवर बसुन गेली
वसंतातील कोकिळ कुंजने..
मी ही मनसोक्त ऐकली..
मी ऐकली प्रेमिकांची
लाजरी कुजबुज..
त्यांचे रुसवे फुगवे..
लटकी भांडणे..
अश्रुंचे सांडणे..
समजावणे..
अन गजरा माळणे..
अनेक पांथस्थ ,
माझ्या सांनिध्यात विसावली.
मी ही बनलो ,
त्यांच्या साठी सावली..
मी पाहिली माणसे ,
कोलमडलेली..
असंख्य वादळे ,
मी ही झेलली..
मी आहे अनेक लढ्यांचा ,
साक्षिदार...
अन ऐकल्या गप्पाही ,
खुमासदार..
पण आता सारच संपलं
या गावाचं म्हणे ..
शहर झालं...
आता पहिल्या सारख ,
नाही राहिलं...
इथे खुप सोइ आहेत ,
पायवाटांचे हामरस्ते
झाले आहेत...
पुर्वी मी पिंपळपार होतो..
आता पारनाका झालो आहे..
माझ्या फाद्यांखाली
बसथांबा झाला आहे..
पुर्वी लालमातीचा
धुरळा उडवित..
टांगा यायचा..
आता..काळाकुट्ट
धुर उडवित एस्टी येते..
मला गुधमरायला होते..
माझे सगे सोयरे त्यांनी तोडले .
माहित नाही त्यांनी ,
मलाच का सोडले..
मरण येत नाही
म्हणुन मी जगत आहे
कोणी येइल कु-हाड घेउन
म्हणुन वाट बघत आहे...
मी अजुनहीउभा आहे..
अलिप्त नि:संग पण..
एकटा......
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1815
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा, छान
नेहमीप्रम
छान
सुरेख!
सुरेख !!
मुक्तक
खूप आवड्ली