दिवा़ळी अंक २०२१ : मिनेसोटातील ऋतुरंग
मिनेसोटातील प्रत्येक ऋतू आणि त्याबरोबर येणारे रंग मनाला मोहवून टाकतात. इथल्या हवामानात प्रामुख्याने चार ऋतू येतात. वसंत, ग्रीष्म, फॉल आणि बराचसा प्रदीर्घ असा हिवाळा. (अधिकृतपणे प्रत्येक ऋतू तीन महिन्यांचा असला, तरी इथे निम्मा फॉल व निम्मा वसंत हे हिवाळ्याचाच भाग बनतात.) हिवाळ्यात तापमान पुरेसे खाली गेल्यावर पहिल्या हिमवर्षावाचे कोण कौतुक लहान तसेच थोरांना वाटते. झाडांवर, रस्त्यांवर आणि घरांच्या छपरांवर हिमवर्षावाचा शुभ्र रंग फार सुंदर दिसतो.
गोठलेल्या तळ्यावर चालणारे कॅनेडियन गूझ.
हिवाळ्यातील सूर्यास्त
लेक आयटास्का. इथूनच महाकाय मिसिसिपी नदी उगम पावते. गोठलेले लेक आयटास्का आणि झुळझुळ वाहणारे मिसिसिपीचे पाणी.
साधारणपणे मार्च-एप्रिलमध्ये गोठलेला बर्फ हळूहळू वितळू लागतो. सगळीकडे पाण्याचे लोट वाहू लागतात. स्थलांतर केलेले पक्षी परतू लागतात. पहाटे पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येऊ लागतो. हिवाळ्यात उशिरा होणार सूर्योदय आता लवकर होऊ लागतो. एवढेच काय डेलाइट सेव्हिंग सुरू होऊन एक तास लवकर उठावे लागते! जसजसा वसंत जोम धरतो, तसेच झाडांना पालवी फुटते. लवकरच विविधरंगी फुले बहरतात.
लेकवूड सेमेटरीतील ट्यूलिप्स.
खालील तीन छायाचित्रे मिनेसोटा लँडस्केप आरबोरेटममधील आहेत.
क्रॅब अॅपल्सचा बहर
तळ्यांमध्ये बदकांची जोडपी विहरू लागतात. पक्षीही आजूबाजूच्या झाडांमध्ये आपली घरटी बांधू लागतात. मिनेसोटामध्ये आवर्जून दिसणारे बिनविषारी गार्टर स्नेक बिळातून बाहेर येऊ लागतात. वातावरण गरम होऊन २५-३० अंश सेल्सियसच्या आसपास स्थिरावू लागते. अगदीच कडक ऊन पडले, तर साधारणपणे ४० अंश सेल्सियसपर्यंत जाते.
लेक सुपीरियरच्या किनार्यावरील डुलुथ येथील रोझ गार्डन
उन्हाळ्यातील लेक सुपीरियरचा एक बीच
लेक मिनिटाँकावरील एक दृश्य
घरामागील तळ्याकाठी आलेले हरीण
सप्टेंबरच्या मध्यापासून फॉलचा प्रभाव जाणवू लागतो. सफरचंद, कणीस, मोठाली भोपळी पिकून कापणीस तयार होतात. झाडांची पाने आता पिवळी पडू लागतात. या काळात पानांचे रंग झपाट्याने बदलतात. सभोवती पिवळा, लाल, नारिंगी रंगाची उधळण होते. रंगांची ही उधळण पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. वातावरणात गुलाबी गारवा येऊ लागतो.
ऊबदार वाटायला गरम अॅपल सायडर आणि पंपकिन स्पाइस्ड लाटे उपयुक्त ठरतात.
बेकर पार्क रिझर्व
प्लिमथ क्रीक पार्क
ग्लिसन लेक
ल्युट्सन माउंटन
सप्टेंबरच्या शेवटी व ऑक्टोबरमधे कापणीचा हंगाम (हार्वेस्ट सिझन) असतो. या काळात जागोजाग भोपळ्यांची सजावट केलेली असते.
स्थानिक लोक अगदी सहजपणे बदलत्या हवामानाबरोबर बरोबर जुळवून घेत प्रत्येक ऋतूचा आस्वाद घेत असतात.

याद्या
16670
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह ! अप्रतिम फोटोज!
फोटो अप्रतिम आले आहेत ...
अप्रतिम छायाचित्रे
११० डिग्री
In reply to अप्रतिम छायाचित्रे by सौन्दर्य
ती अमेरिका आहे. फॅरेनहाईटवाले
In reply to ११० डिग्री by अनन्त्_यात्री
अर्रार्रा
In reply to ती अमेरिका आहे. फॅरेनहाईटवाले by Trump
एक माहिती
In reply to अर्रार्रा by सौन्दर्य
स्थानिक लोक अगदी सहजपणे
फुलांनी फुलवलेला उत्कृष्ट लेख
वाह जुइ,
वा सुरेख आहेत फोटो
+ १
In reply to वा सुरेख आहेत फोटो by ज्ञानोबाचे पैजार
तरीही
💖
हे अनुक्रमे आवडले !वाह खुप छान !
सुंदर फोटो
खूप छान फोटो!
नयनरम्य लेख.
वाह
फोटो पाहून अहाहा झाले,
अप्रतिम, नेत्रसुखद फोटो
खूप सुंदर प्रचि, खरोखर ऋतुरंग
सुंदर लेखन, प्रकाशचित्रे .......
धन्यवाद
फारच छान आहेत सर्व फोटोज
धन्यवाद
In reply to फारच छान आहेत सर्व फोटोज by जेम्स वांड
हे एक बरे आहे
In reply to धन्यवाद by जुइ
अमेरिकेतला दुष्काळी कालखंड
In reply to फारच छान आहेत सर्व फोटोज by जेम्स वांड
खुप छान.
अप्रतिम फोटो.. छान वाटला लेख.