Skip to main content

अवचित गवसावे काही जे...

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 17/11/2021 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
प्रश्न पडावा असा की ज्याच्या उत्तरातुनी नवा प्रश्न मला चिडवीत नव्या उत्तरास शोधत यावा वाट दिसावी अशी की अद्भुत प्रदेशी जाताना विरून जाव्या पुसून जाव्या सार्‍या हळव्या खुणा सूत्र सुचावे असे की ज्याने यच्चयावतास सहज गुंफुनी जरा उरावे अधिक गुंफण्यास अवचित गवसावे काही जे ज्ञातापलिकडल्या मितीतुनी दाखवील इथल्या स्थलकाला वाकुल्या
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1970
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

आवडली पैजारबुवा,

धन्यवाद

कवन आवडले. नुस्त्या 'खुणा' च्या ऐवजी विशेषत्वाने 'हळव्या खुणा' का म्हटले असावे ते उमगले नाही.

In reply to by चित्रगुप्त

धन्यवाद. भावविवश करणार्‍या आठवणी (हळव्या खुणा) अद्भुताची अपरिचित वाट चोखाळण्यापासून परावृत्त करू शकतात ...