मनातलं..खूप खूप आतलं…….!!
इतक्या वर्षानंतर सुद्धा तश्शीच आहे नव्हाळी
तशीच कोवळी
काही फांद्या झाल्या असतील थोड्याशा जुन्या…
पण आतला ओलावा मात्र अगदी तस्साच !
एक छोटंसं मोग-याचं फुल सतत आसपास असावं…
तसा तुझा सहवास
हवाहवासा, ताजा, गंधाळलेला
इतकी सवय झालीये ना त्याची !!
कधी हेच मोग-याचं फुल अबोली बनतं ना…
तेव्हा मात्र मन कावरंबावरं व्हायला लागतं
अबोलीच्या मनातलं काढून घेणं फार फार कठीण !
पण एकदा का ही अबोली बहरुन गुलाबाची टप्पोरी कळी झाली ना……
की सगळं जगच गुलाबी होऊन जातं माझं !
…..
…
आता हा गुलाब… आणखीनच डौलदार झालाय
डोळ्यांवर सोनेरी काड्यांचा चष्मा आलाय
केसातली ती चंदेरी वळणं…
कानावरचे थोडेसे रुपेरी केस…
जास्तच रुबाबदार दिसतो आहेस !
गालांवरच्या त्या दोन खोल खळ्यांमधे तर मी कोसळतेच आहे कित्येक वर्षापासून !
तुझ्या डोळ्यातली मिश्किली…. माझा श्वास आहे
माझं जगणं, मरणं त्यावर अवलंबून आहे
कायमच एक सखा होऊन राहिलास
माझं बालपण टिकवलंस
वेडेपण गोंजारलंस…
तारुण्य जपलंस….!!
अतिशय समृद्ध आणि तृप्त आयुष्य दिलंस मला
तुझ्या परिघातच आहे माझं जग सारं
ते असंच राहू दे.
तुझी सखी
वाचने
2741
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्या बात है!!!
अप्रतिम!
खूप छान
मस्त मुक्तक! :)
एकंदरीत दिवस
वा !
अप्रतीम
अरे....... इतक्या वर्षांनी हा
ह. घ्या.
In reply to अरे....... इतक्या वर्षांनी हा by जयवी
ह्म्म ते ही खरंच