दिवाळी अंक २०२१ : मला दिसलेली जीवसृष्टी

MipaPremiYogesh's picture
MipaPremiYogesh in दिवाळी अंक
1 Nov 2021 - 9:00 pm

body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}

.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}

.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}

गेली काही वर्षे मी पक्षिनिरीक्षण, निसर्गात फिरणे असे करत असताना आलेले काही अनुभव कथन करण्याचा प्रयत्न करतो.

१. मी नुकताच नवीन घरी राहायला आलेलो. साधारण १५-१६ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. बाल्कनीमधून बाहेर बघत असताना अचानक एक मोठ्ठा पक्षी दिसला आणि त्याच्या पायात काहीतरी होतं, पटकन खाली गेलो आणि बघितलं, तर शिक्रा नावाचा शिकारी पक्षी होता आणि त्याने खारुताईचं पिल्लू पायात पकडलं होतं. थोडा झाडीत बसला होता. माझ्याकडे तेव्हा कॅमेरा नव्हता. मोबाइल होता, पण त्याचा कॅमेरा अगदीच बेसिक (vga) असा होता. तेवढ्यात तो शिक्रा पक्षी अचानक माझ्यासमोर असलेल्या कंपांउंडच्या भितींवर येऊन खात बसला. मोबाइल कॅमेरा असल्याने मी जवळ जवळ जात फोटो काढण्याचा प्रयत्न करत होतो. खरं तर मी लांबूनच निरीक्षण करणं गरजेचं होतं, पण मला काही भानच राहिलं नव्हता. शेवटी मी इतक्या जवळ पोहोचलो की त्या बेसिक मोबाइलच्या कॅमेऱ्यातूनही मला त्याचे भेदक डोळे, चोचीला लागलेलं रक्त दिसू लागलं आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण खूपच जास्त जवळ आलो आहोत. पण सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे त्या पक्षाने मला इतकं जवळ येऊ दिलं.. कदाचित तो खाण्यात गुंग असावा. पण मी त्याचे ते भेदक डोळे कधीही विसरू शकलो नाहीये.

1
(हा फोटो नंतर काही वर्षांनी घेतलेला आहे)
2

२. अशीच जुनी गोष्ट. आम्ही एकदा सासवडला गेलो होतो पक्षी बघायला. एक डोंगर चढलो आणि पाहिलं, तर २-३ स्टेप इगल जमिनीवर बसलेले. कुठलाही शिकारी पक्षी असा जमिनीवर बसलेला दिसला म्हणजे खूप भारी दिसतो, मस्त फोटो मिळणार असं वाटत असतानाच अचानक आमचा तिसरा मित्र एकदम वर चढून आला आणि सगळे पक्षी उडाले. आम्ही हताश होऊन पुढे गेलो आणि खूप फिरलो. शेवटी दमून एका झुडपाखाली बसलो. १० मिनिटं झाली असतील आणि अचानक माझ्यासमोर बसलेला मित्र म्हणाला, "अरे, तुझ्यामागून ईगल येतोय." मी मागे वळून बघितलं, तर तो पक्षी झाडावर बसण्यासाठी पाय असे लांब करून बसायच्या पवित्र्यात होता आणि मला त्या पक्षाची नखं (talon) अशी रोखलेली दिसली. अक्षरशः माझ्या डोक्यावर तो बसणार, तेवढ्यात त्याला जाणवलं की इकडे काहीतरी आहे आणि त्याने परत वरती झेप घेतली.

10

३. ए आर ए आय टेकडीवरील घुबड - काही वर्षांपूर्वी एआरएआय टेकडीवर पक्षिनिरीक्षणासाठी आणि फोटो काढायला गेलो होतो. अगदी पहाटेची वेळ होती. आम्ही गाडी पार्क केली आणि जायला लागणार, तेवढ्यात समोरच्या बाजूला काहीतरी हालचाल जाणवली. हळूच बघितलं, तर पिंगळा घुबड (spotted owlet) दिसलं. आम्ही पटकन एका गाडीच्या मागे लपलो आणि निरीक्षण करू लागलो. पुढच्या मिनिटात ते अचानक माझ्या गाडीच्या हँडल बारवर येऊन बसलं आणि इतक्या कुतूहलाने आमच्याकडे बघायला लागलं. तेवढ्यात काही फोटो काढले, ते असे -

4

2

4. पाबेमधील गरुड
खूप दिवस झाले होते बर्डिंगला जाऊन..मग नेहमीप्रमाणे फोनाफोनी झाली. बरीच ठिकाणं ठरवून शेवटी इकडे जायचं ठरलं. नेहमीप्रमाणे ५ला उठून तयारी करून बाहेर पडलो आणि पुण्याबाहेर पडताच मस्त गारवा जाणवायला लागला. अजून उजाडायचं होतं. आम्ही घाटात पोहोचलो. पक्षांच्या activities चालू होत होत्या.. वेगवेगळे कॉल्स ऐकू येत होते. एकूणच मस्त वातावरण होतं. मग आम्हाला शिक्रा, कापशी घार, हरियल, टकाचोर असे पक्षी दिसले. पुढे पूर्ण घाट फिरून मागे फिरलो. सगळे जण मात्र बोलत होतो क्रेस्टेड हॉक ईगल ह्या पक्ष्याबद्दल. मी अजूनही हा ईगल पाहिला नव्हता. घाट उतरू लागलो आणि अचानक झाडावर काहीतरी बसलेलं दिसलं. लांबून एकदम लांडोरिसारखं वाटलं, पण गाडी जशी जशी जवळ नेली, तसं लक्षात आलं - हा तर क्रेस्टेड हॉक ईगल ..
9

शांतपणे गाडीत बसून फोटो काढले. गाडी भर रस्त्यात उभी होती. काय कडक दिसत होता तो.. मग थोडी गाडी पुढे घेतली, जेणेकरून बॅकग्राउंड जरा छान मिळेल. अर्धा तास झालेला, तो एकदम उडाला आणि आणखी छोट्या झाडावर बसला, जमिनीवर काहीतरी पाहत होता. आम्हाला वाटलं काहीतरी किल दिसतंय त्याला, पण तो परत उडाला आणि आधीच्या जागेवर आला. अजूनही मनासारखी बॅकग्राउंड मिळाली नव्हती. परत गाडी थोडी लांब नेली आणि मग सुंदर बॅकग्राउंड मिळाली. आम्ही आहोत हे त्याला कळत होतं, पण विशेष काही फरक पडत नव्हता. आम्ही बऱ्याच गोष्टी ट्राय केल्या, व्हिडिओ काढले. कॅमेऱ्यातून काय सुंदर दिसत होता. मस्त डायरेक्ट आमच्याकडे बघत असतानाची ही पोझ मिळाली. आम्ही धन्य झालो. एक तास आम्ही तिथेच होतो. आयुष्यात असे क्षण फार कमी वेळा मिळतात.. शेवटी म्हणतात ना - मनी वसे ते स्वप्नी दिसे, पण इथे तर ते सत्यात उतरलं होतं.

5. ताडोबामधील अनुभव पहिला अनुभव - वाघ
ताडोबा, लँड ऑफ टायगर..

मी साधारण दीड महिना आधी सफारी बुक केली. जेव्हापासून बुक केली, तेव्हापासून कधी एकदा २६ तारीख येते ह्याची रोज वाट बघत होतो. आणि शेवटी तो दिवस उजाडला. सगळी कामं उरकली आणि सव्वातीनच्या पुणे-अजनी एक्स्प्रेसने नागपूरकडे प्रयाण केलं. बरोबर माझा मित्र शिव होता. भरपूर गप्पा मारल्या आणि रात्री झोपेच्या अधीन झालो. बरोब्बर ५ वाजता अजनीला उतरलो. आमचा naturalist अमेय वाट पाहतच होता. पटकन सगळ्यांनी चहा मारला आणि मग मुंबईतील येणाऱ्या फॅमिलीला घेऊन थेट नागपूरमधील प्रसिद्ध अशा गोकुळमध्ये जाऊन डोसा-उपम्यावर ताव मारला. अप्रतिम चवीचा आस्वाद घेऊन ताडोबाकडे निघालो. सुमारे दोन तासांनी टायगर हेवन रिसॉर्टमध्ये पोहोचलो. रूममधली खिडकी उघडली आणि समोरचं दृश्य पाहून खूश झालो. कांचन आणि चाफ्याची झाडं आणि खाली ब्लॅक हूडेड ओरिओल आणि paradise flycatcher दिसले.

आवरून जेवायला गेलो, अप्रतिम जेवण. बाकीची सगळी तयारी करून बरोब्बर २ वाजता सफरीला निघालो. आमची पहिली सफारी बफर झोनमध्ये होती. जंगलामध्ये दोन झोन असतात - एक थोडा बाहेरचा, त्याला बफर म्हणतात आणि आतला, त्याला कोअर म्हणतात. कोअरमध्ये जास्त sighting होतं normally. जेव्हा जिप्सीने आत एंट्री घेतली आणि जो जंगलाचा वारा लागला, एकदम जब्बरदस्त फीलिंग आलं. मातीच्या रस्त्यावरून जिप्सी आणि आमचे डोळे वाघाच्या शोधात फिरत होते. एका पाण्याच्या डबक्याकडे आल्यावर बर्‍याच जिप्सी उभ्या राहिलेल्या दिसल्या आणि जेव्हा समोर पाहिलम, तेव्हा दोन वाघ पाण्यात बसलेले दिसले. आयुष्यात पहिल्यांदाच वाघ बघत होतो, तेही directly दोन वाघ. एका वाघिणीची दोन पिल्लं होती. जरा वेळ बसल्यावर पिल्लू उठून मागे गेलं आणि फिमेल पिल्लूहि काही वेळाने आत गेलं. आम्ही सगळ्यांनी एकमेकांकडे आनंदाने बघितलं आणि गाइड म्हणाल्याप्रमाणे इतर वॉटर होल्सवर चक्कर मारायला गेलो. बरेच पक्षी दिसले, पण वाघ दिसला नाही. पण आम्ही आधीच ठरवल्याप्रमाणे फक्त वाघ नाही, तर पूर्ण जंगल अनुभवायचं होतम. एका waterholeवर पोहोचल्यावर अचानक एक प्राणी उधळला, तो होता रानडुक्कर. थोडा वेळ तिकडे थांबून परत आधीच्या ठिकाणी जायला निघालो आणि तिथे पोहोचल्यावर पाहिलं, तर परत दोन वाघ दिसले. पण ह्या वेळेस आई आणि मुलगा असे होते. मस्तपैकी पाण्यात बसले होते. वाघ हा तसा अतिशीत प्रदेशातला प्राणी आहे. काही वर्षांपूर्वी सैबेरियामधून सगळीकडे पसरला आणि आपल्याइकडे येऊन स्थिरावला. त्यामुळे वाघाला स्वतःला थंड राहायला खूप आवडतं.
थोड्या वेळाने दोन्ही वाघ पाण्यातून बाहेर आले. आधी आई ऐटीत बसली आणि मग मुलगाहि येऊन बसला. इतकं सुंदर चित्र होतं, दोन वाघ एकदम राजेशाही थाटात बसलेत..
7

आम्ही जसं बघत होतो, तसे तिकडे एक हनुमान लंगूरची टोळीसुद्धा बघत होती. त्यांना पाण्यावर यायच होतं, कारण प्रचंड उन्हाळा होता. एक माकड मस्तपैकी झाडामागे लपून बघत होतं आणि एक तर एकदम पुढे येऊन दोन पायांवर उभं राहून बघत होतं. कदाचित तो हुप्प्या (माकडांचा लीडर) असावा. साधारण तिकडे हालचाल जाणवली, तसं माकडाने पटापट झाडाचा शेंडा गाठला. आणि दोन मिनिटांत फिमेल वाघ उठली आणि सरळ आमच्या दिशेला चालत येत बसली. आता तिच्यात आणि आमच्यात अर्धं अंतर कमी झालं होतं. तेवढ्यात तिने तिच्या मुलालाहि बोलावलं. मस्त ऐटीत चालत आला आमच्याकडे बघत. तिने त्याच्या खांद्यावर हात टाकून चेहरा साफ करायला घेतला आणि मग तोहि तिच्या कुशीत जाऊन बसला. हे सगळं बघून मन एकदम भरून आलं आणि डोळ्यात पाणीच आलं. म्हटलं, बास.. ह्यासाठीच केला होता सगळा अट्टाहास.. उन्हं कलतीकडे चालली होती आणि आमचा ड्रायव्हर म्हणाला, "निघावं लागेल आपल्याला." इतका सुंदर नजारा समोर असताना निघायचं एकदम जिवावर आलं होतं, पण जंगलाच्या नियमाप्रमाणे आम्हाला बाहेर पडणं भाग होतं. परत एकदा वाघांना मनसोक्त पाहून निघालो.

6. ताडोबा - छोटा मटका
आमची तिसऱ्या दिवसाची सफारी होती. रोज एक वाघ दिसलेला, फक्त ह्या सफारीच्या आदल्या दिवशी एकही वाघ दिसला नव्हता. आम्ही ह्या वॉटरहोलवर आलो, तेव्हा खूप गर्दी होती. आमची जिप्सी कशीबशी लावली. समोर हे साहेब मस्त निवांत बसले होते. दहा मिनिटांनी खाली पाणी प्यायला गेला, आता आमची पोझिशन अशी होती की आम्हाला पाण्यातलं काहीच दिसत नव्हतं. आमच्या गाइडने ड्रायव्हरला सांगितलं की गाडी पुढे घे. आता आमची जिप्सी सगळ्यात पुढे आणि रस्त्याच्या उजव्या बाजूला होती. गाइड म्हणाला, "आता बघा, वाघ पाण्यातून थेट चालत आपल्या बाजूला येईल." दहा मिनिटं तशीच गेली, काहीच अ‍ॅक्शन नाही घडली. आणि तेवढ्यात साहेब उठले आणि थेट आमच्याच बाजूला यायला सुरुवात केली. हळूहळू तो जवळ येत गेला.. आधी मी ४०० mmपासून सुरू केलं, मग 300, 200 आणि शेवटी 100 mm. आता तो माझ्या जिप्सीच्या फक्त दहा फुटावर येऊन थांबला. आमच्याकडे बघितलं आणि तिथेच बसला. त्याने जेव्हा माझ्याकडे पाहिलम, तो क्षण एकदम जबरदस्त होता. त्या वेळेस टिपलेली ही छबी..

5

7. फॅन थ्रोटेड लिझार्ड - जेव्हा कळलं की हा सुंदर असा सरडा 'फॅन थ्रोटेड लिझार्ड' पुण्यात, तेही घरापासून १० मिनिटांवर, तेव्हा लगेच जायचा प्लॅन केला. मे महिन्याचा उन्हाळा होता आणि हीच ह्या सरड्याची मिलनाची वेळ असते. आम्ही पोहोचलो आणि बसून हालचाल बघू लागलो. हळूहळू जसा दिवस वर जाऊ लागला, तसा तसा ह्यांचा खेळ चालू झाला. खूप संख्येने इकडून तिकडून पळताना दिसायला लागले. काही मादीच्या शोधात, तर काही नराच्या मागे असं चालू होतं. ह्या मिलनाच्या काळातच ह्याला गळ्यापासून एकदम रंगीत पंखा येतो. तो जितका डार्क, तितकी त्याच्याकडे मादी आकर्षित होते. तर हा असाच पळत पळत आला आणि समोर दिसलेल्या मादीकडे बघून फॅन शानपणे फिरवू लागला, त्या वेळेस टिपलेली ही छबी.

3

8. गरुड शिकार
सासवड.. इतकी सुंदर जागा पुण्याजवळ आहे, पण बऱ्याच लोकांना माहीत नाहीये किंवा पडीक जमीन म्हणून कोणी लक्ष देत नाही. एका अर्थाने हे चांगलंच आहे, कारण तिकडच्या बायोडायव्हर्सिटीला धोका कमी झाला. तर पहाटे पुण्यातून निघून सासवड-यवत रस्त्यावर पोहोचलो, वेगवेगळे पक्षी बघत जात असताना दूर एक शिकारी पक्षी बसलेला दिसला, तो होता सापमार गरुड. लांबून फोटो काढले आणि बघत असताना तो उडाला आणि उंच झाडावर जाऊन बसला. आम्हीही शांतपणे निरीक्षण करत बसलो. ५ मिनिटांनी तो उडाला. आम्ही त्याला फॉलो केलं आणि बघितलं, तर तो जमिनीवर बसलेला दिसला, आम्ही गाडी लावली, सावकाश उतरलो आणि बघायला लागलॊ आणि एकदम खूश झालो. वाइल्ड लाइफमध्ये शिकार होताना बघायला मिळणं म्हणजे खूप नशीबवान मानलं जातं. आमच्यासमोर काही अंतरावर गरुडाने एका सापाला तोंडात पकडलेलं जेव्हा पहिलं, तेव्हा अक्षरशः अंगावर काटा आला.. त्या वेळी टिपलेली ही छबी.
8

9. भिगवण - शॉर्ट इअर आउल
भिगवणला 'दक्षिणेकडचं भरतपूर' म्हणतात इतके भरपूर प्रकारचे पक्षी आणि प्राणी इकडे आढळतात. तर अशाच एका पक्ष्याच्या शोधात आम्ही ह्या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये गेलो. संध्याकाळची वेळ होत आलेली आणि सगळीकडे संध्याकाळचं मस्त ऊन पडलं होतं आणि अचानक आम्हाला हा पक्षी दिसला. हा पक्षी वातावरणात इतका मिसळून जातो की बाजूला असला तरीही दिसत नाही. जेव्हा आम्हाला दिसला, तेव्हा तो गवताच्या आतच बसला होता आणि त्याचे ते डोळे आमच्याकडे बघत होते. आम्ही शांतपणे तिकडे थांबलो होतो. अचानक कसला तरी आवाज आला, त्या पक्ष्याने टुणकन उडी मारली आणि एकदम उघड्यावर येऊन बसला. आम्ही अक्षरशः थरारलो, कारण तो एका मस्त ओपनमध्ये बसलेला दिसला. हा पक्षी होता छोट्या कानाचं घुबड जो आपल्याकडे स्थलांतर करून येतो.

6

11

10. वूल्फ
जसा वाघ जंगलाचा राजा, तसा माळरानावरचा राजा म्हणजे लांडगा उर्फ wolf. ह्याच्या शोधात मी गेली काही वर्षं खूप फिरलो, त्यात एकदा मला दिसला, पण आम्हाला बघून तो पळून गेला होता. ह्या वेळेस जेव्हा कळलं की भिगवणजवळ लांडगे दिसत आहेत, तेव्हा ठरवलं की जाऊ या. भिगवणचं आमचं गोव्यासारखं झालं होतं - म्हणजे भिगवणला जायचा प्लॅन दोन वेळा कॅन्सल झालेला. ह्या वेळेस मात्र ठरवलं की जायचंच. पहाटे ३.३०ला निघालो आणि जोरदार पाऊस सुरू झाला. सोलापूर हायवेवर तर आणखीन जोरात, समोरचं दिसतही नव्हतं इतका पाऊस.. विचार केला, आता काय होतं बघू, भिगवणला पाऊस कमी असू देत, अशी प्रार्थना करत एक चहा ब्रेक घेत ५.३०ला पोहोचलो. अमोल आलाच ५ मिनिटांमध्ये आणि ऑपरेशन wolfला सुरुवात केली. जसे जसे आम्ही wolfच्या एरियात पोहोचलो, तशी तशी आमच्या मनाची घालमेल सुरू झाली - दिसेल की नाही दिसणार, दिसले तर नीट मिळतील का? कारण ह्या वेळेस एकदम ब्रँड न्यू mirrorless सोनी कॅमेरा भाड्याने घेऊन आलो होतो, पहिल्यांदाच वापर करणार होतो. आम्ही पुढे गेलो, तसे अमोल म्हणाला, "४चा पॅक आहे." आम्हाला लांबवर एक दिसला आणि बघेबघेपर्यंत सगळे डोंगर उतरून दरीमध्ये गायब झाले. अमोल म्हणाला की "अल्फा त्यांच्याबरोबर असल्याने शक्यतो ते लांबूनच जातात आणि जवळ येऊ देत नाहीत." पण म्हणाला, "आपण प्रयत्न करत राहू." पुढचा एक तास आमची शोधमोहिम चालू होती. माझी वॅगन आर होती, त्यामुळे ग्राउंड क्लिअरन्स बरा असूनही बऱ्याच वेळेला गाडी घासत होती. पण आमचे लक्ष एकच होते - 'लांडगा'..

आणि तो क्षण आला! एका ठिकाणी आम्हाला ते दिसले. बघतो तर काय, एक नसून दोन लांडगे .. मग पुढचा एक तास आयुष्यातला बेस्ट वेळ म्हणता येईल असा गेला. कारण होतं की आम्ही गेली खूप वर्षं लांडग्याच्या शोधात फिरत होतो, एकदा दोन वर्षांपूर्वी मयुरेश्वरला अचानक दिसला होता, पण तोही लांबून दिसला होता. तर बॅक टु भिगवण.. आम्ही आमची गाडी नीट उभी केली आणि फोटो घ्यायला सुरुवात केली. फोटो काढतानाच आम्ही त्यांचं behaviorहि बघत होतो. आम्ही थोड्या वेळाने जागा बदलून गाडी उभी केली आणि मग एक एक ड्रीम शॉट्स मिळायला सुरुवात झाली. हे दोघंही सबadult - म्हणजेच मिसरूड फुटलेले लांडगे होते. त्यातला एक चांगलाच धष्टपुष्ट होता. आधी दोघंही मस्त बसले एकदम रॉयल पोझ घेऊन.. मग हळूहळू काही ना काही मस्ती सुरु केली. तिकडे चपलेसारखं एक काहीतरी होतं, त्याच्याशी खेळत बसले. मग पोतं होतं, त्याच्याशी खेळत बसले. आम्ही त्यांच्या जवळ असूनही त्यांना काही फरक पडत नव्हता. थोड्या वेळाने ते दोघंही एका ठिकाणी आले आणि मातीत मस्त लोळत खेळत बसले. आणि मग त्यांची आतल्या बाजूला जाण्याची तयारी सुरु केली. आम्हीही मग तिकडेच थांबलो, जाता जाता त्यांनी आमच्याकडे परत बघितलं आणि आत निघून गेले.

12

अशा रितीने आमची इतक्या वर्षांची इच्छा फलद्रुप झाली.

लेख आणि सर्व फोटो - योगेश श्रीकृष्ण पुराणिक

प्रतिक्रिया

उत्कृष्ट छायाचित्रे!

जेम्स वांड's picture

2 Nov 2021 - 6:34 pm | जेम्स वांड

निरतिशय भयानक उत्तम प्रकाशचित्रे, फार म्हणजे फारच आवडली मला.

दिवाळीला घर रंगवले तर जसे सुंदर दिसते तसेच ह्या धाग्याने दिवाळी अंकाला केले आहे.

पाषाणभेद's picture

2 Nov 2021 - 8:16 pm | पाषाणभेद

आमच्या नेहमीच्या आयुष्यापेक्षा निराळेच अनुभव.

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Nov 2021 - 11:29 pm | ज्ञानोबाचे पैजार

एकेका ने अगदी ऐटीत पोझ दिल्या आहेत

प्रत्येक फोटो मागाची तुमची प्रचंड मेहनत, चिकाटी आणि कसब दिसून येत आहे,

पैजारबुवा,

श्रीरंग_जोशी's picture

3 Nov 2021 - 9:33 am | श्रीरंग_जोशी

हा लेख म्हणजे निसर्गातल्या देखण्या पक्षी व प्राण्यांना पाहण्याची आवड असणार्‍यांसाठी पर्वर्णी आहे. अप्रतिम छायाचित्रे व ओघवते वर्णन.
चार वर्षांपूर्वी बिंगच्या होमपेजवर पुण्याशेजारी आढळलेल्या फॅन थ्रोटेड लिझार्डचा फोटो आला होता. तेव्हा मी तो मिपाच्या खरडफळ्यावर टाकला होता.

शोधले असता तो फोटो फेसबुकवर मिळाला.

या लेखासाठी मन:पूर्वक धन्यवाद.

नेहमीप्रमाणे उत्तम फोटो आणि त्याला साजेसे वर्णन
वाघोबांचे फोटो तर अप्रतिम.
तुमचा सापमार गरुडाचा लेख आणि फोटो अजुन लक्षात आहेत.

पक्षी निरीक्षण करणे तसे खूप अवघड काम.खूप वाट बघावी लागते त्यांचे दर्शन मिळण्यासाठी. परत फोटो काढणे अजुन अवघड थोडी तरी चाहूल लागली की ते उडून जाणार.
छान माहिती आणि फोटो सुद्धा.

तुषार काळभोर's picture

3 Nov 2021 - 5:27 pm | तुषार काळभोर

एकेक फोटो बघत बसावा असा!
प्रचंड संयम आणि चिकाटी लागली असणार इतके सुंदर फोटो टिपण्यासाठी. लांडगा, फॅन थ्रोटेड लिझार्ड, खुल्या वनातील वाघ हे तर नुसते दिसणे सुद्धा दुरापास्त! तुम्ही त्यांचे इतके छान फोटो सुद्धा घेतले!

मुक्त विहारि's picture

3 Nov 2021 - 7:30 pm | मुक्त विहारि

आमच्या हातात ही कला नाही

अमरेंद्र बाहुबली's picture

3 Nov 2021 - 9:57 pm | अमरेंद्र बाहुबली

फोटो आणी लेख आवडले

सोत्रि's picture

4 Nov 2021 - 2:12 am | सोत्रि

दिवाळी अंकाची शोभा वाढवत अंकाला देखणं करणारं लेखन!

-(जीवसृष्टी निरीक्षक) सोकाजी

चौथा कोनाडा's picture

4 Nov 2021 - 8:49 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

4 Nov 2021 - 8:49 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

4 Nov 2021 - 8:50 pm | चौथा कोनाडा

केवळ अप्रतिम
निसर्गाचे फोटो नेहमी पाहण्यात येतात, पण असे पक्षी प्राणी यांचे फोटो पाहणे म्हंजे दिवाळी मेजवानीच
या फोटोंसाठी किती कष्ट घेतले हे आपणच जाणे !

हॅट्स ऑफ मिपाप्रेमीयोगेश

MipaPremiYogesh's picture

4 Nov 2021 - 9:52 pm | MipaPremiYogesh
MipaPremiYogesh's picture

4 Nov 2021 - 9:52 pm | MipaPremiYogesh
MipaPremiYogesh's picture

4 Nov 2021 - 9:52 pm | MipaPremiYogesh
अनन्त्_यात्री's picture

5 Nov 2021 - 7:59 am | अनन्त्_यात्री

मिपावर वाटत रहा ही विनंती

MipaPremiYogesh's picture

5 Nov 2021 - 9:20 pm | MipaPremiYogesh

होय फक्त डायरेक्ट अपलोड ची सोय मिळाल्यास पटापट टाकता येतील..

तुम्ही फोटो काढणार म्हणून सगळ्यांनी भारी पोज दिल्यात :) गमतीचा भाग सोडला तर खूप संयम लागतो असे फोटो काढायला.

सर्वसाक्षी's picture

5 Nov 2021 - 5:51 pm | सर्वसाक्षी

आपला व्यासंग आणि चित्रण, दोन्ही जबरदस्त

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

7 Nov 2021 - 9:22 am | ॲबसेंट माइंडेड ...

सगळे फोटो सुंदर आहेत.

चित्रगुप्त's picture

7 Nov 2021 - 10:53 am | चित्रगुप्त

अतिशय सुन्दर फोटो आणि अनुभवकथन.

सुरेख फोटो... पुण्याजवळ राहून हे कधीच केलं नाहीये... आता बघायला हवं

जुइ's picture

9 Nov 2021 - 12:35 am | जुइ

पक्ष्यांचे फोटो आणि त्यासोबतचे वर्णन आवडले. खास करून क्रेस्टेड हॉक ईगल आणि वाघाचे फोटो आवडले.

काय सुंदर लेख आणि छायाचित्रे आहेत...!
वन्यप्राण्यांची छायाचित्रे घ्यायला प्रचंड संयम आणि चिकाटी लागते तेव्हाच असे सुंदर क्षण हाताशी लागतात.
तुम्ही इथं नेहमी लिहीत जावं आणि या क्षणांचे साक्षीदार आम्हालाही करावं.

सुरसंगम's picture

9 Nov 2021 - 7:16 am | सुरसंगम

एका पेक्षा एक कातिल फोटो. शेवटचा तर खुप मस्त.

राजेंद्र मेहेंदळे's picture

9 Nov 2021 - 12:40 pm | राजेंद्र मेहेंदळे

घाईत मोबाईलवर वाचुन झाला होता हा धागा, पण आता मोठ्या स्क्रीनवर चित्रे बघताना अजुन जास्त मजा येतेय. एक से एक चित्रे आणि अनुभव. प्रत्येक फोटोमागची मेहनत जाणवते आहे. अजुन येउंद्या.

रच्याकने- ते लांडगोबांचे अजुन फोटो टाका की मोबाईलवर पाहिलेले :)

लयं भारी फोटोज... :) तुरेवाला गरुड सगळ्यात जास्त आवडला.

मदनबाण.....

श्वेता व्यास's picture

16 Nov 2021 - 12:08 pm | श्वेता व्यास

खूपच सुंदर प्रचि !

गोरगावलेकर's picture

20 Nov 2021 - 7:57 pm | गोरगावलेकर

सर्वच फोटो अप्रतिम

कुमार१'s picture

20 Dec 2021 - 5:09 pm | कुमार१

केवळ अप्रतिम.
पु ले शु