प्रसंग १ :-
स्थळ: मुंबईतल्या अत्यंत गजबजलेल्या काळबादेवी भागातील एका जीर्ण इमारतीचा दुसरा मजला. मोडकळीला आलेल्या कुरकुरणाऱ्या लाकडी जिन्याने दोघे मित्र वर चढून आले.
"जय श्रीक्रिश्ना मोटाभाई. तमारा अमुक सेठ आव्या छे. एना साथे तमने लाडवा मोकलूं छू.." समोर बसलेले झडपियाजी फोनवर कुजबुजले आणि समोरच्या टेबलावर धाड धाड पाचशे-दोन हजारांच्या नोटांची बंडले रचू लागले.
दोघा मित्रांपैकी 'अमुक सेठ' मनोभावे ते पैसे मोजून एक कळकट्ट कापडी पिशवीत भरू लागले आणि मोजणी संपल्याबरोबर स्वतःच्या खिशातून दहा दहा रुपयाच्या दोन चुरगळलेल्या नोटा झडपियाजींना दिल्या. त्यांनी नोटा तपासल्यासारखे केले आणि मग मनोभावे नमस्कार करून त्या नोटा 'श्री कछवाह गोसेवा मंडल, भादोडिया चार रास्ता, लालजीपुर, जिला कच्छ, गुजरात' असा पत्ता छापलेल्या पारदर्शक 'गोसेवा दानपेटी'त अर्पण केल्या.
* *
प्रसंग २ :-
स्थळ : हंगेरी देशाची राजधानी असलेले बुडापेस्ट शहर. सदैव गजबजलेले. शहराच्या बुडा भागातील बेकसी कापू - लुथेरिन चर्चच्या जवळच्या, श्रीमंती थाटाची अनेक दुकाने असलेल्या लेनमधील एक सुंदर 'आर्ट शॉप'. मला थोडेफार डॉलर बदलून स्थानिक चलन हवे आहे आणि माझ्या गाइडच्या मते पूर्ण शहरात इथे सर्वोत्तम दर मिळेल. आम्ही दोघे दुकानात शिरतो. माझे काम चटकन होते. बाजूलाच एक भारतीय चेहरेपट्टीचा माणूस... सहज स्मित.. तो फोनवर बोलतो आहे ... "हां बीजी, भेज रहा हूँ. शाम को मिल जायेंगे आप को. होर दस्सो, लाहोर दा की हाल? सब चंगा?" तो फोन ठेवतो. मख्ख चेहऱ्याने दुकानाच्या मालकीणबाई त्याच्याकडून स्थानिक चलन घेऊन, नीट मोजून पेटीत ठेवतात. फार नसावेत पैसे. साधारण ८०० डॉलर्स. आम्ही दुकानातून एकत्रच बाहेर पडत असताना तो सांगतो - "इथे ट्रक चालवतो. दर महिन्याला घरी पैसे पाठवतो." "बँकेतून का नाही पाठवत?" असे मी विचारल्यावर सांगतो, "बँक में ज्यादा कमिशन है और दो चार दिन लगेंगे. इन आंटी के तारिके से भेजो तो दो घंटे में पैसे घरवालों को मिल जाते हैं."
* *
प्रसंग ३ :-
स्थळ : सिंगापूरचा लिट्ल इंडिया भाग. प्रसिद्ध मुस्तफा स्टोअरच्या बाजूच्या गल्लीत अक्षरश: डझनांनी माणसे खोळंबली आहेत. बहुतेक सर्वच जण तामिळ भाषेत बोलत आहेत. सर्वांना चेन्नई, कोईम्बतूर, चिदंबरम, तिरुचिरापल्ली अशा आपापल्या गावांना पैसे पाठवायचे आहेत. प्रत्येकाची रक्कम तुटपुंजीच आहे, पण घरच्यांना ताबडतोब मिळावी अशी अपेक्षा आहे. काही मिनिटांतच तिथला कारभारी प्रत्येकाकडून पैसे घेऊन धाडधाड फोन करून पलीकडे पैसे मिळाल्याची खातरजमा करतो आणि बघता बघता सगळी गर्दी निवळते. पंधरा-वीस मिनिटांचा खेळ. स्थानिक मित्र सांगतो, ह्याला ‘हवाला’ म्हणतात. दर आठवड्याला पगाराच्या दिवशी साधारण असेच दृश्य असते. मग आम्ही दोघे सिंगापूरच्या कडक सरकारी नियम-कायद्यांवर बोलत बोलत मसाला चहा पिऊन त्या भागातून बाहेर पडतो.
* * *
कर्मधर्मसंयोगाने वरील तिन्ही प्रसंगांचा साक्षीदार ठरल्यामुळे ‘हवाला’ काय भानगड आहे याबद्दलची उत्सुकता ताणली जाते. त्या अनुषंगाने विषयावर विचार – वाचन - चर्चा असा प्रवास घडतो.
अगदी थोडक्यात सांगायचे, तर पैसा ‘जागचा जागीच’ ठेवून जगात हवा तिथे पोहोचवण्याची जादू म्हणजे हवाला. जगाचे पोलीस असलेल्या इंटरपोलची हवाला व्याख्या एकदम सोप्पी आहे - ‘money transfer without money movement’. कोणताही फॉर्म नाही, कागदपत्र नाही, बँक खात्याची गरज नाही. अत्यल्प कमिशन देऊन काही तासांत जगातल्या कोठल्याही कोपऱ्यात पैसे पोहोचवले जातात. व्यवहार त्या त्या देशातील स्थानिक चलनात! झटपट आणि बिनबोभाट.
हवाला जन्माने शुद्ध हिंदुस्थानी असल्याचे मानतात. ह्याचा एक चिनी भाऊबंद आहे 'चॉप मनी' किंवा 'फ्लाय मनी' नावाचा. दोघांमध्ये ज्येष्ठ कोण, याबद्दल वाद आहे. चीनचा Fei-ch'ien, हाँगकाँगचा हुई कुआन (Hui Kuan), भारत आणि अरबस्तानातला हवाला, फिलिपिन्सचा पडाला (Padala), सीयाम-थायलंडचा फे क्वान (Phei Kwan) सगळे एकमेकांचे चुलत-मावस-आतेभाऊ. 'इन्फॉर्मल मनी एक्स्चेंज' असे इंग्लिशमधले सध्याचे गोंडस नाव.
आठव्या शतकात 'रेशीम मार्ग'वर उर्फ सिल्क रूटवर चालणाऱ्या व्यापारात 'हवाला'ची पाळेमुळे आहेत. चीनच्या हान राजवटीत रेशीम मार्ग उदयास आला आणि पुढे उत्तर भारत, इराण-इराक, सीरिया मार्गे रोमपर्यंत खुष्कीच्या मार्गाने व्यापार जोमाने होऊ लागला. देशोदेशीचे व्यापारी हजारो मैलांचा प्रवास करून आपल्या चीजवस्तू विकत आणि त्याबदल्यात अन्य वस्तू किंवा रोकड मिळवत. हा सगळा प्रदेश अनेक लहानमोठ्या राज्यकर्त्यांच्या ताब्यात होता आणि वाटेत व्यापाऱ्यांना लुटण्याचे प्रमाण भरपूर. साहजिकच जास्त रोकड जवळ बाळगण्यात जास्त जोखीम. शिवाय प्रत्येक राज्यात 'चलन' वेगवेगळे असल्यामुळे गोंधळ जास्तच. त्यामुळे भारतीय आणि अरब व्यापाऱ्यांनी 'हवाला'चा मार्ग सर्वप्रथम चोखाळला आणि रेशीम मार्गावरील सर्व मोठ्या शहरात पैसे सुरक्षितपणे पाठवण्याची एक खातरीशीर व्यवस्था अमलात आली. आधुनिक बँकिंग प्रणाली सर्वत्र उपलब्ध आणि सर्वमान्य होण्याच्या आधी विदेशात आणि देशांतर्गत पैशांची देवाणघेवाण करणारी सुरक्षित आणि खातरीशीर पद्धत म्हणून हवाला व्यापार स्थिरावला.
‘हवाला’ शब्दाचे अर्थ प्रदेशागणिक आणि भाषेगणिक बदलतात - साक्ष, कशाच्या तरी ऐवजी, मोबदल्यात, विश्वास, विश्वासू, जामीन, जामीनपात्र असे. हिंदी-मराठीत सूत्रांच्या ‘हवाल्याने’ बातमी इत्यादी आपण ऐकतोच.
रोकड पैसे, एक पैसे देणारा, एक पैसे घेणारा, दोघांचे प्रत्येकी एक याप्रमाणे किमान दोन 'हवालादार', दोघांचे कमिशन आणि परवलीचा शब्द किंवा खूण एवढ्या भांडवलावर हवाला व्यापार चालतो. हवाला पद्धतीला भारतात आणि एकूणच आशिया खंडात मोठा इतिहास आहे. व्यापारी जातिसमुदायांमध्ये शेकडो वर्षांपासून पैशांच्या देवाणघेवाणीसाठी हवाला पद्धत वापरात आहे. आपल्याकडे मुंबई-दिल्ली-कोलकाता शहरात पाच पाच पिढ्या 'हवालादार' असलेली कुटुंबं आहेत. पिढीजात हाच व्यवसाय. त्यांच्यापैकी अनेकांना दलाल, मर्चंट, सेठ, चतुरसेठ, मारफतिया, रोकडिया, झडपिया अशी आडनावे चिकटली आहेत. (ह्या आडनावाचे सर्वच लोक हवाला व्यापारात होते-आहेत असा मुळीच दावा नाही.) परिचयातील एका सिंधी कुटुंबाने नुकतीच काही जुनी कागदपत्रे एका शोधकर्तीला दिली, त्यात कुटुंबाचा हवाला व्यापार कराची, मुंबई, हैदराबाद, लाहोर, मुलतान, काबूल ते समरकंद भागात चालत असल्याचे पुरावे आहेत. पाश्चिमात्य पद्धतीचे बँकिंग सुरु होण्याआधी भारत आणि समस्त आशिया खंडात एकमेकांच्या ओळखी आणि पिढीजात व्यापारी संबंध एवढ्याच भांडवलावर तोंडी आणि पूर्णपणे विश्वासावर चालणारा कारभार. 'लिखापढी' जवळपास नाहीच.
आज आधुनिक बँकिंगचे जाळे जगभर भरपूर पसरल्यानंतरही अधिकृत बँकिंग तंत्राला जोरदार टक्कर देण्याची हवालाची शक्ती प्रचंड आहे. कारणे अनेक आहेत - कागदपत्रांची फारशी गरज नसणे, कमीत कमी कमिशन, बँकेत खाते नसणे, सरकारी कर चुकवण्याची वृत्ती, ताबडतोब मिळणारी घरपोच सेवा, ओळखपाळख असल्यामुळे वाटणारा विश्वास इत्यादी. हवाला व्यवहारातील सर्वात मोठी गोम म्हणजे घेणाऱ्या-देणाऱ्यांची ओळख उघड न होणे आणि झालेल्या आर्थिक व्यवहाराचा कोणताही मागमूस न राहणे. शिवाय 'हवालादार' होण्यासाठी कोणतीही नोंदणी किंवा परवाना लागत नाही, त्यांना कोणत्याही सरकारी निरीक्षण-परीक्षणातून जावे लागत नाही. त्यांच्यावर सरकारचा किंवा इतर कोणाचाच वचक नाही. सगळा व्यवहार फक्त सर्व संबंधितांच्या एकमेकांवर असलेल्या विश्वासावर चालतो. काळाबाजार करणारे, करबुडवे, सराईत गुन्हेगार, सट्टा लावणारे बुकीज, गुंड-खंडणीखोर, तस्कर, पैशांची अफरातफर करणारे, दहशतवादी, अंमली पदार्थाचे व्यापारी असे सर्व समाजविघातक लोक हवालाचा मार्ग वापरतील, ही साधार भीती पोलीस यंत्रणांना असते. त्यामुळे काही आफ्रिकन देश वगळता जगभर हवाला व्यापारावर बंदी आहे. बंदी कितपत परिणामकारक आहे हा वादाचा विषय आहे. अधिक भ्रष्टाचार असलेल्या आणि मागास बँकिंग व्यवस्था असलेल्या गरीब देशात हवाला व्यापार जास्त भरभराटीला आहे असे म्हणावे, तर जुनी आणि गावोगावी रुजलेली प्रभावी बँकिंग व्यवस्था असलेल्या युरोपीय देशातही हवाला जोरात आहे. कर चुकवणे ही प्रवृत्ती जगभर सारखीच असावी. जिथे करव्यवस्था कडक नसेल किंवा करांचे प्रमाण जास्त असेल, तिथे ही प्रवृत्ती हवालासारख्या कर बुडवणाऱ्या पद्धतीला पोषक होते. घरोघरी मातीच्या चुली.
हवाला पद्धतीने देवाणघेवाण करायला भारतात अर्थातच बंदी आहे. तो मोठा गुन्हा आहे. विदेशी मुद्रा नियमन कायद्यानुसार हवालात पाठवलेल्या रकमेच्या तिप्पट रकमेच्या दंडाची तरतूद आहे. पाठवलेल्या रकमेबद्दल तपासयंत्रणांना खातरी नसेल किंवा रक्कम खूप कमी असेल तर किमान दोन लाख रुपये दंड आहे. दंडाची रक्कम न भरल्यास हवाला वापरणाऱ्या दोन्ही पक्षांकडून सर्वदेशीय चलनी नोटा आणि स्थावर संपत्ती जप्त करणे किंवा कैदेची जबरी शिक्षा आहे. असे असूनही आपल्या देशात हवालाचा धंदा जोरात असल्याचे बोलले जाते.
शितावरून भाताची परीक्षा करायची म्हटल्यास भारत दर वर्षी येणाऱ्या साधारण १ लाख कोटी परकीय चलनापैकी फक्त ३० हजार कोटी हे अधिकृत बँकिंग प्रणालीमार्फत येतात. उरलेला मोठा भाग हवालामार्फत येतो. देशांतर्गत रुपयातून होणारी हवाला देवाणघेवाण यात धरलेली नाही, अन्यथा आकडे आणखी फुगतील. अर्थात हे फक्त यंत्रणांचे अंदाज आहेत, अधिकृत आकडे उपलब्ध नसतात. खरी आकडेवारी यापेक्षा बरीच जास्त असण्याची शक्यता आहे.
भारतात येणारा हवालाचा सर्वात जास्त पैसा खाडीच्या देशातून येतो असे म्हणतात. तिथे मोठ्या संख्येत असलेल्या भारतीय कामगारांमध्ये आणि नोकरदारांमध्ये भारतात घरी पैसे पाठवण्यासाठी हवाला पद्धत अनेक दशकांपासून वापरात आहे आणि ती अजूनही लोकप्रिय आहे. मुख्य कारण अल्पशिक्षित लोक आणि सुटसुटीत स्वस्त व्यवहार. हवाला व्यापाराचे एक टोक खाडी देशातून होणाऱ्या सोन्याच्या तस्करीशी जोडले गेले आहे. वेळोवेळी त्याचे पुरावे दिसून येतात. मागच्या वर्षी कोरोना लाटेतसुद्धा तिरुवनंतपुरम विमानतळावर एका राजदूताच्या सामानात फार मोठ्या प्रमाणावर सोने आढळल्याने बरीच चौकशी झाली. त्यात पकडलेल्या हवाला व्यापाऱ्यांचे भारतासह सुमारे वीस देशांत असलेले नेटवर्क उघड झाले. अर्थात असे छापे आणि त्यातून होणारी जप्ती वगैरे हिमनगाचे एक टोक आहे, हे तपासयंत्रणा जाणतात.
मागील वर्षी संयुक्त राष्ट्रसंघाने केलेल्या अभ्यासानुसार दर वर्षी जगभरात अवैधमार्गे फिरणारा पैसा अंदाजे २ ट्रिलियन (२००० अब्ज) अमेरिकन डॉलर्स असावा. ही रक्कम जगाच्या एकूण GDPच्या ५% आहे, यावरून विषयव्याप्ती लक्षात येते. विषयतज्ज्ञ डॉ. रोनाल्ड पोल यांनी केलेल्या एका जागतिक पाहणीच्या निष्कर्षानुसार दर वर्षी जगभरातल्या सगळ्या तपास यंत्रणा मिळून एकूण हवाला व्यापाराच्या जेमतेम ०.१ % रक्कम जप्त करतात. उर्वरित अब्जावधी रुपयांची रक्कम त्यांच्या हाती लागत नाही. ही रक्कम देशोदेशीच्या दहशतवादी संघटनांच्या आणि अंमली पदार्थाच्या तस्करांच्या कामी येत असावी. सर्व देश पैशांचा अवैध प्रवास रोखण्याचा परोपरीने प्रयत्न करतात. त्यांना मिळणारे यश मात्र मर्यादित आहे.
हवाला व्यापार पूर्ण बंद करता येत नाही, हे लक्षात आल्यामुळे अनेक देशांनी सध्या 'दुश्मन से दोस्ती' असे धोरण अवलंबिले आहे. विशेषतः युद्धग्रस्त, राजकीय-आर्थिकदृष्ट्या अस्थिर देशांमध्ये पैसा देशाबाहेर नेण्यासाठी किंवा चलनबदलासाठी स्थानिक यंत्रणा स्वतः हवाला व्यापारांना नोंदणीपत्र वगैरे देऊन थोडेफार नियंत्रण आणू पाहत आहेत. त्याबदल्यात हवालादारांकडून ग्राहकांची नोंदणी, व्यवहाराचे तपशील मिळवून पैसे गुन्हेगारांच्या हाती जाऊ नयेत म्हणून प्रयत्न करायचे त्यांचे धोरण आहे. हे करत असताना देशातील अधिकृत बँकिंग व्यवस्थेला लागलेले भ्रष्टाचाराचे, आळसाचे, भोंगळ कारभाराचे डाग धुण्याचा प्रयत्न अनेक देश करत आहेत. कारभार ग्राहकाभिमुख नसेल, देवाणघेवाणीवर कर जास्त आणि करप्रणाली किचकट असेल, बँकेचे व्यवहार क्लिष्ट असतील तोवर हवालासारखे पर्याय ग्राहक वापरणार, हे सगळ्याच देशांना कळलेले आहे.
बरे, हवाला कितीही बदनाम असला, तरी राजरोसपणे बँकेतून पाठवलेल्या पैशात काही गडबड होत नाही असे नाही. चाणाक्ष व्यापारी आणि हवालादार कधी कधी सोने किंवा तत्सम वस्तूंच्या तस्करीसाठी योग्य त्या देशात पैसे उसने देतात आणि भारतात विक्रीनंतर मिळणाऱ्या नफ्यात हिस्सा मिळवतात. आयात-निर्यातीच्या व्यापारात अधिक बिल दाखवून कमी माल पाठवणे आणि वरचे पैसे हे हवाला व्यवहार पूर्ण कार्यासाठी वापरणे हे तत्त्व वापरले जाते. अनेकदा 'हँडलूम किंवा हस्तकलेच्या वस्तू' म्हणून लाकडी ठोकळे किंवा रंगीबेरंगी चिंध्या भरलेले पेटारे विदेशात पाठवले जातात. त्यापोटी कोट्यवधी रुपये राजरोसपणे बँकेतून निर्यातदाराला मिळतात आणि ते हवाला व्यापारात वापरले जातात. जगभरातील सरकारी यंत्रणा हे थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांचे यश मर्यादित आहे. चोर नेहमी पोलिसांच्या एक पाऊल पुढे असतात.
नवीन तंत्रज्ञान वापरण्यातही चोर पोलिसांना वरचढ ठरत आहेत. प्रभावी संपर्कमाध्यमे वापरून 'घंटों का काम मिंटों में' हे तर आहेच, शिवाय मोठ्या व्यवहारासाठी सररास ओळख चोरण्याचा (Identity Theft) मार्ग वापरला जात असल्याचे तपास यंत्रणांच्या लक्षात येत आहे. हवालाच्या जगात क्रिप्टो करन्सीने प्रवेश केल्याची वदंता आहे. जगभरातील सरकारे आणि हवाला यंत्रणा यामध्ये उंदीर-मांजराचा खेळ अखंड चालूच आहे.
* * *
रोकड, पैसे देणारा, पैसे घेणारा, दोघांचे 'हवालादार' आणि परवलीचा शब्द.. आता वरच्या प्रसंगांमधले दुवे चाणाक्ष वाचकांनी ओळखले असतीलच. अमुक सेठ जे 'लाडू' खाणार आहेत, तो पैशाचा आकडा आहे आणि दहा रुपयांच्या चुरगळलेल्या नोटांचे नंबर हा परवलीचा शब्द आहे, वन टाइम पासवर्ड. 'बीजी' आणि 'लाहोर दा की हाल' हे त्या लाहोरच्या आजींसाठी आणि आपल्या तामिळ मित्रांनी तर थेट फोन करून पैसे मिळाल्याची तत्काळ पावती घेतली आहे.
समाप्त!
टीप : लेखातील तपशील आणि आकडेवारी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आणि विविध देशातील प्रथितयश आणि विश्वसनीय संस्थळांच्या 'हवाल्याने'!
===================
प्रतिसादांत आपल्यापैकी काहींनी विचारल्यामुळे हवाला व्यवहाराची पूर्तता कशी होते याविषयी थोडे अधिकचे :-
लेखात प्रत्येक व्यवहारात किमान दोन हवालादार असतात असे लिहिले आहे, प्रत्यक्षात मात्र ही अनेक हवालादारांची एक मोठी साखळी असू शकते. त्यांचे हवालाव्यतिरिक्त आपसात अन्य आर्थिक व्यवहार असतात. हेच व्यवहार हवालाची पूर्तता करण्यासाठी वापरण्यात येतात, अर्थात अवैध मार्गानी. त्यामुळे प्रत्येकाकडे येणारा पैसा अनेक देश फिरून येतो. त्याला त्यांच्या भाषेत 'लेयरिंग' म्हणतात. त्यामुळे व्यवहाराचा माग काढणे अधिक कठीण होते. हे सर्व परस्पर विश्वासावर चालत असल्याने आपसात ताबडतोब सेटलमेंटचा आग्रह नसतो. म्हणजे कोणी हवालादार ब्यागेत नोटा भरून दुसऱ्या देशांत पूर्ती करायला जात नाही.
थोडक्यात सांगायचे तर ताळमेळ घालण्यासाठी सर्वात जास्त वापरण्यात येणारे सूत्र म्हणजे अन्य वस्तूंची आयात-निर्यात, वेगवेगळ्या देशात करण्यात येणारी खरी-खोटी गुंतवणूक, अवैध सावकारी, मौल्यवान वस्तूंची तस्करी इत्यादी. त्याबद्दल लेखात काही उदाहरणे आहेत. हे गणित २+२ = ४ असे साधे सोपे नाही. साहजिकपणे हवाला व्यवहार बेकायदेशीर आणि गुन्हेगारी कृत्य म्हणून गणले जातात.
गंदा है पर धंदा है :-)
आर्थिक व्यवहाराशी संबंधित हा महत्त्वाचा लेख आवडला.
त्यातील बारकावे तसेच फोटो छान आहेत.
मी परदेशात असताना कटाक्षाने बँकेच्या माध्यमातूनच पैसे भारतात पाठवले होते.
बँकेतून पैसे पाठवण्याचा मुख्य फायदा म्हणजे आपल्याला रोख रक्कम हाताळावी लागत नाही. मला ते महत्त्वाचे वाटले.
बाकी अन्य प्रवृत्तीबद्दल तुम्ही लिहिलेच आहे.
.... मी कटाक्षाने बँकेच्या माध्यमातूनच पैसे भारतात पाठवले होते.....
आपल्यासारखे सामान्य पापभिरू लोक ज्यांना कर बुडवायचा नाही आणि आंतरराष्ट्रीय बँकिंगचा व्यवस्थित अनुभव आहे ते या मार्गाला जात नाहीत. आता विदेशी चलन पाठवण्याची अधिकृत मर्यादा बरीच वाढली आहे आणि भारतीय बँकिंग सेवाही ठीकठाक आहे.
प्रतिसादाबद्दल आभारी आहे डॉक.
अतिशय उत्तम लेख, दृष्टीआड सृष्टी हेच तत्व अमर च्यामारी, मानवी डोके कुठं कुठं काय काय करेल कळायला मार्ग नाही.
दीपावलीचा उत्तम बार उडवला आहे दिवाळी अंकाने त्यातही सुरुवात ही अशीच उत्तम मग विचारायलाच नको.
उत्तम माहितीपूर्ण लेख. आखाती देशातील अनेक मनी एक्सचेंजेस हवाला करतात असे ऐकले होतो. नोटबंदी झाली तेव्हा १ ओमानी रियाल = १८० रुपये official भाव होता. तेव्हा ओमान मधील अनेक नामांकित मनी एक्सचेंजेस जुन्या ५०० च्या नोटा घेतल्यास रियालला दोनशे रुपये देत होते. हवालामुळे असलेला (काळा) पैसा ह्या मार्गाने खपवत आहेत हे कळल्यावर मी चांगलाच 'हवाला-दिल" झालो होतो.
हवाला दिल :-)
.... मनी एक्सचेंजेस जुन्या ५०० च्या नोटा घेतल्यास रियालला दोनशे रुपये देत होते.....
हे मला समजले नाही, बाद झालेल्या जुन्या भारतीय नोटा कोणी कशाला घेईल ?
उलट विदेशात असलेल्या भारतीय लोकांना त्यांच्याकडचे जुने भारतीय चलन बदलून घ्यायला दुप्पट कष्ट पडले असा विदेशस्थ गोतावळ्याचा अनुभव ऐकलाय.
प्रतिसादाबद्दल आभार.
आता फोन, इंटरनेट्च्या गतीमान युगात ही पध्दत कशी चालते हे समजु शकतो.
पण शंभर दोनशे वर्षांपुर्वी हे सर्व व्यवहार कसे चालायचे?
मला वाटते प्रवासाला जाताना गावच्या सावकाराकडे तारण ठेऊन ठराविक रकमेची हुंडी बरोबर घेऊन जायचे आणि गंतव्य स्थानी ती वटवायची. हा हवालाचाच प्रकार का?
@ अभिजीत अवलिया,
मी लेख पाठवतांना 'खात्री' आणि 'खात्रीशीर'च लिहिले होते. कदाचित वेगळ्या सॉफ्टवेअरचा प्रताप असावा आणि हे जुन्या बखरीतल्या मराठीतले 'खातरीशीर' झाले असावे. एके ठिकाणी सर्रास ऐवजी 'सररास' पण झालेले दिसतेय, दुरुस्त करतो, लक्षात आणून दिल्याबद्दल आभार !
@ कुमार१,
शंकानिरसन करणाऱ्या लिंक बद्दल :- आता दोन्ही बरोबर असतील तर राहू देत, दुरुस्ती करत नाही :-)
अभिप्रायांबद्दल आभारी आहे.
हवाला प्रकाराची चांगली माहिती मला आहे. अगदी जवळच्या मित्राने २-३ वेळा हा व्यवहार केला आहे. सिंगापूरमधला मुस्तफा सुद्धा डॉलर काळ्या बाजाराच्या दराने विकणे/घेणे हा प्रकार करायचा. अमेरिकेत प्रसिद्ध होणाऱ्या India Abroad, News India Times वगैरे साप्ताहिकात तर भारतात कोठेही खात्रीशीर पैसे पाठविण्याच्या जाहिराती असायच्या.
जोपर्यंत सरकारी कर आहेत तोपर्यंत लोक तो चुकविण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार. करांच्या प्रमाणाच्या सम प्रमाणात काळाबाजार, विनापावतीचे व्यवहार, हवाला असे प्रकार वाढत राहतात.
खूपच उत्साहाने लेख वाचायला घेतला पण बाकी हा व्यवहार नक्की कसा चालतो हे सांगितलेच नाही तुम्ही!
म्हणजे अस बघा कि कामगाराने दुबईत दिरहम हवाला वाल्याला दिले आणि त्याचय नातेवाईकाला ते भारतात रुपयात मिळाले
हो पण पुढे कुठेतरी दुबईतील हवाला सेवा देणाऱ्या माणसाकडे जमलेले दिरहम आणि भारतात रुपये पुरवणाऱ्या कडून "वजा " झालेलं रुपये यांचा ताळमेळ कसा घालतात? काय गणित काय ?
हवाला म्हणजे अधिकृत अंतर्रष्टत्रीय पैसे चलन वळण ( वेस्टन )युनिअन वैगरे त्याचे जे यंत्र चालते तसेच हे हि चालत असावे फक्त काळ्याबाजारात .. पण ते कसे? बाकी तस्करी वैगरे वेगळ्या पण संबंधित गोष्टी आहेत हे मान्य
या बाबतीत एक रोचक अनुभव .. तो म्हणजे १) अधिकृत हवाला कसा तो अनुभव आणि २) आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन ( कधी ३ पण) असा अनुभव
त्यावेळी भारतातूंत बाहेर जाताना लागणारे परदेशी चलन सध्या सारखे सहजतेने अधिकृत रित्या मिळते नसे .. म्हणजे अगदी इमिग्रेशन च्या पल्याड च्या दुकानात सुद्धा भारतीय चलन वापरता येत नव्हेत , इमिग्रेशन झाले कि खिशात रुपये असणे हे बेकायदेशीर होते ( म्हणे )
काही तांत्रिक कारणाने मला रिझर्व बँकेने परदेशी शिक्षणासाठी लागणारे परदेशी चलन द्यायचे नाकारले .... आणि एकूण रक्कम जवळ जवळ माझ्य त्यावेळचं भारतातील १ वर्षाच्या पगारा एवढी होती त्यामुळे "हवाला" करन्याची भीती वाटत होती ... करावे काय असा प्रश्न पडला
शेवटी परदेशी दूतावासाला विचारले काय करू पैसे कसे भरू? त्यानं पण हा प्रश्न आधी कधी इतर विद्यार्थ्यं बरोबर आला नवहता!
ते म्हणाले तुम्ही असे करा कि चक्क रुपयात दूतावासाचं नावाने डिमांड दराफ्ट पाठवा आणि आम्ही अंतर्गत रित्या तेथील विद्यपीठाला पैसे पोचव्तो ... हुश्श झाला एक प्रकारचाच वैध मार्गाचाच हवाला झाला ....
बर हे झालं आंधळा मागतो एक डोळा आणि मिळालेला दुसरा आता पुढे तिसरा कसा मिळालेलं तर तो असा
प्रदेशात गेलो ( जाताना अगदीच काही तरी पाहिजे म्हणून :ब्लॅक मध्ये ८०० डॉलर घेतले होते ते सुद्धा प्यांट ला आता चोर खिसा वैगरे शिवून त्यात ..विमानात जाई पर्यंत धाकधूक... इमिग्रेशन ला चाचपणी झाली तर ! भारतात आहेस अजून हातात डॉलर कुठून आले !)
तर विद्यपाठीतात गेलो नोंदणी केली आणि तेथील अधिकारी म्हणाला .. अरे तू तर वर्षाच्या मध्यात आला आहेस, पण अख्या वर्षाची फी कशाला दिली आहेस? अर्धी फी परत पाहिजे तर घे !
मी उडालो ..लगेच हो म्हणालो .. करकरीत डॉलर च्या नोटा घेऊन बाहेर पडलो ...
रंजक लेखआवडला.
आंगडिया नावाचा भारताच्या काही भागात पैसे पाठवायचा पर्याय उपलब्ध आहे. हा मार्ग कायदेशीर की बेकायदेशीर ठाऊक नाही.
आंगडिया म्हणजे कूरिअर. मुख्यत: कागदपत्रे पाठविण्याचा जुना सार्वजनिक पर्याय. पण पैसे, सोनेचांदी, हिरे वगैरे मौल्यवान वस्तू देखील देखील पाठवता येतात. हा व्यवहार सचोटीने केला जातो असे बोलले जाते. पैसे वाहून नेले जात नसले तरी वस्तू मात्र वाहून नेणे क्रमप्राप्त आहे.
काही कोटी रुपयांचे सोने नेणार्या आंगडिया सेवकाचा खून एकदा झाला होता. हा सेवक फक्त ओने नेणारा सेवक होता आणि नेहमी नाईट शिफ्ट वा सलग दोनतीन दिवस सेवा बजावीत असे तरी त्याच्या पत्नीला लग्न झाल्यावर पाच वर्षे झाली तरी तो नक्की काय काम करतो ते ठाऊक नव्हते.
असो. छान लेख, धन्यवाद.
खूप मोठे व्यवहार असतात.पैसे मोजून घेतले किंवा दिले पण जात नसावेत.फक्त विश्वास असतो.
खूप मोठ्या रक्कम असतात.गोणी मध्ये भरलेल्या .असे ऐकले आहे.
खरे खोटे माहीत नहीं
झाली तेव्हा खूप मोठ्या रक्कमा हवाला मार्गे बदलेल्या गेल्या.
जुन्या नोटा ध्या आणि नवीन घ्या .
अगदी ट्रेन मध्ये पण दलाल भेटायचे चे.
किती ही मोठी रक्कम असली तरी ते जुन्या नोटाच्या बदल्यात नवीन नोट देत.सरकारी मुदत संपली तरी सुद्धा.
हवाला नियंत्रण ई डी च्या अखत्यारीत आहे.
विदेशी चलन पकडले तर मुख्यत्वे FEMA कायदा लागू होतो.
'हवालात की हवा' कमीत कमी एक वर्ष आहे जास्तीत जास्त किती हे पुराव्यानुसार कोणती कलमे लावलीत त्यावर आहे.
सुरुवातीची चित्रे सुंद्धा सुंदर आहेत. आणि नाट्य पण जबरदस्त.
एक प्रश्न म्हणजे समजा कुणी परदेशातून भारतात आपल्या वडिलांकडे पाठविण्यासाठी क्ष व्यक्तीला दिले. तसे क्ष ने य व्यक्तीला सांगितले. त्याप्रमाणे त्याने य व्यक्तीच्या वडिलांना ते पैसे दिले. क्ष व्यक्ती त्याच्याकडे असलेले पैसे य व्यक्तीला कशा प्रकारे देतो. सरळ रोख रक्कम देतो. काही वस्तूंचे व्यवहार असतात म्हणजे य व्यक्ती व्यापार करतोय माल ऑस्ट्रेलियातून घेतो तेंव्हा त्याचे पैसे क्ष देणार. नक्की व्यवहार कसा होतो.
उत्साह वाढवल्याबद्दल सर्व प्रतिसादकांचे आभार !
आपल्यापैकी काहींनी विचारल्यामुळे हवाला व्यवहाराची पूर्तता कशी होते याविषयी थोडे अधिकचे :-
लेखात प्रत्येक व्यवहारात किमान दोन हवालादार असतात असे लिहिले आहे, प्रत्यक्षात मात्र ही अनेक हवालादारांची एक मोठी साखळी असू शकते. त्यांचे हवालाव्यतिरिक्त आपसात अन्य आर्थिक व्यवहार असतात. त्यामुळे प्रत्येकाकडे येणारा पैसा अनेक देश फिरून येतो. त्याला त्यांच्या भाषेत 'लेयरिंग' म्हणतात. त्यामुळे त्यांचा माग काढणे अधिक कठीण होते. हे सर्व परस्पर विश्वासावर चालत असल्याने आपसात ताबडतोब सेटलमेंटचा आग्रह नसतो. ह्यासाठी सर्वात जास्त वापरण्यात येणारे सूत्र म्हणजे अन्य वस्तूंची आयात-निर्यात, वेगवेगळ्या देशात करण्यात येणारी खरी-खोटी गुंतवणूक, अवैध सावकारी, मौल्यवान वस्तूंची तस्करी इत्यादी, त्याबद्दल लेखात काही उदाहरणे आहेत.
गंदा है पर धंदा है :-)
त्यामुळे त्यांचा माग काढणे अधिक कठीण होते.... परस्पर विश्वासावर...
सगळं ठीक आहे पण प्रत्यक्ष कसे होते ते काहीच कळले नाही ! वाटलं तुम्हाला सविस्तर माहित आहे म्हणून तुम्ही लिहिलात !
खास करून हवाला २ ठिकाणी वापरला जातो
उदाहरण घ्या सिंगापुर मधील "ते" प्रसिद्ध दुकान .. आणि काळ असा जेव्हा भारतातंतून अधिकृत रित्या रुप्याचे डॉलर एकतर ३००० पेक्षा जास्त मिळायचे नाही आणि कोणाला समजा भारतातून ३००० पेक्षा जास्त डॉलर सिंगापोरे मध्ये महागडा कॅमेरा घेण्यासाठी पाहिजे आहेत .. मग तो त्याचे रुपये एकतर भारतात कोणाला तरी देणार आणि हवाला ने डॉलर घेणार किंवा बागेत भरून रुपये सिंगापोरे ला घेऊन येणार आणि "ते दुकान" किंवा दुसरा कोणी हवाला दार त्याला चढाई भावाने रुप्याचे डॉलर करून देणार .. ठीक पण मग सिंगापुर मध्ये ज्याने रुपये घेतले तो ते सिंगापोरे काही वापरू शकणार नाही फारसे सरतेशेवटी त्याला डॉलरचा लागणारं ! मग?
घरातून निघताना चार पाच वेळा कुलूप ओढून बघणारे आपण मराठी मध्यमवर्गीय. आता कुठे आपली पिढी शेअर्स आणि म्युच्युअल फंड्स चा विचार करू लागली आहे. हवाला वगैरे शब्द फक्त ऐ़कून ठाऊक असतात, त्या विषयातील एवढा रोचक लेख, तोही मनोरंजक! विषय खुलवण्याची तुमची हातोटी मस्त आहे!
माझा भाउ जेव्हा अमेरिकेस शिकण्यासाठी गेला, तेव्हा काही मित्र पूर्वीपासून तिथे नोकरी करत होते.
मी भावाला पैसे पाठवायचे आणि ते त्यांच्या घरी पाठवायचे , त्या पेक्षा मि मित्रान्च्या घरि पैसे द्यायचो , मित्र भावाला अमेरिकेत पैसे द्यायचे. कमिशन आणि वेळ वाचायचा.
make any payment to or for the credit of any person resident outside India in any manner;
अमेरिकेतल्या लोकांना देशाबाहेरील पैशांची माहिती द्यावी लागते. हा पैसा त्यांनी अमेरिकेबाहेर पाठवला नाही, म्हणून माहिती दिली असेल अशातला भाग नाही.
‘money transfer without money movement’ इज हवाला.
‘money transfer without money movement’ इज हवाला.
हा......म मग तांत्रिक दृष्ट्या अवैध असेल ...
असो एकूण आज भारतातून बाहेर खर्च करणे क्रेडिट कार्ड ने सोपे आहे या शिवाय गुंतवणुकीसाठी २५०,००० डॉलर एवढी रक्कम प्रति व्यक्ती प्रति वर्षी बाहेर पाठवता येते मग कशाला हवाय हे सगळे ...
थोडे विषयांतर करून सांगतो ५००,००० डॉलर मध्ये तुम्हाला अमेरिकेचे ग्रीन कार्ड ए बी ५ या द्वारे मिळू शकते ... हे माहिती आहे का !
इतर अनेक देशांपेक्षा हे साधय तरी "स्वस्त" आहे
९ झाली ! मला वाटले अजून काही दिवस ५च आहे
९ सुद्धा इतर देशांचं मानाने स्वस्त... सिंगापोरे २० लाख ऑस्ट्रेलिया पण साधारण तेवढेच
त्यामामाने ९ मध्ये अमेरिकेतील जास्त संधी मिळू शकते
अर्थात हे सर्व पैसे रोख किंवा स्वतःचे असावे लागतात , उधार घेतलेले चालत नाहीत आणि ते पैसे येई बी ५ च्या प्रोजेक्ट मध्ये २ वर्षे गुंतवले जातात आणि परतावा काय , तर मुद्दल परत मिळेल असे नक्की नाही. म्हणजे ९ लाख देऊन घरे घेऊ अमेरिकेत असे करून चालत नाही ..
ज्यातून प्रत्यक्ष स्थानिक रोजगार उभा राहील असेच प्रोजेक्ट गुंतवणुकीस उपयुक्त दाहरले जातात
पण ९ लाख डॉलर म्हणजे साडेसहा कोटी रुपये होतात.
कॅनडा फार स्वस्त आहे पण प्रोसेस फार वेळ खावू आहे. २०१५ मध्ये माझ्या एका सहकार्याने ३६लाख रुपये खर्च करून कॅनेडियन पर्मनंट रेसिडेन्सि मिळवली. आता त्या रेसिडेन्सि मुळे अमेरिकेतला व्हिसाचा त्रास नाही. अमेरिकेत नोकरी करतो. सप्ताहांत कॅनडा मध्ये जातो.
अवांतरः सुरुवातीला त्याला कधी अमेरिकेत ट्रॅफिक तिकीट मिळाले कि कॅनडाचे लायसन दाखवायचा, आणि कॅनडात तिकीट मिळाले कि अमेरिकेचे लायसन दाखवायचा म्हणजे दंड भरावा लागेल पण ड्रायव्हिंग रेकॉर्डवर काही नाही.
असे २-३ वेळेस केल्यावर एकदा त्याच्या वकिलाने त्याला असे न करण्याबद्दल तंबी दिली, तेव्हा पासून ड्रायव्हिंग सुधारले. त्यानेच सांगितलेला किस्सा, खरे खोटे तोच जाणे.
१) चे पी आर असेल तर यु एस या ला फिरायाला जायला सोपे होत असेल पण नोकरी साठी काय फायदा? / कदाचित जवळचं देशातील म्हणून मुलखातील जाणे सोपे होत असले पण वर्क व्हिसा साठी काय ?
२) कॅनडियन नागरिक असाल तर काय?
उदाहरण देतो
१) ऑस्ट्रेलिया पी आर असाल तर न्यू झीलंड ला पण काम करता येते पण उलटे नाही ?
२) दोन्ही देशाचे नागरिक असाल तर मात्र एकमेकांचं देशात काम करू शकता त्यात भेदभाव नाही ...
जाळावर थोडी शोधाशोध केली असता लक्षात आले की कॅनेडियन्सना पण वर्क व्हिसा लागतोच. व्हिसाची कटकट नाही असे का म्हणाला माहिती नाही. त्यांना व्हिसाचे जास्त पर्याय असतात.
कटकट कमी म्हणजे कामासाठी एच १च्या रांगेत ना उभे राहावे लागत नसावे असेल जशी ऑस्ट्रेलिय नागरिकांना अमेरिकेत काम ई ३ नावाचं व्हीसा
मिळतो कि जो एच १ पेक्षा सोप्पं आहे ... पण गोची अशी कि ई ३ मधून ग्रीन कार्ड करण्यास मार्ग नाही... जसा एच १ मधून आहे
आहे ते म्हणजे ग्रीन कार्ड लॉटरी .. पण त्यात चीन , भारत इत्यादी देशात नाही ( मग तुम्ही जरी कानडा किंवा ऑस्ट्रेल्या चे नागरिक असाल तरी )
यात बेकायदेशीर काही वाटत नाही फक्त सोयी साठी असे अनेक जण करतात
प्रश्न फक्त दोन्ही ठिकाणी रोख वयहार झाला तर ठीक , बँके मार्फत दिलेत तर स्थानिक आयकर हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो एवढेच
रोचक हवाल्याचा लेख.
हवाला व्यवहारांबड्डाल थोडेफार माहित होते, पण इथल्या तपशिलाने ज्ञानात भर पडली.
गरज ही शोधाची जननी आहे, याच प्रकारे हवाला जन्माला आला आणि लोकांचा विश्वास संपादन केला.
बदलत्या तंत्रज्ञानाला न बुजता त्याचाच वापर करून आणखी दृढ झाला.
लेखातील प्रचि आकर्षक आहेत
धन्यवाद,अनिंद्य यामाहितीपुर्ण लेखाबद्दल !
हा लेख गाजणार याचा हवाला मी
लेख आवडला
वा !
In reply to वा ! by हेमंतकुमार
.... मी कटाक्षाने बँकेच्या
In reply to .... मी कटाक्षाने बँकेच्या by अनिंद्य
विदेशातुन भारतात पैसे
वाह !
In reply to वाह ! by जेम्स वांड
रंजक माहिती
'हवाला-दिल"
In reply to 'हवाला-दिल" by सरनौबत
हवाला दिल :-)
आता फोन, इंटरनेट्च्या गतीमान
माहितीपूर्ण लेख. आवडला.
In reply to माहितीपूर्ण लेख. आवडला. by अभिजीत अवलिया
दोन्ही बरोबर.
In reply to माहितीपूर्ण लेख. आवडला. by अभिजीत अवलिया
@ अभिजीत अवलिया,
माहिती बद्दल धन्यवाद
जबरदस्त लेख.
छान लेख.
मस्त लेख
लेख आवडला
लेख आवडला
हवाला प्रकाराची चांगली माहिती
In reply to हवाला प्रकाराची चांगली माहिती by श्रीगुरुजी
... करांच्या प्रमाणाच्या सम
ताळमेळ कसा घालतात?
या बाबतीत एक रोचक अनुभव ..
छान, माहितीपूर्ण आणि ......
छान माहिती
नोट बंदी
दिवाळी अंकाची सुरवात जोरदार
ज ब र द स्त
छान लेख
यावेळच्या दिवाळी अंकात सुरस माहितीचा सुन्दर फराळ आहे.
रोचक माहिती.
In reply to रोचक माहिती. by अनन्त्_यात्री
हवाला नियंत्रण ई डी च्या
खूप छान लेख
उत्साह वाढवल्याबद्दल सर्व
In reply to उत्साह वाढवल्याबद्दल सर्व by अनिंद्य
त्यामुळे त्यांचा माग काढणे
रोचक आहे
In reply to रोचक आहे by तुषार काळभोर
प्रतिसादाबद्दल आभार.
घरगुती हवाला
In reply to घरगुती हवाला by कपिलमुनी
हा घरगुती व्यवहार बेकायदेशीर
In reply to हा घरगुती व्यवहार बेकायदेशीर by अनिंद्य
हा व्यवहार बेकायदेशीर आहे
In reply to हा व्यवहार बेकायदेशीर आहे by अनन्त अवधुत
‘money transfer without money
In reply to ‘money transfer without money by चौकस२१२
विषयांतर
In reply to विषयांतर by अनन्त अवधुत
९ झाली ! मला वाटले अजून काही
In reply to ९ झाली ! मला वाटले अजून काही by चौकस२१२
सिंगापूर, ऑस्ट्रेलियाच्या मानाने स्वस्त वाटत असेल
In reply to सिंगापूर, ऑस्ट्रेलियाच्या मानाने स्वस्त वाटत असेल by अनन्त अवधुत
१) चे पी आर असेल तर यु एस या
In reply to १) चे पी आर असेल तर यु एस या by चौकस२१२
तुमचे बरोबर आहे
In reply to तुमचे बरोबर आहे by अनन्त अवधुत
कटकट कमी म्हणजे कामासाठी एच
In reply to कटकट कमी म्हणजे कामासाठी एच by चौकस२१२
असो.
In reply to घरगुती हवाला by कपिलमुनी
यात बेकायदेशीर काही वाटत नाही
रोचक हवाल्याचा लेख.