अलक (अति लघु कथा)
वर्णद्वेष/ वर्णभेद
अलक 1
ती अगदी आडनावाप्रमाणे कोकणस्थ. दिसायला गोरीपान आणि घारी. परदेशात आल्यावर अगदी त्यांच्यातली नाही वाटली तरी इतर देशी लोकांच्यात उठुनच दिसायची. तिचा लेकपण तिच्यावर गेलेला. घारा नि गोरा. हळूहळू शेजारी पाजारी ओळख वाढल्यावर एका शेजारच्या गोऱ्या म्हातारीने एकदा हटकलच. "तू गोऱ्या माणसाशी लग्न केलं आहेस का?"
तिला कळेचना असं का म्हणते ही बाई. मग सावकाशपणे आपण भारतीय आहोत, तिकडून इकडे आलो वगैरे सांगितलं. यावर त्या बाईचा विश्वास बसेना. फक्त युरोपियन लोक गोरी असताना ही बाई नि तीच मूल एवढं गोरे नि घारे कसे असू शकतात असा तिचा प्रश्न हिला बुचकळ्यात टाकून गेला. आणि कितीही समानतेच्या गप्पा मारल्या तरीही काळं गोरं हा फरक भारतातच नाही तर सगळीकडे केला जातो हे तिला दिसून आलं.
अलक 2
ती दोघ जण मस्त ब्लॅक फॉरेस्ट ची ट्रिप संपवून परत येत होते. दोघेही मस्त आनंदी मूड मध्ये होते. फ्रायबर्ग वरून त्यांची ट्रेन होती. यांचं फर्स्ट क्लास च रिझर्वेशन होत. ट्रेन आली आणि हे डब्यात चढले मात्र डब्यातल्या सगळ्यांच्या माना वळल्या. हे सावळे, एशियन या डब्यात कसे चढले असे भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर त्यांना वाचायला मिळाले. त्यांनी तरीही दुर्लक्ष करून आपली जागा शोधली आणि जागेवर जाऊन बसले. टीसी आला तोही काही न बोलता पण एक विशिष्ट नजरेने त्यांच्याकडे बघत होता. गाडीत फर्स्ट कलास मध्ये असलेल्या सुविधांमध्ये फुकट पेपर होता. पण पेपर वाला मात्र यांच्याशी न थांबता सरळ पुढे निघाला. आता मात्र तिचा संयम संपला. अस्खलित जर्मन मध्ये तिने त्याला पेपर न देण्याच कारण विचारलं. आणि हा भेदभाव करणं कसं अयोग्य आहे तेही सुनावलं. आता बाकीचे चेहरे तिच्याकडे कौतुकाने बघत होते.पण या दोघांच्या ट्रिपचा शेवट मात्र कडवटच झाला.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ह्म्म्म
एखादी गोष्ट स्वत:कडे
वर्णद्वेष/ वर्णभेद
दोन्ही अलक आवडल्या
>> भारतीय एवढे चांगले कसे हा
भारतीय एवढे चांगले कसे हा
धन्यवाद रावसाहेब
धक्कादायक आहे पण ....
दुसर्या बाजूने विचार करता ..