Skip to main content

सत्कार्.....तेव्हढाही.....

लेखक उदय सप्रे यांनी बुधवार, 22/04/2009 07:25 या दिवशी प्रकाशित केले.
सत्कार .....तेव्हढाही ..... हाय् ! मी न उरलो , माझाच एव्हढाही सलगीत कुंतलांच्या रहातोय केवडाही ! साथीस शब्द होते , होत्या भणंग गझला सर्वस्व मी उधळले , ज्या हातें.....तोकडाही ! प्रेमातली उधारी बाकी तुझीच होती ; झोळीस पेलला ना व्यवहार रोकडाही ! झालीस दूर जेंव्हा झिडकारुनी मला तू , ओठी न आला शिकवा ना शब्द वाकडाही ! माझ्याच आसवांची व्याप्ती मला कळेना माझा मला नुरावा*अधिकार तेव्हढाही ? * नुरला : न उरला पाहून मला वळताना तू दाबलास जो हुंदका , पचवीन मी स्वतःचा सत्कार तेव्हढाही ! सत्कार्.....सत्कार्.....स्..स्..स्.
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1283
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

सुंदर गझल.. माझ्याच आसवांची व्याप्ती मला कळेना माझा मला नुरावा*अधिकार तेव्हढाही हे विषेश आवडले. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

एक सुंदर गझल वाचण्याचा आनंद मिळाला.

झालीस दूर जेंव्हा झिडकारुनी मला तू , ओठी न आला शिकवा ना शब्द वाकडाही ! व्वा.सुंदर... :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.