श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुनाला श्रीमद् भगवद् गीतेचा उपदेश दिला होता. हा उपदेश फक्त अर्जुनासाठी नव्हे तर सर्वांसाठी होता. श्रीकृष्णाने गीतेत या मृत्यू लोकात कर्म करत कसे जगावे, याचे मार्गदर्शन केले आहे. गीतेत यज्ञ या शब्दाचा व्यापक अर्थ आहे. जगाचा व्यापार सुचार रूपेण सुरु राहण्यासाठी, केलेले कर्म यज्ञ आहे. कृषी कर्महि यज्ञ आहे. यज्ञाने प्रसन्न होऊन भूमाता शेतकर्याला भरपूर अन्न प्रदान करते. काही महिन्यांपूर्वी पंजाबात कैन्सर वाढण्याचे कारण या विषयावर एक लेख वाचला होता. त्यात रासायनिक शेतीहि एक मुख्य कारण दिले होते. पंजाबच्या प्रसिद्ध कैन्सर रेलचे उदाहरणहि दिले होते. भगवद् गीता वाचताना तिसर्या अध्यायातील १२व्या श्लोकाने माझे लक्ष वेधले आणि तो लेख आठवला, श्रीकृष्ण म्हणतात:
इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः ।
तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुंक्ते स्तेन एव सः ॥ ३.१२
यज्ञाने प्रसन्न होऊन देवता तुम्हाला इच्छित भोग प्रदान करतात. पण देवांनी प्रदान केलेल्या भोगांत त्यांच्या हिस्सा न देणे हि चोरी आहे.
मनात प्रश्न येणारच शेतकरी भूमातेला काय परत करू शकतो. ती आपल्या सारखी जेवत नाही, अन्नातला तिचा हिस्सा तिला कसा देता येईल. उत्तर सौपे आहे, अन्नापासून निर्मित मनुष्य आणि जनावरांची विष्ठा खताच्या रूपाने भूमातेला परत करता येते. तसेच शेतीसाठी वापरलेले पाणीही पुन्हा तलाव, अडवा-जिरवा इत्यादी अनेक इत्यादी माध्यमाने तिला परत करता येते. प्रत्येक व्यवहार हा द्विपक्षीय असतो. एक पक्षीय व्यवहार म्हणजे चोरी. आपण पाहतोच आहे, शेतकरी पराली पुन्हा जमिनीला परत करण्याएवजी जाळून टाकतात, कारण शेत पुन्हा लवकर तैयार करायचे असते. अन्न निर्मित शेणखत आणि विष्ठा जमिनीला परत मिळत नाही. अधिक अन्नासाठी शेतकरी विषाक्त रासायनिक खतांचा वापर करतात, पण हि खते धरती माता प्रदत्त अन्न नाही.
देवांचा न्याय कठोर असतो, चोरांना क्षमा नाही. दरवर्षी अप्रिल, मई आणि ऑक्टोबर महिन्यात पंजाब हरियाणा सहित दिल्लीकरांचाहि भयंकर प्रदूषणमुळे दम घुटू लागतो. रासायनिक शेतीमुळे आज पंजाबच्या अधिकांश भागात जमिनीतले पाणी पिण्यालायक राहिलेले नाही. पुढील काही वर्षांत बहुतेक आंघोळीलायकहि राहणार नाही. कुपित धरती विषाक्त अन्न प्रदान करू लागली आहे. दरवर्षी फक्त पंजाबात हजारो लोक कैन्सरग्रस्त होऊन मरतात. विषाक्त अन्न खाऊनहि कोट्यावधी लोक विभिन्न असाध्य रोगांनी ग्रस्त होत आहे. भारतात कैन्सर ने मरणाऱ्यांची संख्या दरवर्षी तीव्र गतीने वाढत आहे. असो. तात्पर्य एवढेच किमान कृषी विशेषज्ञांनी श्रीमद् भगवद् गीता वाचली पाहिजे. कर्म सिद्धांत समजला पाहिजे.
वाचने
11521
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
देवांचा न्याय कठोर असतो,
मला खात्री आहे उपदेशक
In reply to देवांचा न्याय कठोर असतो, by गॉडजिला
कर्मयोग काय हे प्रत्येकाला
In reply to मला खात्री आहे उपदेशक by गॉडजिला
प्रत्येकाची बाजू नका मांडू
In reply to कर्मयोग काय हे प्रत्येकाला by विवेकपटाईत
कर्म सिद्धांत हा प्रत्येकाला
In reply to देवांचा न्याय कठोर असतो, by गॉडजिला
माहित होते
In reply to कर्म सिद्धांत हा प्रत्येकाला by विवेकपटाईत
लेख कुठे वाचला ?
पंजाबात कैन्सर वाढण्याचे कारण
In reply to लेख कुठे वाचला ? by कपिलमुनी
गुगल करा अनेक लेख सापडतील.
In reply to लेख कुठे वाचला ? by कपिलमुनी
शरणयोग पाहा.
शेतकरी
मी स्वत: सर्व वस्तू शेविंग
In reply to शेतकरी by hrkorde
शेतकरी रासायनीक खत वापरतो
हेच
In reply to शेतकरी रासायनीक खत वापरतो by Rajesh188
मी स्वत: सर्व वस्तू शेविंग
In reply to शेतकरी रासायनीक खत वापरतो by Rajesh188
तुमचे चरण लागल्यावर हा धागा पवित्र झाला.
खते व्हाया काँग्रेस सरकार
In reply to तुमचे चरण लागल्यावर हा धागा पवित्र झाला. by रंगीला रतन
केंसरचा संबंध हि तुम्ही
In reply to तुमचे चरण लागल्यावर हा धागा पवित्र झाला. by रंगीला रतन
माझा अनुभव
वा!
In reply to माझा अनुभव by स्वधर्म
अशक्य
In reply to माझा अनुभव by स्वधर्म
शक्य आहे पण
In reply to अशक्य by hrkorde
अरे रे
भगवंताची टिंगल करून केंसर
In reply to अरे रे by सुरिया
फक्त भगवंताची भक्ती करून
In reply to भगवंताची टिंगल करून केंसर by विवेकपटाईत
या लेखात योग्य मुद्दा मांडला आहे
...
In reply to या लेखात योग्य मुद्दा मांडला आहे by ज्ञानोबाचे पैजार
नफा व उत्पन्न वाढवायला.
In reply to ... by hrkorde
काय कारणे असतील तुम्ही च ठरवा
In reply to ... by hrkorde
रासायनिक खत
गंमत
म्हणूनच तर गीतेचा संदर्भ दिला आहे.
In reply to गंमत by कपिलमुनी
गीता
"बादरायणी संबंध" साठी
प्रतिसाद देणार्या सर्वांना