Skip to main content

ठाणे जिल्ह्यातील दुर्गम किल्ला: गुमतारा

लेखक इरसाल कार्टं यांनी शनिवार, 18/09/2021 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
गुमतारा किल्ला हा ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक दुर्गम किल्ला आहे. ढोबळमानाने सांगायचे झाले तर हा किल्ला वज्रेश्वरी देवस्थानाच्या परिसरात आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी मुख्यत्वेकरून दुगाड किंवा मोहिली या गावांतून जाता येते. दुगाड गावातून जाणारा रस्ता तुलनेने सोपा असल्याचे कळले पण मी दोन्ही वाला मोहिली या गावातूनच गेलो आहे. प्रस्तुत व्हिडीओ हा सुद्धा मोहिली गावातून जातानाचाच आहे. इथे पोचण्यासाठी ठाण्याहून यायचे असल्यास ठाणे - भिवंडी - दुगाड फाटा - मोहीली/दुगाड असे येता येते. तसेच वसई/विरार मार्गे यायचे असल्यास वसई/विरार - शिरसाड फाटा - वज्रेश्वरी - महाळुंगे फाटा - मोहीली/दुगाड असे येता येते.

वाचने 5321
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

म्हणजे कल्याणपासून १०० किमी वसई विरार परिसर आहे. तिकडे एक वसईचा किल्ला ( जो पूर्वी शाळेच्या सहलीत असायचाच) सोडला तर इतर भाग नाही पाहिला. उदाहरणार्थ कामणदुर्ग किंवा अर्नाळा किंवा तांदुळवाडी किल्ला. पण तुंगारेश्वर देऊळ, आणि वरचा आश्रम इथे गेलो आहे. वनविभागात असल्यामुळे ( ३६/-रु तिकिट आहे प्रवेश )भरपूर पक्षी ,फुलपाखरं, झाडं आहेत. दुसरी जागा म्हणजे नालासोपारा पूर्व भागातील पेल्हार धरण. ( स्टेशनपासून १२ किमी. ,बस जाते) या परिसरात म्हशींचे गोठे आणि शेण असल्याने इवनिंग ब्राउन प्रकारातील ( फुलांचा मध याऐवजी शेण खाणारी )फुलपाखरे बरीच आहेत. सेप्टेंबर ,ओक्टोबर ,नोव्हेंबर हा सीजन असतो फुलपाखरांचा. नऊनंतर फुलपाखरांचे फोटो मिळत नाहीत कारण ऊन खाल्ल्यावर ती फार उडतात. विडिओ पाहिला. रम्य भाग दिसत आहे. पण स्वत:चे वाहन लागेल बहुतेक.

In reply to by कंजूस

स्वतःचे वाहन असल्यास उत्तम अन्यथा दुगाड फाट्यापर्यंत बसने येऊन पुढे रिक्षाने जावे लागेल

या परिसरात गुमतारा आणि कोहोज हे किल्ले आहेत. पैकी कोहोजवर उन्हाळ्यातही सहज पाणी मिळते. आणि कॅम्पिंग करता येते.

In reply to by किसन शिंदे

व्हिडिओ सुरू केल्यानंतर ठणाणा पार्श्वसंगीतामुळे मोजून दुसर्‍या मिनिटाला व्हिडिओ बंद केला.

😨

आम्ही हुशार म्हणायचो. मिनिमम आवाज किंवा म्युट करुन बघायची सवय आहे ! पण आजकाल असा ट्रेण्ड आहे म्हणे. आवाजी पडघम वाजवले नाहीत तर व्हिडोला फाऊल धरतात म्हणे !