श्रीगणेश लेखमाला २०२१ - क्रिस्पी खाजे / चिरोटे
श्रीगणेश लेखमाला २०२१
क्रिस्पी खाजे / चिरोटे
नाजूक तोंडांत विरघळणारे खाजे किंवा चिरोटे न आवडणारे प्राणी विरळाच !
खाण्यास जितके अप्रतिम, तितकेच बनवायला कठीण असतील, असं बऱ्याच लोकांना वाटतं पण तसं अजिबात नाहीये. हाताशी थोडा निवांत वेळ ,सोबतीला आवडतं संगीत असेल तर हा पदार्थ कधी तयार झाला, तुम्हाला देखील कळणार नाही!
चला मग करुया सुरवात..
कृती:
एका परातीत २ वाट्या मैदा घ्यायचा.
मधोमध गोल करायचा. त्यात घालायचं चिमूट भर मीठ, आणि सोबतीला घालायचं ५-६ चमचे खाण्याचे तेल (चमचे आपले कांदेपोह्यांचे).
आता हे तेल सर्व मैद्याला हाताने चोळून घ्यायचं, पिठाची मूठ तयार झाली पाहिजे. मूठ नसेल होत तर एकदोन चमचे तेल अजुन घाला. मूठ तयार म्हणजे परफेक्ट मोहन!
आता थोडं थोडं पाणी घालून पोळ्यांसाठी जशी कणीक मळतो तशीच मऊ मळून घेणे.
आता तयार गोळा २० ते २५ मिनिटांसाठी रेस्ट करायला झाकून ठेवा.
तोपर्यंत पाक बनवून घेऊ. पाक पण सोप्पाच आहे.
ज्या वाटीने मैदा घेतलाय तीच वाटी गच्च भरून साखर घ्या. ती एका जाड बुडाच्या कढईत किंवा पातेल्यात ओता. त्यात तीच वाटी भरून पाणी घाला. गॅस चालू करून पहिली उकळी आली की त्यात लिंबाची चतकोर फोड पिळून घेणे. २-३ हिरव्या वेलची आणि खायचा केशरी कलर अगदी चिमुट भर( ऑप्शनल) टाका.
तीन ते चार मिनिटांनी पाक बोटाच्या चिमटीत घेऊन चेक करा. मधासारखा घट्ट आणि चिकट लागला की लगेच गॅस बंद! एकतारी, दोनतारी पाकची कटकट नाही बघा!
आता पिठानी भरपूर आराम केलाय. त्याला जरा व्यवस्थित मळून तेलाचा हात लावून समान असे ५ गोळे किंवा उंडे तयार करून घ्या.

आता आपण २ मिनिटात याला लावायचा साटा तयार करून घेऊ. २ चमचे भरून तूप(वितळले ले नाही) आणि २ चमचे मैदा एका मोठ्या वाटीत घेऊन फेटायचं. इतकं फेटायचं की ते हलकं आणि शुभ्र झालं पाहिजे मलई सारखं. झाला आपला साटा तयार! आता एक लाटलेली पोळी घेऊन त्यावर हातानेच नीट साटा पसरवून घ्यायचा.

अशा प्रकारे साटा लावून त्यावर दूसरी पोळी ठेवायची. पुन्हा साटा लावायचा. मग परत सेम कृती. सर्व पोळ्यांना साटा लावुन झाला की मग त्याची गुंडाळी(रोल) करायची.

मग त्याच्या समान लाट्या कापून घ्यायच्या.

आता एक-एक लाटी घेऊन तिला बोटांनी हलकेच दाब द्यावा.

आणी एकदाच त्यावर अगदी अलगद लाटणं फिरवावं, म्हणजे लेअर्स दाबले जात नाहीत.

आता तेल तापत ठेवायचं. अगदी कडकडीत नको साधारण तेल गरम झाले की गॅस कमी करायचा. तेलात छोटी गोळी टाकायची. ती गोळी वर आली की चिरोटे/ खाजे सोडायचे. तेलात मंद आचेवर छान तळून घ्यायचे. एकेक पदर मस्त सुटतात -

सर्व खाजे तळून झाले, पण तोपर्यंत आपला पाक गार झाला असेल. तर तो थोडा गरम करून घ्या आणि हे गरम गरम खाजे त्यात साधारण अर्धा मिनिट ( एका बाजूने १५-२० सेकंद) मुरत ठेवा.

बघता बघता झाले की राव! क्रिस्पी खाजे म्हणा किंवा चिरोटे म्हणा.. आता लाळ गाळत बसू नका, रेसिपी लगेच करायला घ्या!

विशेष
वाचने
28100
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
आहा मस्त
लप लप लप… तोपासु
भारी दोन्ही पाकॄ !
वॉव !पियुशा पाकृ नक्की करणारं
वाह्ह...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - India displays military might at ZAPAD-21; China & Pakistan watchमस्त !! तोंपासु हे वेगळे
छान ........
तिखट ?
In reply to तिखट ? by कपिलमुनी
तिखट तर अजुन सोप्प काम , पाक
In reply to तिखट तर अजुन सोप्प काम , पाक by पियुशा
धन्यवाद
In reply to तिखट तर अजुन सोप्प काम , पाक by पियुशा
कुरकुरीत लेयर्स वाली खारी !!!
खल्लास....!!!
पोहोचलो भुवनेश्वर पुरीला.
छान
झकास !
कमाल!!
तळणे
In reply to तळणे by कपिलमुनी
एयर फ्रायरमध्ये
In reply to तळणे by कपिलमुनी
काही कल्पना नाही कारण मी कधी
मूठ तयार म्हणजे परफेक्ट मोहन!
In reply to मूठ तयार म्हणजे परफेक्ट मोहन! by आग्या१९९०
नाही तेल गरम वैगरे नाही
मस्त.
In reply to मस्त. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
मस्त
अहा!
भारीच! शेवटचा फोटो तर बेस्ट!