Skip to main content

चालू घडामोडी - श्रावण-भाद्रपद शके १९४३ (भाग १)

लेखक निनाद यांनी बुधवार, 01/09/2021 08:52 या दिवशी प्रकाशित केले.
चालू घडामोडी - श्रावण-भाद्रपद शके १९४३ (भाग १) चालू घडामोडी - सप्टे २०२१ (भाग १) यावेळी मराठी महिने वापरले आहेत.

वाचने 47974
प्रतिक्रिया 179

प्रतिक्रिया

बेळगावात एकीकरण समीतीला यश मिळाले नाही हे उत्तम झाले. बेळगावातील मराठी तरूणांना भावनिकरित्या भरकटवुन, स्थानिक प्रशासनाविरुद्ध भडकवणे ह्यापलिकडे एकीकरण समीतीने गेल्या ४० वर्षात काहीही केलेले नाही. एकीकरण नेत्यांचे जमीन-जुमले/फ्लॅट्स बेळ्गावपासुन बेंगळुरुपर्यंत पसरलेले आहेत. म्हणजे ह्या नेत्यांची सम्पत्ती महाराष्ट्रापेक्षा 'अन्याय' करणार्या कर्नाटकात आहे. ! एस एम्/गोरे मंडळी होती तोवर मध्यमवर्गाचा थोडाफार पाठिंबा होता. आताची पिढी हुशार आहे. आपले हित कशात आहे हे ह्या पिढीला बरोबर कळते. त्यांमुळे '१०५ हुतात्मे, सांडलेले रक्त' अशा 'सेंटी' वाक्याना ती भूलत नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सरासरीचा विचार केला तर, दर निवडणूकीमागे मतदार तरूण व हुषार साक्षर व टेकसेव्ही होतो आहे ही खरंच चांगली गोष्ट आहे.

In reply to by Rajesh188

भाजपाची मतदान टक्केवारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे आणि आमदारांची संख्या पण. असंच लोकसभेत पण दिसून आलंय. कम्युनिस्ट व काँग्रेसची मतदान टक्केवारी नगण्य झाली आहे. भाजपाची तुलना करता ममतांची टक्केवारी हाताच्या बोटावर मोजता येईल इतकीच वाढली आहे. जागाही फारशा वाढलेल्या नाही आहेत. पण कोणाला हे मतदार हुषार वाटतील तर कोणाला मूर्ख. ज्याचा जसा दृष्टिकोन असेल तसे त्याला दिसेल. मात्र मतदार विचार करायला लागला आहे हे मान्य करावेच लागेल. तसेच हा ट्रेंड २०१४ पासून सुरू झाला आहे व तो वाढतच चालला आहे हेही मान्य करावे लागेल. त्यावरून भविष्यात जो हिंदूत्वाच्या विरोधात जाईल तो लोकशाही मार्गाने संपत जाईल हे जाणवते आहे. हा ट्रेंड योग्य की अयोग्य याबाबत माझा पास.

काल सदाशिव पेठेत एका कार्यालयावर राघवेंद्र मानकरचे चित्र असलेला एक फलक पाहिला. त्यावर त्याच्याबरोबर मोदी, चंपा, फडणवीस यांचीही चित्रे होती. म्हणजे हा सुद्धा भाजपत आलेला दिसतोय. तसे असेल भाजपच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा! २ वर्षे येरवडा तुरूंगात राहून जामिनावर बाहेर असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता, पुण्यातील लँड माफिया आणि लफडेबाज दीपक मानकरचा पोरगा म्हणजे राघवेंद्र मानकर. पद्मसिंह पाटील, जयकुमार गोरे, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, मधुकर पिचड, बबन पाचपुते, नारायण राणे, नितेश राणे, कृपाशंकर सिंह आणि आता राघवेंद्र मानकर . . . फडणवीस आणि चंपा रस्त्यावर पडलेला कचरा उचलून भाजपत आणत आहेत. आता नळस्टॉप/पौड रस्ता प्रभागातून भाजपचा महापालिका उमेदवार राघवेंद्र मानकर असणार. भाजपचे एका कचरापेटीत रूपांतर करीत असल्याबद्दल फडणवीस व चंपा या ढवळ्या-पवळ्याच्या जोडीचे व त्यांच्या अंध भक्तांचे हार्दिक अभिनंदन!

In reply to by श्रीगुरुजी

शांहा सारख्यांना हि खोगीर भरती आपल्यावर उलटेल हे कळत कसे नाही .. राणे जेव्हा भाजपात गेलं / आले तेव्हा मला एकदम राणे अर्ध्या चड्डीत कसे दिसतील हे चित्र डोळ्यसमोर आले .. आणि खुद् करून हसू आले

की हा राजकीय पक्ष चांगला आहे ह्या पक्षात सर्व सज्जन आहेत.भ्रष्ट कारभार करणार नाहीत. आणि हा दुसरा पक्ष चांगला नाही भ्रष्ट आहे जनहिताची काम करणार नाहीत. असे टोकाचे विचार ठेवूच नका राजकीय पक्षा विषयी. राजकीय पक्ष कोणता ही असू ध्या सत्ता मिळवणे हेच ध्येय असते. त्या सत्ता स्थना पर्यंत पोचण्यासाठी प्रतेकापा साध्य होईल ते सर्व बरे वाईट मार्ग सर्व अवलंबत असतात. आणि सत्तेवर आल्यावर दणकून जनतेच्या पैशाची लूट पण सर्व करत असतात. Bjp बाहेरची लोक भरती करून घेत आहे तेच मुळात सत्ता मिळवण्यासाठी. मग तो चोर आहे की साधू ह्याच्या शी काही देणेघेणे नाही तो निवडणूक जिंकेल का हाच निकष आहे . जनतेचा अंकुश नेहमीच राजकीय नेत्यांवर असायला हवा त्या साठी जनता स्व बुध्दी ची आणि जागरूक हवी. BJP ल निवडून दिले की सर्व चांगलेच होईल आपण झोपा काढल्या तरी चालतील अशी जनता असेल तर सत्ताधारी लोकांचे चांगले फावते.

In reply to by Rajesh188

हे प्रत्येक पक्षासाठी लागू पडते.. फक्त भाजपा साठी नाही.. काही ज्येष्ठ राजकारण्यान्नी पत्रकार पाळले आहेत त्यामुळे ते कसेही वागले तरी ते जाहीर होत नाही.. प्रत्येक पक्ष मतदारान्ना जहागीर समजतो.. जातीप्रमाणे वाटून घेतो ...

In reply to by रामदास२९

जनता जागरूक असणे खूप महत्वाचे आहे.चांगले उमेदवार निवडणे आणि त्यांनी चांगलेच राहवे म्हणून त्यांच्या वर नियंत्रण ठेवणे हे काम जागरूक जनता च करू शकते. राजकीय पक्षाच्या नावावर कोणत्या ही गाढवाला निवडून देणारी जनता असेल तर उत्तम सरकार कधीच मिळणार नाही.

मिपावर गंभीर चर्चा सुरु असताना असे प्रतिसाद अधूनमधून कॉमिक रिलीफ नामक हलकाफुलका अनुभव देऊन जातात! 😉

In reply to by वामन देशमुख

ज्यांना दहा बारा वर्ष मीपा वर झाली आहेत आणि mipa ही त्यांची जहागिरी समजत आहेत त्यांची प्रशासन नी लगेच हक्कल पट्टी करावी.नवीन विचार,नवीन मत,नवीन सभासद चा आदर न करता. वडलिर्जित मालमत्ता असल्या सारखे काही जुने सभासद वागत आहेत.

In reply to by सुक्या

निव्वळ कचरा व अज्ञानी प्रतिसाद लिहिणाऱ्यांचे प्रतिसाद अजिबात न वाचणे हेच मॅच्युरिटीचे लक्षण आहे आणि मिपावर मॅच्युअर सदस्यांची संख्या लक्षणीय आहे.

In reply to by श्रीगुरुजी

शाह,मोदी, BJP ह्यांची स्तुती करणे हे ज्ञानी असण्याचे लक्षण आहे हे आम्हाला माहितच नव्हत . ते काय दोन तीन प्रतिसाद मध्ये आम्ही पण ज्ञानी ,हुशार लोकात गणले जावू.

In reply to by श्रीगुरुजी

त्या मुळे बाकी विचार तुम्ही वाचणार नाही. राजकीय पक्ष वाईट किंवा चांगला नसतो. त्या पक्षात असणारी लोक चांगली किंवा वाईट असतात . इतके साधे समजत नसेल तर मुश्किल आहे.

In reply to by Rajesh188

राजेशा, राजकीय पक्षांमध्ये साधुसंत कोणीही नाही. मग तो पक्ष काँग्रेस असो वा भाजपा वा शिवसेना वा त्रूणमूल. आपल्या नावडीचा पक्षावर सारखी आगपाखड करून काहीही साध्य होणार नाही. सध्या भाजपाची चलती आहे हे मान्य करावेच लागेल. आणि लोकानाही समर्थ पर्याय तसा दिसत नाही. 'साधी राहणी उच्च विचासरणी" आपल्या समाजातच आता नाही तर ती नेत्यांमध्ये कुठुन येणार ? राजकीय डावपेच कधी चुकतात तर कधी यशस्वी होतात. राणे हे शिवसेनेला त्यांच्याच भाषेत उत्तर देणारे नेते आहेत. शिवाय ते सिंधुदुर्गात लोकप्रिय आहेत. शिवसेनेला संपवण्यासाठी त्यांना भाजपात घेतले आहे. तीच गोष्ट मानकरांची. मोदी/शहांवर बिनबुडाची टीका न करता विरोधी पक्षांनी आपल्या प़क्षाची कशी वाढ होईल ह्यावर चिंतन केले व कार्यक्रम राबवले तरच भाजपाला पर्याय लोकांना दिसू शकतो.

आधी अजितदादांना क्लिन चिट आणि आता छगनबाप्पा निर्दोष मुक्त. एकदा अनिल देशमुख सुटले की भाजप-राष्ट्रवादी युतीचा मार्ग मोकळा होईल. अभिनंदन! https://www.loksatta.com/mumbai-news/bhujbal-reaction-after-his-acquitt…

In reply to by श्रीगुरुजी

बातमी खरी आहे, पण त्यावरून तुम्ही काढत आहात, त्या निष्कर्षाशी सहमत नाही. हे अशासाठी म्हणतो की: १. कुठयातरी 'विशेष न्यायालयाने'-- म्हणजे नक्की कुठल्या असले तपशील धड देण्याची प्रथा भारतीय मीडियांत नसल्याने, तेही मी सोडून देतो--, महाराष्ट्र सरकारच्या अँटी- करप्शन ब्युरोने दाखल केलेल्या अर्जाचा निकाल दिला आहे, व श्री. भुजबळ व इतर सर्व संबंधित आरोपींना, ठोस पुराव्याअभावी निर्दोष म्हणून सोडून दिलेले आहे. ह्याचा अर्थ हे काही कुठल्याही सरकारने, अथवा पक्षाने दबाव आणून करून घेतले असावे, असा मी तरी लावत नाही. २. ह्याच संदर्भांत ई. डी. ने सदर आरोपींवर दुसरी एक केस दाखल केली होती, तिची सुनावणी अद्याप संपली नाही, असे हीच बातमी म्हणते. A case filed by the Enforcement Directorate, based on this ACB case, is still pending. Bhujbal was arrested by the ED in March 2016 and was granted bail in 2018 by the Bombay High Court.

In reply to by प्रदीप

काही जणांना बातमी आणि त्यावरील मत/निष्कर्ष यातील फरक समजत नाही. घडलेल्या घटनेची बातमी कोणत्याही वृत्तपत्रात छापून आली तरी फरक पडत नाही. उदाहरणार्थ जागतिक व्यापार केंद्रावर विमान धडकले ही बातमी लोकसत्ता, सामना, मटा, द हिंदू अशा कोणत्याही वृत्तपत्रात छापून आली तरी ती खरी असते. परंतु हा हल्ला कोणी केला यावरील मत व निष्कर्ष हे पक्षपाती असू शकतात. १) हे कोणतेही विशेष न्यायालय नसून सत्र न्यायालय आहे. यानंतर उच्च न्यायालय व शेवटी सर्वोच्च न्यायालय आहे. असा निकाल येण्यासाठी एखाद्या पक्षाने किंवा सरकारने दबाव आणण्याची आवश्यकता नसते. काही कागदपत्रे दडवून ठेवली, गहाळ केली, न्यायालयात सरकारी वकिलाने दुर्बल युक्तिवाद केला की खटला आपोआप ठिसूळ होऊन आरोपी पुराव्याअभावी निर्दोष सुटतात. २-जी खटल्यातील आरोपी यामुळेच निर्दोष सुटले होते. भुजबळ निर्दोष सुटण्यासाठी दोन्ही सरकारांनी आपल्या अधिकारात या पद्धतीने पूर्ण प्रयत्न केले असावे असं दिसतंय कारण दोन्ही सरकारांना राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची गरज होती/आहे/असेल. २) राष्ट्रवादीची किती गरज असेल यावर या दुसऱ्या प्रकरणाचा निकाल ठरेल.

In reply to by श्रीगुरुजी

मी वर्तमानपत्रे वाचत नाही. टीव्ही पण पहात नाही. निवडणूकीची मतदान टक्केवारी पुरेशी बोलकी असते. पण याला खूप पेशन्स लागतो. म्हणजे दोन निवडणूकींच्यामधे शांत बसायची तयारी लागते.

बुलेट ट्रेन साठी जमीन हस्तातर करण्याचा ठराव मंजूर केला.ठाणे महानगर पालिका ही सेनेच्या ताब्यात आहे.. बुलेट ट्रेन प्रोजेक्ट साठी सकरत्मक निर्णय ठाणे महानगर पालिकेने घेतला ह्याचा अर्थ bjp शी सेने नी जुळवून घेतले असा नाही काढता येणार. राजकारण वेगळे आणि असे निर्णय वेगळे त्यांची भेसळ करायची नसते. असे पण लालू सोडले तर राजकीय आरोपांच्या धुळवडी चा परिणाम कोणत्या ही पक्षाच्या भ्रष्ट नेत्यांच्या शिक्षेत रूपांतरित झाला आहे. शिक्षा व्हावी म्हणून आरोप केले जात नाहीत फक्त राजकीय फायदा मिळविण्यासाठी च केले जातात. शेवटी प्रयेकाच्या नाड्या प्रत्येकाच्या हातात असतात.हमाम मैं सब नंगे.

https://www.loksatta.com/maharashtra-news/pune-police-issue-lookout-not… समजावून थकलो राजकारण सरळ सोपे आता नाही. आणि निष्ठावान,प्रामाणिक नेते पण आता नाहीत. राणे जे उडत होते त्यांना पडद्या आडून bjp नी च जमीन दाखवली आहे.

पाकिस्तान, बांगला देश,आता अफगाणिस्तान हे जगातील सर्वात कट्टर मुस्लिम लोकांचे देश आहेत. राजसत्ता त्याच विचाराच्या आहेत सत्तेवर आहेत. जगात सर्वात जास्त हलाखी चे जीवन मुस्लिम लोक ह्याच देशात जगत आहेत. भारताला पण धार्मिक आधारावर सरकार नको आहे. कट्टर हिंदू वादी bjp च्या राज्यात च हिंदू कमजोर झाले आहेत. आणि मराठी वादी सेनेच्या राज्यात ४० हजार झोपड पट्टी वासिय लोकांना पक्की घर देण्यात आली ते जवळ जवळ सर्व परप्रांतीय आहेत. हे धार्मिक कट्टर वादी,प्रांतीय कट्टर वादी फक्त लोकांस मूर्ख बनवायचे काम करत आहेत.

In reply to by मदनबाण

बाकी काहीही असो मात्र मला किरीट सोमैय्या या व्यक्तीचे एका बाबतीत खूप कौतूक वाटते ते म्हणजे हा माणूस गुजराती आहे पण मुंबईच्या राजकारणात आहे म्हणून आवर्जून मराठी बोलतो. इतर परप्रांतीय आणि मराठी राजकारण्यांनी देखील नक्की हा गुण घ्यावा.

In reply to by धर्मराजमुटके

सोमय्या भरपूर खोदाखोदी करून पुरावे जमवून भ्रष्टाचाराची प्रकलणे बाहेर काढून पुढे नेतात. परंतु ही प्रकरणे एकदा केंद्रीय तपाससंस्थाकडे गेली राजकीय सोयीनुसार व समीकरणांनुसार पुढील पावले पडतात. त्यामुळे ही प्रकरणे प्रलंबित अवस्थेत लोंबकळत पडली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची असंख्य प्रकरणे असूनही आजवर कोणतेही प्रकरण तडीस जाऊन भ्रष्टांना शिक्षा झालेली नाही. राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेस या पक्षांनी भाजपची दुखरी नस व आपली अपरिहार्यता ओळखली आहे व त्याचा ते अचूक वापर करून निर्धास्त आहेत. अर्थात फक्त विद्यमान केंद्र सरकारच असे करते असे नाही. यापूर्वीची केंद्र सरकारे हेच करत होती (उदाहरणार्थ मुलायम, मायावती).

In reply to by धर्मराजमुटके

बाकी काहीही असो मात्र मला किरीट सोमैय्या या व्यक्तीचे एका बाबतीत खूप कौतूक वाटते ते म्हणजे हा माणूस गुजराती आहे पण मुंबईच्या राजकारणात आहे म्हणून आवर्जून मराठी बोलतो. इतर परप्रांतीय आणि मराठी राजकारण्यांनी देखील नक्की हा गुण घ्यावा. १००% सहमत. याच बरोबर ते नेहमी पुराव्यांच्या आधारावर बोलतात आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे नेटाने लावुन धरतात, या बाबतीत ते विशेष कौतुक पात्र आहेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - He Aaradhya Ganpati Song 2021 | Swapnil Bandodkar | Akshay Dabhadkar | Eros Now Music

In reply to by धर्मराजमुटके

बाकी सर्व प्रांतातील लोक जे मुंबई मध्ये राहतात ते मराठी थोडेफार तरी शिकतात.आणि बोलण्याचा पण प्रयत्न करतात. अगदी दक्षिण भारतीय सुद्धा.. ही हिंदी भाषिक जमात च कोणत्या ही प्रांतात गेले तरी त्या प्रांताची स्थानिक भाषा ,आणि संस्कृती बिलकुल आत्मसात करत नाहीत. गुजराती आणि मारवाडी समाज जो मुंबई मध्ये राहतो.ते मराठी बोलतात. उत

नागपूर ते तारापूर रस्ता होतोय. कोस्टल रोडही होतोय. तारापूर ते तेरेखोल नक्की कुठून जाणारे? कोकणची इकॉनमी सुधारणारे म्हणतात.

योगिजिनि कुठ्ल्या जाहिरातीत कलक्त्याच्या पुलाचे फोटु आपले म्हणुन वापरले म्हणे फ्रन्ट पेज कोटिचि जाहिरात असते म्हणे https://www.youtube.com/watch?v=NRkt21s2zfc