माळशेज घाट आणि खिरेश्वर .
श्रावणाच्या निमित्ताने आणि लॉकडाऊनमुळे देवळे बंद आहेत शंकराची. म्हणजे नावाजलेली बंद आहेत. पण हे खिरेश्वर पाहता येईल.
कालच माळशेज घाट परिसर फिरून आलो. खूप पाऊस नसणे आणि अजिबात नसणे याचा मध्य गाठून जावे लागते. म्हणजे धबधबे, सृष्टीसौंदर्य दोन्ही मिळते. सध्या लॉकडाऊनमुळे पर्यटनाच्या जागा फारच थोड्या शिल्लक आहेत. धार्मिक स्थळेही बंदच आहेत. मित्रांचा भीमाशंकर ट्रेकचा ( खांडस मार्गे) आग्रह होता पण देऊळच बंद असल्याने एकूण फसणार हे सांगून माळशेज घाटातले खिरेश्वर सुचवले. जवळच्या खिरेश्वर गावाजवळचे म्हणून हे नाव. परंतू नागेश्वर हे नाव आहे. इथूनच एक वाट हरिश्चंद्रगडाकडे जाते. दोनवेळा गेलो आहे.
आम्ही कल्याणहून बसनेच जाऊन आलो. रस्ता उत्तम आहे. शहाड स्टेशनजवळचा दोनशे फुट भाग सोडल्यास खड्डा कुठेच नाही.
जावे कसे आणि कुठे आहे -
या नकाशात पिंपळगाव जोगा धरणाचा बांध मुख्य कल्याण नगर रस्त्याला मिळतो तिथेच NH61 लिहिले आहे. तोच "खुबी बंधारा स्टॉप". बंधाऱ्याचा रस्ता पांढरा दिसतो आहे. त्यावरून जाणे. कल्याण नगर रस्त्याला पुणे नाशिक रस्ता "आळे" गावाजवळ छेदतो. त्यास आळेफाटा नाका म्हणतात. पुण्याकडून येणाऱ्यांनी इकडे कल्याण रोडला वळावे.
कल्याणवरून माळशेज घाटमार्गे जाणाऱ्या सर्वच बसेस घाट चढल्यावर लगेचच "एमटिडीसी स्टॉप" नंतर दोन किमिवर "खुबी बंधारा स्टॉप" इथे येतात. इथेच बंधाऱ्यावरूनच चार किमी रोडने गेल्यावर देऊळ येते. कारने येता येते. (आम्ही चालत गेलो.)
माळशेज घाट हेच पर्यटन स्थळ म्हणून सरकारने मान्य केल्याने व्ह्यु पॉइंट्स बनवायचा मार्ग मोकळा झाला. आणि घाटातच अस्ताव्यस्त पार्किंग करणे थांबले. एकूण चार मोठे धबधबे पॉईंट्स, एक बोगदा असे पाच ठिकाणी कार पार्किंग दिले आहे. पुण्याचे लोक वरून खाली येत असल्याने त्यांनी दोन धबधबे आणि बोगदा व्ह्यु पॉइंट करून परत वर जावे. शेवटपर्यंत तळाच्या "सावरणे" गावापर्यंत उतरण्याची गरज नाही. वर गेल्यावर खिरेश्वर करून परत जाण्यात ट्रिप आटोपशिर राहते.
माळशेज घाट - जुन्नर परिसर पर्यटन यामध्ये खालील ठिकाणे येतात. पर्यटकांचे वयोमान, आवड,आणि काळवेळ लक्षात घेऊन ट्रिप आखणे गरजेचे आहे. म्हणजे आटोपशिरपणा राहतो.
१) हरिश्चंद्र गड
२) खिरेश्वर देऊळ ( नागेश्वर),काळू धबधबा. ३) शिवनेरी,
४) लेण्याद्री आणि लेणी.
५) चावंड
६)निमगिरी
७) हडसर
८) माणिकडोह
९) नाणेघाट
१०) जुन्नर बाजार ( रविवार. तांदुळ आणि कडधान्ये)
११)जुन्नर परिसरांतील इतर लेणी डोंगर.
१२) माळशेज घाट पायी फिरणे.
१३) ओझर गणपती.
१४) खोडाड रेडिओ दुर्बिण भेट.
१५) तमाशाची पंढरी नारायणगाव, पण तिथे आता काय आहे माहिती नाही.
( तुम्हास माहिती असलेल्या जागा वाढवा.)दोनतीन जागा एका ट्रिपमध्ये घेऊन आनंद वाढवता येईल.
फोटो १
देऊळ खिरेश्वर

फोटो २
देऊळ खिरेश्वर समोरून.

फोटो ३
छतावरची शिल्पे. १६ आहेत. अंधारामुळे फोटो गंडले.

फोटो ४
विष्णू. गर्भगृहाच्या वेशीवर. शंकराचे देऊळ असले तरी विष्णू आहे.

फोटो ५
झरा. देवळाभोवती वाहतो.

फोटो ६
लेणी. देवळाच्या जवळच आहे.

फोटो ७
हरिश्चंद्र गडाचा डोंगर.

फोटो ८
पिंपळगाव जोगा धरण. पूर्वी इथेच फ्लेमिंगो येत.

फोटो ९
याच देवळाजवळून १६ फेब्रुवारी २००४ शिवरात्री अगोदर हरिश्चंद्र गडाकडे जात असताना प्रसादासाठी थांबलो होतो. त्यावेळेस मिळालेले उत्सवाचे पत्रक.

बसने प्रवास केल्याने घाटात थांबून फोटो काढता आले नाहीत. फक्त दृष्ये पाहिली. फोटोग्राफरांनी अवश्य जावे असे ठिकाण.

वाचने
13541
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
छान.
मस्त!
छान माहिती!
In reply to छान माहिती! by श्रीगुरुजी
माणिकडोह
In reply to माणिकडोह by राजेंद्र मेहेंदळे
लिंक
छान, मस्त ट्रिप. सुरेख फोटो
आवडली भटकंती.
In reply to आवडली भटकंती. by गोरगावलेकर
फोटोसाठी धन्यवाद.
सुंदर!
वाह
मस्तच, देवळाचा पहिला फोटो
मस्त भटकंती.
In reply to मस्त भटकंती. by प्रचेतस
त्या मूर्ती गेरू लावल्यासारख्या लाल रंगांच्या आहेत.
In reply to त्या मूर्ती गेरू लावल्यासारख्या लाल रंगांच्या आहेत. by कंजूस
हो, लेण्यांचा काळ साधारण ९
छान भटकंती...
छान माहिती
छान माहिती .. एक शंका,, देवळे
देवळे बंदच आहेत.
छान लेख!
मी काढलेले माळशेज घाटाचे
In reply to मी काढलेले माळशेज घाटाचे by प्रचेतस
सुंदर आहेत सर्व फोटोज!
In reply to सुंदर आहेत सर्व फोटोज! by टर्मीनेटर
+१
In reply to मी काढलेले माळशेज घाटाचे by प्रचेतस
वाह, प्रचेतस, पावसाळी
In reply to मी काढलेले माळशेज घाटाचे by प्रचेतस
अहाहा!क्या बात!
सुंदर फोटो.
In reply to सुंदर फोटो. by कंजूस
निरागस
👶
In reply to सुंदर फोटो. by कंजूस
एका लहान मुलीने विचारलं"वरून
मस्त भटकंती