✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

क्रिकेट - २

श
श्रीगुरुजी यांनी
गुरुवार, 01/05/2017 - 14:11  ·  लेख
लेख
मिपाच्या नवीन आरेखनात क्रिकेटचा पहिला धागा अदृश्य झाला आहे. तो धागा शोधून त्यात प्रतिसाद लिहिला तरी मुख्य पानावर किंवा नंतरच्या पानांवर तो धागा दिसतच नाही. त्यामुळे हा नवीन धागा सुरू करीत आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
112138 वाचन

💬 प्रतिसाद (432)

प्रतिक्रिया

आजोबा लई जोमात

गामा पैलवान
Sat, 08/07/2021 - 15:01 नवीन
इंद्रसेन आजोब लई जोमात आहेत. जलदगती गोलंदाज कधी ६०० गाठेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण आजोबा तर ६२०+ मारून जम्बोदादाच्याही पुढे गेले. ६५० मारणार का ते बघायचं. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

तो बहुतेक ऍशेसची मालिका खेळून

श्रीगुरुजी
Sat, 08/07/2021 - 15:03 नवीन
तो बहुतेक ऍशेसची मालिका खेळून निवृत्त होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

९ गडी व १५७ धावा

गामा पैलवान
Sun, 08/08/2021 - 03:17 नवीन
भारताला जिंकायला १५७ धावा हव्यात व ९ गडी पडायचे बाकी आहेत. उद्या पहिल्या सत्रात ६० धावा व दुसऱ्या सत्रात १०० धावा काढून खेळ आटोपण्यावर भर राहील. पण पावसाचं भाकीत भारी निराशाजनक आहे. एकंदरीत शर्यत पावसाशीही आहे. -गा.पै.
  • Log in or register to post comments

पावसाची स्थिती

गामा पैलवान
Sun, 08/08/2021 - 14:53 नवीन
गेल्या दोन तासांपासून ते चालू घटकेपर्यंत पावसाची स्थिती इथे पाहता येईल : https://www.netweather.tv/live-weather/radar कसोटी सामना चालू आहे त्या नॉटिंगम चा पोस्टकोड NG11AA टाकावा. -गा.पै.
  • Log in or register to post comments

कालचा संपूर्ण पाचवा दिवस

श्रीगुरुजी
Mon, 08/09/2021 - 10:32 नवीन
कालचा संपूर्ण पाचवा दिवस पावसाने वाया गेल्याने सामना अनिर्णित राहिला. भारताला विजयासाठी फक्त १५७ धावा शिल्लक असल्याने व फक्त एकच फलंदाज बाद झालेला असल्याने विजयाची बरीच संधी होती. अर्थात इंग्लंडच्या गोलंदाजांनाही थोडी संधी होती. भारताचे दुर्दैव.
  • Log in or register to post comments

भारत-इंग्लंड दुसरा कसोटी

श्रीगुरुजी
Sun, 08/15/2021 - 13:34 नवीन
भारत-इंग्लंड दुसरा कसोटी सामना - भारत पहिला डाव ३६४/१० तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंड पहिला डाव ३९१/१० जो रूट फारच त्रास देतोय. पहिल्या कसोटीत ६४ व १०९ आणि दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात नाबाद १८०.
  • Log in or register to post comments

विंडीज-पाकडे पहिला कसोटी

श्रीगुरुजी
Sun, 08/15/2021 - 13:36 नवीन
विंडीज-पाकडे पहिला कसोटी सामना - पाकडे पहिला डाव २१७/१० विंडीज पहिला डाव २५३/१० तिसऱ्या दिवसाखेर पाकडे दुसरा डाव १६०/५
  • Log in or register to post comments

पाचव्या दिवसाच्या पहिल्या

रात्रीचे चांदणे
Mon, 08/16/2021 - 17:39 नवीन
पाचव्या दिवसाच्या पहिल्या सेशन नंतर भारताची एकूण आघाडी 259. शमी 52 तर बुमराह 30 धवांवर खेळत आहेत.
  • Log in or register to post comments

सामना मस्त चालू आहे ..चाहापणा

सुजित जाधव
Mon, 08/16/2021 - 20:36 नवीन
सामना मस्त चालू आहे ..चाहापणा पर्यंत इंग्रज ६७-४..भारताला विजयासाठी ६ बळींची आवश्यकता. जो रूट ची विकेट निर्णायक भूमिका बजावेल अस वाटतंय. खराब लाईट पण घोटाळा करू शकते.
  • Log in or register to post comments

रूट गेलाय, पण अनिर्णित

श्रीगुरुजी
Mon, 08/16/2021 - 21:15 नवीन
रूट गेलाय, पण अनिर्णित राहण्याचीच शक्यता आहे.
  • Log in or register to post comments

भारताचा लॉर्डस वर ऐतिहासिक

सुजित जाधव
Mon, 08/16/2021 - 23:12 नवीन
भारताचा लॉर्डस वर ऐतिहासिक विजय..इंग्लंड ला १५१ धावांनी चारली धूळ.. #हॅट्स ऑफ
  • Log in or register to post comments

हे हे हे. बाकी काही नाही

गॉडजिला
Mon, 08/16/2021 - 23:19 नवीन
पण t२० जर Olympics मधे समाविष्ट झाले तर भारताचे एक मेडल दरवेळेसाठी पक्के होऊन जाईल नाही ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुजित जाधव

भारताचा लॉर्डस वर ऐतिहासिक

सुजित जाधव
Mon, 08/16/2021 - 23:12 नवीन
भारताचा लॉर्डस वर ऐतिहासिक विजय..इंग्लंड ला १५१ धावांनी चारली धूळ.. #हॅट्स ऑफ
  • Log in or register to post comments

भारताचा अविश्वसनीय विजय झाला.

श्रीगुरुजी
Mon, 08/16/2021 - 23:29 नवीन
भारताचा अविश्वसनीय विजय झाला. दुसऱ्या डावात इंग्लंडला १२० धावात गुंडाळून भारताने १५१ धावांनी सामना जिंकला.
  • Log in or register to post comments

काल विंडीजने सुद्धा पहिल्या

श्रीगुरुजी
Mon, 08/16/2021 - 23:33 नवीन
काल विंडीजने सुद्धा पहिल्या कसोटी सामन्यात पाकड्यांना १ फलंदाज राखून हरविले. विंडीज-पाकडे पहिला कसोटी सामना - पाकडे पहिला डाव २१७/१० विंडीज पहिला डाव २५३/१० पाकडे दुसरा डाव २०३/१० विंडीज दुसरा डाव १६८/९ दुसऱ्या डावात विंडीज सुरूवातीला १६/३, नंतर ११४/७ व शेवटी १५१/९ अशा वाईट अवस्थेत होते. पण नेटाने किल्ला लढवून सामना जिंकला.
  • Log in or register to post comments

आज

गुल्लू दादा
Mon, 08/16/2021 - 23:48 नवीन
आज वेळात वेळ काढून आपले मिपाकर हॅरी पॉटर अन मी निवांत सामना बघितला. खूप मजा आली.
  • Log in or register to post comments

तिसरा कसोटी सामना -

श्रीगुरुजी
Fri, 08/27/2021 - 16:39 नवीन
तिसरा कसोटी सामना - भारत ७८/१० व १४/० इंग्लंड ४३२/१०
  • Log in or register to post comments

तिसर्‍या दिवसाखेर भारत २१५/२,

सौंदाळा
Sat, 08/28/2021 - 00:05 नवीन
तिसर्‍या दिवसाखेर भारत २१५/२, अजुन १३९ धावांची पिछाडी पुजारा खूप दिवसांनी चांगला खेळतोय, कोहलीने पण चांगली साथ दिली. पण सामना वाचवायचा असेल तर काहीतरी चमत्कारच व्हायला पाहिजे. (ऑस्ट्रेलियात भारतीय संघाने केलेले असे चमत्कार) राहाणे, पंत, जडेजा सगळे नेटाने उभे राहायला पहिजेत.
  • Log in or register to post comments

विजयाचे प्रयत्न ....

गामा पैलवान
Sat, 08/28/2021 - 14:52 नवीन
सौंदाळा, विराट कोहली या परिस्थितीतही विजयाचाच विचार करीत असणार याची खात्री आहे. त्याकरिता आजचा ( चौथा ) दिवस पूर्ण व उद्या उपाहारापर्यंत फलंदाजी करावी लागेल. तोवर भारताकडे २५०+ धावांची आघाडी जमलेली असेल. इंग्लंडास २ सत्रांत २५० धावांचं माफक म्हणूनंच आकर्षक आव्हान मिळेल. त्याचा पाठलाग करू जाता भारतास चौथ्या डावात विरलेली खेळपट्टी व उत्तम गोलंदाजी यांच्या आधारे यजमानांना उखडणं जमून जावं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

म्हणजे भारताने दुसऱ्या डावात

श्रीगुरुजी
Sat, 08/28/2021 - 15:04 नवीन
म्हणजे भारताने दुसऱ्या डावात ६००+ धावा करायच्या! अजिबात शक्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

गळती

गुल्लू दादा
Sat, 08/28/2021 - 16:52 नवीन
गळती लागलेली आहे.
  • Log in or register to post comments

पहिला डाव फक्त ७८ धावात

श्रीगुरुजी
Sat, 08/28/2021 - 17:08 नवीन
पहिला डाव फक्त ७८ धावात संपल्यानंतर भारत सामना वाचवू शकेल असे कधीच वाटत नव्हते. आता २७६/८. पराभवाची फक्त औपचारिकता शिल्लक आहे.
  • Log in or register to post comments

सर्वबाद २७८. १ डाव ७६ धावांनी

श्रीगुरुजी
Sat, 08/28/2021 - 17:42 नवीन
सर्वबाद २७८. १ डाव ७६ धावांनी पराभव.
  • Log in or register to post comments

पहिल्या २ कसोटीतील दमदार

सौंदाळा
Sat, 08/28/2021 - 17:45 नवीन
पहिल्या २ कसोटीतील दमदार कामगिरीनंतर खूपच लाजिरवाणा पराभव. पहिल्या डावातील फलंदाजांची हाराकिरी नडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आज केवळ पावणेदोन तासात १९.३

श्रीगुरुजी
Sat, 08/28/2021 - 17:53 नवीन
आज केवळ पावणेदोन तासात १९.३ षटकात उर्वरीत ८ फलंदाज बाद झाले. इतकी केविलवाणी पडझड होईल अशी अपेक्षा नव्हती.
  • Log in or register to post comments

दक्षिण आफ्रिकेचा महान वेगवान

श्रीगुरुजी
Tue, 08/31/2021 - 22:17 नवीन
दक्षिण आफ्रिकेचा महान वेगवान गोलंदाज डेल स्टेनने वयाच्या ३८ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने ९३ कसोटीत ४३९ फलंदाज बाद केले आहेत. १२५ एकदिवसीय सामन्यात त्याने १९७ फलंदाज बाद केले आहेत. २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत भारत प्रथम फलंदाजी करताना ३८.५ षटकात १ बाद २६९ अशा भक्कम स्थितीत होता. परंतु नंतर स्टेनच्या भेदक माऱ्यापुढे डाव कोसळला व शेवटी ४९ व्या षटकात २९६ धावांवर भारताचे सर्व फलंदाज बाद झाले. डेल स्टेनने ५ बळी घेऊन भारताचे कंबरडे मोडले होते. शेवटी तो सामना आफ्रिकेनेच जिंकला. २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरूद्ध आफ्रिकेने ४३ षटकात २९७ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. परंतु न्यूझीलंडने ते पार करून आफ्रिकेचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आणले. तेव्हा सामना हरल्यानंतर मॉर्नी मॉर्केल, डेल स्टेन यांचे निराश रडवेले चेहरे अजून आठवतात. डेल स्टेनच्या गोलंदाजीवर शेवटच्या षटकात विजयी षटकार मारणारा न्यूझीलंडचा ग्रँट ईलियट हा आफ्रिकेत स्थानिक सामन्यात डेल स्टेन बरोबरच खेळायचा. सामना संपल्यावर त्याने जमिनीवर निराश रडवेल्या अवस्थेत बसलेल्या डेल स्टेनकडे जाऊन हात पुढे करून त्याला उठविले होते. क्रीडाभावनेचे ते उत्कृष्ट उदाहरण होते. मागील काही वर्षे त्याला टाचेच्या दुखापतीने ग्रासले होते. त्यामुळे तो फार कमी सामन्यात दिसत होता. अत्यंत आक्रमक गोलंदाजी करणारा व मैदानात कायम उत्साही असणारा डेल स्टेन कायम स्मरणात राहील. ही स्टेनगन आता परत धडधडताना दिसणार नाही हे आपले दुर्दैव.
  • Log in or register to post comments

खरंय

गुल्लू दादा
Tue, 08/31/2021 - 22:46 नवीन
नेहमी हसतमुख, प्रसंगी आक्रमक, खिलाडू, वेग आणि स्विंग अजून काय हवंय एका खेळाडूमधे. भावी जीवनासाठी शुभेच्छा डेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मॅच सुरू झाली आहे.

गुल्लू दादा
गुरुवार, 09/02/2021 - 16:03 नवीन
सामना सुरू झालाय.
  • Log in or register to post comments

इंग्लंडने नाणेफेक जिंकून

श्रीगुरुजी
गुरुवार, 09/02/2021 - 16:16 नवीन
इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. दोन्ही संघांनी दोन बदल केलेत. इशांत शर्मा व शमी ऐवजी शार्दूल ठाकूर आणि उमेश यादव आत आलेत. जॉस बटलर आणि करन ऐवजी ऑली पोप आणि ख्रिस वोक्स संघात आलेत. भारत सध्या २८/१ (९). रोहीत वोक्सच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षकाकडे सोपा झेल देऊन ११ धावांवर बाद झाला.
  • Log in or register to post comments

शमी

गुल्लू दादा
गुरुवार, 09/02/2021 - 16:36 नवीन
शमीला बाहेर बसवणे मला नाही आवडलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

दुखापतीमुळे बाहेर आहे. आता ३२

श्रीगुरुजी
गुरुवार, 09/02/2021 - 16:45 नवीन
दुखापतीमुळे बाहेर आहे. आता ३२/२ (१४.३).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुल्लू दादा

३९/३. जडेजा ५ व्या क्रमांकावर

श्रीगुरुजी
गुरुवार, 09/02/2021 - 17:12 नवीन
३९/३. जडेजा ५ व्या क्रमांकावर फलंदाजीला आलाय.
  • Log in or register to post comments

४३/३.५

नावातकायआहे
गुरुवार, 09/02/2021 - 17:17 नवीन
28 Aug 2021 - 3:22 pm | गुल्लू दादा गळती लागलेली आहे. फारसा फरक नाही. कोहली पुन्हा चाचपडतोय!! :-)
  • Log in or register to post comments

भोजनसमयी ५४/३

श्रीगुरुजी
गुरुवार, 09/02/2021 - 17:40 नवीन
भोजनसमयी ५४/३
  • Log in or register to post comments

१०७/५. कोहली अर्धशतक करून बाद

श्रीगुरुजी
गुरुवार, 09/02/2021 - 19:56 नवीन
१०७/५. कोहली अर्धशतक करून बाद.
  • Log in or register to post comments

१२२/६, रहाणे गेला.

श्रीगुरुजी
गुरुवार, 09/02/2021 - 20:12 नवीन
१२२/६, रहाणे गेला.
  • Log in or register to post comments

188

गुल्लू दादा
गुरुवार, 09/02/2021 - 20:19 नवीन
188 तरी करा म्हणा...
  • Log in or register to post comments

भारत १९०/१०. इंग्लंड ५/२ वरून

श्रीगुरुजी
गुरुवार, 09/02/2021 - 22:51 नवीन
भारत १९०/१०. इंग्लंड ५/२ वरून ५२/२.
  • Log in or register to post comments

५३/३

नावातकायआहे
गुरुवार, 09/02/2021 - 23:01 नवीन
मस्त... जो रुट गेलाय. बघायला मजा येतेय !!!!
  • Log in or register to post comments

भारत सर्वबाद १९१

श्रीगुरुजी
Fri, 09/03/2021 - 22:28 नवीन
भारत सर्वबाद १९१ इंग्लंड सर्वबाद २९० दुसरा डाव भारत २६/० (७)
  • Log in or register to post comments

दुसऱ्या दिवसाखेर भारत ४३/०

श्रीगुरुजी
Fri, 09/03/2021 - 23:14 नवीन
दुसऱ्या दिवसाखेर भारत ४३/० (१६). अजून ५६ धावांनी मागे.
  • Log in or register to post comments

हे

गुल्लू दादा
Sat, 09/04/2021 - 00:25 नवीन
हे लेकाचे दिवस संपत यायला लागला की तारून नेतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळ पासून फक्त मैदानावर हजेरी लावून येतात. उद्याचा संपूर्ण दिवस बॅटिंग केली तर आहे काहीतरी खरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

भारताने दुसऱ्या डावात किमान

श्रीगुरुजी
Sat, 09/04/2021 - 09:18 नवीन
भारताने दुसऱ्या डावात किमान ३५० धावा केल्या तरच सामना वाचविण्याची किंवा जिंकण्याची आशा आहे.
  • Log in or register to post comments

अजून तरी

गुल्लू दादा
Sat, 09/04/2021 - 17:38 नवीन
अजून तरी बरं चाललंय सगळं. लंच पर्यंत भारत एक बाद १०८.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

गुल्लू दादा
Sat, 09/04/2021 - 20:20 नवीन
रोहित भाऊंचे दणदणीत शतक. भारत एक बाद १९९.
  • Log in or register to post comments

आजचा खेळ संपला. भारत २७०/३.

श्रीगुरुजी
Sat, 09/04/2021 - 22:40 नवीन
आजचा खेळ संपला. भारत २७०/३. १७१ धावांनी पुढे.
  • Log in or register to post comments

आजून १८० हवेत ....

गामा पैलवान
Sun, 09/05/2021 - 01:53 नवीन
एकंदरीत बेत असा दिसतोय की, उद्या अर्ध्या दिवसात १८० टाकून दीड दिवसात ३५० धावा काढायचं आव्हान इंग्लंडसमोर ठेवणार. मग चौथ्या डावात यजमानांना २०० च्या आत गुंडाळायचं. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

भोजनसमयी भारत ३१४/६, २१५

श्रीगुरुजी
Sun, 09/05/2021 - 18:00 नवीन
भोजनसमयी भारत ३१४/६, २१५ धावांनी पुढे. रहाणे पुन्हा अपयशी.
  • Log in or register to post comments

भारताचा डाव

गामा पैलवान
Sun, 09/05/2021 - 19:21 नवीन
ऋषभ पंत व शार्दूल ठाकूर ११५ ते १२५ षटकांच्या दरम्यान ५ च्या सरासरीने खेळले. याचा दराने खेळंत राहिले तर ४०० ची आघाडी सहज आवाक्यात आहे. मात्र त्याआधी भारताचा डाव लवकर घोषित केला तर इंग्लंडास फलंदाजीसाठी पुरेसा वेळ मिळू शकतो. याउलट उशीर लावला तर इंग्लंड जिंकायचा प्रयत्न न करता सामना अनिर्णीत ठेवण्याचं धोरण अंगिकारू शकतात. त्यामुळे आता कोहलीच्या धूर्तपणाची परीक्षा आहे. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

भारत दुसरा डाव ४६६/१०.

श्रीगुरुजी
Sun, 09/05/2021 - 21:58 नवीन
भारत दुसरा डाव ४६६/१०. विजयासाठी इंग्लंडला १२६ षटकांत ३६८ धावा हव्या. भारत आता हरणार नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा