पुस्तकगप्पा
नमस्कार.
'पुस्तकगप्पा' या नव्या उपक्रमाची ओळख करून देण्यासाठी हे टिपण.
लायब्रऱ्या, कागदी पुस्तकांची दुकानं, वर्तमानपत्रातली मराठी पुस्तकांची जागा आक्रसत जात असताना, मराठीतल्या महत्त्वाच्या, लोकप्रिय, रंजक, अनवट, नव्याजुन्या पुस्तकांवर गप्पाटप्पा करण्यासाठी या कार्यक्रमाची कल्पना सुचली. प्रत्यक्ष भेटणं दुरापास्त होण्याचं एक सकारात्मक फलित म्हणजे कार्यक्रम करण्यासाठी जागा आणि तिथवर सदेह पोचण्यातल्या अडचणी हे दोन्ही प्रश्न रद्दबातल होणं. ते पथ्यावर पडल्यानं ही कल्पना ऑनलाईन राबवायची ठरवली.
काही पुस्तकांची आणि तत्संबंधी विषयाची यादी जाहीर करायची आणि दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत ऑनलाईन भेटून त्याबद्दल गप्पा मारायच्या, चर्चा करायच्या, मुलाखती ऐकायच्या... अशी ही संकल्पना. त्या-त्या पुस्तकाचे लेखक, अभ्यासक, समीक्षक, रसिक वाचक यांपैकी कुणी निमंत्रित असेल; कधी कुणी पुस्तकविक्रेता आपले सुरस अनुभव सांगेल; कधी कुणी वाचक एखाद्या अनवट पुस्तकाची ओळख करून देईल... असा बेत आहे. येत्या सहा महिन्यांची पुस्तकं आणि विषय इथे (https://docs.google.com/spreadsheets/d/1pKyMc8JHqMpLnjCCZZ6hAUkS7vQ9IfQ9hnhVnrKUSfE/edit?usp=drivesdk) बघता येतील. चर्चा 'झूम'वर होईल.
चर्चेतला सहभाग विनामूल्य आहे. 'यू ट्यूब'वरून चर्चेचं थेट प्रक्षेपणही केलं जाईल. त्याचा दुवा 'फेसबुक'वर प्रसिद्ध केला जाईल.
तुम्हांलाही सामील व्हायचं असेल, वा प्रश्न पाठवायचे असतील, तर आम्हांला marathi.upakram@gmail.com या पत्त्यावर एक इमेल पाठवा. सहभाग नोंदवल्यावर कार्यक्रमाच्या आठवडाभर आधी कार्यक्रमाचा दुवा पाठवण्यात येईल. आमंत्रितांचं मानधन आणि तांत्रिक बाबींचा खर्च भागवण्यासाठी ऐच्छिक देणगी स्वीकारली जाईल.
अजून काही शंका वा प्रश्न वा सूचना असतील, तरीही कळवा. बोलूच...
मेघना, सई, किरण, नंदन
वर्गीकरण
प्रतिक्रिया
उपक्रम चांगला.
अगदी बरोबर...
उच्च अभिरूची
😀
हेच बोलतो
सहमत :)
सहमत :)
सहमत आहे, काही सदस्य केवळ
छान
पण यादीत
छान उपक्रम.
उत्तम उपक्रम. अभिनंदन आणि
चांगला प्रतिसाद मिळाल्यास
प्रश्न
जाहिरात करण्याचा उद्देशच होता
उपक्रमाला शुभेच्छा करण्याचा
बाकी शुभेच्छांबद्दल सगळ्यांचे
पुस्तक चर्चेत मत महत्त्वाचे.
पेंडसे,आणि नेमाडे
चांगला उपक्रम...! तुमच्या