नुकतीच काही कामानिमित्त माहेरी फेरी झाली. आम्ही सहा बहिणी व एक भाऊ असा मोठा परिवार आहे. सर्व बहिणी जळगाव जिल्ह्यातच आहेत. त्यामुळे मी गावी येणार आहे असे समजले कि बहिणी, भाचे कंपनीची भेटायला येण्याची लगबग सुरु होते. मी तेथे पोहोचायच्या आधीच वाड्यात सर्व मंडळी जमा झालेली असते. एक दिवस सगळ्यांच्या भेटीगाठी घेण्यात निघून जातो. यावेळी जवळपासच्या एखाद्या पर्यटन स्थळी सहलही करण्याचे ठरले होते. बच्चे कंपनी धरून चांगला पंधरा जणांचा ग्रुप जमला. ठिकाण ठरले चार साडेचार तासांवरील तोरणमाळ.
सातपुडा पर्वत रांगांमध्ये वसलेले तोरणमाळ हे एक निसर्गरम्य ठिकाण. नंदुरबार जिल्ह्यातील हे ठिकाण महाराष्ट्रातील दोन नंबरचे व खान्देशातील सर्वात उंचावरचे थंड हवेचे ठिकाण आहे. याची उंची संद्रसपाटीपासून सरासरी ३३३६ फूट इतकी आहे. याच्या जवळपास मोठी शहरे नसल्याने पर्यटक कमी असतात व त्यामुळेच इथले निसर्ग सौंदर्य अजूनही टिकून आहे.
सकाळी सातला चोपड्याहून (जळगांव) निघालो. साधारण ६०किमीवर शिरपूर नाक्याला नाश्त्यासाठी थांबलो. जास्त वेळ घालवायचा नव्हता म्हणून पटकन मिळणारे पदार्थाच मागवायचे ठरले.
गरमागरम रस्सा वडा किंवा गिला वडा , भजी , कचोरी .
येथून पुढे दीड तासावर शहादा (५४ किमी) व तेथून ५०किमी (दीड तास) तोरणमाळ. धुळ्याकडून येणाऱ्या प्रवाशांनाही शहाद्याहुनच पुढे जावे लागते. तोरणमाळच्या आधी साधारण चार किमीवर नागमोडी वळणांचा खूप सुंदर घाट सुरु होतो. दुतर्फा सागवान वृक्ष व बांबूचे वन दिसते. घाटाला सात नागमोडी वळणे आहेत यावरून याचे नाव सातपायरी घाट असे पडले आहे. सर्वात वरची पायरी चढून आलो की सातपायरी पॉइंटहून आपल्याला सगळ्या पायऱ्या दिसतात. वाढलेल्या वनराईमुळे मला मात्र चारच पायऱ्या नजरेस पडल्या .
तोरणमाळला अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच हॉटेल्स आहेत. त्यातही दोन तीनच चांगली. येथे MTDC चे एक अतिशय मोक्याच्या जागेवर एक रिसॉर्ट होते पण काही वादामुळे ते बंद पडले आहे. सुदैवाने एका चांगल्या हॉटलमध्ये संपूर्ण ग्रुपसाठी रूम मिळाल्या. ताजेतवाने होऊन तोरणमाळचे पॉंईंट बघायला बाहेर पडलो.
बंद पडलेल्या MTDC च्या जागेततून दिसणारा परिसर व तलाव. याच परिसरात काही शिल्पही नजरेस पडतात.
'यशवंत' तलाव
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांनी सन १९६९ मध्ये तोरणमाळला भेट दिली होती. त्यांच्या नावावरून या तलावास यशवंत तलाव असे नाव पडले. पूर्वीचे या तलावाचे नाव मात्र अज्ञात आहे. या तलावास पायी अथवा गाडीने संपूर्ण फेरी मारता येते.
या तलावात बोटिंगचीही सुविधा आहे पण सध्या मात्र बोटिंग बंद आहे. तलावाजवळच गुरु गोरक्षनाथांचे मंदिर आहे.
सीता खाई पॉईंट : येथून घनदाट झाडीने भरलेली व उंच खडकांमधील खोल दरी दिसते. येथील पठाराहून दरीत कोसळणारा एक सुंदर धबधबाही नजरेस पडतो. येथे लगताच इको पॉईंट, सनसेट पॉईंट , खडकी पॉईंट आहेत
वळणा वळणाचे रस्ते
झुक झुक गाडी. खूप दिवसांनी घराबाहेर पडलेल्या मुलांनी सहलीचा पुरेपूर आनंद लुटला.
परिसरात अनेक औषधी गुण असलेल्या वनस्पती आहेत.
जडीबुटी विकणारा एक वैदू.
वाटेतील एक शिव मंदिर व शिल्प
संपूर्ण एकच असलेला वटवृक्ष
येथील आणखी एक प्रसिद्ध तलाव म्हणजे "कमळ तलाव किंवा लोटस तलाव"
नावाप्रमाणेच असंख्य कमळ फुललेली पहिली.
एका कड्यावरून दिसणारे सातपुडा पर्वतरांगांचे अप्रतिम दृश्य
मच्छिन्द्रनाथ गुहा. या ठिकाणी थोडेसे अंतर चालल्यावर पायऱ्या उतरून आपल्याला गुहेपर्यंत पोहचता येते.
तोरणमाळचे क्षेत्रफळ खूपच कमी म्हणजे ४१ चौ.किमी आहे तसेच जवळपास सगळ्या पॉईंट पर्यंत गाडी जाते. यामुळे ३-४ तासात बहुतेक सर्व ठिकाणे पाहून होतात. आम्ही पहिल्या दिवशी पाहिलेली काही ठिकाणे दुसऱ्या दिवशी पहाटेच परत एकदा पहिली. अतिशय थंड वातावरणात धुक्याच्या चादरीत लपेटलेले तोरणमाळ बघताना एक वेगळाच अनुभव मिळतो.
परतीच्या प्रवासात शहाद्याजवळील सारंगखेडा येथील दत्त मंदिर पहिले. हे एकमुखी दत्त मंदिर आहे. दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला सारंगखेडा येथे मोठी यात्रा भरते. यात्रेला ४०० वर्ष जुनी परंपरा आहे. यात्रेनिमित्त येथे भरणारा घोडेबाजार खूपच प्रसिद्ध आहे. करोनाकाळात मंदिर सध्या बंदच आहे. मंदिराच्या आत गाभाऱ्यात नवीन घुमट बसविण्याचे काम सुरु होते. कामानिमित्त देवांच्या मूर्ती बाजूच्या घरात हलविल्या आहेत. दर्शन घेतले व परतीचा प्रवास सुरु केला.
वाचने
15834
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा
अहाहा
मस्त कमल तलाव सुंदर आहे.हातात
छान माहिती.
छान.
@कंजूस
In reply to छान. by कंजूस
धन्यवाद!
सुन्दर ठिकाण
चोपडा मुक्कामी ! अरे वा!
In reply to सुन्दर ठिकाण by यश राज
खुप खुप धन्यवाद
In reply to चोपडा मुक्कामी ! अरे वा! by गोरगावलेकर
व्वा, एक नंबर !
छान फोटो व प्रवास वर्णन . +१
मस्त फोटो.... आवडले
जवळचे मोठे स्टेशन
In reply to मस्त फोटो.... आवडले by ज्ञानोबाचे पैजार
उत्तम वर्णन आणि फोटोज.
धन्यवाद!
In reply to उत्तम वर्णन आणि फोटोज. by गवि
आम्हालाही लांब पडते
मस्त जागा आहे
निसर्गरम्य तोरणमाळ आवडले!
जब्बरदस्त
धन्यवाद!
सुंदर लेख आणि फोटो
फोटो आणि वर्णन खूपच आवडले. ऐन
केंव्हा जायचे बोला ?
In reply to फोटो आणि वर्णन खूपच आवडले. ऐन by प्रचेतस
सुंदर वर्णन
सुंदर वर्णन
वर्णन, फोटो आणि लेखातील
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Misirlou Acapellaधन्यवाद,
धन्यवाद,
तोरणमाळ हिलस्टेशनसाठी सव्वापाचशे कोटींचा आराखडा सादर
लै भारी ! +१
In reply to तोरणमाळ हिलस्टेशनसाठी सव्वापाचशे कोटींचा आराखडा सादर by गोरगावलेकर
स्वागत
In reply to तोरणमाळ हिलस्टेशनसाठी सव्वापाचशे कोटींचा आराखडा सादर by गोरगावलेकर
छान वृत्तांत.
खुप छान
प्रवासवर्णन आवडले