चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ (भाग २)
आधीच्या भागात १५० प्रतिसाद झाल्यामुळे पुढचा भाग काढत आहे.
अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. देशातील चार महत्वाच्या शहरांपैकी कंदाहार आणि हेरात तालिबान्यांच्या ताब्यात गेली आहेत. मझार-ए-शरीफही जवळपास गेल्यातच जमा आहे असे दिसते. पुढील तीन महिन्यांमध्ये काबूलही पडेल अशी भिती पाश्चिमात्य माध्यमांनी वर्तवली आहे. अशा परिस्थितीत काबूलमधील आपल्या दूतावासावर हल्ले करू नयेत अशी विनंती अमेरिकेकडून तालिबानला केली गेली आहे. http://www.uniindia.com/washington-calls-on-taliban-to-spare-us-embassy-as-fight-for-kabul-nears/world/news/2475419.html एका दहशतवादी संघटनेला असा बाबापुता करून केलेली विनंती अमेरिकेसारख्या महासत्तेला शोभते का? असो.
मला वाटते की पूर्ण जगात शापित देश असा कोणता देश असेल तर तो अफगाणिस्तान आहे. एकेकाळी बौध्द संस्कृती त्या भूमीत बहरली होती. पण तिथेच जवळपास गेल्या हजारेक वर्षांपासून काही वर्षे वगळली तर सतत अस्थिरता, सतत हिंसाचार यांचेच साम्राज्य राहिले. गझनीचा महंमद, महंमद घोरी पासून अहमदशाह अब्दालीसारखे क्रूरकर्मे तिथे सत्तेत होते. अलीकडच्या काळात रशिया आणि अमेरिका या दोन महासत्तांच्या साठमारीत अफगाणिस्तान या सुंदर देशाची मात्र पूर्ण वाताहत झाली. हे सगळे बघून खरोखरच वाईट वाटते.
अफगाणिस्तानात पूर्ण लोकसंख्येत लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे. तालिबान राज्यात शाळांमध्ये आधुनिक शिक्षण मिळायची तर शक्यताच नाही. मग या मुलांच्या मनात तेच दहशतवादाचे प्रशिक्षण भरवले जाऊन भविष्यात परिस्थिती अधिकाधिक चिघळत जाणार का ही भिती वाटते. आणि अफगाण स्त्रियांविषयी काही बोलायलाच नको. घराबाहेर पडायचे नाही, पडायचेच असले तर नवरा, भाऊ, बाप किंवा मुलगा यांच्याबरोबरच पडायचे, शिक्षण मिळायचा संबंधच नाही, घरकाम करत बसायचे आणि मुले काढत आणि सांभाळत बसायची, जरा चेहर्यावरचा बुरखा बाजूला झाला तर भर चौकात चाबकाचे फटके पडणार का या भितीच्या सावटाखाली वावरायचे.. खरोखरच भयानक. आणि या परिस्थितीतून मार्ग निघायची शक्यता अजिबात नाही.
असले प्रकार बघितले की भारतातल्या अनेक गोष्टी आपल्याला आवडत नसल्या तरी आपण किती सुदैवी आहोत हे जाणवते.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मूर्खपणा आहे!
आपल्याच दुव्यातील
कितसर विसा देऊन ही का घालून
कितसर विसा देऊन ही का घालून
रीतसर व्हिसा घेऊन येथे येऊ
सांगितलं ना.
म्हणजे तुमच्या कडे ऊत्तर नाही
बरोबर
मोदी हे अफगाणी घालून घेवून
ऊगाच मोदींचं आंधळं समर्थन
वयक्तिक ऊतराताहात डाॅक्टर. का
India is home to
तिथे धर्म न पाहता विसा देणार
तिथे धर्म न पाहता विसा देणार
व्हिसा
काहीतरी केल्यासारखे दाखवायचे,
इतर देश
धर्म न पाहता प्रवेश परवाना
तालिबानचा सफाईदार विजय पूर्वनियोजित ?
सहमत
एक कॉन्स्पिरसी थिअरी
https://newrepublic.com
धन्यवाद.
दुसरी कॉन्स्पिरसी थेअरी
संगती लागत नाही
पाकिस्तान बरोबरचा अनुभव
अर्थात त्यांनी असा प्रयत्न
शक्यता कमी
तालिबानला चीन मध्ये काही
बाकी प्रतिसाद विचार करायला
फैजानने कबीर नावाने केला लव्ह जिहाद
उप्र - स्थापन झालेल्या नवीन कंपन्यांना प्राधान्य
उत्तर प्रदेशात
+१
उद्योजकांचे महाराष्ट्र
२०१९ मध्ये उद्योगास पोषक
+१
पाकिस्तान
मुस्लिम देश च जगासाठी डोकेदुखी ठरत आहेत
सर्व नॉन मुस्लिम राष्ट्रांनी
चक्क पुन्हा एकदा १८८
ब्रायटनचा पठाण
त्याच्या मनात तालिबानविरुद्ध
अफगाण पलायन : स्पष्टीकरण वि. समर्थन
स्थलांतर
नवा धागा काढा