आणि माझा मारुती झाला.
शेवंताने दीव्याच्या ज्योतीवर भाकरी भाजली आणि मारुतीने अचंब्याने तोंडात बोट घातले.
मुळ केसच्या ऑडीओ स्क्रिप्टमधले एफ वर्ड्स मी गाळलेले आहेत, आणि बरेचसे शब्द मवाळुन लिहीले आहेत
_____________________________________________________
आई: अहो तुम्ही लेकीकडे बोलणेच बंद केले आहे. असे हे किती दिवस चालणार. जरा तीला जवळ घेउन बसा. नीट बोला. काय म्हणणे आहे तीचे बघा. नंतरचे त्रास वाचवायचे असतील तर आत्ताच स्पष्ट बोललेले बरे.
बाबा: तु नसताना एकदा बोललेलो आहे. ती जे काही बोलते ते माझ्या आकलनशक्तीच्या पलीकडचे आहे. तु बोलुन बघ. मात्र ती बोलेल ते सहन करायची ताकद आण आधी. मी गेले महीनाभर गोळी घेतल्याशिवाय झोपु शकत नाहीये.
_____________________________________________________
उच्च मध्यमवर्गीय उच्च शिक्षित घराणे. घरात आर्थिक त्रास काहीही नाही. बाबा ४८ वर्ष, आई ४२ वर्ष, मुलगी २० वर्ष
साधारण दोन दिवसानंतर अशीच एक संध्याकाळ. मुलगी घराबाहेर निघाली आहे.
आई: आता कुठे निघालीस?
मुलगी: मित्राबरोबर फिरायला
आई: कुठे?
मुलगी: बघु, अजुन ठरले नाहीये.
आई: कीती वाजता येणार आहेस?
मुलगी: दहा पर्यंत येइन.
आई: असे दहा पर्यंत काय काम आहे?
मुलगी: उगीच नस्त्या चौकशा करु नकोस
आई: आई आहे मी तुझी
मुलगी: ते मी कधी नाकारले आहे.
आई : जरा नीट बोलशील का तु? असे बेताल वागणे बरे नाही.
मुलगी: बाहेर जाताना उगाच मुड खराब करु नकोस. उद्या बोलु. काय विचारायचे ते विचार. खोट सांगणार नाही. सर्व सांगेन.
आई: आत्ताच बोलु.
मुलगी: ठीक आहे. आजचा कार्यक्रम रद्द करते. उद्या करीन. फरक पडत नाही.
मुलगी मित्राला फोनवरुन भेट रद्द झाल्याची सुचना करते.
मुलगी: आता बोल. आक्रस्ताळे पणा करणार नसशील तरच बोलीन. हीस्टेरीक होणार असशील तर बाबा आल्यावर बोलु. मी बाबांना सर्व कल्पना दीली आहे. त्यानंतर त्यांनी माझ्याशी बोलणेच बंद केले . तु पण करशील.
कदाचीत मुलगा असते तर वेगळी परिस्थिती असती.
आई: असे काय बोललीस की त्यांची झोप उडाली?
मुलगी: तुझी पण उडेल.
आई: तो तुझ्याकडे लॅपर्टॉप आहे तो कुणाचा?
मुलगी: माझा. गिफ्ट मिळाला आहे तो मला
आई: कोण कुणाला अशी महागडी वस्तु कारण नसताना गिफ्ट देइल?
मुलगी: खरे आहे तुझे. . लॅपटॉप चे काय घेउन बसली आहेस. माझ्या बँक लॉकर मधे ४ लाखाचे हीरे आहेत.
आई : बाप रे, आता हे पण गिफ्ट का?
मुलगी: हो.
आई : नीट सांग. साधारण कळते आहे तु काय म्हणतेस ते. पण एकदा का तुझ्या तोंडाने कळाले तर बरे होईल.
मुलगी: तुला सर्व माहीत असावे. . फक्त आज विचारायचे धैर्य केलेस तु.
आई: पालक म्हणुन आमचे काय चुकले ते एकदा कळु दे.
मुलगी: तुम्ही दोघांनी मला काहीही कमी केलेले नाही. जो काही निर्णय आहे तो माझा. बर्या वाईटाची जबाबदारी माझी.
तुम्ही अपराधी पणाची भावना बाळगण्यात काहीच अर्थ नाही. सगळे पुर्ण समजल्यावर मला कुटल्याही सायकिऍटीस्ट कडे घेउन जायचे मनात सुद्धा आणु नका. मी येणार नाही. जबरद्स्ती केलीत तर घर सोडुन निघुन जाईन. त्याला कारण पण सांगते. ती मंडळी त्यांच्या प्रोटोकॉल प्रमाणे माझ्या गत आयुष्यात माझ्यावर बाबांनी किंवा इतर नातेवाईकांनी शारीरीक अत्याचार वगैरे केले आहेत का हे शोधण्यात १ महीना घालवतील. तसे काहीच नाही. तुम्ही सर्वांनी मला भरभरुन प्रेम दीले आहे.
आई: आता काय ते एकदा बोल.
मुलगी: थांब, आपण एक ब्रेक घेउ. मला आणि तुला एक फक्कड चहा टाकते. नंतर बोलु. आणि तुझी हरकत नसेल तर एक सिगारेट ओढते. तो पर्यंत तु माझी पर्स बघ. म्हणजे फारसे बोलावे लागणार नाही. सोपे जाईल.
क्रमशः
_____________________________________________________
हा भाग मी लिहीला. दुसर्या भागाचे संपादन करायला एखाद्या दिग्गजाची मदत घ्यायला लागेल. संपुर्ण केस वाचल्यावर मी तोंडात घातलेले बोट अजुनही तसेच आहे.
_____________________________________________________
जाता जाता-मुलगी: तु बाबाना कधी मारले आहेस का?
याद्या
4902
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म.
थोडं थोडं समजतंय..
एग्रिकल्च
नेहमीप्रमाणेच
कुठल्र
वाचतो आहे ...
ह्म्म..
हा णवा
जुणे
मुलगी ज्या
In reply to जुणे by विनायक प्रभू
मास्तर,
डिप्रेसिंग कथांवर उतारा
सहमत
In reply to डिप्रेसिंग कथांवर उतारा by भडकमकर मास्तर
जवाबदारी
बोलती बंद
काळजीमु़क्त?
In reply to बोलती बंद by रेवती
श्रावणसाह
In reply to काळजीमु़क्त? by श्रावण मोडक
तु बाबाना कधी मारले आहेस का?
माहीत नाही
In reply to तु बाबाना कधी मारले आहेस का? by रामदास
मूळ केस कुठली
मूळ
In reply to मूळ केस कुठली by संदीप चित्रे
कथानक
+१
In reply to कथानक by सँडी
विश्वास
लवकर
पुढे?
कहिच कळल नाय