Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग २९

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 15/04/2018 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
कर्नाटक विधानसभेची निवडणुक १२ मे रोजी आहे. इंडिया टुडे च्या नवीन सर्वेक्षणानुसार निकालानंतर कर्नाटकात अशी परिस्थिती असेल. भाजप - ७८ ते ८६ कॉन्ग्रेस - ९० ते १०१ निजद - ३४ ते ४३

वाचने 53939
प्रतिक्रिया 189

प्रतिक्रिया

तुमच्या अभ्यासानुसार भाजपा कर्नाटकात हरायला पाहिजे कारण जे कर्नाटकात हरतात तेच केंद्रात सत्तेत येतात असे तुम्ही कुठेतरी लिहिल्याचे वाचले. बघुया काय होते ते. तुमच्या म्हणण्यानुसार घडले तर काँग्रेस ला काही दिवस आनंदात काढता येतील आणि भाजपा ला २०१९ ला आनंदोत्सव साजरा करता येईल. एकंदरीत विन विन सिच्युएशन आहे !

In reply to by धर्मराजमुटके

१९८३ पासून असा इतिहास आहे की राज्यात सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष व केंद्रात सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष वेगवेगळे असतात किंवा एकाच पक्षाला दोन्हीकडे सर्वाधिक जागा मिळाल्या तर राज्यात व केंद्रात वेगवेगळे पक्ष सरकार स्थापन करतात. १९८९ ला थोडासा अपवाद होता. त्यावेळी राज्यात खांग्रेसला बहुमत होते व केंद्रात १९५ जागा जिंकून खांग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. परंतु केंद्रात सरकार स्थापन झाले ते जनता दलाच्या वि. प्र. सिंगांचे. २००४ मध्येही थोडीशी वेगळी परिस्थिती होती. तेव्हा राज्यात भाजप सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष होता तर केंद्रात खांग्रेसला सर्वाधिक जागा होत्या. परंतु केंद्रात इतर पक्षांच्या मदतीने व राज्यात निजदच्या मदतीने खांग्रेसचेच सरकार स्थापन झाले होते.

In reply to by श्रीगुरुजी

मग बॉम्बस्फोट कोणी केला? 54 साक्षीदार फिरले याचे कुतूहल वाटले. ही फाईल रिओपन होऊन लवकरात लवकर गुन्हेगारांना शिक्षा मिळाली पाहिजे.

In reply to by श्रीगुरुजी

खून , कट , स्फोट अशा खटल्यातून सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटणारे या देशाने १९४८ पासून पाहिले आहेत आणि तुम्ही फक्त २५ वर्षाच्या गोष्टी करता ?

In reply to by manguu@mail.com

संशयाचा फायदा देऊन/सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटणे आणि राजकीय कारणासाठी नाव खटल्यात गोवलेले असताना कोणताही पुरावा नसल्याने न्यायालयाने निर्दोष सोडणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आणि १९४८ पासून त्याची सुरुवात झाली आहे. पण तुम्हाला तो समजणार नाही तेंव्हा सोडून द्या

ज्या NIA च्या अधिकाऱ्यांनी पुरेसा सबळ पुरावा नसताना ही यांना तुरुंगात टाकले त्यांचेवर देशाची दिशाभूल केल्याबद्दल खटला चालवून शिक्षा करता येईल का?

In reply to by Topi

तशी सोय नाही. पोलिसाना तपासात आरोपी मिळणे व कोर्टात ते गुन्हेगार सिद्ध होणे , या दोन भिन्न प्रक्रिया आहेत.

एका बकरवाल माणसाची मुलाखत इथे आहे : https://www.facebook.com/tgtpost/videos/2122302284655399/ त्यात मुलाखतदाता १ मिनिट ३८ सेकंदांनंतर स्पष्टपणे म्हणतोय की त्यांचा राज्य पोलिसांवर आजिबात विश्वास नाही. हत्येनंतर ७ दिवसांनी मुलीचं प्रेत मिळतं ते म्हणे हिंदू मंदिरात! जनता असल्या भूलथापांवर विश्वास ठेवायला मूर्ख आहे का? रोहिंगे मुस्लिम येण्याआधी कोणी कधी असले प्रकार ऐकले होते का या प्रांती? मग रोहिंगे घुसल्यावर जर हा प्रकार होत असेल तर जे कळायला पाहिजे ते कळून येतं, नाहीका? रोहिंग्यांनी अत्याचार करायचे आणि नाव मात्र हिंदूंचं. खासा न्याय आहे. -गा.पै.

बाबरी मशीद असा उल्लेख न करता राममंदिर हे योग्य नाव वापरल्याबद्दल सरसंघसंचालक श्री. मोहन भागवत यांचं अभिनंदन! बातमी : भारतीयांनी नव्हे विदेशी शक्तींनी पाडले राम मंदिर -गा.पै.

म्हणूनच आपले संस्कृती रक्षक विदेश्यांकडून ठोकून ठोकून कबुल करून घेण्यासाठी विदेशात तळ ठोकून आहेत.

हे असेच मुद्दे काढले जातील अशी खात्री वाटते. सर्वत्र अपयशी होत असलेल्या सरकारचा बचाव अश्या प्रकारे थातूरमातूर मुद्दे मिडियाला चघळायला देऊन करण्याचा जुनाच डाव भागवत खेळताहेत. हे आता वाढत जाईल.

कठुआतील ८ वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. हे अमानुष कृत्य करणाऱ्या आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. त्यात चंद्र प्रकाश गंगा आणि चौधरी लाल सिंह हे भाजपचे दोन मंत्री सहभागी झाले होते. या दोन्ही मंत्र्यांना जनक्षोभामुळे आधीच राजीनामे द्यावे लागले असून आज उरलेल्या सर्व ९ मंत्र्यांचे राजीनामे भाजप नेतृत्वाने घेतल्याने जम्मू-काश्मीरच्या राजकारणात भूकंप झाला आहे.  मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या इशाऱ्यामुळे भाजपला हा निर्णय घ्यावा लागल्याचे बोलले जात आहे. ज्या मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत त्यांची खाती बदलली जातील. मोठ्या प्रमाणात फेरबदल केले जातील. याबाबत मेहबूबा मुफ्ती यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असेही सांगितले जात आहे.  मेहबूबा मुफ्ती यांच्या मंत्रिमंडळात भाजपच्या वाट्याला ११ मंत्रिपदं आलेली आहेत. या सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतल्यानंतर फेरबदल करताना यातील काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची तर काही नव्या चेहऱ्यांची वर्णी लागण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

रत्नागिरीमधील नाणार प्रकल्पासाठी गेल्या एक वर्षात मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करण्यात आल्याचं समोर आलं आहे. नाणारमध्ये तब्बल तीन लाख कोटींची गुंतवणूक असलेल्या रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स या तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी जमिनीचं अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. खरंतर नाणारमध्ये सर्व जमिनी या स्थानिक शेतक-यांच्या आहेत. मात्र फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, नाणारमध्ये जमीन खरेदी करणा-यांपैकी ८६ पैकी ३८ जण व्यापारी असून यामध्ये मोदी, जैन, शाह, झुनझुनवाला यांची नावे आहेत. २ मे २०१७ ते १९ जानेवारी २०१८ दरम्यान म्हणजे फक्त आठ महिन्यांत व्यापा-यांनी जवळपास ५५९ एकर जमीन खरेदी केली आहे. यावरुन राजकारणी आणि व्यापा-यांची साटंलोटं असल्याचं सिद्ध होत असल्याचा आरोप स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे. ‘एकीकडे स्थानिक विरोध करत असताना जमीन खरेदी करणा-या व्यापा-यांनी जे आता मालक आहेत त्यांनी आधीच एनओसी देऊन टाकली आहे. व्यापा-यांना या प्रकल्पाची माहिती कशी काय मिळाली ? इथल्या जमीन खरेदी करण्यात त्यांना अचानक इतका रस का आला ? याचा थेट अर्थ आहे की, काही राजकारण्यांनी व्यापा-यांना नाणारमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. यामुळे व्यापा-यांना तब्बल २०० टक्के नफा होणार आहे आणि तोदेखील सफेद पैशांमध्ये’, असं संघर्ष समितीचे अशोक वालम यांनी म्हटलं आहे. https://www.loksatta.com/maharashtra-news/559-acres-land-purchased-by-t…

In reply to by manguu@mail.com

घाणेरडी पत्रकारिता, त्याला फॉलो करणारे अंधविरोधक मग काय आनंदी आनंद!! ************************************* ८६ पैकी ३८ म्हणजे साधारणपणे ४५ टक्के व्यापारी. उरलेले कोण हे सांगणे गरजेचे नसते! या ३८ पैकी ४ म्हणजे साधारण १०-११% तथाकथित गुजराती. बाकीचे कोण हे सांगणे गरजेचे नसते. आणि या सगळ्यातून सांगायचे काय आहे तर बघा बघा आधी जमिनी विकत घेऊन मग गुजरात्यांच्या फायद्यासाठी प्रकल्प आणणार आहेत. आणि वरून दाखला विकणाऱ्यांचा. त्यांना स्वतःचं भलं बुरं कळत नसणारच ना? गन पॉईंट वर जमिनी घेतल्या असतील तर वरील बातमीत काही तरी अर्थ असता आणि कारवाईची, विरोधाची आवश्यकता असती. या असल्याच गोष्टी माध्यमांची विश्वासार्ह्यता रसातळाला घेऊन जात आहे. ************************************* बादवे, तुमचं नाणार प्रकल्पाबद्दल काय मत (काही असलं तर) आहे? कि वरील प्रतिसादामागे काही विशेष हेतू आहे?

In reply to by बिटाकाका

जवळपास ८६ शेतक-यामनी आपली ५५९.७७ एकर जमीन अधिग्रहण करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. ही जमीन मे २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान खरेदी करण्यात आली आहे. १८ मे २०१७ रोजी राजापूरमध्ये जमीन अधिग्रहणाचं परिपत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर या जमिनींची खरेदी-विक्री झाली. ज्यांनी जमीन खरेदी केली आहे त्यांच्यात मोदी, जैन, मुदीराज, वाधवा, मुदियार, सिंघव, निलवर, शाह, दोशी, कटारिया, केडिया, चंदर, थाववरी, रथी आणि झुनझुनवाला यांचा समावेश आहे. यांच्यात काही जाधव, कारंजे, देवळेकर, जोशी असे महाराष्ट्रीयनदेखील आहेत. जमीन अधिग्रहणाची सूचना मे २०१७ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर एखाद्याने जमीन विकत घेतली तर एवढाआरडाओरडा कशासाठी? विकणा-यांना अक्कल नव्हती का? विकण्याची सक्ती होती का? सरकार जमीन विकत मागतंय तर द्यायची तयारी नाही. पण खाजगी व्यक्तीला विकून मोकळे झाले. मग आता प्रॉब्लेम काय आहे?

बादवे, तुमचं नाणार प्रकल्पाबद्दल काय मत (काही असलं तर) आहे? कि वरील प्रतिसादामागे काही विशेष हेतू आहे? बीटाकाका, त्यांचा एकच हेतु, फुकटचे १५ लाख कधी मिळणार ! तो पर्यंत गरळ ओकतच रहाणार !! बर मिळाल्यावरही गरळ बंद होईल ह्याची खात्री नाही !!

In reply to by डँबिस००७

हिंदू मुस्लिम ख्रिस्चन सगळ्या राजांच्या तिजोर्या आमच्या बापजाद्यानीच भरून दिल्यात. कधीतरी राजतिजोरीतून १५ लाख आलाच पे आउट तर मी बिनधास्त घेईन. तुम्हाला नको असतील तर तेही मला द्या.

In reply to by डँबिस००७

त्यांचा एकच हेतु, फुकटचे १५ लाख कधी मिळणार ! साफ चूक. गरळ ओकणे हे कागलकरचे एकमेव जीवनध्येय आहे.

इंद्राणी मुखर्जीने चिदंबरमविरुद्ध कोर्टात जबाब दिला होता म्हणे. भक्त लोक नाचत होते की म्हणे असा जबाब फिरवता येत नाही. स्वामी असीमानंदानी कुणासमोर जबाब दिला होता ? तो जबाब कसा फिरला ?

काय करावं अशा पत्रकारितेला? https://timesofindia.indiatimes.com/sports/off-the-field/cwg-gold-medal… https://timesofindia.indiatimes.com/sports/more-sports/shooting/i-was-n… व्हीव्हीआयपी लोकांसाठी सुवर्णपदक विजेतील खाली बसवलं अशी बोंब ठोकणारे यानंतर काही स्पष्टीकरण देतील का?

सी.ए., सी.एस, ऑडीटर्स साठी रेग्यूलेशन्स च्या ड्राफ्टवर सेबी गांभीर्यानं विचार करतेय, ज्यामुळे शेअरधारकांच्या हिताच्या दृष्टीकोनातून त्यांना काम करावे लागेल. तसेच या कामात केल्या गेलेल्या चुका आणि हलगर्जीपणासाठी दंड ठोठावल्या जाऊ शकतो आणि गरज पडल्यास त्यांच्या विरोधात न्यायालयीन प्रक्रीया देखील सुरू होऊ शकते. यासाठी ड्राफ्ट कन्सलटेशन पेपर तयार करण्यात आलेला आहे अणि आवश्यक त्या चर्चा अन् मतं विचारात घेऊन पुढचे पाऊल उचलण्यात येईल. https://economictimes.indiatimes.com/markets/stocks/news/cas-cs-valuers…

चला. पुरस्कार परती पर्व क्रमांक २ सुरू होणार. याही पर्वात नेहमीचेच यशस्वी कलाकार आहेत. त्यामुळे प्रयोग रंगून यशस्वी होणारच. https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/intelle… बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पर्व क्र. १ सुरू झाले होते व मतदान झाल्याक्षणी पर्वाची समाप्ती झाली होती. आता कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पर्व क्र. २ सुरू होईल आणि १२ मे रोजी मतदान झाल्यानंतर या पर्वाची समाप्ती होईल. पर्व क्रमांक ३ नोव्हेंबर २०१८ मध्ये राजस्थान, म. प्र., छत्तीसगड इ. राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू होईल. एक शंका - पुरस्कार परतीच्या प्रथम पर्वात सर्व पुरस्कार परत दिले होते. आता या द्वितीय पर्वात परत देण्यासाठी पुरस्कार कोठून आणणार? का आधी परत केलेल्या पुरस्कारांचीच झेरॉक्स देणार?

In reply to by श्रीगुरुजी

भाजपाच्या मंदिर प्रश्नाचंही तेच दुखणे आहे. एकदा बांधून टाकले की मग दुसर्या वेळेला काय करायचे ?

In reply to by manguu@mail.com

२०१४ ला भाजपा राममंदिर मुद्द्यावर निवडून आला होता आणि आता भारतभरात त्याच मुद्द्यावर पसरला आहे ह्या भ्रमात (की सुप्त दुखण्यात?) खुश राहा!!

बुद्धिजीवींची नवे तर बघा!! मला तरी असली भूमिका घेऊन स्वतःला बुद्धिजीवी म्हणवून घेण्याची लाज वाटली असती. ************************ लोकशाहीचे अपहरण......दुसऱ्या एका धाग्यावरचा प्रतिसाद परत इथे टाकतो.... हाहाहाहा.....लोकशाही धोक्यात आहे हे प्रकरण दिवसेंदिवस अधिकच हास्यास्पद होत चाललेलं आहे असे वाटते. *********************** या देशात, एक थोर नेत्याची हत्या एका अमुक जातीच्या माणसाने केली म्हणून त्या अमुक जातीच्या लोकांना देशोधडीला लावण्यात आले तेव्हाही लोकशाही मजबूत राहिली. या देशात, आणीबाणी लागू करण्यात आली तेव्हाही ही लोकशाही मजबूत राहिली. या देशात, एका धर्माच्या माणसांनी एका पंतप्रधानांची हत्या केली म्हणून त्या धर्माच्या लोकांना चुन चुन के मारण्यात आले तेव्हाही लोकशाही मजबूत राहिली. या देशात, एका विशिष्ट जातीचे धर्माचे लोक त्यांच्या मूळ प्रदेशातुन अक्षरशः हाकलून काढण्यात आले, मारून टाकण्यात आले तेव्हाही ही लोकशाही मजबूत राहिली. या देशात, एका रेल्वेच्या डब्यात पट्रोल टाकून जाळण्यात आले, त्याची परिणीती म्हणून दोन धर्मात खुनी खेळ खेळला गेला तेव्हाही लोकशाही मजबूत राहिली. आज ज्या घटनांमुळे लोकशाही धोक्यात आली असे काही लोकांना वाटतेय त्यांनी अशा घटनांचा इतिहास जरूर तपासावा. स्वतःचा दांभिकपणा स्वतःलाच कळून लोकशाही मजबूत असल्याची जाणीव नक्की होईल. ************************* आपले नावडते सरकार आल्यावर जळफळाट होणे तसे स्वाभाविक आहे. म्हणजे हा ईव्हीएम घोटाळा आहे असे वाटणे, पैसे वाटून जिंकले आहेत वाटणे, जाती धर्माचे राजकारण करून जिंकले वाटणे, काहीच विकास होत नाही वाटणे वगैरे समजू शकतो. पण लोकशाही धोक्यात आहे...हे मात्र अनाकलनीय आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

मा.गो. मोर्चे काढायला निमित्त हवं ना, म्हणून अचानक मोठमोठ्या रोख रकमा काढून रोखपेढ्या रित्या करण्यात आल्या आहेत. पण काळजी करू नका. शासन आवश्यक तेव्हढ्या नोटा वितरीत करतंय. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

दोनचार मोठे लोक इतके पैसे काढून घेऊन ब्यान्क ठप्प करु शकतात का ?

In reply to by manguu@mail.com

RBI बॅंकेला पैसे (नोटा, नाणी) देते. बॅंक ठरवते, ATM मध्ये किती ठेवायचे आणि cash counter वर किती. ही दोन-चार धेंडं ATM मधून पैसे काढणार नाही तर थेट ATM लागते जाणारे पैसेच पळवतात.

In reply to by गामा पैलवान

गामाजी , चावट लोकानी जर मुद्दाम जास्त पैसे काढून नेलेत तर रिजर्व ब्यान्क जास्तीच्या नोटा का वितरित करत आहे ? ब्यान्केतले पैसे कुणी नेले तर ती तूट रि ब्या का व कशी भरेल ?

In reply to by श्रीगुरुजी

ते बोलतात - पैसे कुणीतरी काढून नेलेत. मग बोलतात - काळजी नका करु . रिजर्व ब्यान्क देईल छापून. कुणीतरी पैसे नेले तर रि ब्या त्याची तूट कशी भरुन काढेल ? , हे समजणे माझ्या आवाक्याबाहेरचेच आहे, म्हणूनच विचारतोय.

In reply to by manguu@mail.com

.... कारण की द्रव्यता व्यवस्थित राहील इतक्या नोटा वितरीत करणे हे राखीवपेढीचं काम आहे. -गा.पै.

In reply to by मार्मिक गोडसे

गा. पैं. गप्प का? पैसे कोणी काढले हे कळणे फार कठीण नाही. एव्हाना त्यांची लिस्ट तयार झाली असती. सरकार इतके सुस्त का?

In reply to by मार्मिक गोडसे

नोटा बाजारातून कमी का झाल्या याची १० कारणे. https://www.dailyo.in/business/cash-crunch-atm-queues-atm-rush-demoneti… बाकी चालू द्या

In reply to by श्रीगुरुजी

लिंक तुम्हीच दिली ना? मग तुम्ही सावकाश वाचली नाही का? निदान हायलाईट तरी वाचा. GDP वाढीच्या प्रमाणात रोख चलन उपलब्ध आहे का? लोकं रोख रक्कम का परत बँकेत भरत नाहीत?

In reply to by मार्मिक गोडसे

हे काही कामाला येतं का बघा - काही शक्यता वर्तवल्या आहेत. https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/taxmen-begi…

निधर्मांधांचे अजून एक कारस्थान अयशस्वी झाले. आधुनिक शेरलॉक होम्स सपशेल हरला. डिसेंबर २०१७ मध्ये गुजरात विधानसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर, भाजपविरूद्ध फुफाटा उडविण्यासाठी काय करता येईल याबद्दल निधर्मांध व खांग्रेसी खल करू लागले. मग त्यातूनच निवडणुकीच्या जेमतेम काही आठवडे आधी अमित शहांचे सुपुत्र जय शहा यांच्या कंपनीविरूद्ध धुरळा उठविण्यात आला. 'जय शहांच्या संपत्तीत एका वर्षात १६००० पटीने वाढ' असे दिशाभूल करणारे शीर्षक देऊन लेख पाडण्यात आले. प्रत्यक्षात कंपनीची उलाढाल ८० कोटींवर पोहोचली होती व एखाद्या कंपनीची उलाढाल सद्यस्तितीत ८० कोटी असणे यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नव्हते. ही कंपनी नियमित आयकर परतावा भरत होती. असे असताना व उलाढालीत वाढ झाली असताना 'संपत्तीत १६००० पटीने वाढ', 'उत्पन्न एका वर्षात १६००० पटीने वाढले' अशा बातम्या मुद्दाम पेरल्या गेल्या. जय शहांनी न्यायालयात जाऊन अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्यानंतर निधर्मांधांचे धाबे दणाणले व ते प्रकरण मागे पडले. दरम्यानच्या काळात निधर्मांध व खांग्रेसी यांच्या कुटील मेंदूतून अजून एक कारस्थान शिजले. सोहराबुद्दिन एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी करणार्‍या न्यायाधीश लोयांचा हॄदयविकाराच्या धक्क्याने २०१४ मध्ये मृत्यु झाला तेव्हा निधर्मांधांनी त्या घटनेची दखलही घेतली नव्हती. डिसेंबर २०१७ च्या गुजरात निवडणुकीच्या तोंडावर यांनी ते प्रकरण उठवून भाजप व अमित शहा यांच्याविरूद्ध धुरळा उडविण्याचे कारस्थान रचले. ज्या व्यक्तीच्या मृत्युची ३ वर्षे दखलही घेतली गेली नव्हती तो मृत्यु यांना अचानक संशयास्पद वाटायला लागला. आधुनिक शेरलॉक होम्स असलेल्या निरंजन टकले नावाच्या एका निधर्मांधाने द वायर नावाच्या एका बदनाम साप्ताहिकात यावर लेख लिहून धुरळा उडविण्याचा नारळ फोडला. त्यापाठोपाठ लगेच खांग्रेसी व इतर काही जणांनी धुळवड खेळण्यास सुरूवात केली. लोयांच्या कुटुंबियांनाही यात गोवण्यात आले. न्यायसंस्थेवर संशय व्यक्त केला गेला. खांग्रेसींनी पत्रकार परीषद घेऊन या नैसर्गिक मृत्युमागे अमित शहाच आहेत अशा स्वरूपाचा आरोप करून त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. नंतर छोटा भीम खासदारांचे एक शिष्टमंडळ घेऊन राष्ट्र्पतींना भेटला व लोयांच्या मृत्युची चौकशी करावी अशी मागणी केली. हे सर्व घडत होते ते मृत्युनंतर ३ वर्षांनी आणि त्याला कारण होते काही आठवड्यांवर येऊन ठेपलेली गुजरात विधानसभेची निवडणुक. निधर्मांध व खांग्रेसी धुरळा उडविण्यात यशस्वी झाले. एकदा धुरळा उडविला की तो खाली बसायला वेळ लागतो. तोपर्यंत आपले काम होऊन गेलेले असते. एवढे होऊन सुद्धा खांग्रेसला गुजरात जिंकता आले नाही. आता सर्वोच्च न्यायालयानेच निकाल दिला आहे की लोयांचा मृत्यु पूर्ण नैसर्गिक असून त्यात काहीही संशयास्पद नाही. या निकालाने निधर्मांध व खांग्रेसी यांना एक जोरदार थोबाडीत बसली आहे. अर्थात ते अत्यंत निर्लज्ज असल्याने ते गप्प न राहता असेच नवीन खोटे प्रकरण उभे करून धुरळा उडविणार हे नक्की कारण पुढील १२ महिन्यात अनेक निवडणुका आहेत. https://www.loksatta.com/maharashtra-news/judge-loya-death-case-supreme… अर्थात आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे संघाचे स्वयंसेवक आहेत असा नवीन आरोप सुरू होईल यात शंका नाही.

In reply to by श्रीगुरुजी

लोयांच्या कुटुंबियांनाही यात गोवण्यात आले.
ह्यात सर्वात शहाणी लोयाची गधडी बहीण. आता बहीणीची माया आंधळीच ! पण किती फायदा घ्यावा? ती म्हणाली ज. लोयांच्या शवावर रक्ताचे एक दोन डाग होते. हार्ट अ‍ॅटॅक आला तर डाग कसे??? म्हणून मला काहीतरी काळंबेरं असल्याची शंका होतीच. अगं बये, पोस्ट मार्टमच्या वेळी असे डाग पडतात! पण तिला तेवढ्या एका मुद्द्द्यावर ब्लॅकमेल केलं गेलं. कितीतरी मुलाखती घेतल्या तिच्या. शेकडो डावे पत्रकार! हे काँग्रेसवाले नेहमी कोण्यातरी मूर्खाला हाताशी धरून डाव आखतात. तो ही खोटा. डजन्ट इंप्रेस.

In reply to by बिटाकाका

+1 तुम्हाला माहिती नसेल कदाचित पण मागे एकदा तर्राट जोकर नामक सदस्याने गुरुजींच्या Profession चा कंपलिट बायोडेटा दिला होता. (असले वागणं पटले नव्हते मला हे आधी स्पष्ट करतो) तो प्रतिसाद पण उडाला आणि बहुतेक तो सदस्य ही...

In reply to by विशुमित

"त जो" यांनी एका स्त्री सदस्याला आपला जन्म बलात्कारातून झाला असे अपशब्द खरडवहीत वापरले होते. त्यावरून त्यांचे सदस्यत्व रद्द केले गेले होते असे आठवते.

In reply to by arunjoshi123

ते नवाब भाई म्हणतात डॉक्टरची नार्को घेतली पाहिजे. तो सुधीर भाऊ चा जवळचा नातेवाईक आहे. आणि रिपोर्ट मधे फेरबदल करतो असा त्याच्या विद्यार्थ्यांने आरोप केला आहे. (अर्थातच पैसै घेऊन करत असणार फेरबदल ) भावड्या तुला काय वाटतं त्या गधड्याबद्दल?? https://www.loksatta.com/maharashtra-news/judge-loya-death-case-ncp-lea…