Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by तुषार काळभोर on Fri, 07/23/2021 - 16:32
नमस्कार, https://upload.wikimedia.org/wikipedia/en/1/1d/2020_Summer_Olympics_logo_new.svg दर चार वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा होतात, आपण दरवर्षी एक मोठ्ठा संघ पाठवतो. आणि दोन-चार पदके कमावतो. १९९६ मध्ये लिअँडर पेसने टेनिस पुरुष एकेरी मध्ये कांस्य जिंकलं आणि खूप वर्षांचा पदकांचा आणि खूप दशकांचा वैयक्तिक पदकांचा दुष्काळ संपवला. त्यानंतर दरवर्षी वैयक्तिक पदके १-२-३-४ मिळत आहेत. २०१६ रियो ऑलिम्पिक : एक रजत, एक कांस्य २०१२ लंडन ऑलिम्पिक : दोन रजत, चार कांस्य २००८ बिजिंग ऑलिम्पिक : एक सुवर्ण, दोन कांस्य २००४ अथेन्स ऑलिम्पिक : एक रजत २००० सिडनी ऑलिम्पिक : एक कांस्य असा या शतकातील प्रवास आहे. यंदा देखील मोठा संघ, मोठा सपोर्ट स्टाफ, मोठ्या आशा आणि अपेक्षासह भारताच्या ऑलिम्पिक प्रवासाला सुरुवात होत आहे. मिपाचे लोकप्रिय क्रीडा लेखक जे पी मॉर्गन यांनी गार्‍हाणं मांडून शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर स्पर्धेचे अपडेट्स, विशेष बातम्या आणि अर्थातच भारतीय खेळाडूंचा सहभाग असलेल्या स्पर्धांविषयी येथे चर्चा करुयात.
  • Log in or register to post comments
  • 54899 views

प्रतिक्रिया

Submitted by रात्रीचे चांदणे on Wed, 08/04/2021 - 14:58

Permalink

रवी कुमार अंतिम फेरीमध्ये

रवी कुमार अंतिम फेरीमध्ये म्हणजे सिल्व्हर पदक तरी पक्के.
  • Log in or register to post comments

Submitted by shashu on Wed, 08/04/2021 - 14:59

Permalink

रवीकुमार २-९ ने पिछाडीवर असून

रवीकुमार २-९ ने पिछाडीवर असून सुद्धा हार न मानता एका पकडीत खेळ खल्लास करून टाकला.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 08/04/2021 - 15:04

Permalink

चौथे पदक नक्की झाले. रवी

चौथे पदक नक्की झाले. रवी कुमार दहियाचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Wed, 08/04/2021 - 15:20

Permalink

पैलवान रविकुमार

पैलवान रविकुमार.... अभिनंदन!! सुवर्णपदक जिंकण्यासाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Wed, 08/04/2021 - 15:40

Permalink

विजय पुनिया

उपांत्य फेरीत पराभूत झाला असला तरी अजून कांस्य पदकाची आशा आहे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 08/04/2021 - 16:22

Permalink

महिला हॉकी

३० मिनिटांचा खेळ बाकी. १ -१ अशी बरोबरी आहे, आक्रमक खेळ आणि बचाव उत्तम आहे त्यामुळे सामना जिंकू असे वाटत आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 08/04/2021 - 16:49

In reply to महिला हॉकी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

शेवटचा धक्का ?

शेवटची १५ मिनिट बाकी आहेत. अर्जेंटीना २ -१ ने पुढे आहेत. आता काही वेगवान खेळी करून पेनल्टी कॉर्नर मिळाले तर गोल होतील वाढतील. चमत्कारी खेळ व्हावा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 08/04/2021 - 17:08

In reply to शेवटचा धक्का ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

अंतिम निकाल

अर्जेंटीना २ भारत १ आता कास्य पदकासाठी जिंकू किंवा मरू....! शुभेच्छा.! -दिलीप बिरुटे (निराश)
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on गुरुवार, 08/05/2021 - 06:12

Permalink

दिवस १३ : ५ ऑगस्ट

काल रविकुमार आणि दीपक पुनिया यांनी बाद फेऱ्यात धडक मारून दिवस गाजवला. आजचा दिवस सुद्धा बराच इव्हेंटफुल्ल आहे. एक सुवर्ण किंवा रजत पदक दोन कांस्य पदके गोल्फ आणि महिला कुस्ती मध्ये पुढे जायचो चांगली संधी. १. गोल्फ महिला दुसरी फेरी अदिती अशोक कालच्या दुसऱ्या स्थानावरून सुरुवात करेल. हे एक सुखद, अनपेक्षित, सरप्राइज आहे. दिक्षा ५५व्या स्थानी असल्याने फक्त कामगिरी उंचावता येईल का ते पाहावं लागेल. २. हॉकी पुरुष कांस्य पदक सामना भारत विरुद्ध जर्मनी ३. कुस्ती महिला फ्री स्टाईल ५७ किलो (दुसरी संधी) अंशू विरुद्ध रशिया ४. कुस्ती महिला फ्री स्टाईल ५७ किलो (उप उपांत्यपूर्व फेरी) विनेश फोगाट विरुद्ध स्वीडन ५. २० किमी चालणे : पुरुष अंतिम फेरी संदीप कुमार राहुल इरफान थोडी ६. कुस्ती पुरुष फ्री स्टाईल ५७ किलो अंतिम सामना रवी कुमार विरुद्ध रशियाचा Zavur Uguev ७. कुस्ती पुरुष फ्री स्टाईल ८३ किलो कांस्य पदक सामना दीपक पुनिया
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on गुरुवार, 08/05/2021 - 06:15

Permalink

पदक तालिका

१. चीन ३२-२२-१६ एकूण ७० २. अमेरिका २५-३१-२३ एकूण ७९ ३. जपान २१-७-१२ एकूण ४० . . . ६५. भारत ०-१-२ एकूण ३
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत अवलिया on गुरुवार, 08/05/2021 - 06:42

In reply to पदक तालिका by तुषार काळभोर

Permalink

एका सुवर्णपदकाची नितांत गरज

एका सुवर्णपदकाची नितांत गरज आहे आपल्याला. पदकतालिकेत बर्यापैकी वर येईल भारत सुवर्णपदक मिळाल्यास.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on गुरुवार, 08/05/2021 - 06:44

In reply to एका सुवर्णपदकाची नितांत गरज by अभिजीत अवलिया

Permalink

एका सुवर्णपदकाची नितांत गरज आहे आपल्याला.

१-१-२ = ४५ क्रमांक (सध्या)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 08/05/2021 - 08:48

Permalink

भारताने जर्मनीला ५-४ हरवून

भारताने जर्मनीला ५-४ हरवून पुरूष हॉकीत कास्यपदक जिंकले.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 08/05/2021 - 08:52

Permalink

४१ वर्षांनंतर भारतीय पुरूष

४१ वर्षांनंतर भारतीय पुरूष संघाने ऑलिम्पिक हॉकी स्पर्धेत पदक जिंकले.
  • Log in or register to post comments

Submitted by shashu on गुरुवार, 08/05/2021 - 13:24

Permalink

Men's 20km walk : संदीप कुमार दुसऱ्या स्थानावर.

Men's 20km walk ४ KM नंतर संदीप कुमार दुसऱ्या स्थानावर. एक इशारा मिळाला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on गुरुवार, 08/05/2021 - 16:52

Permalink

निकाल

१. गोल्फ महिला दुसरी फेरी अदिती अशोक दुसऱ्या स्थानी, उद्या तिसरी फेरी होईल. २. हॉकी पुरुष कांस्य पदक सामना भारत विजयी विरुद्ध जर्मनी भारताला कांस्य पदक ३. कुस्ती महिला फ्री स्टाईल ५७ किलो (दुसरी संधी) अंशू पराभूत विरुद्ध रशिया ४. कुस्ती महिला फ्री स्टाईल ५७ किलो (उप उपांत्यपूर्व फेरी) विनेश फोगाट विजयी विरुद्ध स्वीडन उपांत्यपूर्व फेरी पराभूत विरुद्ध बेलारूस ५. २० किमी चालणे : पुरुष अंतिम फेरी संदीप कुमार २३ राहुल ४७ इरफान थोडी ५१ ६. कुस्ती पुरुष फ्री स्टाईल ५७ किलो अंतिम सामना रवी कुमार पराभूत विरुद्ध रशियाचा Zavur Uguev रौप्य पदक
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 08/05/2021 - 16:46

Permalink

रवी कुमार दहियाला रौप्य पदक

रवी कुमार दहियाला रौप्य पदक मिळाले.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on गुरुवार, 08/05/2021 - 19:10

Permalink

७. कुस्ती पुरुष फ्री स्टाईल ८३ किलो कांस्य पदक सामना दीपक पुनिया

७. कुस्ती पुरुष फ्री स्टाईल ८३ किलो कांस्य पदक सामना दीपक पुनिया पराभूत विरूद्ध सॅन मरिनो
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Fri, 08/06/2021 - 11:24

Permalink

दिवस १४ : ६ ऑगस्ट

१. चालणे पुरुष ५० किमी अंतिम फेरी गुरुप्रीत सिंग २. गोल्फ महिला तिसरी फेरी अदिती अशोक दुसऱ्या तर दिक्षा ५३व्या स्थानावरून पुढे सुरू ठेवतील. ३. हॉकी महिला कांस्य पदक सामना भारत विरुद्ध ग्रेट ब्रिटन ४. कुस्ती महिला फ्री स्टाईल ५० किलो उप उपांत्यपूर्व फेरी सीमा विरुद्ध ट्यूनिशिया ५. कुस्ती पुरुष फ्री स्टाईल ६५ किलो उप उपांत्यपूर्व सामना बजरंग पुनिया विरुद्ध किर्गिजस्थान ६. २० किमी चालणे महिला अंतिम फेरी भावना जाट प्रियांका ७. १००*४ रिले शर्यत पुरूष पहिली फेरी अमोज जेकब नागनाथन पंडी अरोकिया राजीव Noah Tom मुहम्मद याहिया असा संघ आहे
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Fri, 08/06/2021 - 09:13

Permalink

महिला हॉकी स्पर्धेत

महिला हॉकी स्पर्धेत ब्रिटनविरूद्ध भारताचा ३-४ असा पराभव झाला.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Fri, 08/06/2021 - 11:07

In reply to महिला हॉकी स्पर्धेत by श्रीगुरुजी

Permalink

उत्कंठावर्धक सामना होता

चौथा राऊंड सुरू होईपर्यंत ३-३ बरोबरी होती. चौथ्या राऊंड मध्ये दोन मिनिटांत ब्रिटन ला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि तो तीनदा रिपीट होऊन शेवटी त्यांनी गोल केला. हा चौथा गोलच निर्णायक ठरला. 7 मिनिटे शिल्लक असताना भारताला सुद्धा एक पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण त्याचं गोलमध्ये रूपांतर करता आलं नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Fri, 08/06/2021 - 10:46

Permalink

चालणे पुरुष ५० किमी अंतिम फेरी

गुरुप्रीत सिंग शर्यत पूर्ण करू शकला नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by रात्रीचे चांदणे on Fri, 08/06/2021 - 11:13

Permalink

बजरंग पुनिया कुस्तीचे सलग दोन

बजरंग पुनिया कुस्तीचे सलग दोन सामने जिंकून सेमी फायनल मध्ये दाखल. सेमी फायनल जिंकली तर अजून एक पदक पक्के होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Fri, 08/06/2021 - 11:21

Permalink

गोल्फ महिला तिसरी फेरी

गोल्फ महिला तिसरी फेरी अदिती अशोक दुसऱ्या तर दिक्षा ५१व्या स्थानावर आहेत. उद्या चौथी आणि शेवटची फेरी आहे. अदितीने सुरुवातीपासून दुसरे स्थान पक्के केले आहे. त्यामुळे आता पदकाची आशा पल्लवित झाली आहे :)
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Fri, 08/06/2021 - 16:50

Permalink

आजचे एकूण निकाल

१. चालणे पुरुष ५० किमी अंतिम फेरी गुरुप्रीत सिंग शर्यत पूर्ण करू शकला नाही. २. गोल्फ महिला तिसरी फेरी अदिती अशोक दुसऱ्या तर दिक्षा ५२व्या स्थानी आहेत. उद्या चौथी आणि अंतिम फेरी आहे. पहिल्या फेरीपासून तिसर्‍या फेरीपर्यंत अदिती दुसर्‍या स्थानी कायम आहे. उद्या हे एक सुखद सरप्राईज होऊ शकते! ३. हॉकी महिला कांस्य पदक सामना भारत पराभूत विरुद्ध ग्रेट ब्रिटन ४. कुस्ती महिला फ्री स्टाईल ५० किलो उप उपांत्यपूर्व फेरी सीमा पराभूत विरुद्ध ट्यूनिशिया ५. कुस्ती पुरुष फ्री स्टाईल ६५ किलो उप उपांत्यपूर्व सामना बजरंग पुनिया विजयी विरुद्ध किर्गिजस्थान उपांत्यपूर्व सामना विजयी विरुद्ध इराण उपांत्य सामना पराभूत विरुद्ध अझरबैजान कांस्य पदकासाठी सामन्यात एक संधी अजून आहे. ६. २० किमी चालणे महिला अंतिम फेरी भावना जाट ३२ प्रियांका १७ ७. १००*४ रिले शर्यत पुरूष पहिली फेरी अमोज जेकब नागनाथन पंडी अरोकिया राजीव Noah Tom मुहम्मद याहिया असा संघ आहे
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sat, 08/07/2021 - 10:32

Permalink

गोल्फ स्पर्धेत अदिती अशोक

गोल्फ स्पर्धेत अदिती अशोक चौथी आल्याने पदक हुकले.
  • Log in or register to post comments
Profile picture for user नावातकायआहे

Submitted by नावातकायआहे on Sat, 08/07/2021 - 16:25

Permalink

बजरंग पुनिया विजयी ८-०! अस

बजरंग पुनिया विजयी ८-०! अस उपांत्य फेरीत का नाही खेळला काय माहित....
  • Log in or register to post comments

Submitted by रात्रीचे चांदणे on Sat, 08/07/2021 - 16:25

Permalink

बजरंग पुनियला कांस्य पदक.

बजरंग पुनियला कांस्य पदक. भारताच्या खात्यात एकूण 6 पदके.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Sat, 08/07/2021 - 17:31

Permalink

पुरुष भाला फेक अंतिम सामना

नीरज चोप्रा!! भारताला athletics मध्ये पहिलं पदक!! Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत अवलिया on Sat, 08/07/2021 - 17:45

Permalink

अभिनंदन नीरज सुवर्णपदकाबद्दल.

अभिनंदन नीरज सुवर्णपदकाबद्दल.
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Sat, 08/07/2021 - 17:47

Permalink

अभिनंदन नीरज सर!! __/\__

अभिनंदन नीरज सर!! __/\__
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Sat, 08/07/2021 - 17:47

Permalink

अभिनंदन नीरज सर!! __/\__

अभिनंदन नीरज सर!! __/\__
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Sat, 08/07/2021 - 17:56

Permalink

भारत ४७-१-२-४-७

एक सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य पदकांसहित भारत ४७व्या स्थानी. हा भारताचा शेवटचा सामना होता. भारतासाठी आतापर्यंत सर्वाधिक यशस्वी स्पर्धा. एका दिवसात एक सुवर्ण आणि एक कांस्य पदक जिंकून कदाचित आजचा दिवस सर्वाधिक यशस्वी दिवस. मेरी कोम, महिला हॉकी संघ, दीपक पुनिया आणि अदिती अशोक यांची पदके हुकली.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sat, 08/07/2021 - 17:56

Permalink

Hats off to Neeraj Chopra!

Hats off to Neeraj Chopra!
  • Log in or register to post comments

Submitted by Bhakti on Sat, 08/07/2021 - 17:58

Permalink

आणि गोल्ड

आणि गोल्ड भाला फेक :) अभिनंदन!
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sat, 08/07/2021 - 18:29

Permalink

नीरज, अभिनंदन!

नीरज, अभिनंदन!
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 08/07/2021 - 22:31

Permalink

*** जय हो ***

Image removed. आर्मी मॅन ते गोल्ड मॅन... सुभेदार नीरज चोप्राच्या विजयानंतर लष्करप्रमुखांचं ट्विट #Proud General MM Naravane #COAS and All Ranks of #IndianArmy congratulate Subedar Neeraj Chopra on winning Nation’s first ever #GoldMedal in #Javelin in Olympics with a throw of 87.58 meters at #TokyoOlympics. #MissionOlympics #Tokyo2020 Will be an honour to gift XUV700 to 'Golden Athlete' Neeraj Chopra: Anand Mahindra Haryana CM ML Khattar Announces Rs 6 Cr Cash Reward, Govt Job For Neeraj Chopra Manipur Govt Honours Neeraj Chopra With Rs 1 Crore For Winning Gold In Tokyo Olympics CSK announces Rs 1 crore award, jersey No. 8758 in Chopra's honour

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Jai Ho Slumdog Millionaire (Full Song)
  • Log in or register to post comments

Submitted by गॉडजिला on Sat, 08/07/2021 - 22:36

Permalink

आहा

नीरज साहेब मज्या असली अत्यंत कौतुकास्पद अन उत्साहदायक गोल्ड... किप इट ऑन.... _/\_
  • Log in or register to post comments

Submitted by सौंदाळा on Mon, 08/09/2021 - 09:27

Permalink

धन्यवाद

धाग्यावर भारताचे रोजचे सामने, ओलिम्पिकमधले इतर महत्वाचे अपडेट्स खूपच छान मिळत होते. तुषार काळभोर यांना धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by रात्रीचे चांदणे on Mon, 08/09/2021 - 09:57

Permalink

तुषार काळभोर, तुम्ही हा धागा

तुषार काळभोर, तुम्ही हा धागा काढून वेळोवेळी update केल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by गॉडजिला on Fri, 09/03/2021 - 11:41

Permalink

Paralympic मधे देखील भारत

Paralympic मधे देखील भारत चांगली कामगिरी करत आहे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com