Skip to main content

हिंदू कधी एकत्र येणार?

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 20/06/2021 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
रेफरन्स: राजा शिवछत्रपती, लेखक, बाबासाहेब पुरंदरे (पान क्रमांक, 54,55,56) गाभा एक आणि गोष्टी अनेक, आदिलशहाचा दरबार संपला. सरदार आणि शिलेदार मंडळी बाहेर पडत होती. नेमके त्याच गडबडीत, खंडागळे यांचा हत्ती पिसाळला आणि हत्तीला आवर घालायला, छत्रपती शिवाजी महाराज यांचे मामा पुढे सरसावले, तर हत्तीचे रक्षण करायला छत्रपती शिवाजी महाराज यांचे चुलत काका पुढे सरसावले... पुढे झालेल्या धुमश्र्चक्रीत, जाधव आणि भोसले घराण्यातील कर्ती मंडळी बळी पडली... ह्याच्या पण आधी, सिकंदरला साथ देणारे हिंदूच होते.मागच्या आठवड्यात देखील, शिवसेना भवन येथे हीच घटना घडली ... गेल्या अडीच हजार वर्षांपुर्वी जे होत होते, तेच आजही होत आहे... हिंदू कधी एकत्र येणार?

वाचने 69629
प्रतिक्रिया 209

प्रतिक्रिया

बसुन त्यात ठरवु, कसे एकत्र आणायचे ते. फक्त सेना भाजप संबंधि बोलत असाल तर... त्याची शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

आदिलशाहीचा दरबार होता की विषय संपला. त्यापेक्षात्यांचे म्हणणे ऐका, मैत्री करा, कट्टे करा, चिल कराना भाऊ... कशाला वादविवाद करायचे आपापसात ?

हिंदू धर्मात राहून माझी आर्थिक उन्नती होत आहे. हिंदू धर्मात राहून मला समाजात संरक्षण मिळत आहे. हिंदू धर्मात राहिल्या मुळे माझ्या अडचणी च्या वेळी मदत मिळत आहे. असे वातावरण जेव्हा निर्माण होईल तेव्हा हिंदू एकत्र येतील ,त्यांच्यात दुरावा असणार नाही. भले त्यांची राजकीय मत वेगळी असली तरी.हिंदू हित हीच प्राथमिकता असेल.

मी काय म्हणतो, सर्वजण एकत्र येउन मानव धर्माचे पालन कसे करता येइल असा विचार केला तर बरे होइल का? धर्म ही आपली संकल्पना Religion च्या खूप वरच्या level ची आहे.

In reply to by तिता

तिता... हो अगदी करूयात ना पण एक समाज म्हणून बघितले जातेच कि मी भले मंदिरात जात नसेन.. कर्मकांडाला आणि अंधश्रेधला कडाडून विरोध करीत असें पण आवडो ना आवडो माझी ओळख समाजात " अमुक धर्माचा" मग जर उगाचच माझया "सामाजिक ओळखीवर " अन्याय होत असेल तर मी त्या धर्मासाठी उभा राहणारच .. किती उदाहरणे द्यायची ! आणि खास करून एकीकडे "सर्वधर्म समभाव " जप करणाऱ्यांना त्याची व्याख्या हि " सगळ्यांना पाहिजे ते नियम " अशी करावयाचा "शातीर " / चापलुसी करावीशी वाटते तेवहा. मंदिर गेला खड्यात . काह्ही फरक नाही ," शाळा आणि वयैद्यकीय उपचार हेच माझे मंदिर" असे असले तरी पण "मंदिर व्हावे" या भावनिक हक्क साठी मी भलावण करणारच ... मग भले "धर्मांध" म्हणून लेबल चिकटले तरी चालेल अगदी सगळेच एका धर्माचे असले तरी १२ मैलावर जर भासहा आणि पद्धती बदलत असणार तर तेढ होणार .. तेवहा अगदी मानवता वैगरे सगळे बरोबर असले तरी रोजचे प्रश्न आहेतच कि एक क्षण असे धरुयात कि देशात सगळे खाऊन पिऊन सुखी आहेत , रोग नाही पण तरी तेढ आणि भांडणे थांबतील का? निसर्ग नियम आहे

हिंदू ची व्याख्या ठरल्यावर एकत्र येतील . आधी हिंदू ची व्याख्या ठरवू या

In reply to by कपिलमुनी

जगातील सर्वात प्राचीन असलेला धर्म((संस्कृती) हिंदू आहे. जगातील कोणत्याच धर्मात झाले नाही त्याच्या पेक्षा किती जास्त आणि उत्तम दर्जा चे अनेक ग्रंथ हिंदू धर्मात आहेत. योगा ,तंत्व ज्ञान,आरोग्य,कामजीवन,जीवनाचे सार,सर्व काही हिंदू धर्मात आहे. आणि हिंदू हा असे सर्व विषयात ज्ञानदेणारा एकमेव धर्म आहे. जे हिंदू देवदेवता, मानतात,सर्व प्राचीन ज्ञान चा आदर करतात ते सर्व हिंदू.

In reply to by Rajesh188

जे हिंदू देवदेवता, मानतात,सर्व प्राचीन ज्ञान चा आदर करतात ते सर्व हिंदू.
हिंदूची लोकसंख्या एकहाती कमी करून टाकली की !

१९४८ साली हिंदुबांधवांनी आमच्या " तत्वनिष्ठ गांधीवादी" आजोबांचा वाडा जाळला आणि सणसणीत कानाखाली लाऊन गाढ झोपेतुन कोणीतरी जागं करावं तसं काहीसं झालं. त्याच दिवशी आमचा हिंदु धर्माशी असलेला संबंध संपला. आता हिंदु म्हणुन कोणाविषयी आत्मीयता वाटत नाही. त्यामुळे हिंदु म्हणुन एकत्र यायची गरज वाट्त नाही.

In reply to by मुक्त विहारि

पण आता जुन्या गोष्टी विसरून, एकाच झेंड्याखाली यायला लागणारच आहे...
आता तुम्ही कोणतातरी झेंडा हातात घ्यायचा आग्रहच करत असाल तर आमचा झेंडा आहे !! cpi Let the revolution begin !

In reply to by प्रसाद गोडबोले

बघूया लेखक मार्कसजींची यशस्वी मनधरणी कशी करतो ते.. लेखकाच्या स्टान्स वर हिंदू कसे एकत्र येऊ शकतात याचे भवितव्य दडलेले आहे आणि मिपाकट्ट्याला सदस्य एकत्र आणायचा अनुभव मुळातच पुरेसा गाठी असल्याने मुव्ही काका हे ही आव्हान लीलया पार करतील असा मला विश्वास वाटतो. रोचक धागा अन प्रतिसाद.

In reply to by मुक्त विहारि

आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा। माझिया सकला हरिच्या दासा।। १।। कल्पनेची बाधा न हो कोणे काळी। ही संत मंडळी सुखी असो।। २।। अहंकाराचा वारा न लागो राजसा। माझ्या विष्णुदासा भाविकांसी।। ३।। नामा म्हणे तया असावे कल्याण। ज्या मुखी निधान पांडुरंग।। ४।। नामदेवरायांची प्रार्थनापण किती गोड. ते काय मागतात तर हरिच्या दासांनी कल्पनेची बाधा, संशय पिशाच्छाचा संसर्ग आपल्या तन-मनाला होणार नाही याची दक्षता बाळगावी. या राजस आणि राजयोगी भाविकांना अहंकाराचा थोडाही वारा लागू नये. मनातील संशय हा देवाजवळ, सद्गुरूजवळ जाण्यापासून रोखतो, कारण संशय भ्रम वाढवतो आणि भ्रमामुळे दृष्टी अंध होते. अंधासमोर साक्षात परमेश्वर उभा असला तरी त्याला तो कसा दिसणार, शक्यच नाही. तद्वत संशय आत्मज्योतीला झाकोळून टाकतो. तीच गोष्ट अहंकाराची. एकदा का अहंकाराचा झंझावात सुटला की, भले-भले योगी तपस्वी यांचा संयम अंगावरील उपरण्याप्रमाणे उडून जातो. त्यामुळे संशय आणि अहंकार या दोन गोष्टीपासून तुम्ही दूर रहा, तर तुम्हाला हरिच्या कुळामध्ये चांगले स्थान लाभेल असे नामदेवरायांचे आश्वासन आहे

In reply to by प्रसाद गोडबोले

गडचिरोलीच्या जंगलातील दहशतवाद्यांचाही असाच झेंडा असतो ना?

In reply to by प्रसाद गोडबोले

हा झेंडा नक्कीच नको!

मुवी हे पहा : https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/in-fraud-case-famous… डी.एस.के झाले , आता परांजपेंचा नंबर ... चितळे गाडगीळ वगैरे लाईन मध्ये आहेत ! भांडारकर तो झांकी है, बालगंधर्व अभी बाकी है ! आता तुम्हीच ठरवा कोणता झेंडा घ्यायचा हातात ते =)))) अवांतर : बाकी इस्रायल मध्ये " गेर तोशाव" नावाची एक संकल्पना आहे , कधी वेळ मिळातर जरुर वाचा त्या विषयी !

In reply to by मुक्त विहारि

मेळवा मेळवा , आमच्या कडून शुभेच्छा ! इत्यलम ! लेखनसीमा ! _____________________________________________________________________________

In reply to by प्रसाद गोडबोले

अविनाश भोसलेंच्या घरावर पण ED ने छापा मारून 40 कोटीची मालमत्ता जप्त केली. चुकीचं वागला तर भरपाई करावीच लागणार, मग चितळे असो नाहीतर भोसले असो. भुजबळांना अटक झाल्यावर आपण OBC चे नेते आहोत म्हणूनच कारवाही झाली अशीच ओरड त्यांनी केली होती.

क्रूरपणाचा कळस! आधी फसवून लग्न, मग धर्मांतरासाठी बळजबरी आणि अल्पवयीन मुलीवर बलात्कार... https://www.loksatta.com/desh-videsh-news/up-man-marries-woman-after-fa… ------- हिंदू तितका मेळवावा ....

लोकसभेत ३०१ जागा त्या मुळे तर मिळाल्या. हिंदू नी एकत्र येवून हिंदुत्व वादी सरकार केंद्रात स्थापन केले ना. ५५.७४% मत bjp ला मिळाली आहेत. हिंदू नी एकत्र येवून त्यांची जबाबदारी पार पाडली आहे. आता सरकार नी हिंदू हिताचे निर्णय घेवून त्यांची जबाबदारी पार पाडावी.

In reply to by Rajesh188

आता सरकार नी हिंदू हिताचे निर्णय घेवून त्यांची जबाबदारी पार पाडावी. येथे आपण भाजपचं पाठीशी असलेल्या रा स्व संघाच्या विचारसरणीची थोडी ओळख करून घेणे अवयषयक आहे असे वाटते - त्याना देशाचे हित अभिप्रेत आहे "त्यात हिंदूंचे आपोआप येते" मग असे देशाचे हित हे भाजप कि काँग्रेस राखते याने संघाला फार फरक पडत नाही असे म्हणले जाते ( हंम रहे ना रहे भारत ये रहना चाहिये" या "मनकर्णिका " या चित्रपटातील गीत आणि त्याचा अर्थ आठवा ) - दूर पल्याचा विचार ( आणि तो तसा फारच दूर पाल्याचा आहे अस हि मतप्रवाह आहे संघाच्या पाठीराख्यात , "आधी जनमानसाची मने वळवू सत्ता महत्वाची नाही" हा एक विचार आणि दूसरा "सत्ता आधी मग कार्यक्रम राबवू आणि मग मने वळतील " असे हे अंतर्गत द्वंद्वव

आले का सर्व एकत्र ? कुठे भेटायचं वगैरे ठरलं का ?

काश्मीर: १८ वर्षीय मुलीचं जबरदस्ती धर्मांतर?; शीखांचं श्रीनगरमध्ये आंदोलन..... https://www.loksatta.com/desh-videsh-news/conversions-marriages-sikh-le… --------- शीख समुदाय लगेच एकत्र आला...

In reply to by मुक्त विहारि

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीनं कुटुंबियांनी केलेल्या आरोपांविरुद्ध भूमिका न्यायालयात मांडली. आपण स्वतःच्या मर्जीने विवाह केला असल्याचं तिने न्यायालयात सांगितलं ???

In reply to by मुक्त विहारि

ह्या बद्दल सतत मुस्लिमद्वेष्टा टिव्हीटीवाट करणाऱ्या ट्विटर आयडीने आपला भंपक पणा उघड झाल्यावर वक्तव्ये बदलली. मुलीचे वय १८ नव्हते, २६ होते. जबरदस्ती धर्मांतर झाल्याचे पोलिसांनी सुद्धा फेटाळले आहे. तरी त्या मुलीचे लग्न दुसऱ्या शीख व्यक्तीशी लावण्यात आले. https://www.thequint.com/amp/story/news/india/jk-sikhs?__twitter_impres…

In reply to by कॉमी

तुम्हाला व मुविकांकाना मी निर्मळ मनाचे माझे चांगले मित्रच मानतो त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन कोणीतरी त्यांना मेनूपुलेट केल्यानेच त्यांनी घाईघाईत शहानिशा न करता प्रतिसाद दिला असावा ??? आपण तिघेही एक कट्टा करू व ज्यात कॉफी आणि मद्याची रेलचेल ठेवू अन गप्पागोष्टी करू ज्यावर मी इथे एक फोटो सकट धागाही काढेन असे मी आता सुचवतो.. काय म्हणता मित्राहो?

In reply to by गॉडजिला

जरूर ! जुलै नंतर कधीपण तयार. मुविकाकांची यात चूक नाही आहे, ज्यांनी ही बातमी खोटे बोलून पसरवली त्यांची चूक आहे. शहानिशा करणे त्या पॉइंटला मुवींच्या पण हातात नव्हते. त्यापुढे ते तरी काय करणार ? त्यांनी वाचलं आणि टाकलं. शेवटचं वाक्य वाचायचं राहिलं असेल कदाचित. आपल्या मताशी जुळणारी घटना झाली की एकंदर चित्राच्या विरोधात जाणाऱ्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष भल्याभल्यांचे होते (Including me.)

In reply to by कॉमी

शहानिशा करणे त्या पॉइंटला मुवींच्या पण हातात नव्हते. त्यापुढे ते तरी काय करणार ?
हम्म खरं आहे... आपण यासाठी मुविना दोष दिला नाही पाहिजे तसेच मिपाचे अथवा भारताच्या धोरणात अफवा पसरवणे अथवा शहानिशा न करता नेटवर बातमी पेरणे अक्षम्य गुन्हा जरी ठरू शकत असेल तरीही मूवी काका नी त्यांचे विधान करताना क्वेश्चन मार्कचा खुबीने वापर केल्यामुळे ते कोणत्याही कायद्यात सकृतदर्शनी चूक ठरणार नसावेत.

In reply to by मुक्त विहारि

हिन्दुस्तान टाईम्स. सोमालीयन रेफुजी होता आणि त्याला मानसोपचार चालू होता. https://www.hindustantimes.com/world-news/germany-three-dead-several-in…

In reply to by नावातकायआहे

द हिंदू, इंडिया टुडे इथे पण आली आहे बातमी. पण गुगल सर्च करणे हा गुड फेथ मार्ग वापरतील तर ते मुक्त विहारी कसले ! मुक्तपणे दाणकन मिपावरच येणार ते :)), आणि बॅड फेथने असे सुचवतील कि ही बातमी कोणत्याच पेपरात आली नाही.

In reply to by कॉमी

तसे ते मनाने अत्यन्त निर्मळ व सरवांचेच चांगले मित्रही आहेत. पूर्वी ते मिपाकर जोडण्यात पुढे होते असे त्यांचे धागे व प्रतिसाद वाचून दिसते आहे सध्या त्यांनी थोडा व्यापक उपक्रम हाती घेतला आहे आणि तो म्हणजे हिंदूना त्यांचे क्षात्रतेज परत मिळवून देणे, जागृती करणे हे हि त्यांचे रिसेंट प्रतिसाद वाचूनच समजून येते आहे आणि मिपाकर म्हणून त्यांच्या या उद्योगाचा आपण अर्थातच मान राखणे आवश्यक आहे... कारण शेवटी ते जोडायचे काम करायचा प्रयत्न करतात लोकांना विभागायचा नाही... त्यामुळे त्यांच्या योग्य त्या सर्व कृतींना पाठिंबा होता व पुढेही राहील आणि इतरांनी हीच कृती अनुसरावी ही माझीही वैयक्तिक अपेक्षा आहे

In reply to by नावातकायआहे

छापील बातमी येऊनही, आपल्या देशातील, मानवाधिकारवाल्यांनी काही टिप्पणी केली नाही... ---------- मानसोपचारांची मदत ऐनवेळी लागतेच..... https://youtu.be/2FmWzeUGV8c

आताच एक लोकसत्ता मध्ये बातमी वाचली.भारतात सर्वात जास्त धर्मांतर हिंदू धर्मातून होत आहे. धर्मांतर करणारे अनुसूचित जाती आणि जमाती मधील लोक जास्त आहेत. ओबीसी मधील पण लोक आहेत. धर्मांतर करण्याचे महत्वाचे कारण हिंदू धर्मात त्यांना भेदभाव ला समोर जावे लागते. म्हणजे हे धर्मांतर होण्याला हिंदू पण जबाबदार आहे. सर्वात जास्त हिंदू Christan धर्मात जात आहेत. दक्षिण भारत हे प्रकार जास्त घडतात. पण तरी सुद्धा हिंदू च्या एकूण लोकसंख्येत जास्त फरक पडलेला नाही ,आणि पडणार पन नाही. अगदी आणीबाणी ची स्थिती नाही.

In reply to by Rajesh188

पण तरी सुद्धा हिंदू च्या एकूण लोकसंख्येत जास्त फरक पडलेला नाही ,आणि पडणार पन नाही. अगदी आणीबाणी ची स्थिती नाही.
टक्का इतरांचा वाढतो आहे की नाही याचा अभ्यास आपण ऑप्शनला टा़कला असावा ?

In reply to by गॉडजिला

त्या वाढत्या टक्क्यावरून काय निर्णय घ्यावा ? (असाच प्रश्न विचारला आहे. मला व्यक्तिष: फारशी माहिती नाही. S.Y.QURESHI (पूर्व EC अध्यक्ष) यांचे या विषयावरचे सरकारी डेटावर आधारित पुस्तक लाईन अप करून ठेवले आहे.)

In reply to by कॉमी

त्या वाढत्या टक्क्यावरून काय निर्णय घ्यावा ?
हाच कि ज्याला कमी टक्के मिळतात त्याचा नंबर खालचा असतो. त्यामुळे आपला टक्का वाढो न वाढो इतरांचा तो वाढत असेल तर एक दिवस तुम्हाला तो मागे टाकेल ही काळ्या दगडावरील रेघ

In reply to by गॉडजिला

इथे ते खरे नाहीये. तो पॉईंट येणार नाही. Fear-Mongering. तात्पुरते हे वाचा, पॉप्युलेशन मिथ वाचून सविस्तर लिहिणार आहे. https://www.livemint.com/Opinion/5bsICkXvl4t4hXSewk8bkN/Four-out-of-fiv…

In reply to by कॉमी

एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात 60-70 वर्षाचा काळ म्हणजे फार मोठा आहे परंतु देशासाठी 60-70 वर्ष म्हणजे काहीच नाही. त्यामुळे तुम्ही जे पॉप्युलेशन मिथ वरती सविस्तर लिहिणार आहेत त्यासाठी पुढच्या 300 -400 वर्षात जर अशीच लोकसंख्या वाढ होणार असेल तर काय होईल ह्याबद्दल लिहिले तर बरं होईल. वरच्या लेखा मध्ये पुढील 60 -70 वर्षे नंतर काय होईल हेच लिहिले आहे. परंतु भारता सारख्या देशासाठी हा काही मोठा कालखंड नाही.

In reply to by कॉमी

दुर्लक्ष नाही झालं, परंतु ह्यात काय चुकीचं आहे असं वाटतं नाही. मुळात मुस्लिम लोकसंख्या वाढ ही हिंदू लोकसंख्या वाढी पेक्षा भरपूर जास्त होती आणि अजूनही आहे. जो काही लोकसंख्या वाढीचा दर कमी झाला आहे तो फक्त 2001 ते 2011पुरताच आहे. 1991 ते 2001 व 1981 ते 1991 मध्ये तो हिंदू लोकसंख्या वाढीच्या दरा पेक्षा जास्तच होता.

In reply to by रात्रीचे चांदणे

ट्रेंड महत्वाचा नाहीये का ? फॅमिली प्लॅनिंग हळू हळू वाढणे आणि लोकसंख्या वाढदर हळू हळू कमी होत जाणे हे बदल ट्रेंडच्या रुपात दिसत आहेत. मुद्दा हा कि आत्ता उपलब्ध माहितीनुसार मुस्लिम लोकसंख्या हिंदूंपेक्षा जास्त होईल ही हिंदुत्ववाद्यांच्या डोक्यातली आणि पसरवलेली हॉरर-फँटसी कल्पना आहे. त्याला माहितीच्या जोरावर शून्य आधार आहे. हिंदू-मुस्लिम लोकसंख्या वाढदरातला फरक घटतानाच दिसला आहे.

In reply to by कॉमी

पॉप्युलेशन मिथ वाचून सविस्तर लिहिणार आहे.
सविस्तर लिहाच, अवश्य चर्चा करू लेखातील काही मुद्दे पटले नाहीत तेंव्हा एक धागा काढावा यावर आपण अवश्य चर्चा करूया... धन्यवाद कॉमी एक चांगला विषय चर्चेला येऊदे

In reply to by Rajesh188

भारतात सर्वात जास्त धर्मांतर हिंदू धर्मातून होत आहे.
ह्यात वाईट काय आहे हे मला कळत नाही. लोकं धर्मांतर करुन जीवनमान सुधारेल ह्या आशेने अन्य धर्मात जात असतील तर त्यात चूक काय ? उलट जितके जास्त लोकं हिंदु धर्म सोडून अन्य धर्मात जातील तितकेच हिंदु धर्मासाठी उत्तम असेल . मंदिरात असणारी गर्दी कमी होईल , भोंदु बाबा महाराजांचा रेव्हेन्यु घटल्याने त्यांचा धंदा बसेल , सण समारंभ उत्सव साजरे करण्याच्या नावाने सार्वजनिक ठिकाणी चालणारा उन्माद , रस्त्यात फटाके ऊडवणे, खड्डे खोदुन मांडव घालणे, , कमी होईल . आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे - ज्या लोकांचा मुळातच हिंदु धर्मावर विश्वास नाही, त्यातील परंपरांचा अभिमान नाही, त्यातील तत्वज्ञानाविषयी आदर नाही , असे लोकं धर्मात राहुन काय उपयोग , उलट अशा लोकांनी धर्मांतर केले तर उर्वरित हिंदु धर्म हा जास्त चांगला असेल ह्यात शंका नाही !

In reply to by प्रसाद गोडबोले

भलतेच लोक हिंदू धर्म सोडत आहेत हा असावा ? जे लोक हिंदुत्व सोडल्याने हिंदूंचे कल्याण होईल ते अजून हिंदुत्व सोडतच नसावेत ?

ह्याला दोषी कोण? ह्या प्रश्नांचे उत्तर शोधणे गरजेचे आहे.रोगाचे मूळ माहीत पडले तर च उपाय करता येतील. पण अतिशय दुर्दैव नी हे सत्य आहे अजुन हिंदू धर्म जाती पाती मध्ये विभागला गेलेला आहे. महाराष्ट्रात अनेक महापुरुषांनी,संतांनी ,समज सुधारक लोकांनी जन्म घेतल्या मुळे जाती जाती मध्ये संघर्ष होत नाही .पण जातीभेद अजुन आहे. रोटी, बेटी व्यवहार हिंदू मध्ये जाती च्या पलीकडे जावून होणे गरजेचे आहे. उत्तर भारतात अजून पण जाती भेदाच्या भिंती मजबुत आहेत त्या अजुन ठिसूळ होणे गरजेचे आहे. पण हिंदू राजकारणी च तसे होवून देत नाहीत. आरक्षण चे गाजर सर्व जाती ना दाखवून संघर्ष निर्माण झाला पाहिजे हीच त्यांची रण निती आहे. कसा होणार हिंदू एक?

In reply to by Rajesh188

आरक्षण चे गाजर सर्व जाती ना दाखवून संघर्ष निर्माण झाला पाहिजे हीच त्यांची रण निती आहे. "ते" राजकारणी म्हणजे नक्की कोण बारामती कि नागपूर ? टीका करायाची तर सगळ्यांवर करा ना का फक्त नागपूर वाले जातीभेद करतात ( तरी बरं मोदी, शाह आणि योगी "जनेउधारी" नाहीत ) मग बारामती चे "जाणते राजे " कडून जागीर सभेत "पगडी नको पागोटे" असले चाळे होतात त्याच काय? का त्याच्याकडे सुमडीत कानाडोळा ! हिंदू धर्म जाती पाती मध्ये विभागला गेलेला आहे. हेच उगाळत राहायचं आणि म्हणून "हिंदू एकत्र व्हावा " या प्रयातनांना असा धोशा लावून एक प्रकारचा छुपा विरोध करावयाचा !

.ह्यात वाईट काय आहे हे मला कळत नाही. जर हे असेच होत राहील तर भारतात एक दिवस मुस्लिम कायदा लागू होईल, 1990 साली जी परिस्तिथी काश्मीर मधील उरलेल्या हिंदूंवर आली तीच इतर राज्यातील हिंदूंवर होईल.

In reply to by रात्रीचे चांदणे

भाऊ तोरसेकरांचे एक तर्क म्हणून विचार करण्यासारखे विधान https://www.youtube.com/watch?v=Io3pf7z7diA&t=84s हिंदू एकत्रित नसल्यमुळे फार मोठया संख्येने एकदम हिंदूंचे धर्मांतर होणे अवघड आहे म्हणजे असे कि ज्याला हिंदूंना मोठ्याप्रमाणात धर्मांतर घडवून आणण्याचे आहे त्याने अगदी शंकराचार्यांना जरी धर्मांतराला राजी केलं तरी याचा अर्थ हिंदू सगळे खाली मान घालून त्यान्चा मागे जातील असे नाही !

जसे मानव प्रगत होतील धर्म कमजोर होत जातील . पुढे जास्त वर्ष धर्म टिकणार नाहीत. पण प्राचीन ज्ञान ,संस्कृती,आहार,विहार हे धार्मिक कारणाने तो पर्यंत नष्ट झाले नाही पाहिजेत.तो मानवाच्या प्रगती ची इतिहास आहे.

हे महाभारत मध्ये आहे सर्व श्रेष्ठ धनुर्धर , दाणी व्यक्ती का . सूत पुत्र म्हणून हीनवून त्याचा अपमान करणाऱ्या हिंदू धर्मात धर्मांतर का नाही होणार. अजुन पण ती चूक सुधारली जात नाही टिप. मी मागासवर्गीय नाही हिंदू धर्मात समजल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित जाती मधील आहे.आणि हिंदू धर्माच्या अनेक गोष्टींचा अभिमानी आहे.

In reply to by Rajesh188

सर्व श्रेष्ठ धनुर्धर , दाणी व्यक्ती का .
श्रेष्ठ धनुर्धर ठीक आहे दाणी व्यक्ती कसा ? माझ्या अंगातून फुकट सोने निर्मार होऊ लागले तर मी हि ते जगभर वाटत सुटेन कि...

जगात हिंदुत्व सोडून बाकी काही अस्तित्वातच नाही असे मानणाऱ्या हिंदूंना इतर धर्म हि गोष्टच आउट ऑफ सिल्याबस आहे याची अजूनही जाणीवच झालेली नाही... त्यामुळेच मुळात हिंदुत्व म्हणजे काय याचाच गोंधळ उडालेला दिसतो बरं इतर धर्मानचा उगम भारतभूमीत झाला असता तर काही ना काही जुगाड मारून ते शेवटी हिंदूच असं तरी ठसवता आले असते पण आता तेही शक्य नाही... त्यामुळे जेवढ्या लवकर शहाणपण येईल तेव्हडे बरे असे म्हणण्या खेरीज अन्य काहीच तूर्त शक्य नाही