आयएएस आणि बिहारी गणित :)-
हेमंत वाघे
बिहार कसा आयएएस मध्ये पुढे आहे आणि मराठी तरुण त्यात नाही आहे यासाठी अतिरंजित आणि पूर्णतः: खोटे दावे करणारी एक पोस्ट गेली काही वर्षे येत आहे आणि आता परत आली
त्या पोस्ट नुसार
UPSC चा आज आलेला रिझल्ट १७५७ पैकी एकट्या बिहारने पुन्हा रचला इतिहास.. ११२३ बिहारी बनले IAS अधिकारी..
.
म्हणजे १७५७ पैकी इतर संपूर्ण देशाचे फक्त ६३४; आणि त्यात महाराष्ट्र जवळजवळ नाहीच..
.आता हा रिझल्ट कोणता कोणत्या वर्षीचा हे दिले नाही
आता गंमत बघा हा
( यात काही चूक असेल तर प्लिज सांगा )
UPSC अनेक परीक्षा घेते तर त्यातील राजा समजली जाते हि परीक्षा असते त्यातून IAS अधिकारी निवडले जातात
आता हि परीक्षा होते त्यातून खालील अधिकारी निवडले जातात
प्रशासकीय सेवा (आयएएस), विदेश सेवा (आयएफएस), पोलीस सेवा (आयपीएस), गट अ आणि गट ब ( IAS/ IFS / IPS / Central Services Group ‘A’/ Group ‘B’ Services)
तर २०२० साली झालेल्या परीक्षेच्या मुलाखती अजून व्हायच्या आहेत
मला तरी शेवटचे २०१९ चे रिझल्ट मिळाले
ते रिझल्ट असे ( बायजु वरून )https://byjus.com/free-ias-prep/last-india-rank-for-ias-ips-ifs/
IAS - 180
IFS - 24
IPS - 150
Central Services Group ‘A’ - 438
Group ‘B’ Services - 135
Total - 927
Total IAS/IFS/IPS - 354
लोकसत्ता मध्ये पण याची बातमी होतो **
https://www.loksatta.com/maharashtra-news/upsc-result-2019-five-candida…
लोकसत्ता मध्ये गट बी चे आकडे कमी होते
अजून एक नेट वरील आकडेवारी सांगत आहे कि गेली काही वर्षे फक्त १८० IAS निवडले जात आहेत .
https://www.ksgindia.com/blog/ias-preparation/23552-how-many-ias-office…
पण सांगायचं मुद्दा हा
मी महाराष्ट्रात जिकडे गणित शिकलो तिकडे ११२३ हा आकडा १८० पेक्षा फार मोठा आहे किंवा ३५४ वा ९२७ पेक्षा
जास्तीत जास्त ९२७ मुले जर यूपीएससी फायनल मधून निघत असतील ( त्यात १८० IAS ) तर त्यात ११२३ बिहारी कसे ?
हे बिहारी गणित मला समजावून द्याल का ?
आणि लोकसत्ता सांगते कि - महाराष्ट्रातील ८५ ते ९० मुलांची निवड झाली -
यात ७० तरी मराठी मुले असतील ना ?
आता हि ७० - ८५ - ९० हि सर्व निकालात असतील
आणि त्यात IAS कमी असतील
आणि त्यावर पण बिहार / उत्तर प्रदेश मधली असणार
पण महाराष्ट्रातील पण ७-८ टक्के मराठी मुले असतील
आणि हा आकडा वाढत आहे
बाकी इतके हजारो IAS ( असल्या आकडेवारी नुसार ) देऊन त्यांचा बिहार / उत्तर प्रदेश च्या प्रगतीला हातभार काय ?ते भाग मागासलेले का ?
तिकडे सर्वसाधारणपणे स्त्रियांचे स्थान काय ?सुरक्षितता किती आहे ?
असले प्रश्न विचारायचे नाही ना ?
- हेमंत वाघे
वाचने
7504
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
असले प्रश्न विचारायचे नाहीत.
:)
व्हॉट्स ॲप
मुळात चर्चा ह्या वर झाली पाहिजे
देशातील सर्व भाषेत UPSC परीक्षा होते
In reply to मुळात चर्चा ह्या वर झाली पाहिजे by Rajesh188
हिंदी भाषेचा एक पेपर असतो
समाज
बिहारी आणि यूपी
ह्याच
In reply to बिहारी आणि यूपी by Rajesh188
वाचू नका असलं काही..
+१
In reply to वाचू नका असलं काही.. by चिगो
नमस्कार साहेब. आपल्या व्यस्त
In reply to वाचू नका असलं काही.. by चिगो
उज्ज्वलजी
In reply to नमस्कार साहेब. आपल्या व्यस्त by Ujjwal