Skip to main content

चालू घडामोडी - जून २०२१ (भाग 4)

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 20/06/2021 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
६२०० कोटींचे शेअर्स विकून होणार कर्ज वसूली; बँकांना गंडवणाऱ्या विजय माल्याला दणका.... https://www.loksatta.com/arthasatta-news/sbi-led-banks-to-sell-vijay-ma… -------- वसुली योग्य मार्गानेच जात आहे, असे वाटते ...

वाचने 36569
प्रतिक्रिया 110

प्रतिक्रिया

क्रूरपणाचा कळस! आधी फसवून लग्न, मग धर्मांतरासाठी बळजबरी आणि अल्पवयीन मुलीवर बलात्कार... -------- https://www.loksatta.com/desh-videsh-news/up-man-marries-woman-after-fa… --------- काय बोलावं ते सुचेना....

In reply to by मुक्त विहारि

धर्म ही एक भौतीक अन राजकिय बाब आहे हे जितक्या लवकर लक्षात येइल उपाययोजना तितक्याच सोप्या होत जातील.

In reply to by मुक्त विहारि

योगी च्या राज्यात असे पण घडते ह्याचे आश्चर्य नाही वाटत. भारत देशातील यूपी आणि बिहार ही राज्य अत्यंत मागास आहेत.ह्या राज्यात नेहमीच कायदा सू व्यवस्थेचा bandbaja वाजलेला असतो. ह्या दोन्ही राज्य मुळे दिल्ली पण असुरक्षित होते. दिल्ली च्या अनेक मुख्यमंत्र्यांनी तसे व्यक्त पण केले आहे. शीला दीक्षित पण बोलक्या होत्या दिल्ली मध्ये गुन्हे घडण्यास बाजूची यूपी ,बिहार राज्य च जास्त जबाबदार आहेत.

In reply to by Rajesh188

आणि करमुसे नामक सामान्य माणसाला मारहाण, कुठल्या राजवटीत झाली?

In reply to by मुक्त विहारि

योगी च्या राज्यात असे पण घडते ह्याचे आश्चर्य नाही वाटत. भारत देशातील यूपी आणि बिहार ही राज्य अत्यंत मागास आहेत.ह्या राज्यात नेहमीच कायदा सू व्यवस्थेचा bandbaja वाजलेला असतो. ह्या दोन्ही राज्य मुळे दिल्ली पण असुरक्षित होते. दिल्ली च्या अनेक मुख्यमंत्र्यांनी तसे व्यक्त पण केले आहे. शीला दीक्षित पण बोलक्या होत्या दिल्ली मध्ये गुन्हे घडण्यास बाजूची यूपी ,बिहार राज्य च जास्त जबाबदार आहेत.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/delhi-police-took-a-photo-wit… भारतीय पोलिस चा दर्जा खरोखर चिंताजनक आहे.पोलिस भरतीचे सर्व नियम बदलून सक्षम,शिक्षित, लोकच पोलिस मध्ये असले पाहिजेत. गुन्हेगार बरोबर फोटो काढण्याची कोणती ही वृत्ती.

In reply to by मदनबाण

(मी व्हिडिओ पाहिला नाही) पण, रवी शंकर यांनी उगाचच राईचा पर्वत केला आहे असे वाटते. त्यांनी कुठेतरी माँ तुझे सलाम चा ऑडिओ असणारे चलचित्र टाकले होते, त्याबद्दल सोनीने तक्रार केली होती, मग DMCA खाली ट्विटर ने तात्पुरते खाते लॉक केले. त्यात माजण्याचा काय प्रश्न समजत नाही ब्वा.

मग DMCA खाली ट्विटर ने तात्पुरते खाते लॉक केले. अगदी बरोबर... त्यांनी ट्रम्प तात्यांचे अकाउंट देखील असेच बंद केले होते. जर अमेरिकन कायदे हिंदूस्थानी नागरिकांना लागु होत असतील तर हिंदूस्थानी कायदे देखील ट्विटरला लागु झाले पाहिजे. [ Do business in India by all means, but follow the laws: RS Prasad on social media rules | Exclusive ] ज्या तत्परतेने त्यांनी अमेरिकन कायद्याचे पालन केले त्याच तप्तरतेने त्यांनी आपल्या कायद्याचे पालन केलेले मला तरी अजुन माझ्या वाचनात आलेली नाही.आता ट्विटर तसे करत नसेल तर त्याला माज म्हंटले तर त्यात काय गैर ? असो... वरती दिलेल्या व्हिडियोत रवी शंकर प्रसाद यांच्यावर टिका करण्यात आलेली आहे, ती देखील आपल्याला कळावी म्हणुन तो व्हिडियो दिला आहे. जाता जाता :- In June 2021, Twitter lost its immunity as an "intermediary" under the Information Technology Act for its failure to appoint a local representative. It will be considered publisher of all materials posted on the platform.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Believer... :- Imagine Dragons


अमेरिकेच्या नादी लागण्याचे काही तोटे तर असणार च .स्वाभिमान नसलेला देश म्हणून च ते आपल्याला ओळखतात. भारतीय कायदे नाही पाळले तरी चालते असे जगातील खूप देशांना वाटत. मल्या ,मोदी ला कसे संरक्षण किरकोळ देश पण देत आहेत तेच माल्या ,मोदी अमेरिका,रशिया,चीन, ह्यांच गुन्हेगार असते तर कोणत्या ही देशाची हिम्मत झाली असती का संरक्षण देण्याची. भारतीय लोकांना ना संस्कृती च अभिमान ,ना त्यांना भाषेचा अभिमान,ना त्यांना स्वतःच्याच कर्तृत्ववान लोकांचा अभिमान.ना देशाचा अभिमान. कशाला आपल्या कायद्यांचा कोण आदर करेल.

In reply to by Rajesh188

तो स्नोडेन आणि असांजे कुठल्या देशात राहत होते म्हणे? कुठेतरी परग्रहावर राहत असणार. अमेरिकेला डोळा वर करून दाखवायची कोणाची हिम्मत आहे म्हणा?

Drone हल्ल्या बाबत काही माहिती दिली आहे का देशाला. कसा झाला,कोणी केला,कोठून केला ह्या विषयी सरकार नी काही निवेदन केले आहे का? फुटकळ नेत्यांनी आणि आणि मीडिया नी (ते पण भारतीय मीडियानं नी) ज्या कमेंट केल्या आहेत त्या सत्य च असतील ह्याची शक्यता कमी आहे.. आताच काही निष्कर्ष काढणे मूर्खपणाचे लक्षण आहे

In reply to by Rajesh188

फक्त आपापल्या जागेपुरते पहावे, उगाच राज्य, देश, जग ह्या सगळ्यांची उठाठेव कशाला. आणि चर्चा करून काय होतंय--- ही आपली मौलिक वक्तव्ये इथे येऊन १८.८ दिवसही झाले नसतील. तितक्यात तुम्ही स्वत:च अमेरिका, ड्रोन, काश्मिर, मोदी, आणिबाणी वगैरेंवर लिहीत सुटला आहात. तेव्हा, स्वतःच्याच सांगण्याप्रमाणे आपल्या घरी बसून 'नाद करायचा नाही' चा खुळखुळा वाजवत बसा, कसे?

In reply to by Rajesh188

आता इथून पुढील काळ रोचक होणार... दहशतवाद्यांच्या समूळबिमोडाची ही सुरुवात आहे असे माझे तरी भाकीत आहे.

महाराष्ट्र हे खेदजनक राज्य, सुमित राघवन आता शरद पवारांच्या ताफ्यावर भडकला आता यांना महाराष्ट्रद्रोही कधी ठरवले जाते ते पाहायचे... . आणि हो.. . खरंच, नाद नाय करायचा महाराष्ट्राचा आणि त्याच्या नेत्यांचा...

सुमित नी फक्त शरद पवार ह्यांच्या विषयी बोलले पाहिजे ते योग्य ठरले असते. महाराष्ट्र राज्य विषयी बोलणे चुकीचं नाही का.

In reply to by Rajesh188

जे काही घडले आहे ते महाराष्ट्रातच घडले आहे ना? की उत्तर प्रदेश/बिहार मध्ये घडले आहे? चुकीला चुकही म्हणायचे नाही का?

In reply to by सॅगी

शरद पवार साहेब म्हणजे म्हणजे महाराष्ट्र नाही. महाराष्ट्र ल उच्च परंपरा आहेत. सुमित राघवन सारखा अत्यंत लहान व्यक्ती महाराष्ट्र वर कमेंट करूच शकतं नाही... मी काही ही चुकीचं सुमित विरूद्ध लिहलेले नाही . . पवार साहेब चुकीचं असतील तर त्यांच्या वर टीका करा . महाराष्ट्र वर टीका करण्याचा नक्कीच त्यांना हक्क नाही

In reply to by Rajesh188

बातमी १.८८ सेकंदात वाचली की असे होते... हा कार्यक्रम शासकीय होता. आणि हा जो काही पराक्रम केलाय तो "महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा विभागाच्या शासकीय अधिकार्यां"नी केला आहे. तेव्हा राज्यावर होणारी टिका स्वाभाविक आहे.

In reply to by सॅगी

जो प्रसंग सुमित शी संबंधित होता .फक्त त्याच्या पुरताच. त्या वरून उच्च मानवीय मूल्य,उच्च परंपरा असणाऱ्या महाराष्ट्र वर तो टीका करू शकत नाही.. राज्य सरकार किंवा संबधित स्थानिक प्रशासन ह्या वर टीका करू शकतो

In reply to by Rajesh188

५ कोटींच्या सिंधेटिक ट्रॅक वर, खेळाडूंना पायी चालायचीही परवानगी नसताना, मंत्र्या-संत्र्यांच्या गाड्या यायला परवानगी दिली जाते, जय हो.... काय ती उच्च परंपरा, आणि काय ते कौतुक..

In reply to by Rajesh188

आपल्याच देशातील इतर राज्यांना खुजे दाखवणे हे आपल्या राज्याच्या "उच्च परंपरे"त बसते का हो?

In reply to by Rajesh188

मग UP बिहार मधल्या एखाद्या घटनेचे शेपूट धरून तुम्ही जेव्हा सगळ्या राज्याला शिव्या घालता तेव्हा हा *धर्म* कुठे जातो?

In reply to by आनन्दा

कुणाकडुन *धर्मा* ची अपेक्षा करता . . त्यांच्यासाठी काहीतरी खोडसाळ पणा करणे हाच एक धर्म आहे. बाकी दगडावर डोके आपटु नका ... त्रास तुम्हालाच होइल . . त्यांच्यासाठी "कंगनाचा हिमाचल" / "योगींचा उत्तर प्रदेश" असतो ... बाकी महाराष्ट्र कुणाचाच नसतो .. हा आइडी मुद्दाम खोडसाळ/ बाष्कळ प्रतीसाद देतो हे माहीत असुनही सगळे त्याला का एंटरटेन करता हेही एक कोडेच म्हणा ..

In reply to by सुक्या

बाकी तुमच्याशी सहमत आहेच...पण त्या बाष्कळपणाचा/खोडसाळपणाचा नाच किती सहन करायचा हा ही एक प्रश्न उरतोच ना?

उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतराचं बीड कनेक्शन आलं समोर; एकाला अटक.... https://www.loksatta.com/maharashtra-news/up-forced-conversion-case-irf… --------- ?

यंदाच्या गणेशोत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर; मूर्तीच्या उंचीपासून अनेक निर्बंध.... "Ganesh Utsav 2021 Maharashtra Government Issued Guidelines Corona Height Ganesh Idol 4 Feet Public Ganesh Mandals | Maharashtra, Ganesh Utsav Guidelines: यंदाच्या गणेशोत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर; मूर्तीच्या उंचीपासून अनेक निर्बंध" https://marathi-abplive-com.cdn.ampproject.org/v/s/marathi.abplive.com/… ------------- ज्या मुर्तीकारांनी आधीच दोन फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मुर्ती बनवल्या असतील, त्यांनी काय करायचे?

In reply to by मुक्त विहारि

मूर्तींच्या उंचीवर मर्यादा कशासाठी हे समजले नाही. घरच्या मूर्तीच्या उंचीवर सुद्धा निर्बंध टाकलेत. बातमीत आस म्हटलंय की कोविड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे सरकार ने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. पण समजा घरातली गणपतीची मूर्ती 4 फुटा पेक्षा जास्त असेल तर त्यामुळे कोविड च्या साथीवर कसा काय परिणाम होईल?

In reply to by रात्रीचे चांदणे

तलावात,समुद्रात न जाता घरातच ,बिल्डिंग च्या टेरेस वर विसर्जन करता यावे हा हेतू . लहान मूर्ती असेल तर ते सोप जाईल.