Skip to main content

नोटा बंदी व परिणाम

लेखक संदीप डांगे यांनी गुरुवार, 17/11/2016 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
नोटा बंदी प्रकरणाने संमिश्र भावना बघायला मिळत आहेत. सर्वच लोक आपापल्या परीघ, आकलनक्षमता, राजकीय विचार, जीवनशैली, पूर्वग्रह यांच्या एकत्रित प्रभावाने सदर घटनेकडे बघत आहेत. सोशल मिडीयावर फिरणाऱ्या एका विनोदचित्रानुसार झीन्यूज च्या लैनीतले लोक्स जाम खुश आहेत, आजतक च्या लैनीतल्याना थोडाफार त्रास होतोय तर एन्ड-द-टीव्हीच्या च्या लायनीत लोक मरत आहेत. जेवढं प्रसार माध्यमं व सोशल मिडीया यातून माहित होतंय, पसरवल्या जातंय त्याबाहेरही बरंच मोठं जग आहे ज्यावर ह्या निर्णयाचे चांगले वाईट परिणाम झालेत, होत आहेत, होणार आहेत. ह्या धाग्याचा विषय आहे की कोणकोणत्या क्षेत्रातल्या लोकांवर याचा कसा परिणाम झाला व त्यांनी त्यातून कसा मार्ग काढला काढत आहेत ह्याबद्दल चर्चा करणे, यायोगे आपल्या परिघाबाहेर काय होतंय व त्यातून आपल्यालाही दोन गोष्टी शिकायला मिळून ज्ञानाचे क्षितिज जरा विस्तारेल. मी सुरुवात करतो व इतर सदस्यांनीही आपले प्रश्न व अनुभव, माहिती सांगावी, जमल्यास तिऱ्हाइत कधी चांगला उपाय सुचवू शकतो हे समजून उपायही सांगावे. एक उदाहरण आहे ट्रान्सपोर्ट च्या ट्रकवाल्यांचं. एखादा गुरुभादूरसिंग मुंबईहून कोलकाता ट्रक घेऊन निघतो, त्याला टोलनाके, जकात, पोलीस, लाच, स्वतःचा खर्च, इंधन इत्यादीसाठी बरीच मोठी रक्कम घेऊन निघावे लागते. कार्ड वापरून व्यवहार करणारेही असतीलच पण खर्चाचे स्वरूप बघता रोख रकमेचा वापर जास्त आहे, तेव्हा आपल्या सरदारजीने दोन ते तीन लाख रुपये सोबत घेतले आहेत, बऱ्याच केसेस मध्ये हि रक्कम वीस लाख सुद्धा असते. पूर्ण रस्त्यात तो ऑन हिज ओन म्हणजे स्वतःवर अवलंबून असतो. अशा प्रसंगी मध्येच कुठेही त्याला अर्ध्या रात्री कळते की आता आपल्या जवळची रक्कम शून्य झाली, फक्त कागद आहेत तेव्हा त्याच्यासाठी सरकारी नियमात बसणारे कोणते उपाय आहेत? लाच घेणारे आता पैसे स्वीकारत नाहीत, जाऊ देतील तसेच याची शाश्वती नाही, पम्पवाले अजून दोन दिवस मदत करतील, एवढी रक्कम कोणतीही बँक बदलून देणार नाही. तेव्हा त्याच्याकडे काय उपाय आहेत किंवा तुमच्या कुणाच्या माहितीत असे काही झालेले? मला वाटतं चिनार जोशी यांना ह्यातलं ठाऊक आहे त्यांनीही आपले विचार मांडावे. इतर प्रसंगांचे स्वागत आहे!

वाचने 122496
प्रतिक्रिया 187

प्रतिक्रिया

In reply to by मराठी कथालेखक

तुमचा पैसा पांढरा , काळा, हिरवा अथवा गुलाबी असल्याबद्दल मी काहिच टिप्पणी केलेली नाही आहे. तुम्ही सरसकटपणे "देशातील जनता तास न तास ATM पूढे उभं राहिल्यावर" असा प्रतिसाद देत आहात. साधारणपणे सगळ्यांच्याच बँका अथवा त्यांच्या शाखा घरा अथवा ऑफिसच्या कामाज्वळ असतात. लांबवर कुठेतरी अकाउंट उघडुन तेच लोक साधारणपणे वापरत बसत नाहित. आपल्यासारख्या काही लोकांचा अपवाद नक्की असेल. अश्या लोकांनी बँक अकाउंट बदलुन घेणे सोयिस्कर असते. अर्थात आता या घाईगर्दीत ते शक्य नसावे. आधीच केले गेले असते तर कदाचित उपयोग झाला असता. आपल्याला बर्‍याच बँकांच्या लायनीमध्ये उभे रहायला लागत असेल तर त्याचा अर्थ आजुबाजुला बर्‍याच बँका आहेत. असे असताना आपण आपले अकाउंत आडवळणाच्या बँकेत का उघडले हे उलगडत नाही. अर्थात त्यामागे आपले काही वैयक्तिक कारण असेल. पण इतके सगळे फिल्टर लावुन झाल्यावर अडलेले लोक फारच कमी आहेत. इतर सर्वांनी लायनीत उभे राहुन सर्वांचेच कष्ट वाढवण्याचे कारण नाही. बादवे तुम्ही हे एक सरसक्ट विधान केले होते. तुम्हाला स्वतःला असा काही अमुकतमुक त्रास होतो आहे असे सांङितले नव्हते आणि त्या अनुषंगाने मी माझे विधान केले नव्हते. त्यामुळे मला असंवेदनशील वगैरे म्हणण्याची मौज वाटली. उगा छोट्या चोट्ञा गोष्टींना असंवेदनशील म्हणायची फ्याशन आली आहे आजकाल. ग्रो अप. अर्थात प्रत्येकाकडे असा समजुतदारपणा असलाच पाहिजे असा माझा अट्टाहास्स नाही. असो.

In reply to by मृत्युन्जय

माझा पैसा पांढराच आहे नोटा डिपॉजिट करायला ब्रॅच मध्ये जावे लागेल पण ज्या बँकेत माझे अकाउंट आहे त्याची ब्रँच जवळपास नाही. ATM मध्ये पैसे मिळत नाहीयेत. समोरच्याची परिस्थिती जाणून न घेता त्याच्या प्रयत्नांना 'अट्टहास' म्हणणे म्हणजे संवेदनशीलतेचा अभाव. प्रत्येकाने दुसर्‍याबद्दल संवेदनशील असावे असा माझा 'अट्टहास' नाही. असो.

मारवा साहेब हा वितंडवाद आहे हे मान्य करून पुढे जाऊ. मी सुरुवात करतो व इतर सदस्यांनीही आपले प्रश्न व अनुभव, माहिती सांगावी, जमल्यास तिऱ्हाइत कधी चांगला उपाय सुचवू शकतो हे समजून उपायही सांगावे. असे लिहून डांगे साहेब ट्रक बद्दलचा प्रसंग लिहितात. शेवटी इतर प्रसंगांचे स्वागत आहे! असे लिहिले आहे. म्हणजे धाग्यात मूळ हा प्रसंगच आहे आणि तो प्रसंग म्हणजे १०० टक्के थापा आहेत. असे असताना चर्चा कशावर होणार. माझ्या मित्राची जी कहाणी मी लिहिलि आहे त्याचे आता २० ट्रक आहेत. तो स्पष्ट म्हणाला ट्रक ड्रॉयव्हर जवळ आम्ही जास्तीत जास्त १०,००० रुपये देतो कारण अत्यंत विश्वासार्ह ड्रायव्हर नसेल तर सर्व ड्रायव्हर कुठेतरी घाटात पाटा तुटला, इंजिन सीझ झाले अशा तर्हेच्या खोट्या तक्रारी सांगून मालकाकडून पैसे काढतात. धंद्याच्या सुरुवातीला त्याला त्याच्या ट्रक ड्रॉयव्हरने खंडाळा घाटात ऍक्सल मोडला ८०००/- रुपये खर्च येईल असे म्हणाला. हा त्याला म्हणाला आहे तिथेच थांब मी येतोय. आणि गाडी घेऊन जाणार होता तेंव्हा थोड्या वेळाने त्याचा फोन आला कि साहेब ते दुसऱ्या मेकॅनिक ला दाखवले त्याने ६०० रुपयात रिपेयर केले. मित्र म्हणाला कि ड्रायव्हर लोक शेंडी लावण्यात पटाईत असतात. कुठेही अफाट खर्च येतो सांगितले( १०,००० पेक्षा जास्त) तर तिथे मला विमानाने जाणे परवडेल. एकदा त्यांना हे कळून चुकले कि साहेब सहज सहजी गंडणार नाहीत यानंतर असे प्रकार कमी झाले. सगळ्या ट्रक ड्रायव्हरचे "वरकड" उत्पन्नच पगारापेक्षा कितीतरी जास्त असते त्यामुळे त्यांना स्वामिनिष्ठा(loyalty) हा प्रकार जरा कमीच असतो. कारण एकाची नोकरीसोडली तर दुसरीकडे नोकरी मिळतेच. तिथेही पगार हे वरचे उत्पन्न धरूनच असतो. बाकी त्यांचे इतर उत्पन्न वेश्यागमन दारू गांजा पिणे इ सुरस चमत्कारिक कथा अनेक आहेत. मूळ हे २ लक्ष रुपये हेच थोतांड आहे तर २० लाख रुपये कुठून येणार. २० लाख रुपयात त्या ड्रायव्हर ला पळून जाऊन नवीन ट्रक घेऊन धंदा सुरु करता येईल ज्या मूळ पायावर डांगे अण्णांनी हा धागा काढला आहे तोच ढिसाळ आहे तेंव्हा त्यावर चर्चा काय करणार. यामुळे यापुढे मी काही लिहीत नाही. इति लेखनसीमा.

In reply to by सुबोध खरे

ज्याचा त्याचा परीघ असतो. डांगे अणांचा परीघ मोठा आहे. त्यांचा अनुभव दाडगा आहे. त्यान्च्या ओळखीतले ट्रक ड्रायव्हर २० - २० लाख घेउन इकडुन तिकडे जातात. याच्या एक दशांश पैसे सुद्धा आम्ही एका देशातुन दुसरीकडे जातो तेव्हा बाळगु शकत नाही. त्यान्च्या माहितीतल्या ड्रायव्हर्स ना जकात भरण्यासाठी आणि इतर खर्चासाठी २० - २० लाख रुपये लागतात ते बघता त्यांचा परीघ किती मोठा आहे याची तुम्हाला कल्पना यायला हवी होती. केवळ हसण्यावारी न्यायची गोष्ट नाही आहे ही. त्या ऐवजी आपण आपला परीघ वाढवुयात. तुम्ही काळे चष्मे लाबुन प्रत्येक गोष्टीकडे बघणार असाल तर मात्र निरुपाय आहे. बाकी अजुन काय बोलणार मी? ज्याचा त्याचा परीघ, वर्तुळ, त्रिज्या वगैरे तुम्ही समजौन घ्यालच अशी आशा आहे. याऊप्पर डांगे सर खोटे बोलत आहेत हेच पालुपद तुम्हाला लावायचे असेल तर चर्चा होणार कशी?

In reply to by मृत्युन्जय

मृत्युंजय साहेब काही नाही तरी २३ वर्षे लष्करात काढली आहेत त्यामुळे एका शहरातून दुसऱ्या शहरात बदलीच्या वेळेस सामान ट्रकनेच पाठवायला लागते. केवळ निवृत्त होऊन १० वर्षे झाली आहेत म्हणून काही बोललो नव्हतो. मुंबईहुन विशाखापटणम येथे १९९८ साली माझे आणि एका मित्राचे सामान एका ट्रक मध्ये भरून पाठवले तेंव्हा त्याचा खर्च रुपये ७०००/- आला( प्रत्येकी ३५००/-) मी मुंबईत सामान चढवले आणि विशाखापटणमला मित्राने उतरवले आणि तोच ट्रक शेवटपर्यंत ४ दिवसात गेला. तेंव्हा एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत सामान न्यायला इतकाच खर्च आला त्यावेळेस ट्रक ड्रायव्हरला काय २ लाख रुपये दिले असतील. उगाच उंदराला ऐरावत म्हणणे फार होते.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर साहेब, मला वाटते तुम्ही दिले आहेत ते उदाहरण आणि डांगे साहेब देत आहेत ते उदाहरण ह्यात फरक आहे. डांगे साहेब जी रक्कम म्हणत आहेत ती डिलिवरीची रक्कम आहे असे मला वाटते. हि पद्धत थोडीफार तरी भारतात होती / आहे /असे वाटते. आता ट्रक ड्रायवरला इतकी रक्कम कोण देईल असे म्हणणे असेल तर त्यात फारसे तथ्य नाही.. भारतात विश्वासावर अनेक गोष्टी चालतात.

In reply to by संपत

डांगे साहेब जी रक्कम म्हणत आहेत ती डिलिवरीची रक्कम आहे असे मला वाटते. हे ही मान्य. मग ड्रायव्हरला काय चिंता..? रक्कम देणारा आणि घेणारा गोंधळ घालूदेत. त्याला फक्त ट्रक चालवायचा आहे आणि रकमेची डिलीव्हरी द्यायची आहे.

In reply to by संपत

स्वकष्टाने कमावलेले २० लाख जर कोणाला द्यायचे असतील तर चेकने देता येतील...कॅश द्यायची काय गरज?

In reply to by टवाळ कार्टा

मी फक्त ड्रायवरकडे इतकी रक्कम असण्याची शक्यता कशी असेल ह्याबद्दल बोलत होतो.. डॉक्टर साहेबांचा त्यालाच आक्षेप होता असे मला वाटतंय.

In reply to by संपत

एखादा गुरुभादूरसिंग मुंबईहून कोलकाता ट्रक घेऊन निघतो, त्याला टोलनाके, जकात, पोलीस, लाच, स्वतःचा खर्च, इंधन इत्यादीसाठी बरीच मोठी रक्कम घेऊन निघावे लागते. कार्ड वापरून व्यवहार करणारेही असतीलच पण खर्चाचे स्वरूप बघता रोख रकमेचा वापर जास्त आहे, तेव्हा आपल्या सरदारजीने दोन ते तीन लाख रुपये सोबत घेतले आहेत, बऱ्याच केसेस मध्ये हि रक्कम वीस लाख सुद्धा असते. यात डिलिव्हरीची रक्कम असल्याचा पुसटसा सुद्धा उल्लेख नाही. आणि वीस लाख ? स्वतःच्या ड्रायव्हर कडे इतकी रक्कम कुणी ठेवेल? बढिया है जाऊ द्या हो साहेब. कशाला वाद घालताय?

In reply to by सुबोध खरे

जाऊ द्या हो! ते दोन 'लक्ष' मूळ मुद्द्यावरून 'लक्ष' उडवण्यासाठी होते हे तुम्ही 'लक्ष' वेळा सांगितले तरी त्यांच्या 'लक्षा'त नाही यायचे! त्यामुळे नवीन मुद्द्यांच्या प्रतीक्षेत राहण्याशिवाय पर्याय नाही.

In reply to by संपत

जर का ते डिलिव्हरीचे पैसे असतील तर मग पावती असायला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे जकातनाक्यावर पावती दाखवायला लागते. जरी तिथे पण रोख पैसे (लाच) देऊन काम होत असेल असे म्हणले तरी १००% होईलच अशी खात्री कोणीच देऊ शकणार नाही. अजून एक तोटा म्हणजे विमा वगैरे काढता येणार नाही. २ लाख ते २० लाख एवढ्या मोठ्या किमतीचा माल विम्याशिवाय नेणे फारच जोखमीचे आहे. त्यामुळे पावती असायला पाहिजे आणि जर असेल तर ही रोख रक्कम काळा पैसा नसावा, म्हणजेच तो बँक खात्यात भरण्यात अडचण यायचं काही कारण नाही. राहता राहिला प्रश्न ड्रायव्हरच्या रोजच्या खर्चाचा. यात खाणे पिणे - नेहमीचा मार्ग असेल तर ढाबेवाले ओळखीचे असतात, त्यामुळे उधारी नेहमीच चालत असेल. जरी नसेल तरी ड्रायवर आणि क्लीनर कडे फक्त आणि फक्त ५००/१००० च्याच नोटा असतील हे गृहीत धरणे म्हणजे फारच झालं. विविध ठिकाणी वाटण्यासाठी (लाच म्हणून) बरेच सुट्टे पैसे ठेवतात. डिझेल - पेट्रोल पंपावर ५००/१००० च्या नोटा स्वीकारल्या जाव्यात असे निर्देश आहेत टोल - बंद आहेत अजून काय असेल ते सांगा, आपण त्यांचे कष्ट निवारणाचा प्रयत्न करू.

In reply to by संपत

ओ संपत भाऊ, कशाला तुम्ही वाद घालताय कोण जाणे? आपण रुपाली पाटील (नाव बदलले आहे) ने अबोर्शन करण्याचं नक्की काय कारण ह्यावर वाद घालूया... ;)

जमल्यास तिऱ्हाइत कधी चांगला उपाय सुचवू शकतो हे समजून उपायही सांगावे.
काही उपाय (आधी योजलेले , काही आता करत आहे) मी बहूधा ATM मधून पैसे काढताना ५००० असे न काढता २०००,२०००,१००० असे काढत असे कारण ICICI च्या ATM मधून बहूधा (५०० पेक्षा मोठी) रक्कम काढताना १०० च्या पाच नोटा यायच्या , बाकी ५०० च्या. त्यामुळे १०० च्या नोटांचा बर्‍यापैकी साठा माझ्याकडे असायचा. त्यामुळे अगदी ९ तारखेलाही परिस्थिती हातघाईवर आली नव्हती. नंतर काही रकमेच्या नोटा बदलल्याने सुस्थितीत होतो. पत्नीने तिच्या एका मैत्रीणीस ५०० रुपये उधार दिले. मला दुसरे वेळेस नोटा बदलणे शक्य नसल्याने ऑफिसमधील एका सहकार्‍यास सांगितले. तिला स्वतला नोटा बदलवायच्या नव्हत्या त्यामुळे तिने माझ्या नोटा बदलून दिल्यात. या संकटाच्या समयी एकमेकांना मदत मागण्यास संकोच करु नये, तसेच शक्य असल्यास कुणाला आवर्जुन मदत करावी. आता काही भाजीवाल्यांनी paytm द्वारे पैसे स्वीकारण्यास सुरु केले आहे. मी आज ऑफिसबाहेरील टपरीवर (जिथे चहा, वडापाव ई करिता २०-३० रुपये खर्च होतात) paytm द्वारे पैसे स्वीकारण्यास सुचवले आहे. बघू सोमवारपर्यंत काही करतो का ते. बाकी थोडी काटकसर चालू आहे, निदान जिथे रोखीनेच पैसे द्यायचे आहेत तिथे खर्च आवरते घेतले आहेत.

असे ट्रकचालकाकडे असलेले २०किंवा कितीही लाख कसे बदलायचे किंवा deposit करायचे यावर उपाय सुचवणे म्हणजे आपल्या ज्ञानाचे क्षितिज नको त्या ठिकाणी विस्ताराणे नसेल का, म्हणजेच एका अर्थाने काळा पैसा खपवायला मदत करणे ! "लाच घेणारे आता पैसे स्वीकारत नाहीत, जाऊ देतील तसेच याची शाश्वती नाही" हे चांगले आहे, आता तरी अडकतील असे लोक.

संपादक मंडळ, भारतात आतापर्यंत सफेद कारभार करणाऱ्या कोणालाही कसलाही त्रासदायक अनुभव आल्याची एकही घटना घडलेली नाही, तसं काही होण्याची 0 टक्के शक्यता असल्याने धाग्याचा मूळ उद्देश व उपयुक्तता शिल्लक राहत नाही. त्यामुळे धागा अप्रकाशित करावा ही विनंती! धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

असहमत. "दिशाभूल करणारी विधाने केल्यानंतर आणि असंबद्ध उदाहरणे दिल्यानंतर आंतर्जालावर नक्की कसा प्रतिवाद होतो" याचे उदाहरण म्हणून हा धागा अप्रकाशित करू नये अशी नम्र विनंती.

In reply to by मोदक

मोदक, तुमच्या युक्तीवादशी तटस्थ आहे, मात्र धागा अप्रकाशित करू नये या मताशी सहमत. ट्रक म्हणजे आपण बालवाडीत ऐकलेल्या पहिल्यावहिल्या सामिष विनोदात वापरलेले रूपक धरून धागा (स्वत:च्या जबाबदारीवर) पुनरपि वाचावा. आ.न., -गा.पै.

कोणाकडे एक कोटी रुपये आहेत काय १०० १०० च्या नोटांमधे? एक ट्रक घ्यावा म्हणतो. ५ फेर्‍यांमधे मुद्दल आणि ६ व्या फेरीत व्याज फेडिन म्हणतो. पार्टनरशिपसाठी व्यनि करावा. रच्याकने शाळेत कॉलेजात जाउन गणित गचकलं असल्याने साधं गणित घालतो ऑ. एका ट्रकात २० टण तूरडाळ मावते. तूरडाळिची ख्रेदी कींमत ६० रुप्ये किलो आहे. सर्कारी गोदामातूण णीघुण डेस्टिणेषण पर्यंतचं अंतर १००० किलोमीटर आहे. प्रतिकिलोमिटर ट्रकास चालवायला ३३ रुपडे खर्च येतो. पुर्ण फेरीमधे टोलवाटोलव क्रुन १०००० रुपडे खर्च येतो. ट्रकड्रायव्हरास मालक २०,००,००० रुपये हातखर्चास देतो. डाळ उतरवायचा खर्चं प्रतिटनास ३५० रुपये येतो. तर २० टण डाळ एकरकमी घेणार्‍या ब्रेक इव्हन कॉष्टीत डाळ इकायची असल्यास किती रुपयास पडेल? वीष्वासु ट्रक डायवर मालकास किती रुपये परत करेल? ----- १० टक्के कमिशण दिल्यास ट्रक विश्वासाने पोचवले जातील ह्याची णम्र णोंद घ्यावी. ----- औषधी गोळ्यांच्या ट्रकास २% सूट.

झीन्यूज च्या लैनीतले लोक्स जाम खुश आहेत, आजतक च्या लैनीतल्याना थोडाफार त्रास होतोय तर एन्ड-द-टीव्हीच्या च्या लायनीत लोक मरत आहेत. सब के सब कमाल के न्यूज चँनल है भाई संदीप निर्णयाच्या विरोधात आहे असे कुठेच नाहि आढळले त्याने धागा काढायचा उद्देश सुध्दा स्पष्ट केला होता.
ह्या धाग्याचा विषय आहे की कोणकोणत्या क्षेत्रातल्या लोकांवर याचा कसा परिणाम झाला व त्यांनी त्यातून कसा मार्ग काढला काढत आहेत ह्याबद्दल चर्चा
पण ट्रक गाळात फसला अन चर्चा तीथेच थांबली. आता जितका दाब अँक्सिलरेटर वर पडेल चाक आणखीनच फसत जाईन ना बाप्पा. जँक अन टॉमि च्या शोधात होबासराव

In reply to by सचु कुळकर्णी

अगदी सहमत. अगदी फर्स्ट हँड अनुभव घेउन लिहिल्याने लेख अगदी छान जमलाय. वास्तविक पहाता एवढ्या किरकोळ रकमा नेण्यास ट्रकड्रायव्हर तयार व्हावेत म्हणजे ते दिल दर्या वगैरे वगैरे आलचं. :)!!! बाकीचे आमच्यासारखे अतिसामान्य बुद्धिमंद लोकं कधी घराबाहेर नं पडल्याने म्हणा किंवा स्ट्रीट स्मार्ट नसल्याने त्यांना हे व्यवहार कसले कळायला. असेचं फॅक्ट्सनी भरलेले, अनुभवगोळीने समृद्ध लेख वाचायला आम्ही मिपावर येत असतो. :)!!! (आईशप्पथ उपरोध नसलेली प्रतिक्रिया)

मला वाटते आत्ता पर्यंत तो ट्रक वाला सगळ्या नोटा गंगेच्या दोन्ही बँक्स वर सोडून आणि ट्रक देखील गंगेत सोडून पायी हिमालयात निघून गेला असावा!

विषय महत्त्वाचा आहे, लोक अकारण फाटे फोडून विषयांतर करत आहेत. डिझेल, दुरुस्ती, टायर बदलणे, रोजचे खाणे पिणे लक्षात घेतले तर देशाची दोन टोके गाठणार्‍या ड्रायवरला प्रचंड पैशाची गरज असते हे नक्की. एवढी रक्कम रोखीऐवजी अनेकजण एटीएम कार्डही वापरत असतील. अर्थात अशावेळी या लोकांची गैरसोय झाली असेल पण निरनिराळ्या ठिकाणी ओळखीपाळखी असतात. तिथे मदत मिळू शकते.

उदाहरणातल्या काल्पनिक ट्रकच्या वीस लाखाचे पुरावे मागणारे प्रत्यक्ष होऊन गेलेल्या एका राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्याबद्दलच्या तुम्ही पुरवलेल्या माहितीबद्दल पुरावे मागतात काय हे पाहणे रोचक असेल. या प्रतिसादामधील.. पुढील भागाच्या अनुषंगाने एक प्रश्न.
उदाहरणातल्या काल्पनिक ट्रकच्या वीस लाखाचे पुरावे मागणारे
या धाग्यावरील काल्पनिक उदाहरणामधील "ट्रकच्या वीस लाखाचे पुरावे" मागितलेला प्रतिसाद मला मिळाला नाही किंवा कळाला नसेल. असा प्रतिसाद कृपया कोणी शोधून द्याला का..?

हैला चार वर्षांनी धागा परत वाचून हसून हसून पुरे वाट झाली आहे. चलन फुगवट्याप्रमाणे आता ट्रकवाल्याकडे ३० लाख रुपये असायला हरकत नाही. डांगे अण्णा ऐकताय ना?

आज काही वर्षांनी नोटबंदी चे त्यावेळी सांगितलेले फायदे वाचून आपली कशी फसवणूक आणी हसवणूक झाली ते कळते. त्यावेळी मी नोटबंदी चा प्रचंड समर्थक होतो. देशाच्या कल्याणासाठी आपण काहीतरी करत आहोत असे वाटायचे. ह्याचा एक वैयक्तिक फायदा मात्र झाला. आता अशा चमकोगिरी योजनांवर चटकन विश्वास ठेवत नाही. चीन मधून udhoyg भारतात येणार, ५ Trillion ची इकॉनॉमी , डिजिटल इंडिया, Atymanirbhay bharat ह्यात ९०% marketing आणी केवळ ५-१०% possibility गृहीत धरतो. अर्थात सगळ्या गोष्टी यशस्वी व्हावीत असे मनापासून वाटते.

In reply to by डाम्बिस बोका

काळा पैसा आणि काळे व्यवहार यात काही फरक पडला असे जाणवत तर नाही. मी पण तुमच्याप्रमाणेच आनंदलो होतो, पण २००० आणि ५०० च्या नोटा काढणार असल्याचा निर्णय जाहीर झाल्यावर ताबडतोब जमीनीवर आलो. खरा तसा उद्देशच नव्हता हे लक्षात आले.

In reply to by डाम्बिस बोका

>>>>आज काही वर्षांनी नोटबंदी चे त्यावेळी सांगितलेले फायदे वाचून आपली कशी फसवणूक आणी हसवणूक झाली ते कळते. सहमत....! -दिलीप बिरुटे

ते फक्त हिंदुत्व चे कातडे घेतलेले होते.हिंदुत्वाची गरज म्हणून bjp sarkar चे ते आंधळे,मूर्ख पणाचे समर्थन होते. हे सरकार हिंदू च काय कोणाचेच भले करणारे नाही हे आता सर्वांच्या लक्षात आले आहे. Notbandi नी देशाचा काहीच फायदा झाला नाही. मात्र प्रचंड नुकसान झाले.

In reply to by Rajesh188

हे सरकार हिंदू च काय कोणाचेच भले करणारे नाही हे आता सर्वांच्या लक्षात आले आहे.... हे नक्की का? -------- महाराष्ट्र राज्यातील काही घटना वाचल्या असतीलच .... 1. साधू हत्याकांड 2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली 3. वीज बिल आणि नुकसान भरपाई बद्दल दिलेली पोकळ आश्र्वासने 4. काही विचारले की, बाप काढायचा असा एकही महिना जात नाही की, ह्या राज्य सरकारने केलेली, बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, ताटात येत नाही... -------

परत नवीन नोट बंदी झाली आहे ! आता नव्याने नवीन रडणे! पण मला चिंता आहे ट्रक वाल्यांची आता तर महागाई पण वाढली आहे तर काय करणार ते तीस लाखांचे ? कसे मॅनेज करणार !

In reply to by हेमंत सुरेश वाघे

थांबा हो.. अजून टूलकिट तयार झाले नसणार. पोस्टमन BBC कडून टूलकिट घेऊन येईल.. मगच सामुदायिक रडारड सुरू होईल.

In reply to by कंजूस

२०१६ पासून लोकं हे बोलत आहेत की २००० च्या नोटा बंद होणार आहेत. ATM मधून फार क्वचित २००० च्या नोटा मिळत असत. बाजारातले सर्क्युलेशन पण रोडावले होते. त्यामुळे हे कधी ना कधी होणारच होते.