पट्टदकल मंदिर समूह - जागतिक वारसा स्थळ
आम्ही कर्नाटकमध्ये हंपी फिरण्यासाठी गेलो होतो. हंपी पाहून झाल्यानंतर आम्ही तिथूनच जवळ असलेल्या "पट्टदकल" ही चालुक्य राजघराण्याची राजधानी पाहण्यासाठी तिथे पोहचलो. युनेस्कोने इ.स. १९८७ साली या ठिकाणी असलेल्या मंदिरांचा आपल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला.
कर्नाटकातील मलप्रभा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या ‘पट्टदकल’ येथे चालुक्यकालीन वास्तुशैलीतील मंदिरे आहेत. ७ व्या शतकाच्या आरंभी सुरु झालेले मंदिरांचे बांधकाम ९ व्या शतकापर्यंत चालू राहिले. चालुक्यकालीन वास्तुतज्ज्ञांनी मंदिरे बांधताना निरनिराळ्या धाटणीच्या वास्तुशैलीत प्रयोग केले. भारतात प्रामुख्याने आढळणाऱ्या ‘द्रविड-विमन’ आणि ‘रेखा-नागर’ अशा दोन वास्तुशैलीतील मंदिरे येथे पाहायला मिळतात. त्यामुळे पट्टदकल मंदिर समूहाला तज्ज्ञांकडून ‘वास्तुकलेची कार्यशाळा’ असे संबोधले जाते. या वास्तुसमूहात एकूण १२ प्रमुख मंदिरे आहेत व ती पायवाटेने एकमेकांना जोडली आहेत. ही सर्व शिव मंदिरे असून त्यांच्या गाभाऱ्यात आजही चांगल्या स्थितीतील शिवलिंग आहेत.
जागतिक वारसा लाभलेलं ठिकण असल्या कारणाने आपल्या तिथे टिकेट्स घेऊन जावा लागत. तसेच स्वछ्तेच्या बाबतीत हि हे एक उत्तम ठिकाण आहे . हे एक खेडे गाव असल्या कारणांनी राहण्या साठी काही नियोजन करून आज काही प्लॅन असतील जवळपास २५ कि. मी . अंतरावर असलेल्या बदामी या ठिकाणी जावे. हा पण पट्टदकल येथे मिळणाऱ्या सुक्क्या भाकऱ्या , सोबत ३ ४ प्रकारच्या भाज्या आणि दही एक उत्तम मेजवानी नक्कीच अनुभव घ्या.
इथे पोहचण्यासाठी जवळच स्टेशन आणि बस स्थानक हे बदामी. जर तुम्ही बदामी ला थांबत असला तर, तिथून ३ जागतिक वारसा स्थळांना भेट देता येते -
१. बदामी
२. ऐहोळे
३. पट्टदकल
इथले मंदिरे पाहण्यासाठी आपला हा " Pattadakal - Harmonious Blend of Indian Architecture - UNESCO Heritage Temples - 4K Musical Journey" व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या प्रतिक्रया द्या .
वाचने
9658
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान.
छान.
धन्यवाद !!!
In reply to छान. by कंजूस
छान .आवडले
भव्य आहे नंदी ! +१
In reply to छान .आवडले by गोरगावलेकर
एका दिवसात ?
In reply to छान .आवडले by गोरगावलेकर
हो. एका दिवसातच
In reply to एका दिवसात ? by कंजूस
मग झकासच.
In reply to हो. एका दिवसातच by गोरगावलेकर
खरं तर इथं एक आठवडा निवांत
In reply to मग झकासच. by कंजूस
सुंदर व्हिडियो आणि माहिती !
धन्यवाद !!!
In reply to सुंदर व्हिडियो आणि माहिती ! by चौथा कोनाडा
___/\___
खूप छान व्हिडिओ.